नक्षत्रांचे देणे - ४९ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणे - ४९

निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती. क्षितीज आणि भूमी, ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद झाला. तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला.

 

'ना है ये पाना

ना खोना ही है

तेरा ना होना जाने

क्यूँ होना ही है

 

तुमसे ही दिन होता है

सुरमई शाम आती

तुमसे ही, तुमसे ही.'

हे गाणं सुरु झालं होत.

''सो पार्टनर, नानांची तब्येत कशी आहे आता?" क्षितीज डान्स करता करता भूमीला विचारत होता. 

''एक दिवसात नाही सांगता येणार, पण थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल.'' भूमी 

''आणि तुझी?'' क्षितीज 

''माझी? मला काय झालाय?'' भूमी आश्चर्याने. 

''अधून मधून तुझं डोकं वेगैरे दुखत ना. निधी सांगत होती.'' क्षितीज 

''होय, आता ठीक आहे सगळं.'' भूमी 

''ओके.'' क्षितीज 

''अजून काय सांगितलं निधीने तुला?'' भूमी त्याला काय काय माहित आहे, हे पाहण्यासाठी विचारत होती.

''काही नाही. का असं काही आहे का सांगण्यासारखं. जे तू लपवून ठेवलं आहेस.'' क्षितीज 

''नाही. काहीच नाही.'' बोलताना भूमी जरा गोंधळली होती. 

''तुला खोट बोलता येत नाही, म्हणून तू खरं सुद्धा लपवून ठेवतेस. हाच प्रॉब्लेम आहे, आणि यामुळे लोकांचा तुझ्याबद्दल गैरसमज होतो.'' क्षितीज 

''लोकांचा नाही, तुझा.'' भूमी 

''मग समजावं ना, जे प्रॉब्लेम्स असतील ते सांगत जा.'' क्षितीज 

''सांगेन ना, नंतर भेट, सांगते.'' भूमी 

''नंतर? तुला खूप काम असतात. नाना आजरी असतात. माईना बघायला जायचं असत. कंपनीमध्ये महत्वाचं काम असत. अजून ही बऱ्याच गोष्टी.'' क्षितीज 

''सध्या काही काम नाही. तेवढा वेळ आहे.'' भूमी 

''मी सोडून तुला खूप काम असतात. पहिल्या पासून मला फक्त गृहीतच धरत आलीस तू. आणि मी फक्त वाट बघत बसलो.'' क्षितीज 

''असं काही नाहीय रे. तू गैरसमज करून घेऊ नकोस.'' भूमी 

''तुझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये माझं नाव आहे तरी का ग?'' क्षितीज 

''सर्वात आधी तुझं नाव येत, मग बाकीचे. तुझा विश्वास नाही त्याला मी काय करू.'' भूमी 

''विश्वास कमवावा लागतो.'क्षितीज 

''काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल?'' भूमी 

''वेळ आल्यावर सांगतो.मग बघू.'' क्षितीज 

''बरं, डान्स पुरे करूया का? मला चक्कर सारखं होती.'' भूमी 

''ओह, सॉरी. आधी सांगायचं ना.'' म्हणत क्षितिजने तिला हाताला धरून स्टेजवरून खाली उतरवले. आणि ते बघून निधी धावतच त्यांच्याकडे आली.  तिला क्षितीज आणि भूमीला एकत्र बघून आनंद झाला होता.  

''हाय, गाईज. नाइस टू सी यू  टुगेदर.'' निधी 

''थँक्स डिअर तुझ्यामुळेच हे शक्य आहे. नाहीतर मला वाटलं होत, क्षितीज पुन्हा माझ्याशी केव्हाही बोलणार नाही. '' भूमी 

''मला वाटलं नव्हतं, क्षितीज एवढ्या लवकर तुला माफ करेल. त्याचा राग बघून तर पुन्हा तुम्ही दोघे एकत्र येणे स्वप्नवत वाटत होते.'' निधी 

''मी एवढा रुड नाहीये ग. थँक्स टू यू हनी. कशी आहेस?''  क्षितीज निधीला विचारत होता. 

''मी मस्त.'' निधी 

''आणि हा तुला काही त्रास देत नाही ना?'' क्षितीज निल कडे बघत निधीला विचारत होता. 

''नाही रे.'' निधी नीलच्या हातात हात घालून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली. 

''पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले रे आम्ही दोघांनी. संजना आणि माझा डिवोर्स नंतर माझ्या घरच्यांचे नखरे, मी घर आणि घरचा बिझनेस सगळं सोडलं, तू मदत केलीस, म्हणून आमचं लग्न झालं, नाही तर एकामागोमाग एक अशी संकटपाठ सोडायला तयार नव्हती.'' निल 

''माय प्लेजर. काही विशेष केलं नाही. ऍटलीस्ट तुमची लव्हस्टोरी पूर्ण होताना बघून समाधान वाटलं.'' क्षितिज निधी आणि निल बरोबर बोलत होता. भूमी त्यांचं बोलणं बाजूला उभी राहून ऐकत होती. या काही दिवसात क्षितिजच्या स्वभावाचे नवीन पैलू तिला बघायला मिळाले होते. त्याने निधी आणि नीलच्या लग्नासाठी मदत केली होती. ऐकून भूमीला आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही वाटलं. आपण यांच्यामध्ये कुठेच बसत नाही, त्यात क्षितीज आपल्यामुळे दुखावला गेला आहे, याच तिला सारखं वाईट वाटत होत. तिचे मन तिलाच खात होते. आपण काय करतो आणि त्याच काय होत? होत्याच नव्हतं होऊन, आपलं इतरांपासून वेगळे होते, आणि दरवेळी आपल्याला एकाकीपणाला समोर जावं लागत.  हो गोष्ट तिला त्रास देत होती. त्यांच्या गप्पा ऐकताना ती गुपचूप तिथून बाहेर पडून साइडला गेली. 

निधी आणि निल बरोबर गप्पा मारताना क्षितिजच तिच्याकडे चांगलं लक्ष होत, तो दाखवत नसला तरीही त्याने भूमीला तिथून बाहेर जाताना पाहिलं होत. थोडावेळ गप्पा मारू तो त्यांना शुभेच्छा देऊन बाहेर आला. भूमी कुठे दिसत नव्हती. कदाचित फ्रेश व्हायला गेली असेल म्हणून त्याने थोडावेळ बाहेर तिची वाट पहिली. अजूनही तिचा पत्ता नव्हता. क्षितिजने तिचा फोन ट्राय केला. तिने तो उचलला. ती गाडीत जाऊन बसली होती. हे समजल्यावर क्षितीज तिथे गेला. 
''निघतेस का?'' क्षितीज 

''होय, निधीला भेटून निघेन. आतलं आवरलं आहे का? कि अजून पार्टी सुरु आहे?'' भूमी 

''पार्टी संपत आले. निधी आणि निळा सुद्धा निघतील.'' क्षितीज तिच्या उतरलेल्या चेहेऱ्याकडे बघत म्हणाला 

''आणि तू?'' भूमी 

''तुझा मूड ठीक वाटत नाहीय. थोडावेळ थांब आपण सोबत निघू.'' क्षितीज 

''मी गाडी आणलेय, आणि तू पण. सो मी निघते.'' भूमी 

''माझ्यासोबत यायचं नसेल तर तस सांग, उगाच गाडीचं निमित्त सांगू नकोस.'' क्षितीज 

''ओके, मी तिला सांगून येते. मग निघूया. '' भूमी गाडीतून बाहेर निघत म्हणाली. 

''ओके.'' म्हणत क्षितीज तिथेच थांबून राहिला. आणि भूमी निधीला भेटायला आत निघून गेली. 

इकडे क्षितीजला भेटायला मिसेस मेघा सावंत म्हणजेच क्षितिजची आई त्याच्या सध्याच्या राहत असलेल्या घरी आल्या होत्या. कंपनीमधून त्यांना काही महत्वाच्या कागदपरांवर साह्य पाहिजे होत्या. त्या घेण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या. पण तो घरी नाही हे समजल्यावर त्या तिथून पुन्हा सावंत निवासाकडे निघाल्या. 'काय करत असेल? कुठे असेल क्षितीज ? एकटाच घरदार सोडून इथे राहतो. काय गरज आहे या सगळ्याची याचा विचार त्या करत होत्या.' आपला मुलगा आपल्यापासून खूपच लांब गेला आहे, मानाने आणि शरीराने, हि गोष्ट त्यांना अजिबात पटत नव्हती. खूप वाईट वाटायचे पण त्या काहीही करू शकत नव्हत्या. क्षितिजला पुन्हा घरी घेऊन येण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण यश आले नाही. तो घरी यायला अजिबात तयार नव्हता. भूमी त्याच्या आयुष्यात आल्यापासून या सगळ्या गोष्टी बिघडल्या होत्या असा त्यांचा गैरसमज झाला होता. काय करावे म्हणजे तो पुन्हा पहिल्या सारखा होईल? याचा विचार करत त्या घरी जायला निघाल्या. 

*****

भूमी निधीला भेटून पुन्हा बाहेर आली. क्षितिजला फोन आला होता तो बोलत होता. ती येऊन बराच वेळ उभी राहिली. तो गाडीच्या समोर उभा होता आणि भूमी गाडीला टेकून उभी राहून त्याच्याकडे बघत होती.  

फोनवर बोलताना काय म्हणून क्षितिजने नजरेनेच तिला विचारले आणि तिने नकारार्थी मान डोलावली.  फोनवर बोलता बोलता त्याने भूमीला हाताला धरू गाडीत बसवले आणि तो गाडी सुरु करून निघाला. ती मागे डोकं टेकून आरामात डोळे मिटून शांत बसून होती. बोलून झाल्यावर फोन बाजूला ठेवून क्षितिजने तिच्याकडे पहिले. 
''मॅडम कुठे जाणार?'' क्षितीजने तिला विचारले. 

''माहित नाही, पण तुझ्यासोबत आहे म्हणजे योग्य ठिकाणी पोहोचेन एवढं मात्र नक्की.'' भूमी म्हणाली. 

''मूड का डाऊन आहे? बरं नाही वाटत का?'' क्षितीज 

''थोडं अस्वस्थ वाटतंय, का माहित नाही.'' भूमी 

''मुडी आहेस तू. अचानक स्विंग होतेस.'' क्षितीज म्हणाला आणि ती फक्त हसली. 

''घरी येतेस का ? माझ्या सोबत.'' क्षितीज 

''नको.'' भूमी 

''मग, तुझ्या घरी सोडू?'' क्षितीज 

''नको, कुठेतरी शांत ठिकाणी जाऊया. मला तुझ्याशी बोलायचं. खूप काही बोलायचं राहून गेलय.'' भूमी 

''ओके, एक मस्तपैकी झोप काढ, पोहोचल्यावर उठवतो. तुझा मूड सुद्धा फ्रेश होईल.'' क्षितीज 

''दॅट्स गुड.'' म्हणत भूमी डोकं मागे टेकून पुन्हा शांत झोपून गेली.  

रेट करा आणि टिप्पणी द्या

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 1 वर्ष पूर्वी

Sharmila More

Sharmila More 1 वर्ष पूर्वी

Kirti Pande

Kirti Pande 1 वर्ष पूर्वी

Nice story