इंद्रजा - 9 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 9

भाग - ९


जिजाला डिस्चार्ज मिळाला......तिला घरी सोडल त्यादिवसापासून इंद्राने तिची खूप काळजी घेतली....तिच्यासोबत जमेल तितका वेळ घालवला..जिजाचा ग्रुप सुद्धा बऱ्याचदा येऊन जायचा...


जिजा घरीच असल्यामुळे इंद्रा स्वतः तिची स्टडी करून घ्यायचा.....त्यावेळी इंद्रा खूप स्ट्रिक्टली तिला शिकवायचा हे नवीन रूप पाहून ती इंद्रावर रुसायची😂पण इंद्रा मात्र तिला ओरडायचा आणि गप्प पणे अभ्यास करायला लावायचा...दोघं ही त्यांच्या प्रेमाच्या प्रवासात पूर्णपणे खुश होते...



जिजाचा फोन वाजला.....📲


जिजा - हॅलो....//


इंद्रजीत - हॅलो..!!....//


जिजा - बोला सरकार.....//


इंद्रजीत - ओह्ह अचानक सरकार and all....//


जिजा - मग काय... 😂....//


इंद्रजीत - काय करत होतीस...?.....//


जिजा - नथिंग, स्टडीज झाली मग..बसले होते, पुस्तक वाचत होते....//


इंद्रजीत - ओके.. गुड... कोणता पुस्तक वाचत होतीस....//


जिजा - वसंत पुरुषोत्तम काळे यांचं सखी हे पुस्तक वाचत होते.......//


इंद्रजीत - ओह्ह i know... खूप छान पुस्तक आहे त्याचं.......//


जिजा - हो.....//


इंद्रजीत - आ हम्म, तर मग बोल बाकी......//


जिजा - आ बाकी काही नाही तू बोल काय करत होतास......//


इंद्रजीत - काही नाही बसलोय,अजून ऑफिस मध्येच आहे, काम करतोय तुझी आठवण आली सो.....//


जिजा - इंद्रा, तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी हो ना,....//


इंद्रजीत - न नाही..म्हणजे मी काय म्हणत होतो आपण उद्या फिरायला जाऊया?......//


जिजा - उद्या... अम्म्म ठीके पण कुठे?......//


इंद्रजीत - जाऊयात ना..कुठे तरी जिकडे आपल्याला वेळ मिळेल.......//


जिजा - ओके डन.. मला असं का वाटतं आहे की तुला काहीतरी बोलायचंय माझ्याशी........//


इंद्रजीत - नाही ग.. नाही.......//



जिजा - हम्म ठीके...ठेवते मग... तू ही घरी जा लवकर.....//


इंद्रजीत - हो... बाय बेबी.....//


जिजा - बाय लव्ह.... ❤️//


इंद्रजीत - आज काय होतंय मला..तिची खूप आठवण येतेय... आणि नकळत असं वाटतय की कोणीतरी आपल्या माणसाजवळ जाऊन रडावं... मी माझ्या फॅमिली समोर रडलो तर त्यांना टेन्शन येईल.. आणि जिजा? तिला तर काहीच माहिती नाही... मी लपवतोय तिच्यापासून मला शेयर करावंसं वाटतय पण... कस करू?? तिला काय वाटेल?? 😭😔
.
.
.
.
.
.
सकाळी जिजा मस्त तयार झाली...प्लाझो पॅन्ट आणि त्यावर कुर्ता घातला....हलकासा मेकअप आणि चेहऱ्यावर किल्लर अशी स्माईल....खाली इंद्रा आला.... आज तो ही बाईक घेऊन आलेला...दोघेजण मस्त फिरायला निघून गेले....ते आधी दादर ला आले सिद्धिविनायक मंदिरात...बाप्पाचं छान आणि सुंदर असं मंदिर पाहून जिजा खुश झाली...तिकडचं प्रसन्न वातावरणामुळे मन आनंदी होऊन जात...


जिजा - बाप्पा तुम्ही माझे कायम फेव्हरेट आहात..तुम्ही तर सर्व जाणता तुमच्याजवळ काय निवेदन ठेऊ? पण एकच मागणी आहे माझ्या आणि इंद्राच्या घरच्यांना सुखी आणि हेल्थी ठेव.. इंद्राला भरभराटी दे..इंद्रा आणि मी कधी ही दूर नको व्हायला आमच्यात काहीही लपून राहता कामा नये..तस तर मला विश्वास आहे की इंद्राने माझ्यापासून काहीही लपवलेला नाही..सो i am happy..... तुझी कृपा अशीच राहो.. 🌈.... (मनात)



इंद्रजीत - बाप्पा आज तुमच्या मंदिरात आलोय माझ्या होणाऱ्या पत्नीसह तुम्हाला माझ्या मागील आयुष्याची माहिती आहेच... पण माझ्या या अर्धांगिनीला मला सांगता येत नाही आहे... तिला कळलं आणि ती मला सोडून गेली तर? ही भीती आहे... आणि बाकी कोणत्याही बाबतीत मी तिला फसवलं किंवा लपवलं नाही बस हेच.. माझी इतकीच इच्छा आहे की जिजाला हे सत्य कधीच कळू नये.. कधीच.. आणि बाकी माझ्या दोन्ही कुटुंबावर तुझ आशीर्वाद राहो....... 🌈... (मनात)
.
.
.
.
.

मग ते दादर चौपाटी ला गेले....पिझा,पास्ता, असे खूप काही पदार्थ त्यांनी तिकडे खाल्ले...horse riding सुद्धा केली....फोटोज काढले एकत्र....मग,तिथे समोरच चैत्याभूमी होती दोघ तिकडे ही गेले....आतमध्ये मा.डॉ.आबेडकर यांचं स्मारक होता...दोघ त्यांच्या तस्वीर समोर नतमस्तक झाले..थोडावेळ तिकडेच शांत बसून राहिले....आणि मग चौपाटी वर गेले...
.
.
.

शांततेत..हातात घालून दोघंही शांत समुद्राकडे पाहत बसलेले.... मावळता सूर्य आणि दोघ❤️.....जणू त्यांना सर्वकाही आता मिळालं आहे...कशाची आता कमी नाही असे तृप्त होऊन ते बसलेले...जिजाने त्याच्या खांद्यावर डोकं हळूच ठेवलं...त्या क्षणी झालेला स्पर्श त्याला त्याच्या भूतकाळात पुन्हा घेऊन गेला...तो विचारात हरवला...


जिजा - वाव!! किती छान वाटतय ना जेव्हा पाणी पायांना लागतंय... हा ना इंद्रा...🙄ओय इंद्रा.... कुठे लक्ष आहे.....


इंद्रजीत - आ हा हा बोल ना काय झालं...?



जिजा - तुझा लक्ष कुठे आहे...?



इंद्रजीत - कुठे नाही...



जिजा - खूप मस्त वाटलं आज..तुझ्यासोबत टाइम स्पेन्ट करून...



इंद्रजीत - हो मला ही.. ❤️



जिजा - इंद्रा एक बोलू का??



इंद्रजीत - हो..



जिजा - मला असं वाटतय की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस..???



इंद्रजीत - आ ब नाही असं काही नाही...



जिजा - हम्म.. तस नसावंच..पण आतून असं वाटतं होता मला..मी तुला कुणासोबत वाटून नाही घेऊ शकत... आणि मला ना खरं बोलेल आवडत.. गोष्टी लपवायच्या आणि मग नंतर सांगायचं याला काय अर्थ नसती ना रे... मला खूप राग येतो अशा खोट्या माणसांचा... माझ्या अशाच ऐका बेस्ट फ्रेंड ला मी यांचमुळे सोडून गेले...तिने तिच्या काहो गोष्टी.. तीच भूतकाळ माझ्यापासून लपवला... नंतर सांगितलं.. मला खूप जवळची मैत्रीण म्हणायची ना ती मग असं का केला? माझ्यापासूनच लपवलं.. 😏मी कायमच नातं तोडलं तिच्याशी..पण तू तस नाही केलंयस.. म्हणून मला कसलीच काळजी नाही...



इंद्रजीत - आ हो हो ना... मी.. काहीच.... नाही... लपवलं... ना....



जिजा - हम्म... 😊



इंद्रजीत घरी आला.....पण त्याच्या डोक्यात मात्र तेच सगळं फिरत होता.......तो बाल्कनी मध्ये गेला आणि सिगारेट ओढत बसला....



इंद्रजीत - हे काय चाललं आहे माझ्या आयुष्यात,हो मी जिजावर प्रेम करतोय पण मी तिला ही विसरू शकत नाही आहे, कारण ती माझं पहिलं प्रेम होती!आहे आणि कायम असेल पण तिच्याबद्दल मी हिला कस सांगू? कस सांगू जिजाला की हृदयाची अर्धी बाजू तिच्या नावी आहे.. आणि आर्धी जिजाच्या..तिला खोटं बोलेल गोष्टी लपवलेलं आवडत नसे..काय करू मी? मला ही ती सोडून जाईल.. नाही... हे तिला कधीच कळायला नको.. नकोच... 😔मी जिजाला नाही गमावू शकत..
I know प्रेमात खोटं बोलायचं नसतं..काही लपवायचं नसतं..पण,आपल्या जोडीदाराला गमवायची भीती ही असतेच ना..त्याच भीतीमुळे काही गोष्टी प्रेमात लपवाव्याच लागतात...कदाचित हे ही प्रेमच आहे...?

************************


इंद्रा काही महिने झाले त्याच्या कामात बिझी होता...जिजाला फार वेळ तो देत नव्हता...जिजा ही काहीशी अपसेट होती...



जिजाचा फोन वाजला..... 📲



जिजा - हॅलो...who??.....//



मीनल - हॅलो..मीनल बोल छू.......//



जिजा - हा बोल मीनल केसी है......//



मीनल - मी मस्त... तू?.....//



जिजा - मी पण.. बोल मी कसा फोन केलास....//



मीनल - असच मला माहित पडला तुझा लग्न ठरते आता..इंद्राजीत भोसले सोबत......//



जिजा - हो......//



मीनल - अभिनंदन हा...मग बाकी?....//


जिजा - बाकी काही नाही......//



मीनल - मग काय एन्जॉय केल का नाय तुम्ही......//



जिजा - हो करतोच की,चौपाटी ला गेलो, सिद्धिविनायक, अलिबाग ला जाऊन आलो..आणि अधून मधून macdonald ला पण जातो......//



मीनल - अरे तस नाय.... एन्जॉय... म्हणजे...***//



जिजा - ए बाई असं काही आम्ही केल नाही... कधी विचार पण नाय आला माझ्या डोक्यात.....//



मीनल - हा तुझा विचार झाला ने... त्याचे काय??.....//



जिजा - त्याचा पण हेच मत असेल....आहे म्हणजे...//



मीनल - बग जिजा माझं बी आता आता लग्न झालं..मी आणि संजू जेव्हा रिलेशनशिप मध्ये होतो ने तो असच मला टाइम कमी द्यायला लागला..कॉल कमी करायचा... मग आमच्यात.... सेक्स झाला ने... तेव्हा पासून तो खूप चांगला वागायचंय बग... मुलांची गरज आपण पूर्ण केली ने की ते पण आपल्याशी नीट वागते... आणि आजकाल young मुलांची मुलींची हे होणं कॉमन असते..प्रेम घट्ट होता वाढत हे केलेनी..आणि तुम्ही तर लग्न बी करणारे ना... मग काय वांदा नाय...//


(मीनल सारखे काही लोक असतात जे कानात थुकून जातातच😂पण यांच्याचमुळे काही धडे शिकायला मिळतात......???)



जिजा - तू खरं बोलतीस का??....//



मीनल - सौं टक्का खरे बात ने......//



जिजा - काही दिवस झाले इंद्रा असच करतोय......//



मीनल - हा ने....मग आता मी बोलें ते कर....कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है रे..असं केल की सगळं बदलत तू बग करून.....त्याची पण इच्छा असणार पण तो बोलत नाय तुला......आणि हे केला ना की कोण आपल्याला सोडून नाय जात.....बस्स... आता मी बोलते ते कर.. ओके.....//



जिजा - हो सांग.....//


📲📲📲📲📲📲📲



इंद्रजीत - ह्म्म्म हॅलो बेबी........//



जिजा - मला विसरलास वाटतं कामाच्या नादात???....//



इंद्रजीत - खरं सांगू..... हो...... 😂सॉरी.....//



जिजा -😏...//



इंद्रजीत - चिडू नकोस... आता मी एकदम फ्री झालोय...//



जिजा - ठीके मग संध्याकाळी ये घरी......//



इंद्रजीत - ओके... ले कियो पूछ पूछ...येतो चल.....//



जिजा - ओके बाय.... 🤩//



रात्री इंद्रा घरी पोहोचतो......तो खूप दमला होता.....त्याच्या डोक्यात चालेल फक्त जेवायचं आणि झोपायचं.....
जिजाने बऱ्याचवेळाने दार उघडल.....
समोर इंद्रा तिला पाहतच राहिला.....जिजाने ब्लॅक सिल्क ची ट्रान्सपरंट साडी नेसलेली....गुलाबी ओठांवर गुलाबी लिपस्टिक......मऊ अशा लांब केसांना मोकळ सोडल.....
जिजाला पाहून इंद्राची हर्टबिट्स वाढल्या....पण त्याने स्वतःला सावरले......



इंद्रजीत - hahaha अरे वा वा! साडी वैगेरे घालून कुठे???



जिजा - कुठे नाही म्हंटल आज बऱ्याच दिवसांनी तू घरी येतोयस.... त्यात आपण एकटेच.... आहोत.... म्हणून तुझ्यासाठी तयार झाले.....



इंद्रजीत - काय? एकटे?



जिजा - हो... बाबा आई आणि तारा गावी गेलेत कालच....
(त्याच्या जवळ येत )



इंद्रजीत - तू तू बोली नाहीस??



जिजा - कस बोलू... मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता.... ये बस.... जेवूया.....



इंद्रा जेवत असताना पण तीच त्याच्याकडे पाहणं...बोलण आज त्याला वेगळंच वाटतं होता...तो जितकं लांब पळत होता तितकं ती जवळ येत होती.... इंद्रा जेवून वरती गेला....जिजा ही त्याच्या पाठोपाठ गेली...दरवाजा लावून घेतला.... रेडिओ ऑन केला.... आणि.....त्याच्या जवळ जाऊन त्याच शर्ट काढलं....त्याला बेडवर ढकललं.....
त्याच्या छातीवरून हळुवार हात फिरवू लागली....



सुबह तक भी ना उतरेगा नशा ये इस पल का.........

इस मे जीले क्या करना है वादा ये कल का........

एक 'तेरी ही खातीर ये जाम है छलका.........

हाय!!!!

मेरी जान मेरी जान मेरी जान........



इंद्राला स्वतःला सावरण कठीण होत गेलं....जिजाने काहीच क्षण न घालवता लगेचच त्याच्या ओठांचा ताबा घेतला...आता मात्र इंद्रा ही तिच्यावर कोसळून पडला...



मेरी आंखो से कम गेहरा नशा पैमानो का.......

इन मे ही तो डुबना चाहे दिल मेहमानो का.......

तेरी खातीर हे तोडा ये ख्वाब दिवानो का.......

हाय..!!!!!

मेरी जान मेरी जान मेरी जान.......

आयी है जो रात नशिली इसकी हर एक बात नशिली.......


तू भी आ कर ले नशा.......

दोनो की मुलकात नशिली.......

नशे की ये बरसात नशिली.....

तू भी आ कर ले नशा आ आ.......


मेरी जान....मेरी जान....मेरी जान.....



इंद्रा तिच्या मानेवर चुबंन करू लागला.....ती विव्हलली......जिजाने तिचा पदर बाजूला सरकावळा.....अचानक इंद्रा उठून बसला....त्याला काहीतरी जाणवलं तस तो दूर झाला....



जिजा - काय झालं इंद्रा...? दूर का झालास?? ये ना...



इंद्रजीत - जिजा अग... हे......



जिजा - इंद्रा ये ना...



इंद्रजीत - जिजा ऐक....



जिजा - नको ना काही ऐकवूस.... ये ना.....तुला पण हेच हवाय ना.... यामुळे आपल नातं घट्ट होईल ना....


इंद्रजीत - जिजाsssssssss😡😡😡😡😡 चूप एकदम चूप...काय लावल आहेस तू हे?? बस्स झालं..मला अगदीच हे सगळं नकोय..अग कोण म्हणाल तुला की प्रेमात हे सगळं गरजेचं आहे..अग प्रणय क्रीडा ही अवशक्यक आहे पण फक्त मर्यादित..आणि विवाह बंधन नसताना तर अजिबात नाही...मी कधी असं बोलो का तुला? की मला काही हवंय म्हणून? मग असं का?



जिजा - ते मला मीनल...........



इंद्रजीत - अच्छा 😡 हे कारण आहे तर..😡 तिने सांगितलं आणि तू ऐकलंस काही वाटतं नाही का तुला..? मला हे कधीच नको होता यासाठीच मी प्रेम केला.. आणि तू पण कशी काय मोहित झालीस..? हे सगळं करण्याची बुद्धी कशी आली तुला.. त्यापेक्षा अभ्यासात लक्ष घाल स्वतःच करियर बग समजलं.. माझ्या जीवा वर राहणार आहेस का आयुष्यभर? शिकून सुद्धा.. 😡आणि हे जाऊदे तुला कळलं पाहिजे ना की मला कधीच नको होता हे? मी तुझ्या शरीरावर प्रेम नव्हतं केला ग कधीच..😡समजलं तुला..आपल नातं आहे तसेच घट्ट आहे ग...प्रत्येकवेळी नात्यात हेच नको असत....भांडण, छोट्या गोड तक्रारी याने पण नातं घट्ट होता.... समजलं हे असत प्रेम.... शरीरावर नव्हे मनावर प्रेम करणं....आणि मला माफ कर मी तुझ्या जितकं पण जवळ आलो....
(खोली बाहेर निघून जात )



जिजा - मी हे काय केला..मीनल च ऐकून मी खूप मोठी चूक करत होते..जी गोष्ट मला चुकीची वाटायची तीच मी आज करत होते... 😕😨मी. इंद्राचं मन दुखावलं..



इंद्रजीत रागातच बाहेर हॉल मध्ये बसला....जिजा चेंज करून खाली आली...तर इंद्रा सिगरेट पीत होता...जिजा त्याच्यासमोर बसली....आणि सिगरेट ओढून घेतला...



जिजा - इंद्रा काय करतोयस हे? मला माहिती होता की तू असे थोडेफार व्यसन करतोस पण असं माझ्यासमोर? आणि मी सांगितलेला ना की नो सिगरेट..



इंद्रजीत - हम्म.. लास्ट टाइम...



जिजा - बाळा ए ऐक ना.. आय एम सॉरी..रियली सॉरी..मला माफ कर 😕 माझं चुकलं चुकीच्या माणसांच्या दिखाव्यात आले मी आणि..😔



इंद्रजीत - जिजा अग प्रेमाचा खरा अर्थच काय.? निस्वार्थीपणाने कुणाला तरी आपलंस करने,त्याला जीवापाड जपने, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणे,प्रेम म्हणजे पवित्र भावना,हळुवार पण हक्क असेल तेव्हा केलेला स्पर्श..दोन जीवांची नाजूक डोर, समजून घेणं आयुष्यभर सोबत राहणं, सुखात ही आणि दुःखात ही.. प्रेम हे....कळलं..हे सगळं तेव्हाच जेव्हा तुझी आणि माझी मनापासून इच्छा असेल..आणि हक्क असेल अधिकार असतील तेव्हा.. हम्म..!पुन्हा असं करू नकोस..



जिजा - हो.. मी खूप लकी आहे की मला तू भेटलायस.. दुसरं कुणी असत तर...



इंद्रजीत - हो समजलं मला पुढचं...वेडी समजून घेणं तर महत्वाचं आहे....😂


जिजा -Lovee uhh❤️


इंद्रजीत - Lovee uhh too❤️



क्रमश :




©Pratiksha Wagoskar