निर्णय कादंबरी भाग४
बंगलोरला पोचल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तो जे बोलला ते ऐकून इंदीरेला विचित्र वाटलं पण याला सर्वस्वी जबाबदार मंगेशच होता.
मिहीर म्हणाला,
" आई बंगलोर स्टेशन वर उतरताच मला बाबांच्या कडक शिस्तीच्या जोखडातून मुक्त झालो याचा खूप आनंद झाला. आई कदाचित तुला माझं बोलणं. आवडणार नाही पण ही माझी भावना खरी आहे. तू कशी इतकी वर्ष त्यांचा हा जाच सहन करत आलीस."
इंदिरा म्हणाली,
"मिहीर तुझ्या आणि माझ्या भूमिकेत फरक आहे. मला तुझ्या सारखं वाटलं जरी असत तरी मी तसं वागू शकले नसते.तुम्हा दोघांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं. कोणताही विचार करण्यापूर्वी मल दहादा विचार करावा लागत असे. तू बाहेर पडावस आणि स्वतःच्या कर्तुत्वाला वाव द्यावा असं मला खरंच वाटत होतं म्हणून तुला मी सुचवलं."
आई थोड्या वेळानी फोन करू का? आत्ताच स्टेशन मधून बाहेर पडतोय."
" चालेल. सगळं लागलं की तू फोन कर."
इंदिरा म्हणाली. मिहीरने फोन ठेवला तसा तिनेही फोन ठेवला.
मिहीर आपल्या नवीन नोकरीसाठी बंगलोरला गेला. एक आठवडा त्याचं बस्तान बसण्यात गेले. मिहीर नाही म्हणून मेघना आणि इंदिरेलि करमत नसे.
"आई मिहीर मस्त एन्जॉय करतो आहे." मेघना म्हणाली.
"मेघना मिहीर बंगलोरला नोकरी करण्यासाठी गेला आहे. एंजॉय कराला नाही." इंदिरा थोड्या दटावणीच्या सुरात मेघनाला म्हणाली.
ताक घुसळता घुसळता इंदीरा मेघनाला म्हणाली.
"हो पण ऑफीस मधून आल्यावर तर तो मनसोक्त हवं तिथे फिरू शकत असेल. मला कुठे कधी मनाप्रमाणे जातं येतं" मेघना वैतागून बोलली.
हे वाक्य बोलताना मेघनानी इंदीरेच्या तोंडाजवळ तोंड नेऊन आपल्या भुवया उडवल्या. ते बघून इंदीरेला हसू आलं.
" चल बाजूला हो. ताक करू दे. तू जा अभ्यासाला."
"ए ममुडी सारखी काय ग मागे लागते अभ्यास कर म्हणून?" मेघना लाडात येऊन म्हणाली.
" का अभ्यास का करायचा नाही? तुझं सासरा बसलाय का तुला अभ्यास न करता परीक्षेत पास करायला?"
मंगेशचा तप्त स्वर इंदिरा आणि मेघना दोघींच्या कानावर पडला मंगेश स्वयंपाकघराच्या दाराशी उभा राहून जरबेच्या स्वरात विचारत होतं. मेघना गुपचूप ओट्या पासून लांब झाली आणि आपल्या खोलीत गेली.
"फार डोक्यावर बसवू नको मेघनाला. वेळेवर शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. मिहीरला ढील दिली बास्स झालं."
मांगेशचा स्वर अजून तसाच होता. इंदीरेने फक्त मान हलवली आणि पुन्हा ताक करू लागली.
मंगेश पावलांचा दण दण आवाज करत बाहेरच्या खोलीत गेला.
***
इंदिरा मनातच विचार करू लागली की 'किती दिवस मुलं वडलांची अरेरावी सहन करतील. मुलं मोठी झाली हे मंगेश मान्यच करत नाही. मी ऐकलं म्हणजे मुलं ऐकतील असं नाही. मला ऐकणं भाग होतं मुलांचं भविष्य डोळ्यासमोर होतं. घरात रोजची भांडणं होणं मला नको होतं. मी ऐकलं म्हणजे मी कमकुवत आहे असं नाही. मेघनाच शिक्षण झालं की मी मोकळी.'
विचारांच्या तंद्रीत इंदीरेच ताक करून झालं. त्यातील लोण्याचा गोळा काढताना पुन्हा स्वतः शीच म्हणाली,
"इतक्या विचारमंथनतून चांगलं नवनीत म्हणजेच लोणी बाहेर येतं." आणि स्वत:शीचं हसली.
तिचं हे हसणं बघून पुन्हा मंगेशाला प्रश्न पडला की आता का हसते आहे. त्याचं डोकं गरगरू लागलं.
निर्णय भाग सहावा
मागील भागावरून पुढे
मिहीरनी मंगेशची शिस्त मोडली त्या गोष्टीलाही आता चार वर्ष झाली. मिहीर पाठोपाठ पुढचं शिक्षण घ्यायला मेघनापण बंगलोरला गेली.
घरातून निघण्याच्या वेळी मेघनाने सांगीतलं तेव्हा असा काही भूकंप घरात आला की इंदीरेला वाटलं झालं आता संपलं सगळं.
" मला विचारल्याशिवाय तू बंगलोरला अॅडमीशन घेतलीच कशी?मी नावाला बाप आहे का तुझा? माझ्या परवानगीची गरज वाटली नाही? तुझ्या आईची फूस असेल तुला.त्या मिहीर लाही तुझ्या आईनीच फूस लावली म्हणून त्यांची हिम्मत झाली.बंगलोरला जाण्याची."
मेघनाच्या दंड पकडून कर्कश मंगेशी तिला ओढलं आणि रागारागाने विचारलं,
" मी तुझ्याशी बोलतोय.मुद्दाम दुर्लक्ष करतेस.दाखवतोच आता
"असं म्हणून मंगेशी मेघनावर हात उगारला तो वरचेवर मेघनानी पकडला.खाडकन तिने मंगेशचा हात खाली झटकला. ते बघून मंगेशचा तीळपापड झाला .इंदीराकडे बघून मंगेश म्हणाला,
" ही तुझी शिकवण मुलांना बापाला उलटून वागण्याची."
" बाबा ही वेळ तुमच्यावर आली याला कारण तुम्हीच आहात. मी ,आई आणि मिहीर म्हणजे काय तुम्हाला किल्ली वर चालणारी खेळणी वाटलो का? तुम्ही ऊठ म्हटलं की आम्ही उठायचं."
" हो तसंच वाटतं मला कारण मी घरचा कर्ता पुरूष आहे. सगळ्यांनी माझंच ऐकायला हवं. माझेच नियम या घरात चालतील."
" ठीक आहे मग तुम्ही रहा या घरात स्वतःचा हुकूम चालवत.मी इथे राहणार नाही.आई तू पण चल." मेघना इंदिरेला म्हणाली.
" ती कुठेही जाणार नाही."
"आई बाबा तुला वाट्टेल तसं वागवतील.आमचा राग तुझ्यावर काढतील. चल तूही माझ्या बरोबर."
" मेघना मी येणार नाही. तू जा. ठरल्याप्रमाणे आपलं शिक्षण पूर्ण कर.आता या घरात पाऊल टाकू नकोस. तुझ्या कर्तृत्वाला या घराबाहेर राहिलीस तरच वाव मिळेल. तू जा." इंदीरा शांतपणे म्हणाली.
" भडकवा तिला अजून आपल्या बापाविरूद्ध. हे काम इंदीरे तुला छान जमतं. त्या मिहीरला असंच भडकवलस आता हिला भडकवलं.बघतो तुला मी." इंदिरा शांत होती.
" आईनी आम्हाला भडकवलं नाही. तुमच्या वागणूकीला कंटाळून आम्ही हे पाऊल उचललं आहे."
" मी मारत होतो का तुम्हा दोघांना की जेवायला देत नव्हतो का कपडे देत नव्हतो. सांग मला मी कसा छळ केला तुम्हा दोघांचा. मला कळू दे."
" तुमची अतीशिस्त. तुमच्या इच्छा आमच्यावर थोपल्या. तुम्ही आमच्या मनाचा कधी विचार केला?आमच्या इच्छा,अपेक्षा काय आहेत याचा विचार केला? नुसतेकपडेलत्ते आणि जेवण मिळून माणूस जगत नसतो.त्याच्या इच्छापण विचारल्या गेल्या पाहिजे."
" वा! मला माझी मुलगी शिकवते आता की मी कसं वागायला बोलायला हवं. मी मूर्ख आहे ! एक लक्षात ठेव या घराच्या बाहेर पाऊल टाकले तर तुझा या घरावरचा ,इस्टेटीवरचा हक्क जाईल. जसा मिहीरचा हक्क मी काढला आहे."
" काढा. जिथून तुम्हाला माझं नाव काढायचं असेल काढा.मी आता इथे थांबणार नाही."
" बंगलोर जायचं म्हणजे खायची गोष्ट आहे? तिकीट काढायला पैसे लागतात. ते काय भीक मागून जमवणार आहे?"
" त्याची चिंता तुम्ही करू नका.मिहीरनीच तिकीट बुक केलय आणि वरून पैसेपण पाठवले आहेत."
"अच्छा सगळं ठरलंय.नीघ इथून पुन्हा पाऊल नको टाकू या घरात."
मंगेश चिडून ओरडला.घाबरून त्याच्या अंगाला घाम सुटला. ओरडताना त्याचा आवाज टिपेला पोचला.इंदीरेनं शांतपणे मेघनाची बॅग उचलली.आणि दाराशी गेली. मंगेश रागाने थरथर कापत खुर्चीवर बसला. हा त्याचा अपमान त्याला सहन झाला नाही.
"निघ बाळा गाडीची वेळ होत आली. खूप शुभेच्छा. पोचलीस की फोन कर."
मेघना "आई" म्हणत इंदीरेच्या गळ्यात पडली.तिला इंदीरेनी थोपटले काही वेळात बाजूला करून निघ असं म्हणाली.
मेघना जड अंत:करणानी बॅग घेऊन ऑटोरिक्षा पर्यंत गेली.
बॅग रिक्षात ठेऊन इंदीरेला टाटा केला तशी रिक्षा निघाली.
***
इंदीरा घरात आली.आणि सरळ आत गेली.आत जाता जाता तिच्या कानावर मंगेशचे शब्द आले,
" करा वाट्टेल तसं. मनात येईल तसं वागा.या घराचं वाट्टोळ करा म्हणजे सगळ्यांना समाधान मिळेल."
त्यांचं बोलणं कानाआड करून इंदीरा आपल्या खोलीत गेली.
इंदिरा आता मंगेश घ्या दबावाखाली येणार नव्हती कारण आता तिच्या नाही मुलांच्या आयुष्याचा प्रश्न होता. तिचं आयुष्य तर बैलांच्या कोलूला जुंपल्यासारखं गेलं होतं.आता तिनं ठरवलं बस्स.....
—------------------------------------------