मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १७ - शेवटचा भाग

ती चिठ्ठी मी उघडून वाचायला सुरुवात केली.

प्रिय दुसरा मित्र,
तुला मी माझ्या बरोबर घडलेली सर्व हकीकत सांगितली. पण एक सत्य अजूनही बाकी आहे. ते तुला सांगणार होतो. पण रजनीच्या प्रेमामुळे आणि तिच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून या चिठ्ठीत तुला उरलेल्या गोष्टी सांगणार आहे. 
संजय आता मोठा राजकीय नेता झाला आहे. संध्याने एमएस्सी केले आणि ती निशा दोघी अजुनही बरोबरच आहेत आणि एका ठिकाणी काय काहीतरी काम करतात. विवेक चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. आम्याला आता त्याचे स्वतःचे दुकान मिळाले. संजय आणि संध्या, विवेक आणि निशा, आम्या आणि त्याच दुकान, अशा तीन जोड्या मला खूप आवडल्या. पण चौथी जोडी रजनी आणि माझी ती मला काही आवडली नाही. 
माझं पूर्ण नाव समीर हरी देशमुख आहे. एस डी कंपनीचा मालक, हे कोणालाच माहिती नाही. पाच वर्षापूर्वी माझ्या आईची तब्येत एकदमच बिघडली आणि ती देवाघरी गेली. त्यानंतर तीन वर्षांनी बाबांची तब्येत बिघडली आणि वयोमानानुसार बाबाही गेले. एक ते दीड वर्षांनी मी सर्व कारभार माझ्या हातात घेतला. गेल्या दहा महिन्यापासून मी आता त्या कंपनीचा मालक आहे. 
दोन महिन्यांपूर्वी मी एक कागद शोधत होतो. पण तो काही मिळत नव्हता, म्हणून बाबांच्या खोलीत गेलो आणि बाबांनीच कुठेतरी ठेवला म्हणून त्याला पाहत होतो. बाबांची सर्व खोली पाहिली, पण तो कागद काही मिळाला नाही. आता बाबांचे एक कपाट उरलेले होते ते पहायला गेलो. मी ते कपाट उघडले, त्यात मला तो कागद मिळाला पण अजूनही काहीतरी मिळाले. पण मी आता त्याबद्दल कसं सांगू त्याचाच विचार करत आहे.
त्या दिवशी त्या कपाटातून मला माझे दत्तक पत्र मिळाल्याने, मी हरी देशमुख यांचा दत्तक मुलगा होतो आणि मला सरपोतदार अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आलं होतं. 
मी माझी सर्व प्रॉपर्टी अनाथ आश्रमाच्या नावावर केली आहे आणि मी आता जात आहे कधीच न परत फिरण्यासाठी, मी गेल्यावर ही चिठ्ठी सुरेश काकांना दे, त्यांना म्हणाव आश्रम जुने झाले आहे आता नवीन इमारत बांधा.
रजनीला सांग तिने माझ्यावर खर प्रेम केलं. पण त्याला काही अर्थ नव्हता, अर्थहीन होतं ते प्रेम.
सुरेश काकांना सांग आत्तापर्यंतचे धर्माचे अनाथाश्रम तुम्ही चालवत होते. ते चांगलेच आहे, पण मी गेल्यानंतर तिथल्या मुलांना आम्या, संजय, विवेक, समीर यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगा, तेव्हाच खऱ्या अर्थाने सरपोतदार अनाथाश्रमात धर्माच अनाथाश्रम राहणार नाही.

- तुझाच मित्र समीर उर्फ आशिष


आता सांगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. सर्व काही सरळ धाग्यासारखं झालं होतं. गुंता सुटून मोकळा झाला होता. मी त्यानंतर वर मान केली तर सर्व जण रडत होते. काहीजण स्वतः वर तर काहीजण समीर वर राग काढत होते. इतकी भयानक शांतता पसरली होती की, माझा जीव गुदमरायला लागला होता. मी आता जाण्याची तयारी केली आणि जायला निघालो. ती चिठ्ठी सुरेश काकांच्या हातात दिली. माझी बॅग उचलून मी दरवाजा वर येऊन उभा राहिलो. मागे वळून पाहिले तर मला सर्व दिसत होते आणि प्रत्येकाला एक स्वप्न देऊन गेलेला समीर त्यांच्यात दिसत होता.
संजय, अमर, विवेक, संध्या त्यांच्याबरोबर निशा, सुरेश काका, काकू, छोटी आई, पिंकी आणि मोठा झालेला बंटी सर्वजण माझ्या डोळ्यापासून दूर जात होते. पायरीवर बसून रडताना गुलाबी रंगाच्या आणि ओढणी नसलेली रजनी काहीतरी सांगून गेली. तिच्या मनात एक विश्वास होता एक आठवण होती.

एका वर्षानंतर,

पुन्हा एकदा मला अनाथ आश्रमाच्या एका कार्यक्रमासाठी बोलावले. मी गेलो सुरेश काकांनी समीरने दिलेल्या प्रॉपर्टीतून आश्रमासाठी एक नवीन भव्यदिव्य अशी इमारत उभी केली होती.
काका आता म्हातारे झाले होते. आम्या त्याच्या दुकानात व्यस्त झाला होता. संध्या आणि संजयच आता लग्न झालं होतं. विवेक आणि निशा सुद्धा लवकरच लग्न करणार होते. सर्व आता दुःख विसरून कामाला लागले होते. 
समोरून मला रजनी येताना दिसली. सूट पॅन्ट मध्ये एकदम रुबाबदार दिसत होती. ती आल्यावर तिने मला नमस्कार केला आणि आल्याबद्दल धन्यवाद बोलली. पाहुण्यांच्या खुर्च्यांमध्ये मला पहिल्या खुर्चीवर बसवले, कार्यक्रम सुरु झाला. नव्या अनाथआश्रमाचा सर्व कारभार आता रजनी सांभाळत होती. संजय आणि आईने तिला लग्न करण्यासाठी सक्ती केली नाही. 
त्या दिवसानंतर तिने पंजाबी ड्रेस सोडला असावा. समीरच्या मूर्तीचे अनावरण माझ्या हस्ते होणार होते, पण मी ते रजनीनेच करावं असा आग्रह केला. कार्यक्रम संपल्यावर परत जाण्यासाठी निघालो आणि सर्वांचा निरोप घेतला. रजनीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, आश्रमाच्या मुख्य दरवाजावर येऊन थांबलो.
सवयीप्रमाणे मी मागे वळून मान वर करून पाहिले. मला दिसली समीरची एक आठवण अनाथाश्रमात मुख्य दरवाजावरचे मोठे नाव,

"मित्रांचे अनाथाश्रम"

The End - दुर्गेश यशवंत बोरसे

रेट करा आणि टिप्पणी द्या

Shubhangee Talekar

Shubhangee Talekar 1 महिना पूर्वी

M I

M I 2 महिना पूर्वी

Amazing.... नेहमीप्रमाणेच...

Durgesh Borse

Durgesh Borse मातृभारती सत्यापित 2 महिना पूर्वी