सांग ना रे मना (भाग 17) Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांग ना रे मना (भाग 17)

आता त्याला या सगळ्या आठवणी त्रास देत होत्या.सिगरेटस वर सिगरेट तो ओढत होता आरु च्या आठवणीने खूप बैचेन झाला होता. आरु ये ना ग माझ्या जवळ मी खूप एकटा पडलो आहे. प्लिज आरु डोळे उघड एकदा माझी अवस्था बघायला तरी ये. तुझ्या शिवाय कसा जगतोय हे माझं मलाच माहीत. आरु अस तो मोठ्याने ओरडला. तसा त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात त्याला जाणवला. मितेश शान्त हो नको इतका स्ट्रेस घेऊस . त्याने वळून पाहिले तर निनाद होता. तसा मितेश त्याला मिठी मारून अजूनच रडू लागला. निनाद ने त्याला रडू दिले मग शान्त झाल्यावर त्याला घेऊन तिथून निघाला. त्याची कार त्याने तिकडे हॉटेल कडेच पार्क करून आला होता त्याला माहित होतं की मितेश नाराज असला की टेकडीवर जातो. आता ही तो तिकडेच असेल म्हणून निनाद तिथे आला होता. मितेश ची कार त्यानेच ड्राइव्ह करायला घेतली. बाजूला मितेश बसला दोघेजण शान्तच होते. निनाद ने मग रेडिओ सुरू केला. खुपच सॅड सॉंग लागले होते.....दिल ने मेरे तेरे दिल से कहा इश्क तो है वही जो है बे-इन्तेहा तूने कभी जाना ही नहीं। मैं हमेशा से तेरा, तेरा ही रहा के जब तक जियूं मैं जियूं साथ तेरे। फिर चाँद बन जाऊं तेरी गली का ।मैं जिस दिन भुला दूँ तेरा प्यार दिल से वो दिन आखिरी हो मेरी ज़िन्दगी का।ना ठहरेगा कोई आखों में मेरी हो ना सकूँगा मैं और किसी का।मैं जिस दिन भुला दूँ तेरा प्यार दिल से वो दिन आखिरी हो मेरी ज़िन्दगी का।हाँ मैं वो ख्वाब हूँ जो किसी ने ना देखा वो किस्सा हूँ मैं जो बिन तेरे था आधा कोई चीज जचती नहीं है कसम से मेरे हाथ में तेरे हाथों से ज्यादा मेरे रात दिन भी लिखे नाम तेरे,ज़रा हाल देखो दीवानगी । हे गाणं ऐकून मितेश अजून सॅड होईल असं समजून निनाद ने रेडिओ बंद करायला हात पुढे केला तसा मितेश बोलला असू दे निनाद आय लाईक इट. मैं जिस दिन भुला दूँ तेरा प्यार दिल से वो दिन आखिरी हो मेरी ज़िन्दगी का ।हाँ मिला तो मुझे तू मगर देर से क्यूँ हमेशा मुझे ये शिकायत रहेगी लगा ले गले से मुझे बिन बताये उम्र भर तुझे ये इजाज़त रहेगी ।मुझे अब कोई गम रुला ना सकेगा के तू है बहाना मेरी हंसी का। गाणं ऐकत मितेश ने सीट च्या मागे डोके ठेवले आणि डोळे बंद केले. निनाद ला त्याच्या बद्दल खूप वाईट वाटत होते. त्याला घरी सोडून निनाद ही घरी आला. तसा संयु चा त्याला कॉल आला. संयु -- हॅलो निनाद मितेश सर कसे आहेत? मी चुकीचे केले का काही? निनाद-- नाही संयु तुझं काहिच नाहीचुकले ग. उलट तू मितेश ला आनंद होईल असाच विचार करून केलेस ना. आणि त्याला घरी सोडले मी आहे बरा. काही बोलला नाही अँज युजवल टेकडीवर होता. संयु-- मला त्यांना सॉरी बोलायचे आहे. मला हर्ट नवहते करायचे त्यांना. निनाद-- संयु तू नको काळजी करू आणि आता नको बोलू त्याच्या शी खूप अपसेट आहे उगाच काही बाही बोलेल तुला. एक दोन दिवस जावू दे मग बोल.

ओके म्हणत संयु ने फोन ठेवला. मितेश ही इकडे अपसेट होता आपण चुकीचे वागलो का? संयु ला कुठे माहीत होते की मला हे आवडणार नाही. मी जास्तच रूड वागलो का असा तो विचार करत होता. तिचा काय दोष याच्यात? ती प्रेम करते माझ्यावर म्हणून तिने माझा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे ठरवले असेल. या विचारातच तो झोपी गेला.दुसऱ्या दिवशी ही तो अपसेटच होता. काय बोलावे संयु शी त्याला समजत नवहते पण तिची खूप आठवण येत होती. हे त्याच प्रेमच होत पण तो स्वीकारत नवहता इतकच. संयु ने ही त्याला मेसेज नाही केला. मितेश चे कामात लक्ष लागत नवहते. आपण का तिला गृहीत धरतो कारण ती प्रेम करते माझ्यावर म्हणून! तिला हर्ट होईल असं नेहमी बोलतो तरी ती गप्प ऐकून घेते कारण ती प्रेम करते म्हणून! आपल्याला आनंदात पाहायला तिची धडपड सुरू असते ,आपल्याला समजावून घेते कारण ती प्रेम करते म्हणूनच आणि मी काय त्याच्या बदल्यात देतो तिला फक्त अश्रू! मितेश चुकतोस तू नेहमी आणि बोल मात्र संयु ला लावतो अस विचारांचे वादळ त्याच्या मनात चालू होते. निनाद संयु कशी आहे? निनाद कडे बघून तो बोलला. लॅपटॉप वरून नजर मितेश कडे करत बोलला,मला काय माहीत आणि तुला काय करायचे संयु कशी आहे ते जाणून. तुला फक्त तुझे प्रॉब्लेमस,तुझं दुःख या पुढे कोणीही दिसत नाही ना! आणि बाय द वे कोण लागते संयु तुझी जस्ट फ्रेंडच ना मग ती कशी ही असो यु डोन्ट वरी मितेश. आता निनाद ही चिडला होता. त्याच्या पुढे मितेश काही बोलत नवहता. मित्या तुझ्या बेरंग आयुष्यात कोणीतरी रंग भरायचा प्रयत्न करतय. आपल्या प्रेमाची सावली तुझ्या डोक्यावर धरू पाहतय. तुझ्या सोबत प्रत्येक पावलांवर कोणीतरी चालू पाहतय. तुझ्यावर भरभरून प्रेम करू पाहतय पण तुला किंमत नाही रे कशाचीच ना माणसांची ना त्यांच्या भावनांची . यु आर हार्टलेस पर्सन मित्या. सॉरी मी हे सगळं बोलणार नवहतो पण तू बोलायला भाग पाडलेस. इतकं निनाद बोलला तरी मितेश शान्तच होता. कारण त्याला ही माहीत होतं की तो चुकला आहे. एखादी व्यक्ती तुमचे दुःख विसरून तुम्हाला सुखाचे काही क्षण देऊ पाहतेय आणि तुम्हाला ते नको आहेत तर मग तुमच्या सारखे दुर्दैवी तुम्हीच! मित्या नीट विचार कर रे खूप प्रेम करते संयु तुझ्यावर तिला अस गृहीत धरू नकोस. आज ती वाट बघते तुझी पण उद्या तुला तिचे प्रेम समजेल पण ती नसेल जवळ तर काय उपयोग? उगाच उशीर नको करु कोणीतरी म्हंटले आहेच ना की "opportunity and love knocks once only". तेव्हा बघ तूच ठरव भुतकाळातच जगायचं की भविष्य काळा कडे बघायचं. क्रमश...stay connected👍