त्याच कॉन्सनस्ट्रेशन मग चांगले होत असे. एफ बी वर त्याला नोटिफिकेशन आले. संयुक्ता शेयर युवर पोस्ट. त्याने लगेचच ते पहिले संयु ने त्याचा काल चा लाईव्ह शो चा व्हिडीओ शेयर केला होता आणि त्याच खूप कौतुक केले होते. त्याच वेळेस तिचा मेसेज ही त्याला आला . सर काल चे तुमचे स्पीच खूपच मस्त होते. मला खूप आवडले. तुमचा आवाज खूप छान आहे सतत ऐकत रहावा असा. त्याने मेसेज वाचला आणि गालातल्या गालात हसला. शी इज मॅड मनातच बोलला तो. पण संयु ज्या टोन मधये बोलायची ते त्याला आवडायचे म्हणजे जे आहे ते स्पष्ट बोलायची ती. बाकी च्या मुलीं सारखी नाटकी किंवा आव आणून लाडे लाडे बोलणं असा प्रकार नवहता. या वरून संयु किती निष्पाप आणि निरागस असेल याची प्रचिती येत होती . अँड आफ्टर ऑल मितेश पडला रायटर मग लोकांना ओळखायला तो थोडीच चुकणार होता.तिने इतके त्याचे कौतुक केले म्हंटलया वर तिला रिप्लाय करणं भाग होत सो त्याने थँक्स संयुक्ता असा मेसेज केला. आणि तिचा प्रोफाइल फोटो पाहण्याचा मोह तो टाळू नाही शकला. तिने दुसरा तिचा फोटो डी पी ला लावला होता. येल्लो कलरचा कुर्ता आणि त्या वर पिंक कलरची बारीक फुलांची डिझाइन होती. केस तिचे खांदया पर्यंत होते ते मोकळे सोडले होते . हलकी गुलाबी लिपस्टिक आणि हसरे पाणीदार डोळे. काहि क्षण मितेश तिच्या फोटो मध्ये हरवून गेला. नकळतपणे तिचा फोटो लाइक केला. आणि परत आपल्या कामात गुंतला. मितेश ने रिप्लाय दिला आणि आपला फोटो ही लाईक केला हे बघून संयु खूप खुश झाली. संध्याकाळी पल्लवी कडे गेली . तिला त्याचा मेसेज दाखवला. यात काय वेगळं आहे संयु त्याने फक्त थँक्स चा रिप्लाय दिला आहे. पल्लू अग तो किती मोठा रायटर आहे मग त्याने मला रिप्लाय दिला ही मोठी गोष्ट नाही का. आणि माझा फोटो सुध्दा लाइक केला ना. मग या वरून तू काय तर्क लावतेस संयु वेडी आहेस का? फोटो तर कोणीही बघितला की लाइक करतोच ना? कोणी तरी नाही पल्लू डार्लिंग द बेस्ट सेलर ऑथर मितेश आहे तो. तुला ना काही बोलण्यात पॉईंटच नाही संयु. असू दे मी इतकी खुश झालेय त्याच तुला काहीच नाही म्हणे बेस्ट फ्रेंड माझी. संयु अग मला आनंद आहे याचा पण मला हेच सांगायचे आहे की ही मोठी लोक आहेत ग त्याच्या समोर आपण कोण ?आज टॉप लेखकांच्या यादीत मितेश आहे तो तुझ्या भावना का समजावून घेईल आणि प्रेम तर खूप दूर ची गोष्ट आहे. त्याने तुला नुसतं युज केले आणि सोडून दिले तर? तू प्रेम करतेस ग पण त्याच काय? पल्लू मितेश असा वाटत नाही ग. काहीतरी आहे ग ज्याने तो हर्ट झालेला वाटतो. त्याच्या कथा,कविता मध्ये ते दिसून येते ग. अस असेल तर संयु तो तुझे प्रेम का स्वीकारेल? पल्लू तो माझं प्रेम स्वीकारू दे अथवा नको मी मात्र कायम त्याच्या वर प्रेम करत राहीन.
कधी तरी त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होईल ना! संयु मी काय बोलू या वर आता. लेट्स होप तुझ्या मना सारख होऊदे. संयु घरी आली . रात्री झोपण्यापूर्वी संयु ने पुन्हा मितेश ला गुड नाईट चा मेसेज केला. त्याचे फोटो बघत बसली. तेव्हा मितेश ने एक कविता पोस्ट केली होती
एकांत
आभाळातील चंद्र तो चांदणया सवे आतुर आहे.
माझ्या मनी तुझ्या आठवांचे काहूर आहे.
तू नाहीस सोबत तरी हा एकांत समीप आहे.
नको विचारु माझ्या हसणयाचे गुपित,
कित्येक वेदनांनी व्यापला माझा एकांत आहे.
अलवार छेडीला तू आलाप प्रेमाचा,
मी तुझ्यात असन्याचा कसला हा भास आहे.
तुझ्या सोबत जगण्याचा अट्टाहास माझा,
तूझ्यात रेंगाळत राहण कसला हा ध्यास आहे.
ना आला तू परतून ना सरला माझा एकांत आहे.
लख्ख चांदणयानी भरले आभाळ तरी,
एकाच त्या चंद्राची मज आस आहे.
मीत. वा किती सुंदर कविता आहे पण किती दर्द आहे यात संयु कविता वाचून मनातच म्हणाली. काय झालं असेल नेमके का हा इतका दर्दभरे लिहीत असेल? खूप छान लिहिले आहे सर अस तिने कमेंट केले. मितेश बद्दल संयु ला अजून जास्तच उत्सुकता लागून राहिली आणि प्रेम ही! का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे…
उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे…बंध जुळती हे प्रीतीचे…गोड नाते हे जन्मांतरीचे…
एक मी एक तू…शब्द मी गीत तू…आकाश तू..आभास तू…साऱ्यात तू…ध्यास मी श्वास तू…स्पर्श मी मोहर तू….स्वप्नात तू सत्यात तू…साऱ्यात तू…
घडले कसे कधी..कळते न जे कधी..हळुवार ते आले कसे ओठावरी..दे ना तू साथ दे..हातात हात घे..नजरेतून नजरेतुनी इकरार घे…
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे.. गाणं ऐकत संयु मितेशच्या स्वप्नात हरवून गेली. निनाद चल सुजय ने बोलवले आहे . मितेश ने आरोही कडे पाहिले काहीच फरक नवहता तिच्या मध्ये . मितेश चे डोळे भरून आले तो तिच्या कडे बघत रडू लागला. सुजय ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.मितेश काय करू शकतो आपण सांग. काही च आपल्या हातात नाही राहिले आहे. मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. पण रिझल्ट शुन्य.
क्रमश