सांग ना रे मना (भाग 29) - अंतिम भाग Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांग ना रे मना (भाग 29) - अंतिम भाग

माझ्या मूळे मितेश चा अपघात झाला असच तिला वाटत होते.कधी मितेश ला बघते अस तिला वाटत होते.दुसऱ्या दिवशी निनाद आणि सुजय मितेश ला घेऊन पुण्यात सुजय च्या हॉस्पिटलमध्ये आले. सकाळीच संयु पल्लू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. मितेश शान्त झोपला होता. त्याच्या डोक्याला मोठे बँडेज होते. खूप अशक्त दिसत होता तो. संयु त्याच्या जवळ बसली. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहतच चालले होते. ती एकटक मितेश कडे बघत होती. मितेश ला जाग आली त्याने संयु ला पाहिले त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की संयु समोर आहे. संयु तू खरच आली आहेस का त्याने विचारले. तसे संयु ने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली, होय मितेश मी खरच परत आली आहे. हे सगळं माझ्या मुळे झाल आय एम रियली सॉरी. नाही संयु तुझ्या मुळे काही ही नाही झाले पण आता मला सोडून तू कुठे जाणार तर नाहीस ना? नाही मितु मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आय प्रॉमिस. संयु आरु मला कायमचे सोडून गेली ग आणि तू ही मला न सांगता निघून गेलीस हे मला सहनच नाही झाले. सॉरी मितु अस पुन्हा नाही होणार. संयु आय लव यु मितेश म्हणाला. आय लव यु टू बोक्या. संयु ही हसत म्हणाली. मिस्टर बेस्ट सेलर ऑथर आता लवकर बरे व्हा आणि कामाला लागा निनाद रुम मध्ये येत म्हणाला. त्याच्या पाठोपाठ सुजय आणि पल्लवी ही आली. कसे वाटते आता मित्या सुजय ने विचारले. छान वाटते अँड थँक यु माय स्वीट ब्रोज म्हणत निनाद आणि सुजय चा हात त्याने हातात घेतला. आम्हाला तुझे थँक्स नको. आम्हाला आमच्या भावाला बेस्ट सेलर ऑथर बनलेले पाहायचे आहे ते ही लवकरात लवकर काय संयु बरोबर ना? निनाद सुजय एकदम बोलले. हो तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात ना मग नक्की मी बेस्ट सेलर ऑथर बनणार हसतच मितेश म्हणाला. चला आता त्याला आराम करू दे लवकर बरा होऊ दे . सुजय म्हणाला. मग सगळ्यानी त्याचा निरोप घेतला. नंतर मितेश चे आई बाबा,संयु चे आई बाबा त्याला भेटायला आले. मितेश आठवडा भर हॉस्पिटलमध्ये होता . संयु रोज सकाळ आणि संध्याकाळी मितेश कडे यायची. आज मितेश पूर्णपणे बरा होऊन घरी येणार होता. सगळ्यानी मिळून मितेश चे स्वागत करायचे ठरवले. मितेश च्या घरी सगळे जमले होते. सुजय आणि संयु मितेश ला घेऊन आले

मितेश च्या आई ने त्याचे औक्षण केले. घर छान सजवले होते. फक्त सुजय आणि निनाद ला माहीत होते की मितेश खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होता त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता ब्लड ही खूप गेले होते. नशिबाने तो वाचला होता. त्याला बघून निनाद ला राहवले नाही तो मितेश च्या गळ्यात पडून रडू लागला. निनाद अरे मी पूर्ण बरा झालो आहे असा रडणार आहेस का तू आता आणि मला ही रडवणार. हो मित्या तू बरा झालास आणि असाच हसत रहा कायम निनाद त्याला म्हणाला. हो निनाद तुम्ही सगळे माझ्या सोबत असल्यावर मी कायम हसतच राहीन. थोडा वेळ सगळे गप्पा मारून जायला निघाले.

मितेश ला त्याच्या रूम मध्ये सोडून संयु ही निघाली जाता जाता तिने वळून आवाज दिला मितु आणि मितेश ला घट्ट मिठी मारली. मितु तुला काही झाले असते तर मी जगू शकले नसते. मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत. यु आर माय वर्ल्ड मितु. हो संयु आता अस रडायचे नाही मी कायम आहे तुझ्या सोबत तुला सोडून कुठे ही जाणार नाही. त्याने तिचे अश्रू पुसले आणि कपाळावर किस केले. मी येईन उद्या मितु टेक केयर म्हणत संयु ही निघाली. थोडे दिवस मितेश ने लिखाण करू नये असं सुजय ने सांगितले होते. महिन्या नंतर थोडं थोडं मितेश ने लिखाण सुरू केले. सहा महिन्या नंतर ती कादंबरी पब्लिश झाली आणि खूप त्याची विक्री झाली . लोकांना ही कादंबरी खूपच आवडली कारण वाचकांना हेच वाटत होते की ही कादंबरी म्हणजे जणू मितेश चेच आत्मचरित्र आहे असे पण तसा उल्लेख कुठेच त्या कादंबरीत नवहता. खूप इमोशनल आणि हार्ट टचिंग अशी ती स्टोरी झाली होती.आणि बघता बघता मितेश "द बेस्ट सेलर ऑथर "बनला होता आज मितेश ची "सांग ना रे मना" या कादंबरी साठी बेस्ट सेलर ऑथर चे अवॉर्ड मितेश ला मिळणार होते. मितेश आज खूप हँडसम दिसत होता. थ्रि पीस ब्लु बलेझर त्याने घातला होता. संयु ने ही ब्लू लॉंग वन पीस घातला होता ती ही छान दिसत होती. संपूर्ण ऑडीटोरियम मितेश च्या फॅन्स नी भरून गेला होता. मितेश ने संयु आणि सुजय निनाद सह तिथे प्रवेश केला तसे सर्वजण मितेश च्या नावाने जल्लोष करू लागले. मुली तर संयु ला त्याच्या जवळ बघून जळत होत्या. मितेश ने सर्वांना शान्त केले. त्याला बेस्ट सेलर अवॉर्ड दिला गेला. आता मितेश बोलायला उभा राहिला. हॅलो एव्हरी बडी गुड इविनिंग . सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मना पासून आभार मानतो. आज मला हा अवॉर्ड मिळाला ही ट्रॉफी मिळाली याच सारे क्रेडिट फक्त आणि फक्त तुम्हालाच आहे. तुम्ही जो माझ्या वर विश्वास ठेवलात तो मी खरा करून दाखवला. आता मी तुमच्या सर्वांच्या मनातला प्रश्न की जो तुम्ही लोकांनी मला मेल,मेसेज करून विचारला होता त्याच प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. होय "सांग ना रे मना" ही माझीच रियल कथा आहे. तुमचा अंदाज बरोबरच होता. ही कादंबरी पूर्ण करण्यात माझे मित्र निनाद आणि सुजय यांचा ही मोलाचा वाटा आहे.मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती जरूर असते की जिच्या साठी आपल्याला जगावेसे वाटते. ती सोबत आहे ना मग दुःखाची पर्वा पण आपण करत नाही. त्याच्या कडे बघत स्वहता हसत राहायचे,ती व्यक्ती आपली इनस्पिरेशन असते,आपल संपूर्ण जग तिच्यात सामावलेले असत. त्याच्या साठी सगळं करत राहायचे भले मग बाकी काही अपेक्षा नाही ठेवायची यालाच तर प्रेम म्हणतात ना? माझ्या आयुष्यात ही अशी व्यक्ती आहे जिने मला समजून घेतलं भरभरून प्रेम दिल. ती फक्त देत राहिली पण माझ्या कडून काही तीच मागण नवहत . तिने नेहमी माझ्या सुखाचा,आनंदाचा विचार केला . मी मात्र कायम तिला गृहीत धरत आलो तरी ही तिने तक्रार नाही केली माज्यावर फक्त प्रेम करत राहिली. तीच माझी जीवन साथी संयुक्ता अस बोलून मितेश ने संयु ला आपल्या जवळ बोलवले. आणि माझे जिवलग मित्र माझे भाऊ निनाद आणि सुजय या दोघां मुळे मी आज तुमच्या समोर जिवन्त आहे. माझी ही कादंबरी मी आरोही ला डेडीकेट केली आहे जी आज माझ्या सोबत नाही आहे ते सगळं तुम्ही कथेत वाचलेच आहे. आरु चे स्वप्न होते की मी बेस्ट सेलर ऑथर बनावे अँड सी हियर एम आय " द बेस्ट सेलर ऑथर मितेश" . आणि लवकरच मी आणि संयु लग्नाच्या बेडीत अडकणार आहोत. तुम्हा सर्वांचे शुभ आशिष असू द्या. अजून ही खूप लिखाण करायचे आहे तुम्ही अशीच मला साथ देत रहा. कार्यक्रम छान पार पडला. लवकरच संयु आणि मितेशचे लग्न धुमधडाक्यात पार पडले आणि हो निनाद आणि पल्लवी च्या एंगेजमेंट ची ही तारीख ठरली. "सांग ना रे मना " च्या खूप साऱ्या प्रति विकल्या गेल्या. मितेश चे नाव सगळीकडे गाजत राहिले. " अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे,अंतरी वाजती प्रीतीची पैंजणेआणि धुंदावती भाबडी लोचने.होतसे जीव का घाबरा सांग ना सांग ना रे मना सांग ना रे मना.

श्वास गंधाळती शब्द भांबावती रोमरोमांतली कंपने बोलती. मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी भारलेल्या जीवा आवरावे कितीका अशा जागल्या सांग संवेदना.सांग ना रे मना सांग ना रे मना सांग ना रे मना .सांग ना रे मना .हे नवे भास अन नव्या चाहुली ऐकू ये कोठुनी साद ही मलमली .गोठले श्वास अन् स्पंदने थांबली.हे शहारे जणू रेशमाच्या झुली.आज ओथंबल्या का अश्या भावना .सांग ना रे मना .सांग ना रे मना .सांग ना रे मना .सांग ना रे मना.... (झेंडा सिनेमातील गीत)

©® sangieta devkar 2017

समाप्त . कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत. साहित्य चोरी करणे गुन्हा आहे. कोणता ही भाग कॉपी करू नये. माझ्या नावा सहित इतरत्र कथा प्रसिद्ध करू शकता. धन्यवाद💐💐