श्वास असेपर्यंत - अंतिम भाग Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - अंतिम भाग




चल राहुल (कहानी ऐकणारा _भाग पहिल्यावरून ) , बघ दिवस उजाडला . पाऊसही थांबलाय !! घरी जाऊन तू आराम कर ! रात्रभर झोपला नाही , ऐकत होता माझी करून कहाणी. माझा हा नित्यक्रम झालेला आहे. म्हातारा झालोय मी. कुठे चालायला गेलो की धापा लागतात. म्हातारे बाबा ( अमर) बोलत होते. आयुष्य संपलं आहे माझं आता. आयुष्यभर दुःख झेलली . आता म्हातारपणी सुद्धा दुःखाची सवय झाली आहे. " बाबा बोलत होते.

आता माझ्या डोळ्यांत फक्त अश्रू होते. तुम्ही सांगताय ते स्वतः अनुभवलं . एवढे दुःख असून , मनाचा मोठेपणा करून त्या मुलीला ( छाया ) केले. जिच्या एका चुकीने तुमचं चांगलं असणार भवितव्य तुम्ही न केलेल्या चुकीने पुर्णतः बरबाद झालं, चांगल्या भविष्याचा बदनामी मुळे अंत झाला. प्रत्येकचं वेळेस दुःख डोंगराएवढा असून सुद्धा, तुम्ही सहज सहन करून जगत राहिले. नाही तर आज प्रेयशीने धोका दिला, शिक्षकांनी गृहपाठ करून आणायला सांगितलं आणि तो आणला नाही तर शिक्षक कधी कधी मारतात, थोड्या थोड्या कारणांसाठी आत्महत्या करतात. आणि तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा तुम्ही जीवनाशी झटत राहिले, सहन करून जगत राहिले. बाबा, सलाम तुमच्या त्यागाला!!!

अजून खूप सारे प्रश्न माझ्या ( राहुल च्या ) मनात घुमत होते. पण तरी ही बाब एक प्रश्न अजूनही मनात सतत उठतो आहे. तुमची काही हरकत नसेल तर विचारू का????

अरे राहुल , " मला कसली हरकत असणार आहे!!! आज ची पिढी आपल्या जन्मदात्या मात्या पित्याला वृद्धाश्रमात देतात . जे त्यांना जन्म देतात , त्यांचाच वास येतो , किंव्हा तुच्छतेने त्यांच्याकडे पाहून घराच्या बाहेर हाकलून लावल्या जाते!!! तू तर माझी जाणीवपूर्वक विचारपूस केली . मी इथे का राहतो अशी विचारणा केली !!! मग मला तुझ्या बोलण्याची , विचारण्याची कसली हरकत असणार आहे ??? "

" मनात न ठेवता विचारून घे !!! काय सांगता येते, समोर भविष्यात तुला सांगण्यासाठी मी या जगात असेल वा नसेल !!! कारण आता पिकलेले पानं कधी गळून पडेल याचा काही नेम नाही!! पण हे पिकलेले पान गळून पडल्यावर कुणालाचं दुःख होणार नाही एवढं मात्र खरं आहे... तर विचार मग !! "

" बरं बाबा , परत एकदा धन्यवाद !!! माझ्यामुळे तुम्ही कंटाळले सुद्धा असतील, पण मनात तो प्रश्न सतत घुमत असल्याने तो विचारावा वाटतो!!!!

" शाळेपासून - महाविद्यालयापर्यन्त सोबत असणारा , सुख-दुःखात साथ देणारा , भावासारखा , अमर च्या आणि लक्ष्मी च्या प्रेमाचा साथीदार , तुमचा खरा जिवलग मित्र आनंद चे पुढे काय झाले ??? तुंम्ही परत आनंदचा उल्लेखचं केलेला दिसत नाही !!! काही दोघांमध्ये वाद निर्माण होते का ??? तुमची मैत्री लक्ष्मी गेल्याने तुटली होती का??? की मग देवाने तुमच्या जवळ असणाऱ्या , तुम्हांला आवडणाऱ्या व्यक्तीला जवळ बोलून घेतलं???? की ते त्यांच्या विश्वात रमले होते किंवा इतर काही कारणे ???? आनंदच काय झालं नंतर एवढं नक्कीचं सांगा बाबा ???? "

" खूप छान राहुल !!! मनाला हेलावून टाकणारा प्रश्न केला तू बाळा !!! बरं सांगतो आनंद विषयी !! तसंही आनंद हा विषय , व्यक्ती माझ्या दुखण्यावर सुखाचा, आनंदाचा मलम चं लावत असतो . म्हणजे आनंदची आठवण आली की , तो अजूनही आपल्या जवळ आहे असा भास होतो . आमची दोघांची मैत्रीण लक्ष्मी सोडून गेल्यानंतर , आम्ही दुखी , विचाराधीन आणि आपल्याच विश्वात राहायचो. त्यात गावकऱ्यांनी , पाटलांच्या गुंड लोकांनी , लक्ष्मीचा जीव माझ्या प्रेमाने घेतला म्हणून , पाटलाच्या गाव गुंड लोकांनी आम्हांला गावातून हाकलून लावले. आंम्हचं गाव आम्हांला सोडावे लागले. आमच्या राहण्याचा ही प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या ही कठीण परिस्थितीत आनंद सोबतच होता. पण लक्ष्मी आमच्या दोघांच्या आयुष्यात एक आठवण म्हणून राहून गेली. परत आम्हीं दोघे हॉस्टेल ला असतांना इथेही आम्हांला धमकावण्यात आले. त्यात आनंद उगाचं गुरफटला जाऊ नये, माझ्याच्याने त्याला त्रास होऊ नये म्हणून मी पुढे एकटाचं राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला आनंदचा विरोध होता.

आनंद म्हणायचा की, " जरी लक्ष्मी तुझी प्रेयसी असली तरी ती माझी जवळची मैत्रीण होती. आता तिने तर आपली सुटका करून घेतली , पण माझा मित्र अजूनही अडचणीत आहे, त्याला मी सोडून जाऊ शकत नाही.पण माझ्या पुढे तो नमला, आणि तेव्हाचं आम्हांला टाकून जाण्याचा निर्णय त्याने घेतला. जाता जाता मी म्हणालो, परत आपलं शिक्षण सुरू ठेव . एम ए. संपले की, कुठं ना कुठं आपलं पोट भरता येईल अशी नोकरी मिळेलचं .एखाद्या महाविद्यालयात शिकविण्याचे काम कर. आणि सर्व व्यवस्थित झालं की सुखी संसार बसव. आपली सामाजिक कार्याची आवड नेहमी जपत रहा . मी आणि आई जगण्याचा प्रयत्न करतो. तू तुझे आई-वडील , लहान बहीण त्यांच्याजवळ रहा. शेवटी आनंदने आमची रजा घेतली, ती कायमचीचं..."

त्यानंतर बरीचं वर्षे आमची भेट चं झाली नाही. बरीचं वर्षे लोटून गेली. आमची भेट झाली ते ते मागच्या वर्षी . माझा अवतार , माझी परिस्थिती, पण अचानक माझं लिखाण त्याच्या वाचनात आले,. आपला मित्र अमर अजूनही त्याचं शहरात राहतो , म्हणून तो आपली तबियत दाखविण्यासाठी, तो या शहरात आला होता. अचानक पणे त्याची आणि माझी भेट झाली होती. पण त्याला ही टीबी झाला होता.डॉक्टरांनी त्याला टीबी चं निदान सांगितले होते. आणि तो ही शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला. तो इथेचं त्याचाचं इलाज करण्यासाठी आला होता. ऐकून फार वाईट वाटलं. मग एवढे वर्षे काय केलं, कुठे राहिलो या सर्वांवर आम्हीं मनसोक्त चर्चा केली. त्याला एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी लागली होती. मग त्याने लग्न करून आपला संसार बसविला. त्याला एक मुलगी झाली होती आणि आनंदने तिचं नाव मात्र लक्ष्मी चं ठेवलं होतं. लक्ष्मी आठवणीत राहावी म्हणून त्याने आपल्या पोटच्या मुलीला लक्ष्मी हे नाव दिले. मित्र म्हणून तर त्याने खूप मदत केली पण आज तो आमच्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून लक्ष्मीच्या आठवणीत सुद्धा घेऊन गेला. आमचं शेवटचं बोलणं झाल्यावर आनंदने आता माझा निरोप घेतला होता. तो ही थकला हो, वयाने आणि शरीराने सुद्धा. मी पण तसाचं होतो. एकेदिवशी टीबी च्याचं रोगाने परत त्याला माझ्याजवळून देवाने घेऊन घेतले होते. आनंद ला ही आपला जीव गमवावा लागला होता. ही बातमी आनंदच्या च पोरीने म्हणजे लक्ष्मी ने माझा शोध घेऊन सांगितली. लक्ष्मी ला पाहतांना परत भूतकाळात गेल्यासारखं वाटलं..

आज बाबांची कहाणी संपली होती. मी (कहाणी ऐकणारा ) राहुल मात्र आता पूर्णतः भान हरपलो होतो. डोळ्यांत माझ्याही आनंदची, बाबांची कहाणी ऐकून अश्रू येत होते. मनात परत विचारांचे वादळ सुरू झाले होते. बाबांनी ज्यांना ज्यांना जवळ केलं ते सर्व सोडून निघून गेले!!! तरीही बाबा एवढे खंबीर कसे काय ??? प्रेमाचं उदाहरण जरी घेतलं तरी प्रेम न भेटणारे कित्येक मुलं आत्महत्या करतात!!! प्रेम विवाह तर करतात पण शेवटी घरच्यांचा विरोध असल्यामुळे पळून जाऊन लग्न करतात !!! आणि मग दोघेही एक झालो म्हणून आत्महत्या करतात. अशी कित्येक जोडपी असतात त्यांना आयुष्यात दुःख पचवता येत नाही म्हणून, ते निराशेत जाऊन आत्महत्या करतात. ज्यांच्याकडे संपत्ती असते, सर्व सुख सुविधा व्यवस्थित असतांना त्यांना मनाची शांती मिळत नाही, म्हणून ते आत्महत्या करतात . पण बाबाना आयुष्यात सर्वच दुःख आले होते. सुरुवातीला बहिण , नंतर बापाने केलेली आत्महत्या ,नंतर जिच्यावर प्रेम केलं ती लक्ष्मी ही सोडून जाते, आणि शेवटचा प्रिय व्यक्ती म्हणून आनंद तो ही वय झाल्याने, रोगाचा उपचार करतांना मरण पावतो, तरी ही बाबा सर्व सहन करून जगत आहेत!!! एवढे दुःख असून सुद्धा बाबा खंबीर होऊन जगत आलेत, अगदी श्वास असेपर्यंत !!!

मी राहुल, बाबांची कहाणी ऐकून निरोप घेतला.कधी कधी येत जाईल तुमच्या भेटीला असं सांगून. डोळ्यांत फक्त अश्रू होते. कुणी एवढे दुःख सहन करून सुद्धा जगण्यासाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी वाटत होता. बाबांच्या घराबाहेर पडलो. दिवस उजाडला होता . रात्री सतत असणाऱ्या व अचानकपणे हजेरी लावणाऱ्या पावसाने कुठे जमिनीवर पाण्याचे डबके साचले होते . जिकडे तिकडे रस्त्यावर चिखल होता . मध्येच रस्त्यावर कालच्या वाऱ्याने झाडे पडली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती . काही नगरपालिकेचे कर्मचारी ते पडलेले झाडे बाजूला करण्यात गुंतले होते. जिकडे तिकडे रस्त्यावर कालवाकालव सुरू होती. भाजीविक्रेते भाजी आणण्यासाठी आपल्या गाड्या हाताने ओढत घेऊन चालले होते . पेपर वाल्यांच्या सायकली वेगाने पेपर वाटण्यात बिझी होत्या . रात्रभर जागल्यामुळे अंग दुखत होतं . डोळ्यावर झोप होती म्हणून मी ती झोप उडावी, म्हणून चहा टपरीवर गरमागरम चहा घेतला.

आणि परत एकदा विचारात गुंग झालो. लहानपणा पासून बाबांना सारखे चटके सहन करावे लागले, कधी प्रेम केलं म्हणून गावच्या बाहेर हाकलून लावण्यात आले तर कधी जातीवाचक शिव्या देऊन अपमानास्पद वागणूक मिळाली, तर कधी प्रेमाला नकार दिला म्हणून बदनामी चा खोटा आळ म्हणून संपूर्ण आयुष्याची गाडीचं चुकली तरी त्या व्यक्तीला काही एक शब्द न बोलता तिला माफ करून दिलं . किती दुःखाचा डोंगर चढावा लागला बाबांना तरी मात्र ते खंबीर होऊन जगले, आत्महत्या करून सुटका करण्यापेक्षा ते जगण्याचा संघर्ष करत राहिले, अगदी " श्वास असेपर्यंत !!"

कधीमधी मी त्या रस्त्याने गेलो की, बाबांना भेटायला जात असायचो. एके दिवशी त्यांच्याही जिंदगी भरच्या दुःखण्याला पूर्णविराम मिळाला होता. त्यांनीही आयुष्यातून कायमची रजा घेतली होती. अर्थातच वय झाल्याने ,म्हातारपण आल्याने त्यांचाही नकळत मृत्यू झाला त्यांचे निधन झाले.....

कधी तो हसला,
तर कधीच दुसऱ्यांसाठी लढला,
तर कधी तो समाजासाठी झिजला,
त्याची वाटचं वेगळी होती
तरी तो इथेचं जगला आणि जगतचं राहिला ...

कधी घरची संकटे पेलली,
तर कधी प्रेयशीची दुःख पचवली,
तर कधी या निर्दय समाजाची ठोकरे खाल्ली,
तो एक समाजवंत होता ,
तरी तो या भुतलावावर जगला
आणि जगतचं राहिला ....

दुनियेत वावरतांना ,
भयावह काटे टोचली त्याला ,
कधी त्यांच्या भावनेला ,
तर कधी त्याच्या स्वाभिमानाला,
तो एक किर्तीवंत होता,
तरी तो इथेचं जगला आणि जगतचंराहिला...

मानवतेचा तो रक्षण कर्ता झाला ,
निराधारांचा आधार बनला,
अंधांचा तो नयन बनून राहिला,
तो एक आधारस्तंभ होता
तो इथेचं जगला आणि जगतचं राहिला...

शेवटी ,
" श्वास असेपर्यंत " तो राबला ,
नयनांना अश्रुधारा सोडून गेला ,
शेवटी तो थकला ,
तो एक न मरणारा " अमर " होता,
इथेचं जन्माला आला आणि इथेचं संपून गेला....

💐समाप्त 💐


" श्वास असेपर्यंत "
✍️ सुरज मु. कांबळे
एकूण भाग -२५
एकूण वेळ - ३ तास