नक्षत्रांचे देणे - ४४ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणे - ४४

भूमी भारतात परत आल्याचे समजल्यावर नानांनी तिला फोन लावला.

 

''हॅलो बेटा, कशी आहेस?'' नाना

 

 

 

 

''मी मस्त. तुम्ही कसे आहेत ? आणि माई?'' भूमी

 

 

 

 

''आम्ही अगदी मजेत. इकडे गावी केव्हा येणार आहेस? ये आम्हाला भेटायला. तुला बघावंसं वाटतंय.'' नाना

 

 

 

 

''हो,तुम्हाला भेटायला लवकर येणार आहे. इथे थोडं महत्वाचं काम आहे. ते संपल्यावर येते.'' भूमी

 

 

 

 

''क्षितिजला भेटलीस का? तो अधून मधून चौकशी करण्यासाठी फोन करतो आम्हाला.'' नाना

 

 

 

 

''हो. भेटले. मस्त मजेत आहे सगळं. तुम्ही काळजी घ्या, फ्री झाल्यावर फोन करते मग, माईंशी बोलेन.'' भूमी

 

 

 

 

''आत्ता घाईमध्ये दिसतेस. बर बरं सावकाश फोन कर.'' म्हणत नानांनी फोन ठेवला.

 

 

 

 

भूमी फोन कट करून विचार करू लागली. नाना आणि माईंनी क्षितीज आणि माझ्या साठी खूप काही केले. अगदी आपल्या मुलाचे सत्य जगासमोर आणण्यासाठी मदत केली. जर त्यांना समजले, कि आता क्षितीज आणि मी एकत्र नाही आहोत. तर त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे हि गोष्ट सध्यातरी त्यांच्या पासून लपवून ठेवावी. त्यामुळे तिने थोडक्यात बोलणे उरकून तिने फोन ठेवून दिला.

 

 

 

 

*****

 

 

 

 

भूमीला सांगितल्या प्रमाणे किर्लोस्कर तिला घेऊन आज कंपनीमध्ये हजर झाले. वार्षिक सर्वसाधारण सभा होती. बरेच महत्वाचे निर्णय आज घेतले जाणार होते. त्यामुळे ते मिटिंगसाठी निघून गेले. ऑफिस मध्ये आल्यावर भूमीला खूप सारे बदल जाणवले. पूर्वीचे खेळीमेळीचे वातावरण आता दिसत नव्हते. सगळे लोक खाली मान घालून काम करत होते. कोणीही मजा मस्ती करत नव्हते. जो तो आपला कामात व्यस्त. युनिफॉर्म वरचे नियम कडक करण्यात आले होते. सगळे फॉर्मल मध्ये होते. रिसिप्शन वरती असणारी आधीची मुलगी बदलण्यात आली होती. बरेच वरिष्ठ अधिकारी बदलले होते. त्यांच्या जागी नव्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. मुखर्जींची जागा सरपोतदार म्हणून एका तरुण मुलाने घेतली होती. जुन्या स्टाफ पैकी फक्त वेदांत तिथे हजार होता. भूमीला बघून तो लगेच तिच्या जवळ आला. हाय हॅलो करून त्याने तिची विचारपूस केली. बदलेले सूर आणि नवीन बॉस च्या हाताखाली काम करताना जाणवणारी परकेपणाची भावना त्याने बोलून दाखवली.

 

 

 

 

थोडं फार ऑफिस फिरून ती तिच्या आधीच्या केबिनकडे वळली. तिथे रागिणी नावाची एक तरुण मुलगी जॉईन झाली होती. तिच्याशी गप्पा मारून झाल्यावर भूमी क्षितिजच्या केबिनकडे वळली तेव्हा तिला 'भूमी' म्हणून मागून कोणीतरी हाक मारली होती. तिने मागे वळून पहिले मागे निधीचा नवरा निल उभा होता.

 

''हाय तू इथे?'' भूमी

 

 

 

 

''मी इथे जॉब करतो. तू इथे कशी काय?'' निल

 

 

 

 

''ओह, म्हणजे तू क्षितिजच्या कंपनीत जॉईन झाला आहेस तर. ग्रेट.'' भूमी

 

 

 

 

''एस, निधीसाठी मी माझं घर सोडलं, मग जॉबचा प्रश्न आला. क्षितिजने मला जॉब ऑफ़िर दिली. एवढेच नाही आमच्या लग्नासाठी त्याने खूप प्रयत्न केलं आहेत. म्हणून तर हे सगळं शक्य झालं.'' निल

 

 

 

 

''गुड, मी बाबांच्या बरोबर आलेय, जस्ट कंपनी पाहायला.'' भूमी

 

 

 

 

''बाबा? ओह, मिस्टर किर्लोस्कर का? एस निधीने संगीतलं आहे मला. ते इकडे अगदीच क्वचित येतात. आज तुला घेऊन आले.'' निल

 

 

 

 

''एस, क्षितिजला भेटायला जाते.'' भूमी

 

 

 

 

''तो.. आय मिन सर इथे नाही आहेत. बट त्याच्या PA कडून आधी अपॉइंटमेंट घावी लागते, तरच तो भेटतो.'' निल

 

 

 

 

''व्हॉट? आर यु सिरिअस?'' भूमी

 

 

 

 

''एस, सगळं काही बदललेलं आहे. बी केअरफूल.'' निल

 

 

 

 

''सांगितल्या बद्दल थँक्स.  नाहीतर मी डायरेक्ट आत गेले असते.'' भूमी

 

 

 

 

''चुकूनही नको जाऊस. तो अजिबात इंटरटेन करणार नाही. उलट सीक्युरीटीला सांगून तुला ऑफिस बाहेर काढेल.'' निल

 

 

 

 

''ओ आय सी.'' भूमी

 

 

 

 

''चल, बाय. भेटू नंतर.'' म्हणत निल निघून गेला. आणि काहीतरी विचार करून भूमी गुपचूप क्षितिजच्या केबिनमध्ये शिरली. सुदैवाने कोणाचे तिच्याकडे लक्ष गेले नाही.  कोणी तिला पाहू नये म्हणून आतमध्ये गेल्यागेल्या तिने आतली लाईट बंद केली. आणि ती क्षितिजची वाट बघत तिथे बसून राहिली.

 

 

 

 

*****

 

मिस्टर किर्लोस्कर मिटिंग मध्ये व्यस्त होते. ते कंपनीमध्ये खूप दिवसांनी आले होते त्यामुळे बऱ्याच गोष्टी पेंडिंग होत्या. त्यांच्या टेबलवरती कागदपत्रांचा ढीग पडला होता. महत्वाचे सगळे कागदपत्र तपासून त्यांनी त्यावर सह्या केल्या. महत्वाचे टेंडर पास केले आणि त्यांच्या दृष्टीने महत्वाचे नसणारे रिटर्न केले. उद्या एक तातडीच्या सभेचे मेल महत्वाच्या व्यक्तींना पाठवून दिले आणि ते वार्षिक सभेसाठी कॉमन हॉलमध्ये हजर झाले.

 

 

 

 

*****

 

 

 

 

कॉमन हॉलमध्ये शुकशुकाट पसरला होता. काही निर्णय घेऊन झाले होते. तर काही पेंडिंग ठेवण्यात आले. किर्लोस्करांना बघून क्षितीज सभा अर्धवट सोडून तिथून उठून त्याच्या केबिनच्या दिशेने निघाला. ''माझा PA पुढचे सगळे हान्डेल करेल मी निघतोय. महत्वाचे काम आहे.'' असे बोलून तो आपल्या केबिनमध्ये आला. लाईट लावून त्याने आपली चेअर ओढली त्यावर तो बसणार तर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या भूमीकडे त्याची नजर गेली.

 

''तू? माझ्या केबिनमध्ये माझ्या परवानगी शिवाय काय करतेस?'' म्हणत तो उठून उभा राहिला. भूमी अजून बसलेली होती. त्याच्याकडे बघत तिने एक स्माईल दिली.

 

''बॉस वाटतोस हा आता. अगदी हटके.'' भूमी

 

 

 

 

''तू आधी इथून बाहेर निघून जा. आणि मला समजवायला वेगैरे आली असशील तर तसा प्रयत्नही करू नको. त्याचा काहीही उपयोग होणार नाही.'' क्षितीज रागाने तिला म्हणाला.

 

 

 

 

''नाही. तुला काय समजावणार मी. कंपनीत आली होती तर तुला भेटायला आली.'' भूमी

 

 

 

 

''तुला आतमध्ये कोणी येऊ दिल?'' क्षितिज

 

 

 

 

''आले गुपचूप, काय करणार आहेस?'' भूमी

 

 

 

 

''माझे पेशन्स चेक करू नकोस. सरळ सरळ उत्तर देत जा. आणि हो मला खूप काम आहेत. सो प्लिज आलीस तशीच निघून जा.'' क्षितीज अजूनही चिडलेला होता. खुर्चीवर बसत त्याने समोरचे पेपर्स आपल्याकडे ओढले आणि त्यावर साह्य करायला सुरुवात केली.

 

 

 

 

''जाते, ऐकून होते इथला बॉस खूपच तापट आहे. स्वतःची मनमानी करतो, कंपनीच्या प्रॉफिट शिवाय त्याला कोणाशीही काहीही हितसंबंध ठेवायला आवडत  नाहीत. वेगैरे वेगैरे एकूण होते, आता प्रत्यक्षात बघितलं. खात्री करत होते. तोच क्षितीज आहे कि वेगळा कोण इथे येऊन बसल्या.'' भूमी अतिशय शांतपणे बोलत होती.

 

 

 

 

''माझी कंपनी, मी काय वाट्टेल ते करेन. तुझी आता खात्री झाली असेल तर तू जाऊ शकतेस.'' क्षितीज

 

 

 

 

''विचार कर तुझ्याच कंपनीत तुझ्या समोरच्या खुर्चीवर प्रतिस्पर्धी म्हणून मी बसलेली आहे. काय करशील?'' भूमी

 

 

 

 

''अशक्य. या कंपनीत तुला आत कोणीही पुन्हा घेणार नाही. तसा स्वप्नातही विचार करू नकोस.'' क्षितीज

 

 

 

 

'म्हणजे मी किर्लोस्करांची मुलगी आहे हे याला अजूनही माहित नाहीतर? भूमीने विचार केला. न सांगितलेले बरे. आत्ता तर खरी मज्जा येणार होती. त्यामुळे ती मनातच हसली.''गुड, सी यु सून पार्टनर.'' म्हणत दार ढकलून ती बाहेर आली. आणि सरळ कंपनीबाहेर येऊन तिने घराचा रस्ता धरला.

 

बदलेला क्षितिज आणि त्याने कंपनीत चालवलेली मनमानी बघून तिने तिच्या बाबांना फोन करून आपण घरी जात असल्याचे कळवले. आणि त्यांनी तिच्या समोर ठेवलेल्या प्रपोजलला ताबडतोप होकार कळवळा.

 

 

*****

निधी, निल आणि भूमी कॅफेमध्ये कॉफी घेत बसले होते. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. क्षितीज बद्दल भूमीला समजलेल्या गोष्टी तिने निधी आणि नीलकडून कडून  कन्फर्म करून घेतल्या. निधीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला कि आता क्षितीज आणि तू पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. पण भूमी आपल्या निर्णयावर ठाम होती. बदललेला क्षितिज आणि आता त्याला टक्कर द्यायला ती स्वतःला बदलायला तयार झाली होती.

 

''तू लंडनला जाण्यामागचे खरे कारण आणि तिथे गेल्यावर घडलेल्या अनपेक्षित गोष्टी तू क्षितिजला सांग.'' असे निधी म्हणाली. पण आता क्षितीज भूमीचे काहीही ऐकायला तयार नव्हता. एवढंच काय तिने काहीही सांगितले तरीही ती खोटं बोलते असे त्याला वाटने साहजिक होते. त्यामुळे भूमीने तसे करण्यासाठी साफ नकार दिला.

 

 

 

 

'निल आणि निधीने तिला समजावले पण आता भूमी देखील मागे हटणार नव्हती. क्षितीजवर आपले प्रेम होते, आहे आणि सदैव असेल. त्यामुळे त्याला परत मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. नीलने तिला लागेल ती मदत करण्याचे वचन दिले. निधी देखील त्या दोघांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुk होती.'

 

रेट करा आणि टिप्पणी द्या

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Hrishikesh Godage

Hrishikesh Godage 12 महिना पूर्वी

Sharmila More

Sharmila More 1 वर्ष पूर्वी

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 1 वर्ष पूर्वी