नक्षत्रांचे देणे - ३२ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणे - ३२

‘हॉटेल सनशाइनला तळमजल्यावर शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सगळी अरेंजमेंट आणि रोषणाई बघून क्षितिजला आश्चर्य वाटले. क्षितीज आणि भूमी तिथे पोहोचले. सगळे त्याची वाट बघत होते. काइट्स माउंटनला आपल्याला क्षितिजच्या आईने बोलावल होतं, हे तिला क्षितिजने येताना गाडीमध्ये सांगितलं, त्यावर तिचा विश्वासच बसेना. उगाच लाइमलाइटमध्ये येन तिला आवडत नव्हतं. त्यामुळे पार्टीमध्ये भूमी स्टेजपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, मेघाताई  तिला एकटी सोडायला मागेनात. केक कटिंग करून झालं होतं. सगळे मस्त डिनरचा आस्वाद घेत होते. क्षितिजला शुभेच्छा देणाऱ्यांची नुसती मांदीआळी होती. आपण काय करावं? घरी जायला निघावं का? या विचारात असतानाच भूमीला मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या पप्पांनी आवाज दिला. ते तिच्या मागे उभे होते. तिने हसून त्यांच्याकडे पहिले.’

''भूमी मॅडम, बोर झालं का?'' मिस्टर सावंत

 

''नाही सर, असं काही नाही.'' भूमी

 

''मग एकटीच का उभी आहेस?'' मिस्टर सावंत

 

''खरंतर मला लेट झालं आहे. घरी जायला पाहिजे.'' भूमी

 

''क्षितिजला सांगतो सोडेल तो तुला. अजून एक, आपली केस सेन्सिटिव्ह आहे, काहीही होऊ शकत.'' मिस्टर सावंत

 

''होय सर, तो अपघात झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते.'' भूमी

 

''क्षितीज बोलला मला त्याबद्दल. त्या फाइल्स नष्ट करण्यासाठी कोणीतरी तुझ्यावर लक्ष ठेवून होत. त्या गाडीत राहिल्या म्हणून त्यांनी गाडीला उडवले. नाहीतर तुझा पाठलाग झाला असता.'' मिस्टर सावंत

 

''सर, कोणीतरी खूप स्ट्रॉंग सेटीन्ग लावली आहे. केस खूप अवघड होत चालली आहे.'' भूमी 

 

''काळजी घे.'' एवढं बोलून त्यांनी लांबून क्षितिजला हात केला.

 

''भूमिका घरी सोडून ये आणि हो, हात सांभाळ. जीवावर आलं होत ते हातावर निभावल.'' मिस्टर सावंत क्षितिजला सांगत होते.

 

''नाही सर, मी टॉक्सि करून जाऊ शकते.'' भूमी

 

''बघा काय ते, मी आलोच.'' म्हणत मिस्टर सावंत बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीशी हाय हॅलो करत होते. आणि त्यांच्या गप्पा रंगल्या. बहुतेक त्यांचा कोणीतरी मित्र असवा.

 

''काय प्रॉब्लेम आहे? टॉक्सिने का जाते? मी सोडतो तुला घरी.’'  पप्पा थोडे दूर गेलेले पाहून क्षितीज भूमीला म्हणाला.

 

''हात दुखतोय म्हणून इथे येताना गाडी मी चालवली. ते बँडेज सुद्धा बदललेले दिसत नाहीय अजून. कशाला मला सोडायला पाहिजे, मी जाते.''  भूमी

 

''आश्रमात असताना कोणीतरी प्रेमाने बांधलं होत ते बँडेज.... कस सोडणार.'' तो तिच्याकडे बघत म्हणाला.

 

''ते समजलं मला. जखम चिघळली कि मग ते बँडेज प्रेम आपोआप कमी होईल.'' भूमी

 

''असुदे चालेल मला. बरं पप्पा काय म्हणत होते?'' क्षितिज

 

''केस बद्दल.'' भूमी आणि क्षितीज बोलत असताना मेघाताई तिथे आल्या होत्या.

 

''काय चाललंय? आणि संजयला काही माहित नाहीय. त्याला काही सांगू नका तुम्ही दोघांनीही.'' मेघाताई

 

''कशाबद्दल बोलतेस तू?'' क्षितीज

 

''अरे मी भूमीला त्या कॅफेमध्ये बोलावलं ते. त्याच्याकडून भूमीच्या कामाची थोडी माहिती मिळवली आणि मग केसच नाव पुढे करून तिला ते लेटर पाठवलं होत.'' मेघाताई

 

''आई, तू पण ना.'' क्षितीज

 

''सर कामाबद्दल बोलत होते. बाकी त्यांना काही माहित नाहीय ना.'' भूमी विचारत होती.

 

''माहित नाहीय, पण तू काळजी नको करु लवकरच माहित होईल आहे.'' म्हणत मेघाताई आजूबाजूला पाहायला लागल्या. बऱ्यापैकी लोक घरी गेले होते. गर्दी कमी झाली होती. आता फक्त घरचे उरले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. क्षितिजला एका बाजूला घेऊन त्यांनी भूमीला ऐकू जाणार नाही अश्या आवाजात विचारले.

''हो म्हणाली का?''

 

''आई, तू पण काय विचारतेस.'' क्षितीज

 

''सगळं माहित आहे मला. म्हणूनच विचारतेस.  हो म्हणाली कि नाही तेवढंच सांग.'' मेघाताई

 

''हो.'' तो शक्य तेवढ्या हळू आवाजात म्हणाला.

 

''गुड. ये इकडे.'' म्हणत त्यांनी क्षितिजच्या हाताला धरले. भूमीच्या शेजारी येत त्यांनी बाजूला स्टेजशेजारी असणाऱ्या आज्जोला हाताने खुणेने तिथे बोलावून घेतले. अगदी जवळचे काही नातेवाईक आणि क्षितिजचे मोजके मित्र तिथे होते. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी माइक हातात घेतला आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली.

 

 

''हॅलो मंडळी, प्लिज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आज क्षितिजच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक खास अनाउन्समेंट करणार आहे.'' त्या बोलत होत्या. बाजूच्या एका पिशवीतील एक छोटासा बॉक्स काढून त्यांनी क्षितिजच्या हातात दिला आणि त्या पुढे बोलू लागल्या.

''आज क्षितिजचा वाढदिवस त्यामुळे आमचे सुपुत्र आणि आमच्या भावी सुनबाई यांची एक साधीशी एंगेजमेंट इथे होणार आहे. ग्रँड ऑफिशिअल एंगेजमेंट काही दिवसातच सगळ्यांच्या उपस्थितीत होईल. योगायोग असा कि दोघांचाही आजच वाढदिवस असतो. या दोघांसाठी यापेक्षा बेस्ट गिफ्ट काहीच असू शकत नाही. सो प्लिज सगळ्यांनी इकडे या.''

हे ऐकून क्षितिज शॉक्ड झाला होता. भूमीसाठी आश्चर्य कमी पण धक्का जास्त होता. अश्या पद्धतीने हि गोष्ट सगळ्यांसमोर यावी हे तिच्या पटलेलं नव्हतं. आज्जो आणि क्षितिजच्या पप्पाना या सर्प्राइजची आधीपासून कल्पना होती.

 

भूमीच्या हाताला धरून क्षितिजच्या आईने तिची 'आमच्या भावी सुनबाई' ओळख करून दिली. भूमीला नाही सुद्धा म्हणता येन शक्य नव्हतं. क्षितिजने आईला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. त्याच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करून त्यांनी त्याच्या हातातील बॉक्स मधून दोन अंगठ्या बाहेर काढल्या. भूमी आणि क्षितिजच्या हातात देऊन एकमेकांना घालायला सांगितली. नाही म्हंटले तरीही त्यांच्या घरचे २०-२५ लोक तिथे उपस्थितीत होते आणि मित्र मंडळी वेगळी. त्यांच्या समोर हसे व्हायला नको म्हणून भूमीने ती आंगठी क्षितिजच्या बोटात घातली आणि क्षितीजनेही तिच्या बोटात घातली. एवढ्या घाईमध्ये कोणतीही पूर्वकप्लना न देता, न विचारता अशी एंगेजमेंट होणे, हे भूमीला पटले नाही, ती दाखवत नसली तरीही क्षितिजने हे ओळखले होते. आनंद होताच पण नाइलाजही झाला होता. आईच हे वागणं त्याला तितकसं पटलेलं नव्हतं. अशी सार्वजनिक अनाऊंसमेंट केल्यामुळे मिस्टर सावंत देखील काही बोलू शकले नाहीत. आज्जो आणि मेघाताई मात्र फारच खुश होत्या.

 

*****

पार्टी संपल्यानंतर भूमीला सोडून क्षितीज घरी आला, भूमी गाडीमध्ये त्याच्याशी एकही शब्द बोललेली नव्हती. घरी जाईपर्यंत अगदी शांत होती ती. क्षितिजलाही काही बोलता येईना. आईने असे का केले? आणि एवढ्या अचानक इंगेजमेंटचा डिसिजन का घेतला? हे समजल्याशिवाय भूमीला समजावणे कठीण होते. यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार हे त्याला माहित होते. घरी आल्या-आल्या त्याने मेघाताईंना याबाबत विचारले. त्यांनी सांगितलेले कारण ऐकून त्यावर काय बोलावे त्याला सुचेना. क्षितिजची आई म्हणजेच मेघाताई हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्या होत्या. जिथे मैथिलीवर उपचार सुरु होते तिथे. तिथे केलेल्या चॊकशीत असे समजले होते कि, ‘मैथिली आता ट्रीटमेंटला प्रतिसाद देतेय, लवकरच तिची प्रकृती सुधारेल आणि ती कोमातून बाहेर येईल.’ ती शुद्धीवर आली तर क्षितिजच्या आयुष्यात पुन्हा वादळ येण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मेघाताईनी मिस्टर सावंत म्हणजेच क्षितिजच्या पप्पांशी बोलून त्याच्या वाढसीवसाच्या दिवशी सरप्राइज पार्टी आणि त्यामध्येच त्यांच्या इंगेजमेंटची अनाउन्समेंट करण्याचे ठरवले.

 

 

क्रमश 

पुढील भागासाठी भेट द्या.  - https://siddhic.blogspot.com/

रेट करा आणि टिप्पणी द्या

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Vandana Barage

Vandana Barage 1 वर्ष पूर्वी

vishal patil

vishal patil 1 वर्ष पूर्वी

Sandhya Shinde

Sandhya Shinde 1 वर्ष पूर्वी