चुकीचे पाऊल! - ०४ Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चुकीचे पाऊल! - ०४



आता पर्यंत आपण बघीतले.

शामलच्या आकर्षक शरीरयष्टीने मला कधीचेच घायाळ केले होते. त्याच्या विचारात असताच दारावर थाप पडली आणि मी विचारातून बाहेर येत दार उघडले! बघून आश्चर्यचकित झाले कारण, स्वतः तो खोलीबाहेर येऊन उभा होता!

आता पुढे..!

"झोपला नाहीस अजून? काय हवं आहे तुला?" : मी, केसाची बट हळूच कानामागे करत, शामलला स्वतःकडे आकर्षित करत होते.

हे सर्व नकळत माझ्याकडून घडत होते.

"काही नाही ग, झोपली होतीस का तू? की, जागी होतीस?" : शामल, स्वतःच्या केसांतून हात फिरवत.

"जागेच होते, बोल ना!" : मी, केसांची बट उजव्या हाताच्या बोटाने फिरवत.

"अच्छा." : शामल, माझं वरून - खाली वेगळ्याच नजरेने निरीक्षण करत.

"हो." : मी, गालात हसत.

आम्हा दोघांच्याही मनात वेगळीच उलथापालथ व्हायला सुरूवात झाली होती! पण, नक्की काय? हे दोघांनाही कळेना! तेवढ्यात कोणी तरी जिन्यावरून खाली येत असल्याच्या आवाजाने दोघेही घाबरलो आणि शामल माझ्या खोलीत शिरला.

जिन्यावरुन खालच्या दिशेने चालत येणाऱ्या पावलांचा आवाज आता जास्तच वाढला होता. जणू कोणी माझ्याच खोली समोरून जाणार आणि असं झालं तर, आम्ही दोघं एवढ्या रात्री त्यांच्या नजरेस पडणार! या भीतीपोटी आम्ही दार आतून लावून घेतला.

जरी कोणी येण्याच्या भीतीने आम्ही दार आतून लावून घेतला असला. तरी, आम्ही दोघं एकमेकांत हरवून गेलो होतो आणि हे चूक की, बरोबर याचं दोघांनाही काही घेणं - देणं नव्हतं. कोवळ्या वयातील भावना आम्हाला एकमेकांकडे सतत आकर्षित करत होत्या.

दार लावताना आम्ही सोबतच दार बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे घाईत आधी माझा आणि त्यावर शामलचा हात दाराच्या कुंडीवर पडला! त्या स्पर्शाने मी शहारले हे बघून शामल उत्तेजीत झाला आणि त्याने हलकेच माझा हात स्वतःच्या हातात घेतला!

नंतर त्याने मला कमरेत पकडत स्वतःकडे ओढून घेतले! आणि मी त्याच्या छातीवर जाऊन धडकले. त्याचा सामना करण्याची हिम्मत माझ्यात नव्हती!

पुढे काय होणार या भीतीनेच पोटात गोळा आला!

शामलच्या वागणुकीचा मला काहीच फरक पडला नाही! उलट मी त्याच्याकडे आकर्षित होत होते.

मला बिछान्यावर लोटून देत हळुहळू त्याने माझ्या शरीरावर ताबा मिळवला आणि माझ्या भावना उत्तेजीत झाल्या. मला माझेच भान राहिले नाही!

त्याच्या त्या ऊबदार स्पर्शाने माझ्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारली! शरीराच्या प्रत्येक भागातून त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद मिळत होता. त्यालाही त्या प्रतिसादाला शांत करण्याचे जणू तंत्र अवगत असावे! म्हणूनच आजवर मी अनुभवत असलेल्या सुखाची मला त्याने प्रत्यक्षात ओळख करून दिली. साधारण तीन तास आम्ही एकमेकांत आकंठ बुडालो. त्या तीन तासात मला कशाचेच भान राहिले नाही!

मागील तीन तासात आम्हा दोघांमध्ये जे काही घडले ते माझ्यासाठी किती धोकादायक याची जाणीव त्यावेळी मला झाली नव्हती. माञ त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर दोघांनाही कमालीची भिती वाटू लागली!

शामल उठून रागातंच बाहेर निघून गेला. मी माञ विचारातंच पूर्ण खोली आवरून घेतली.

थोड्या वेळाने दारावर थाप पडली. त्या आवाजाने मी विचारातून दचकून भानावर आले.

स्वतःला आरशात एक नजर पाहून नंतर दार उघडण्याचे धाडस मी केले. समोर बाबा उभे दिसले. त्यांना बघून मी थोडे घाबरलेच! लगेच सर्व बळ एकवटून स्वतःला मी सावरले.

"दिशा, शामल अग?" : बाबांनी काळजीने विचारले.

"काय माहित? असेल ना बाहेरच्या खोलीत!" : मी, काहीही माहिती नसल्याचे भाव चेहऱ्यावर आणत.

"नाही अग, बघतो मी कुठे गेला ते. जा तू आराम कर. लाईट्स सुरू दिसली म्हणून आलो होतो." : बाबा.

"हो, अभ्यास करता करताच झोप लागली आणि ते सुरूच राहिले!" : मी, आळस देत थोड्या वेळा आधी गाढ झोपेत असल्याचे नाटक करत.

"बरं, आराम कर." : बाबा.

ते निघून गेल्यावर मी आतून दार लावून घेतला. आत येऊन शांत बसले. घडलेल्या प्रकारातून मी अजूनही सावरले नव्हते. शामलच्या त्या स्पर्शाने मला वेड लागले! कधी तरी स्वतःच्याच अंगावरून हळूच होणारा तो रोमांचक स्पर्श! तर कधी हलकेच नकळत ओठांचा दाब मी अनुभवत होते. यात वेगळाच आनंद मला मिळत होता. "आता पुढे काय?" मनात हा विचारही डोकावला नाही. किंबहुना त्याला डोकावायला माझं शामल विषयीचं आकर्षण परवानगी देत नसावं!

पुढचे काही दिवस शामल नोकरीच्या शोधात रोज बाहेर ये-जा करू लागला. त्याचे माझ्याशी बोलणे खूप कमी झाले होते. कालांतराने ते बंद झाले. नोकरीच्या काळजीत तो मला टाळत असावा असा तर्क मी लावला. पण, तो तर्क खोटा ठरला.

एक दिवस सायंकाळी आई आणि बाबा लहान बहिणीला घेऊन बाहेर गेले होते. शामल सुद्धा बाहेरंच होता. पण, अचानक तो घरी परतला आणि त्यावेळी मी घरी एकटेच होते.

.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.