नाते बहरले प्रेमाचे - 2 Reshu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते बहरले प्रेमाचे - 2















मागच्या भागात....

आरोही समीर सोबत बोलून निघून गेली....

पण समीर तो त्याला आरोही ची जास्त काळजी वाटत होती... आरोही जेवढी शांत होती .. त्याच्या दुप्पट तर ती कमीत कमी सर्वांपासून दूर व कोणाशीही जवळील संबंध ठेवायची नाही... मग कोणाजवळ मन हलकं करणं तर दूरची गोष्ट... आणि दुसरी व्यक्ती होती ती होती आभा. . आरोहीची जिवलग मैत्रीण कमी बहीण जास्त.. तर आभा ही चंद्रपूर जिल्ह्यातील राहणारी पण आभा ची फॅमिली पुणेला नेहमी साठी शिफ्ट झाले होते... आरोही पण पुण्यातच राहत होती... पण होस्टेल ला .....आभा आणि आरोहीची मैत्री ती झाली होती.. जेव्हा आरोहीने लाॅ काॅलेजात एडमिशन घेतली होती बस् त्या पहिल्या दिवशी पासूनच आरोहीची आणि आभाची मैत्री झाली होती...

आरोही घरी येऊन फ्रेश झाली आणि बेड वर पडली... आज जे झालं होतं त्याबद्दल विचार करून तर तिला झोपच येत नव्हती.. विचार करून कीती वेळ गेला असेल पण आरोही एक सेकंद सुद्धा झोपली नाही.. थोड्याच वेळात दिवस उजाडला .... मग तिच लग्नाची धावपळ लग्न घरीच होतं...

लग्नाला सुरवात झाली.. सर्व विधी.. सात फेरे सप्तपदी.. अस करत पुर्ण दिवस् गेला त्यात.. पण विक्रांतने एकदा पण आरोही कडे पाहिलं सुद्धा नाही .. मग आईसाहेब यांनी आरोहीची पुर्ण सोरते परिवाराशी ओळख करून दिली.. पाहुणे म्हणाल तर कोणीही नाही.. फक्त घरचे होते कारण विक्रांत एकाच अटीवर तयार झाला होता .. की लग्नाबद्दल फक्त घरच्यांना आणि त्याचे काही फ्रेंड आहेत त्यानाच माहिती असायला हवी... मग आईसाहेब पण तयार झाल्या .. कारण आईसाहेब यांच्या मते तरी विक्रांतने कधीही लग्न केलं नसतं.. मग त्यांना विक्रांतची ठेवलेली अट मान्य करावीच लागली..

मी तुझ्या जवळ बसू का इथे ? ... " आरुष आरोहीची परवानगी घेतं बोलला..

का नाही.. ये बस क्युटीपाय् .. तु ना खुपच क्युट आहे माहिती आहे का तुला ? ... " आरोही

Yes I know I'm cute 😊...पण मला राग येतो.. माझे सर्व झण नुसते गाल ओढतात 😖.. " आरुष

ओ माय क्युट बेबी तु ना आहेच क्युट मग तुझा लाड तर सर्वच करतील ना.. आता मी बघ माझा लाड कोणीही करत नाही 😞.... " आरोही खोटं खोट सॅड होत बोलली..

नाही मी करेल ना तुझा भरपूर लाड.. विकांत चाचू पेक्षा पण जास्त... " आरुष आरोही च्या गालावर पप्पी घेऊन बोलला..

ओके छोटे क्युट बेबी.. " आरोही

चाची मला फोटो काढायची आहे तुझी... काढु का❓... " आरुष निरागसपणे बोलला..

ओके बेबी.. मला काही प्राॅब्लेम नाही आहे... " आरोही

खरंच आरुष ने आरोही चा छान फोटो काढली...



आरुष त्याला फोटोग्राफर बनायचं होतं मग काय आरोही पासून सुरुवात.. 😂 आता कीती दिवस हा त्याचा फोटोग्राफी चा छंद राहिल पाहू सामोरं..



" आरोहीने रेड गोल्डन कलरचा लहंगा घातला होता आणि मेकअप.. हातात मेहंदी जी खुपच सुंदर दिसत होती तिच्या हातावर... असा हा आरोहीचा साधारण रुप जो कोणीही घायाळ होईल असा.. "

विक्रांतला तर अस झालं होतं.. केव्हा ह्या कचाट्यातून निघेल...

विक्रांत बेटा जा जोडीने सर्वाचा आशिर्वाद घ्या.. " आईसाहेब

आईसाहेब पुष्कळ झालं.. मला इथे वैताग आला आहे.. आणि जे आहे ते लवकर निपटवा मला रात्रीच्या फ्लाईट ने बिझनेस च्या कामानिमित्त हैद्राबाद ला निघायचं आहे मला .... " विक्रांत वैतागून बोलला

अरे पण.. आईसाहेब काही बोलणार त्याआधीच विक्रांत..

मी इथेच आहे आणि तुम्ही लवकर नाही निघालात तर मी हे लग्न सोडून जायला पाच मिनिटे पण लागणार नाही.. तर आईसाहेब प्लीज... " विक्रांत चिडून बोलला कारण त्याला बिझनेस पेक्षा काही महत्त्वाच्ं नव्हतं

बरं ठिक आहे.. त्यांनी विक्रांत मुळे लवकर निपटवायला घेतलं.. आणि फायणली ते निघाले पुणेला जायला..

जायच्या वेळेस तर आरोही मामांना आणि तिचा छोटा भाऊ अक्षय यांच्या गळ्या पडून खूप रडली.. कारत ते दोघेच तिचे होते.. बाकी तर तिच्या साठी आपले असून पण परायेच होते.. आणि ते निघाले एकदाचे..


पुणे..


गाडी सोरते राजवाड्यात आली.. दारात छान फुलांनी सजवलं होतं.. विक्रांत आणि आरोही यांच्या वेलकम साठी विक्रांतची लाडकी बहीण काजल हिनेच सर्व तयारी केली होती.. विक्रांत आणि आरोही दारात आले.. तसच काजल हिने विक्रांत ला अडवलं...

दादा वहिनी कीती हाॅट आणी ब्युटिफुल आहे.. म्हणून तु लग्नाला रेडी झाला..असो पण दादा तुझी चाॅईस भारी आहे रे.. मला ना वहिनी खुप आवडली 😍... " काजल विक्रांत च्या कानात बोलली..


ओके झालं असेल तर जाऊ देशील आज घरात ? .. विक्रांत चिडूनच बोलला आणि जाणार तर त्याच्या अनुसया आजीने रस्ता अडवला..

नाही पहिले एकमेकांचा नाव घ्या मगच घरात जाऊ देईल.. .. " अनुसया आजी

काय फालतू पणा आहे हा.. झालं ना लग्न ...जबरदस्तीने करून घेतलं तेवढं पुरे नाही आहे का तुम्हा सर्वांना.. " आणि चिडून विक्रांतने हातातील वरमाला फेकली आणि घरात जाऊन आपल्या रुममध्ये गेला

हा मुलगा केव्हा स्वत ला चेंज करेल काय माहीत ? ... " आईसाहेब निराश होऊन बोलल्या

बेटा तु काही वाईट वाटून घेऊ नकोस ये आत ये ... आणि तो तसाच आहे. " संध्या आरोही ला..

आरोहीने पायाने तांदळाचं माप ओलांडून.. मोठ्या परातमध्ये कुंकवाच्या पाण्यातून तिच्या पायाचे ठसे उमटवून आरोहीने घरात प्रवेश केला..

काजल बेटा आरोहीला तुझ्या रुममध्ये घेऊन जा.. " आईसाहेब

आरोही बेटा कशाच टेन्शन घेऊ नकोस.. काही वाटलचं हक्काने सांग आणि फ्रेश होऊन आराम कर थोडा प्रवासानंतर बरं वाटेल.. " आईसाहेब आरोही च्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून बोलल्या

तेवढ्यात तरी आरोहिला भरुन आलं.. तिला मायेची तर गरज होती.. तिला दोन मिनिटांसाठी तर असं वाटलं की तिला जर अशी फॅमिली भेटली असती तर किती छान झालं असतं... पणण तिने आपल्या मनातील विचार झटकले. कारण त्याचं लग्न फक्त सहा महिन्यांच होतं...

आईसाहेब मी तुम्हांला आई बोलली तर तुम्हाला काही प्राॅब्लेम नसेल ना ? ... आरोहीने आईसाहेब यांना थोड दबक्या आवाजात विचारलं

नाही आम्ही सर्व त्यांना आईसाहेब बोलतो.. आणि तु आज आलेली.. त्यांना आई बोलशील.. तुला काही मान वगैरे आहे की नाही. आपल्या पेक्षा मोठ्या लोकांना मान देऊन बोलायचं येवढं पण नाही का कळत तुला.. .. " विक्रांत ची माॅम आरोही ला रागावून बोलल्या..

शुभ लक्ष्मी जरा तोंड सांभाळून बोला. सून आहेत त्या तुमच्या.. आणि मान देऊन बोलण्यापेक्षा मानाने वागायला हवं... आणि आरोही बेटा नाही मला काही प्राॅब्लेम नाही.. तु मला आई बोलू शकते.. आईसाहेब बोलल्या.. आरोही ला पण छान वाटलं

Thank you so much❤😊 आई.. " आरोही

विक्रांत च्या माॅम ला तर आरोही चा रागच आला..

घर कसला मोठा अलिशान राजवाडाच होता तो.. प्रशस्त मोठा हाॅल.. मधात मोठमोठे सोफा सेट.. खुप मोठा झुंबर... हाॅलच्या बाजूला मोठी अशी माॅर्डेन किचन.. ... हाॅलच्या राईट साईडहून जाणाऱ्या पायर्या.. दुसऱ्या मजल्यावर मोठ मोठ्या रुमा ..

काजल आरोहीला घेऊन तिच्या रुममध्ये गेली..

अगं वहिनी बसं ना इथे.. आणि थांब तुला भुक लागली असेल ना.. मी शारदा काकुनां काही तरी बनवायला सांगते ..... " काजल

नाही नाही नको मला भुक पण नाही आहे.. " आरोही

अगं असं कसं भाग्यश्री वहिनी ने सांगितल की तु नीट जेवली नाही आहे.. नाही काही खाऊन घे.. आणि तु माझ्याशी मोकळे पणाने बोलू शकतेस.. I know.. दादा रागीट आहे पण मनाने तेवढाच हळवा आहे ग.. आणि त्याचा गोष्टी मनावर नको घेऊ.. बाकी तर मी आहेच तुला सपोर्ट करायला.. ओके आणि नंनंद नाही तर बहिणी प्रमाने मान.. ओके ... " काजल

😊 ओके.. आणि तु नव्हती ना लग्नाला ? ... " आरोही

अगं मी आताच मुंबई वरुन आली.. मला काॅलेज मधून सूट्या भेटल्या नाही. म्हणून दादा चा लग्न मी मीस् केलं

ओके नो प्राॅब्लेम.. आरोही ला पण बरं वाटलं.. कारन काजल पण आरोही च्या वयाची होती म्हणून ती काजलशी मनमोकळेपणाने बोलायची

विक्रांत फक्त अर्धा तासात त्याने आपल्या बॅग पॅक केल्या आणि बाथ वगैरे घेऊन तो रेडी झाला.. आणि निघाला.. हैद्राबाद ला जायला.. त्याने आईसाहेब यांचा आशिर्वाद घेतला त्यांना स्वतः ची काळजी घ्यायला सांगून गाडीत बसून निघून पण गेला ...

ह्यातच सात आठ दिवस गेले.. रात्रीच्या बारा वाजताच्या दरम्यान विक्रांत घरी रिटर्न आला.. पण आरोही ला स्वतः च्या रुममध्ये पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.. तसाच त्याने धाडकन दरवाजा आपटला आणि बाहेर गेस्ट रुममध्ये झोपायला गेला.. आईसाहेब यांच्याशी सकाळी बोलू असा विचार करून त्याने लाईट्स आॅफ केल्या आणि झोपला..

सकाळी आरोही उठली.. बाथ घेऊन ती तयार झाली.. आणि मिरर सामोरं रेडी होत होती.. तिने ब्लॅक कलरची फुल नेटवाली साडी घातली होती.. वन साईड केसांचा आंबाडा घातला होता.. ती खुपच सुंदर दिसत होती.. तेवढ्यात तिथे रागाने विक्रांत आला..

तु माझ्या परमिशन शिवाय माझ्या रूममध्ये का आली.. आणि तुला आधीच सांगितल आहे आपल्या मध्ये कोणतही नवरा बायको चा रिलेशन नसणार मग माझ्या रुममध्ये करत का आहे तु.. आपला सामान घे आणि निघ माझ्या रुममधून.. " विक्रांत

आरोही फक्त उभी होती आणि डोळ्यातून अश्रु निघत होते.. " कारण विक्रांतने आरोहीचा हात मागे हून खुपच जोरात पकडून होता त्यामुळे तिला खुप दुखत होतं ..








आरोहीने जोरात त्याचा हात झटकला पण त्याची पकड येवढी होती की तो जागचा हलला पण नाही..

आईसाहेब अचानक आल्या त्यामुळे त्याने तिला सोडलं .. तशीच आरोही रडत रूमच्या बाहेर गेली ..

विक्रांत काय आहे हे.. तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हतीच.. " आईसाहेब विक्रांतला रागाने बोलल्या

मला नाही माहिती पण मला ती मुलगी माझ्या रुममध्ये नकोय.. And that's it 😡 .. " विक्रांत

ठिक आहे तुला ती मुलगी तुझ्या रुममध्ये नकोय ना.. तर मी पण ह्या घरात राहणार नाही.. आणि माझ मेलेला चेहरा पाहशील तु ... " आईसाहेब

आईसाहेब काय बोलतीयेस तु.. ह्या नंतर बोलली तर बघ मग.. .. " विक्रांत

मग माझी गोष्ट ऐकावीच लागेल तुला.. नाही तल माझा मेलेला..

ठिक आहे राहू द्या माझ्या रुममध्ये त्या मुलीला.. " विक्रांत आणि टेबलावरचा फ्लाॅवर पाॅट जोरात जमिनीवर आपटून गेला..


नाष्टा करतांना पण विक्रांत चा सारखा लक्ष होता तिच्या कडे.. पण आरोही ती चुपचाप बसली होती..

अग शारदा तो किचनमध्ये माझा औषधींचा पाॅकेट राहीला आणुन देते का.. आता

आई मी आणुका.. काही प्राॅब्लेम नसेल तर.... " आरोही

ठीक आहे जा आण.. " आईसाहेब

आईसाहेब तुम्हाला आधीच सांगतोय मला ह्या लग्नात काहीही रस नाही आहे.. तुम्ही त्या मुलीची लाईफ खराब करत आहात.. " विक्रांत

आईसाहेब काही बोलणार त्या आधीच आरोही येतांनी दिसली पण आरोही येतांनी कसं तरीच करत होती. आणि पाहता पाहता ती जोरात जमीनीवर बेशुद्ध पडली.. तिच्या डोक्याला लागलं आणि त्यातून थोड रक्त पण

विक्रांत जोरात ओरडला.. आरोही.. तिच्या जवळ गेला.. तिला शुध्दीत आणण्यासाठी प्रयत्न केला पण आरोही काही केल्या उठली. नाही

माॅम call the doctor... Fast. .. " विक्रांत

आरोही ला उचललं आणि रुममध्ये घेऊन गेला विक्रांत

आईसाहेब यांना तेवढंच बरं वाटलं...


क्रमशः

भाग वाचून सांगा कसा आहे.. 😊