Gift from stars 18 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १८

चैन सोडवण्याचा प्रयत्न करत असलेली भूमी क्षितीजच्या अगदी जवळ आली होती. दोघांमधील होते नव्हते ते हि अंतर जवळजवळ मिटले.  त्याचा भिजून चिंब झालेला ओला व्हाइट शर्ट आणि तिला अजूनच चिपकून बसलेली तिची सुती साडी, वरून बरसणाऱ्या जलधारा… दुरून पाहणाऱ्याला नक्कीच काहीतरी वेगळा संशय आला असता.  हे लक्षात आल्यावर तिने चैनला जोराचा हिस्का दिला, त्यामुळे ती चैन अजूनच अडकली होती.  मान तिरकी करून उभ्या  असलेल्या तिला तिच्या नकळतं क्षितीज न्याहाळत होता. आज मौसम कुछ और हीं हैं। असं त्याला वाटलं. तिची मात्र वरती पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती.  एवढ्या जवळून त्याला पाह्ण्याच धाडस होतच कुठे म्हणा. तिच्या ओल्या झालेल्या अस्ताव्यस्त केसांच्या काही बाटा नाकावर आल्या होत्या. न राहवून क्षितिजने त्याला हलकेच कानामागे सारले, आणि नकळत हातातील चैन सोडून भूमी  त्याच्याकडे बघत बसली.

अंगावर पडणाऱ्या जलधारा झेलत ते दोघे तसेच एकमेकांकडे बघत उभे होते. 'हम भले ही लाख परदे गिराये, पर नजरे किसी कीं कहा सुनती हैं. ' थोड्याच वेळात रस्ताच्या बाजूने जाणाऱ्या एका गाडीने मोठ्याने हॉर्न वाजवला आणि दोघेही भानावर आले. पटकन मान खाली घालत भूमी थोडी दूर झाली. पण ते अगदी किंचितसे, चैन अजूनही लॉकेटमधून सुटलेली नव्हती. 'कॅन आय' म्हणत क्षितिजने चैन आणि लॉकेट हातात घेतले. भूमीने मान खालीच झुकवलेली होती. हळूच आपले हात तिच्या गळ्यात गुंफून त्याने फासा लावला. तो काय करतोय हे भूमीच्या लक्षात आले नाही. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्यकडे पहिले, आणि तो हळूच तिला बाजूला करून गाडीच्या दुसऱ्या बाजूला वळला. गळ्यात पाहिल्यावर भूमीच्या लक्षात आलं. त्याच लॉकेट तिच्या गळयात होत आणि तिची चैन ही... पण अजूनही त्यांचा गुंता सुटलेला नव्हता. चैन सोडवणे शक्य नाही, हे समजल्यावर क्षितिजने फक्त आपलया गळ्यातील लॉकेटचा फास काढून ते भूमीच्या गळ्यात घातले होते. याला 'सोडवणे म्हणावे कि अजूनच गुंतणे'  हे भूमीला कळेना. गाडीच्या दुसऱ्या बाजूला दाराचे हान्डेलला पकडून तो तिलाच बघत होता.  हात वरती करून त्याने बाय केले आणि तो गाडीत जाऊन बसला. गाडी स्टार्ट करतानाही त्याची नजर तिच्याकडे लागलेली होती. आपला ओला पदर भोवताली लपेटून भिजलेली साडी सावरत भूमीने हलकेच बाय असे म्हंटले आणि ती बिल्डींगच्या गेटकडे वळली.  एकमेकांची चोरी एकमेकांनी पकडली होती. त्यामुळे  परत मागे बघण्याची हिम्मत होतीच कुठे.  गाडीला रिव्हर्स गिअर टाकून तोही निघाला. आरशातून मात्र ती गेली त्या दिशेने त्याचे डोळे वळले होते.  दिल संभल जा जरा, फिर महोबत करने चला हैं तू... अशी दोघांचीही अवस्था होती.

''माई आत्ताच घरी पोहोचले, आवरते आणि थोडं खाऊन घेते.''  भूमीने माईंना फोन करून पोहोचल्याचे कळवले. त्या तिच्याच फोनची वाट  होत्या.

''फार उशीर झालाय ग... जेवून झोप... उद्या सकाळी आठवणीने फोन कर.''  माई

''माई तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत जागे राहणे जाऊ नका... मी अगदी व्यवस्थित आहे, आणि शहर म्हंटल्यावर काहींना काही कारणाने लेट होत असतं.'' भूमी

''होय गं, काळजी घेत जा. फोन ठेवते मी.'' म्हणत माईंनी फोन कट केला.

******

इकडे घरी आलेल्या क्षितिजला पाहून मेघाताईना हायसे वाटले,  काय झालं, ते त्यांना थोडक्यात सांगून क्षितिज फ्रेश व्हायला निघून गेला. भिजून घरी आलेल्या क्षितिजला पाहून मेघाताई आश्चर्यचकित झाल्या होत्या. आशाकाकूंना जेवण लावायला सांगून त्या क्षितिजची वाट बघत बसल्या.

आवरून गॅलरीत येऊन बसलेली भूमी घडलेल्या गोष्टीचा विचार करत होती. गळ्यातील ते लॉकेट हाताने चेक करून तिने चैन आणि ते काढून हातात घेतले. तिच्या चैनध्ये ओवलेल्या बी अक्षराच्या पानावरचे छोटेसे गोल रिंग त्याच्या लॉकेटच्या साखळीमध्ये गुंतलेले होते. सावकाश सोडवले असते तर अगदी सहज सुटेल असा गुंता, पण काल ते सोडवण्याच्या धडपडीमध्ये अजून अडकून बसले. सावकाश सोडवून तिने आपली चैन पुन्हा गळ्यात घातली. हातातील क्षितिजच्या लॉकेटशी खेळत ती विचार करु लागली...  'माझ्यामुळे त्याला उशीर झाला... ऑफिसमध्ये थांबले असते तर बरं झालं असत. पोहोचला असेल का? फोन करून विचारावं का?' म्हणून तिने फोन हातात घेऊन नंबर डाइल केला, पण दुसऱ्याच क्षणी तो डिस्कनेक्ट केला. 'नको... बरं दिसत नाही ते.' म्हणत ती उठून आत आली. बेडवर पडूनही झोप लागत नव्हती. बाहेर पाऊसही अजून बराच होता. पुराच्या बातम्या बघून तिला सारखं वाटत होत की, त्याला फोन करून पोहोचला का हे विचारावे. एकदोन वेळा तिने फोन लावण्याचाही प्रयत्न केलाही, करू का नको, या विचारात असतानाच मोबाइलवर एक मेसेज ब्लिंक झालेला दिसला.

'जस्ट रिच्ड, आर यु ओक? '

-  क्षितीज

मेसेज बघून खरतर तिला खूप आनंद झाला होता. तिने लगेच रिप्लायही केला.

'येस, आय एम फाइन, गुड नाईट.'

'गुड नाईट.' असा पलीकडून आलेला रिप्लाय बघून तिने समाधानाने डोळे बंद केले. हाताच्या मुठीत पकडलेले ते लॉकेट बघताना झोप कधी लागली हे तिला समजलंही नाही.

*****

मैथिली आणि भूमी या दुहेरी पेचात अडकलेला क्षितीज मात्र नाईट लॅम्पची लाइट उघडझाप करत तसाच जागा होता. दारावर हळूच टकटक करत मेघाताई आत आल्या.

''क्षितीज. अजून झोपला नाहीस?''  मेघाताई

''तू जागी आहेस अजून?'' क्षिति

''तू जागा असल्यावर मला कुठे झोप लागते म्हणा... काय झालं?'' मेघाताई त्याचा केसात मायेने हात फिरवत विचारात होत्या.

''काही नाही ग. झोप नाही लागत.'' क्षितिज

''का? तिचा विचार करतोयस ना?'' मेघाताई

''नाही, तसं काहीच नाहीय.'' क्षितीज

''मी कुठे म्हंटल, तस काही आहे.'' मेघाताई हसत त्याला चिडवत होत्या.

''आई... तू पण ना.'' क्षितीज

''बरं, आता सांगणार आहेस काय ते?'' मेघाताई सिरिअस होत म्हणाल्या.

''बऱ्याच दिवसापासून मैथिलीला बघायला जायचं जवळजवळ बंदच केलय. पण भूमीला भेटल्यावर डोक्यात काहीतरी वेगळेच विचार येतात. मला नाही समजत, नक्की काय ते सांगता सुद्धा येत नाही, बट देअर इज समथिंग बिटवीन अस.'' क्षितीज आईचा हात हातात घेऊन त्यांवर डोकं ठेवून झोपला होता.

''यु आर इन लव्ह... भूमी बद्दल बोलतेय मी.'' मेघाताई क्षणाचाही विलंब  न करता बोलल्या.

''कसं काय शक्य आहे? मैथिलीला काय वाटेल, यु नो ना… तिला विसरणं मला शक्य नाही.'' क्षितिज

''विसरू नको, मी तुला तसं करायला सांगणारही नाही. पण डोळ्यावर पट्टी बांधून आंधळं प्रेम करत बसू नकोस, भावनांच्या आहारी जाण्यापेक्षा गोष्टी स्विकारायला शिक. त्याने तुझा त्रास कमी होईल.  मैथिलीने फक्त बिझनेससाठी तुझा वापर होता. हे सत्य नाकारता येत नाही.  आणि आता तू भूमीच्या प्रेमात पडला आहेस, हे सुद्धा तितकंच खरं आहे. ''   मेघाताई

''होय. पहिल्या भेटीतच भूमी आवडली मला. आणि कदाचित तिला देखील मी आवडतो.'' क्षितीज

''काय बोलतो, ते कशावरून?'' मेघाताई आनंद आणि कुतूहलाने विचारात होत्या.

''काल तिच्या वागण्यावरून मला जाणवलं ते. '' क्षिती

''ही चांगली गोष्ट आहे, खरं असेल तर, यु कॅन थिंक अबाउट हर. मला ती अगदी साधी आणि प्रामाणिक वाटली. आवडली देखील...  फक्त तुझी आई म्हणून  नाही  तर एक मैत्रीण म्हणून काही मदत लागली तर सांग, मी आहेच नेहमीप्रमाणे.'' त्याच्या पाठीवर थोपटत त्या बोलत होत्या.

बोलता बोलता क्षितीज तिथेच झोपला, त्याच्या अंगावर चादर टाकून, लाइट बंद करून मेघाताई बाहेर निघून गेल्या. खूप दिवसानंतर...अगदी वर्षानंतर क्षितिज काहीतरी सकारात्मक विचार करतोय हे त्यांना जाणवले होते. त्यामुळे लवकरच साठे काकांना फोन करून भूमीची चौकशी करावी असे त्यांनी ठरवले.

क्रमश 

https://siddhic.blogspot.com/

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED