नक्षत्रांचे देणे - १९ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नक्षत्रांचे देणे - १९

‘सकाळी मेघाताई हॉलमध्ये बसून tv बघत होत्या. आज्जो आपली योगासने आवरून फ्रेश व्हायला निघून गेली, ऑफिसला सुट्टी असल्याने क्षितिजही आरामात उठला होता.’

''गुड मॉर्निंग मेघा.'' म्हणत मिस्टर सावंत सकाळी सकाळी बाहेरून आत येत होते.

''मॉर्निंग. न झोपता तुझी मॉर्निंग एवढी फ्रेश असते.'' नवर्याच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे बघत मेघाताई म्हणाल्या.

''काम असेल तर मला झोप लागत नाही. तुला माहित आहे. महत्वाची एक डील साइन करून आलोय.'' मिस्टर सावंत बोलता असतानाच क्षितीज त्यांच्या मैफिलीत सामील झाला होता.

''गुड मॉर्निंग आई, मॉर्निंग पप्पा.'' म्हणत तो किचनकडे वळला.

''नवीन मॅडम ना डायरेक्ट घरी सोडून आला का?'' मिस्टर सावंतांनी त्याला खोचक प्रश्न केला. आणि त्याचे पाय जागच्या जागीच खिळले.

''होय. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. ती रिसिप्शनिस्ट तेच काम करण्याचे पैसे घेते.'' क्षितिज

''कळायलाच पाहिजेत ना.'' मिस्टर सावंत

''मग मला सुद्धा एक गोष्ट कळायला हवी.'' क्षितिज

''बोल. काय विचारणार आहेस?'' मिस्टर सावंत

''भूमीच जॉइनिंग माझ्यापासून लपवण्याचे कारण?''  क्षितीज

''ओह म्हणजे तिने सुद्धा तुला ही गोष्ट सांगितली नव्हती?'' मिस्टर सावंत

''तुम्हीच तसे बजावले होते ना.'' क्षितिज

''गुड, आय लाईक इट, मला हेच हवं होत.'' मिस्टर सावंत

''म्हणजे? स्वतःच्या मुलापासून कंपनीच्या गोष्टी लपवणार आहेस का?'' मिस्टर सावंत आणि क्षितिजचे बोलणे शांतपणे ऐकत बसलेल्या मेघाताई विचारात होत्या.

''गोष्ट लपवण्याची नाही. विश्वासाची आहे. मागे ते लीगलाचे पेपर्स परत करून भूमीने आपल्या प्रामाणिकपणा दाखवून दिला. आपली खोटी केस खरी करून तिची हुषारीही आपण पहिली... पण मला हे चेक करायचं होत की, ती आपल्या विश्वासाच्या पात्र आहे का? त्यासाठी मी तिला तिच्या जॉइनिंग बद्दल क्षितिजला काहीही सांगू नको, असे सांगितले होते, आणि तिने कोणालाही काही सांगितलेले नाही. सो मी कोणत्याही गोष्टीसाठी तिच्यावर १००% विश्वास ठेवू शकतो.''  म्हणत त्यांनी प्रसन्न मुद्रेने टाळी वाजवली.

त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणाऱ्या मेघाताई अवाक होऊन त्यांच्याकडे बघत होत्या. क्षितिजही काही वेळ विचारात पडला. एक दीर्घ श्वास घेऊन ते पुढे बोली लागले.

''क्षितीज आजपर्यंतच्या आयुष्यात उगाच करायचं म्हणून मी काहीही केलं नाही. किंवा कोणी वडिलोपार्जित संपत्ती माझ्यासाठी फुकटमध्ये ठेवली नव्हती. खूप कष्ट केलेत रे...  ही कंपनी आणि मिळालेला पैसे, ऐश्वर्य हे मी स्वतः कमावलं आहे. वयाच्या १० व्य वर्षी भंगार गोळा करून विकायचो, नंतर काही वेळाने त्याचंच गॅरेज टाकलं. आणि तिथूनच या SK ग्रुप ची  सुरुवात झाली. तुला सगळं रेडिमेड मिळतंय, त्याच चीज कर, प्रत्येक गोष्ट वाढवं. फक्त प्रेमाने पोट भरत नाही आणि चुकीच्या व्यक्तीची निवड केल्यावर पश्चातापाशिवाय काही मिळत नाही.''

तीक्ष्ण बाणाच्या टोकाप्रमाणे ते एकेक वाक्य बोलत होते. मेघाताई काहीक्षण अगदी स्तब्ध झाल्या.

''पप्पा चुकीची व्यक्ती म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस मैथिलीला का मध्ये आणता?'' शांतपणा  सोडून क्षितिजने त्यांना प्रश्न केला.

''तुला माहित आहे, ती आपल्या बापाला बिझेसमध्ये आणण्यासाठी तुझ्याबरोबर प्रेमाचे नाटक करत होती.'' मिस्टर सावंत

''असेलही पण तिनेच कंपनीमध्ये सुरु असलेला फ्रॉड शोधण्यासाठी प्रयन्त केले होते, आणि ती अल्मोस्ट यात सक्सेस झाली होती. पण तिचा अपघात झाला आणि सगळ्याच गोष्टी अर्धवट राहिल्या.'' क्षितिज

''आय अक्ससेप्ट इट, तिने फ्रॉड शोधण्यासाठी मदत केली, पण ते का माहित आहे?  तिचे बाबा, ते किर्लोस्कर ५०% चे मालक झाल्यावर कंपनीमध्ये आलेल्या नफ्याचा आणि तोट्याचा ५०% वाट त्यांचा होता. नफा मिळत होता तेव्हा सगळं ठीक होत. ती मस्त आराम करत होती. तुझ्याबरोबर फिरत होती. २ कोटींचा फ्रॉड झाला आणि त्यातले १ कोटी त्यांचे होते.  गोष्ट सरळ होती, आपाला आणि त्यांचा दोघांचाही अर्धा अर्धा  तोटा होता.  हे तिच्या लक्षात आलं होत. तो फ्रॉड शोधून काढला तर पुढे होणार नफाही किर्लोस्कर आणि मी आमच्या दोघांचाच होता. म्हणून ती त्या केसचा शोध लावत होती.''  मिस्टर सावंत

''त्या मागील हेतू काहीही असो, पण तिने कंपनीच्या हिताचा विचार केला होता ना. आणि कश्यावरुन तिच्या वडिलांनी तिला क्षितिजला फसवण्यासाठी फोर्स केला असेल. पण त्या वेळी गैव्यवहार वाढले असे म्हणणे अगदीच अयोग्य आहे. योगायोग असू शकतो. काही लॉजिक नाही यात. '' मेघाताई मध्येच बोलल्या.

''मेघा तुम्हा दोघांनाही हे चांगलेच माहित आहे, की कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी त्याबद्दल काहीही बोलत नाही, आणि कोणावर उगाचचे आरोप करणे हे माझं नेचर नाही. मध्यंतरीच्या या काळात बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आहे.''  मिस्टर सावंत बोलत होते.

आता यावर  काय बोलावं हे मेघाताईना कळेना. उगाच क्षितिजला अजून वाईट वाटायला नको म्हणून त्या मैथिलीची बाजू घेत असल्या तरीही आपल्या नवऱ्याचा तोंडून आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे. हे मेघाताईना माहित होते.

एवढे दिवस डोळ्यासमोर असणारे पण आपण पाहू न शकलेल काहीतरी सत्य अनपेक्षितपणे आपल्या समोर यावे असे क्षितिजला वाटत होते. खरं-खोटं त्याच त्याला समजेना. आतून मात्र तो फार दुखावला होता.  त्याच्या मनातील मैथिलीच्या प्रतिमेचे चित्र आता हळूहळू बदलत होते एवढे मात्र नक्की.

''काहीही असो, पप्पा आणि आई, मला यापुढे या घरी मैथिलीचा विषय नको. प्लिज रिक्वेस्ट आहे.'' म्हणत तो उठला आणि बेडरूमकडे वळला.

''भूमी आवडली आपल्याला... पण तिला सेफ ठेवायचं असेल तर तिच्यापासून थोडं लांब राहा.'' मिस्टर सावंत लांबूनच त्याला मोठ्या आवाजात ओरडले. आणि तो पुन्हा जागच्या जागी थांबला.

''व्हॉट डू यु मिन पप्पा?'' क्षितीज

''मैथिली बघत होती ती केस भूमी सांभाळतेय, जे लोक कंपनीला फसवत आहेत, ते फार चलाख आहेत आणि खतरनाकही. भूमी मागे राहून शक्यतो पडद्याआड हे काम करणार आहे. तुझ्यासोबत सगळ्यांच्या नजरेत आली तर लोक तिच्यावर फोकस करतील, तिच्या बद्दल कंपनीमध्ये बरच कुतूहल आहे लोकांना. त्यामुळे तिची आणि तिच्या कामाची माहिती काढण्याचा प्रयत्न होईल.... तू माझा मुलगा आहेस. कंपनीच्या लोकांच्या लक्षात येईल असं काहीही करू नकोस. समजतंय का मी काय बोलतोय?'' मिस्टर सावंत क्षितिजला सांगत होते. थोडी गोष्ट त्याच्याही लक्षात आली होती.

'''पप्पा आमच्यामध्ये तस काहीही नाही. तुम्हाला भीती वाटते का? कि मी भूमी बरोबर काहीतरी रिलेशन ठेवेन आणि ती सुद्धा आपल्याला फसवेल? किंवा दुसरे कोणीतरी तिच्यामार्फत आपल्याला नुकसान पोहोचवेल?'' क्षितिजने त्यांना उलट प्रश्न केला.

''नो माय बॉय. शी ईज प्युअर. ती नाही फसवणार कोणाला. मुळात कोणासाठी आपल्याला फसवायला तिचं  आहेच कोण या जगात? त्यामुळे जरा काळजी वाटते.'' मिस्टर सावंत खोलवर काहीतरी विचार करत म्हणाले.

''म्हणजे संजय? नेमकं काय म्हणायचं आहे तुला? भूमी एकटीच राहते का इथे?'' मेघाताई काळजीच्या सुरत विचारात होत्या.

''इथे कोणासोबत राहते हे माहित नाही. पण आपण आपल्या पेपर्ससाठी तिचा शोध घेत होतो तेव्हा मला माझ्या माणसांकडून तिची थोडी माहिती मिळाली होती. ती अनाथ आहे, लहानपची आई गेली. नाशिकला एका आश्रमात वाढली. शिक्षण वगैरे स्वतःच्याच हिमतीवर केलं. इथे मुंबईला येण्याआधी कोणीतरी श्याम साठे म्हणून आहेत त्यांच्यासोबत कोकणात राहत होती. त्यांचं तिच्याशी नातं काय? याची माहिती नाही मिळाली. असो ती आपल्यासाठी काम करतेय. तुझ्यासोबत राहून मैथिली जशी लाइमलाइट मध्ये आली तशी भूमीला फेमस करू नकोस... सध्यातरी एवढंच सांगेन. बाकीच्या गोष्टी वेळ आल्यावर समजतील तुला.''  मिस्टर सावंत सांगत होते. आणि मेघाताई ऐकून थक्क झाल्या.

''आहेच तशी रे ती. पहिल्या भेटीतच मनात भरणारी. अनाथ आहे... म्हणून तुला ती आवडली. बरोबर ना?  ''  मेघाताई

''होय, प्रामाणिक, कष्टाळू आणि अनाथ... माझ्यासारखी. अनाथ होण्याचं दुःख काय ते माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहित. '' हे बोलत असताना मिस्टर सावंतांच्या डोळ्यात किंचितसा ओलसरपणा आला होता.

पप्पांच्या या वाक्यावर क्षितिजच्या डोळयात पाणी आले. मेघाताईही नर्व्हस झाल्या होत्या.

''सॉरी पप्पा.'' म्हणत क्षितिज वरती निघून  गेला.

आपले पप्पा, त्यांचे निर्णय आणि ते करत असलेली प्रत्येक कृती यामागे कितीतरी विचार दडलेले असतात. पुन्हा आज याची प्रचिती त्याला आली होती. आपल्यासाठी उभारलेले हे साम्राज्य सांभाळण्याची आता आपली जबाबदारी आहे हे त्याने मान्य  केले. भूमी विषयी समजलेल्या माहितीचे नवल होतेच, तरीही पप्पांनी बजावलेल्या गोष्टी मनाशी पक्क्या करून तो उठून लॅपटॉपवर कामाला बसला.

क्रमश 

https://siddhic.blogspot.com/