gift from stars 14 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १४

मेघाताई आणि मिस्टर सावंत यांचं बोलणं सुरु होत. आज भूमी ऑफिस जॉईन करतेय, हे समजल्यावर मेघाताईंना कितीतरी आनंद झाला. क्षितीज आणि त्याच्या पप्पांचे बदलणारे सूर त्यांना आता स्पष्ट दिसत होते. म्हणून त्यांनी मुद्दाम विषय काढला.

''संजय क्षितिजमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येतोय का? तो आता एकटा-एकटा नाही वाटत. पहिल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वाटतो. आणि पॉसिटीव्हही ''

''होय, आणि ते त्याच्यासाठी आणि कंपनीसाठी चांगलं आहे.'' ऑफिसला जाण्याच्या तयारीत असलेले मिस्टर सावंत मेघाताईंना म्हणाले.

''भूमीला असं त्याला न सांगता जॉईन करण्याचं कारण समजेल का?''

मेघाताईंनी डायरेक्ट विषयाला हात घातला.

''भूमी ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने असलेली माझी चॉईस आहे, क्षितिजला मला इथे इन्व्हॉल्व्हड करायचं नाहीय.''  ते मेघाताईंकडे बघत म्हणाले.

''पण का? तो चांगल बोलतो तिच्याशी. इनफॅक्ट त्यांचं छान  बॉण्डिंग आहे.''

''असेलही पण त्याच्या एका चुकीची शिक्षा माझी संपूर्ण कंपनी भोगतेय. आता इथे पुन्हा त्याच रिपीटेशन नको.  मेघा तू यात लक्ष देऊ नकोस, प्लिज.''

''कोणती चूक? मैथिलीला कंपनीत जॉईन करण्याची ना?''

''नुसती जॉईन नाही केलं त्याने,  त्यानंतर माझी कंपनी लॉसमध्ये गेली, म्हणून त्याने तिच्या बापाला पार्टनरशिप द्यायला लावली. आणि आता स्वतःच्या मुलीच्या मागे तो किर्लोस्कर माझ्या डोक्यावर बसलाय.'' मिस्टर सावंत आता फार चिडले होते.

''होय, ते खरं असलं तरीही हे नाकारता येणार नाही, कि मैथिलीमुळे क्षितीज ऑफिसला जायला लागला. नाहीतर नुसता उनाड मुलासारखा वागत होता. आठवत ना?''  मेघाताई आपला मुद्दा क्लिअर करत म्हणाल्या.

''मेघा तुला अजूनही कसं समजतं नाही. त्या मैथिलीला पैसेवाला मुलगा पाहिजे होता, आणि त्याच्या मार्फत आपल्या फॅमिलीला बिझनेसमध्ये सेटल करण्यासाठी तिने क्षितिजचा फक्त वापर केला. एवढं वाईट व्हायला नको होत, पण आपलं सुदैव, की तिचा तो अक्ससिडेन्ट झाला आणि क्षितीज तिच्या जाळ्यातून सुटला.''  बोलताना मिस्टर सावंतांचा राग आता अगदी अनावर झाला होता. नेहमीप्रमाणे त्यांच्या हातापायांची थरथर व्हायला लागली.

''मला असं नाही वाटतं. असो, आपण का वादावाद घालतोय. आता क्षितीज ओक आहे, सो तुम्ही आता त्याला समजून घेत जा. प्लिज.''  मेघाताई त्यांना शांत करत म्हणाल्या.

''येस, सध्या तरी मी तेच करतोय.'' म्हणत ऑफिसची तयारी करून ते बाहेर निघाले होते.

******

आज तिचा नवीन जॉबचा पहिला दिवस. पुचारपूस करावी म्हणून माईंनी भूमीला फोन केला. ''हैलो, झाली का ग तयारी?''

''होय माई, निघतेच आहे.''

''भूमी टिफिन वगैरे घेतला का?''

''होय माई, सगळं घेतलं हो. तुम्ही दोघांनी काळजी घ्या.''

''तू काळजी घेत जा. आम्ही मस्त आहोत. आणि रात्री यायला उशीर झाला तर बाजूच्या गोखले काकूंना सांगून ठेवत जा. त्या तुझं जेवण करत जातील.''

''माई, काकू आत्ताच येऊन गेल्या. आपल्या या फ्लॅटमध्ये एवढ्या दिवसांनी मी राहायला आले, ते आवडलं त्यांना.''

''होय गं, नानांच्या रिटायर्डमेन्टच्या आधी आम्ही तिथे राहायचो ना, चांगली गट्टी जमली होती गं आमची. मुंबई सोडून फार वर्षे झाली, पण त्या आम्हाला विसरल्या नाहीत अजून. ''

'' तुमची आठवण काढत होत्या. सवडीने फोन करा त्यांना, आणि इथल आपलं घर अगदी सुस्थितीत आहे, काहीही काळजी नसावी.'' असं म्हणत भूमी मोठ्याने हसली. पलीकडून स्पिकरवरून माईंचे आणि भमीचे फोन संभाषण ऐकणारे नाना देखील हसले. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांना उत्तर मिळाले होते.

''बरं बाई, उगा पहिल्याच दिवशी तुला उशीर नको. संध्याकाळी फोन कर हो.'' म्हणत माईंनी फोन ठेवला आणि आपली पर्स उचलून हॉलचा दरवाजा ओढत भूमी घराबाहेर पडली.

ऑफिसचा पहिला दिवस, त्यात क्षितिजला काहीही पूर्वकल्पना न देता त्याचीच कंपनी जॉईन करतेय. आणि मिस्टर सावंतांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास... या सगळ्याच प्रचंड दडपण तिच्या मनावर आलं होतं. खरतरं एवढ्या मोठ्या गॅप नंतर पुन्हा काम करण्याची इच्छा तिला नव्हती. पण आयतीच ऑफ़िर चालून आली होती, ती ही तिच्या आवडत्या क्षेत्रात, त्यामुळे आपल्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल टाकण्यासाठी तिने हि संधी एक स्वतःलाच दिलेले आव्हान म्हणून स्विकारली होती.

कॅब पकडून भूमी निघाली, थोडे अंतर पार झाले नसेल तेवढ्यात तिच्या मेल बॉक्समध्ये एक नवीन मेल आल्याचे नोटिफिकेशन तिला दिसले, मेल ओपन केल्यावर मात्र तिच्या चेहेरा उतरला होता. SK ग्रुप ऑफ कंपनीज च्या HR चा मेल होता. ' काही अपरिहार्य कारणामुळे मिस्टर सावंत आज कंपनीमध्ये उपस्थित राहू शकत नव्हते, त्यामुळे भूमीला उद्या जॉईन करायला सांगितले होते.' कदाचित सावंत सरांना त्यांच्या अनुपस्थित भूमीच जॉइनिंग अपेक्षित नसावं. असा भूमीने अंदाज बांधला. नकारार्थी मान डोलावत पुढील मेल वाचत तिने कॅब परत मागे घ्यायला सांगितली. तिच्या मोबाइलवर एक अनोळखी नंबरचा कॉल आला होता. तिने आपला मोबाइल कानाला लावला.

''हैलो, भूमी साठे ?'' पलीकडून विचारणा झाली.

''येस, आपण?''

''मी SK ग्रुप ची HR बोलतेय, तुम्हाला मेल मिळाला असेलच तरीही सरांनी एक फोन करायला सांगितला होता.'' SK ग्रुपची HR बोलत होती.

खरतरं भूमी थोडी गोंधळली होती. तरीही तिने विचारलेले. ''ओके, बोला.''

''उद्या कंपनीमध्ये न्यू प्रोजेक्टच लॉन्चिंग आहे, सो नो फॉर्मल्स, उद्या ड्रेसकोड असणार आहे.  तुम्ही न्यू जॉईंनी आहेत त्यामुळे तुमचा गैरसमज व्हायला नको, म्हणून मी पर्सनली फोन करून तुम्हाला हे सांगते. मेल मिळाला असेलच.''

''ओह, thats fine. मेल बघून मी थोडी गोंधळलीच होती. तुम्ही फोन करून क्लीअर केलं ते बरं केलं.'' आता भूमीला थोडं हायस वाटलं. निशंक होऊन ती उद्याच्या तयारीला लागली.

क्रमश

https://siddhic.blogspot.com/

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED