भाग - ११
मनाली आणि जिजा वर्गात आल्या....बँच वर त्यांना एक गुलाबाचं फुल आणि चिठी मिळाली....
जिजा - अरे ही कसली चिठी? आपल्या बाकावर कुणी ठेवली?
मनाली - हो ना.. आणि अजून तर कुणी आलं ही नाही वर्गात...
जिजा - हम्म थांब उघडून पाहतेय....
ओह्ह्ह मन्या चिठी तुझ्यासाठी आहे...
मनाली - काय??बघू...
अरे देवा!आज्या ने लिहिलंय ग...
"कभी गुस्सा,कभी प्यार,"
"कभी 'तेरी जीत, तो कभी मेरी हार"
"ऐसा ही होता है हर बार"
"क्यूकी,"
"हम दोनो का रिश्ता बडा अनोखा है मेरे यार"
~फक्त तुझ्यासाठी मनाली!!तुझाच आज्या!!
(-Pratiksha Wagoskar )
जिजा - वाव किती गोड😍
मनाली - हो ना आज्या असं काही करू शकतो वाटलं नव्हतं...
अजिंक्य - आज्या लई काय करू शकतो...तुम्हाला अजून माहित नाय.....
(मागून येत )
मनाली -हम्म तर आजूबाजूलाच होतास....
अजिंक्य - हो का नको का मी तुज्या आजूबाजूला?
मनाली - असं म्हणाले का रे मी...
जिजा - ए प्लिज आता सकाळ सकाळ सुरु नका होऊ...
मनाली / अजिंक्य - आम्ही भांडत नाय आहोत.....
(ऐका सुरात )
जिजा - 🙄😕
***************************
जिजाच्या परीक्षा चालू झाल्या होत्या...म्हणून जिजा आणि अजिंक्य कमी बोलायचे आणि भेटायचे...जिजा असच अभ्यास करत असताना तिला unknown नंबर वरून फोन आला...
जिजा - हॅलो...जिजा प्रधान... Who's speaking??....... 📲
समोरील व्यक्ती - i know who u are so,don't introduced ur self........ 📲
जिजा - sorry?? Who???......📲
सा.व्यक्ती - मी कोण यापेक्षा महत्वाचं आहे की तू कोणासोबत लग्न करतेस? तू ज्याच्या सोबत लग्न करतेस तो दिसतोय तसा नाही..तो खूप डेंजर्स माणूस आहे..स्वतःचा खरा चेहरा तो नेहमी लपूनच ठेवतो..तुला काय माहिती?........ 📲
जिजा - ओह्ह अच्छा...अरे तुला काय माहिती तो कसा आहे आणि कसा नाही...मी त्याला ओळखते माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर.......... 📲
स.व्यक्ती - अग तुला काय माहित? तो त्याचा खरा चेहरा नाही दाखवत..तुला माहिती आहे का तुझ्याआधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती पण तिलाही त्याने संपवलं..अग तो फक्त सगळ्यांना लुबाडू शकतो... तुझ्यासोबत प्रेम करणं वैगेरा का? कारण तू एका पोलिसांची मुलगी आहेस त्याची इमेज अजून चांगली व्हावी आणि त्याला त्याचे चुकीचे काम करता यावेत म्हणून... आणि तू तर दिसायला ही अप्सरा आहेस मग....तुझ्यासोबत साखरपुडा होऊन सुद्धा तो दुसऱ्या मुलींच्या संपर्कात असतोच..तू कधी फोन चेक नाही करत..म्हणून तो बिन्दास्त राहतो..बहाणे आहेत फक्त काम वैगेरा...आणि तू जितकं त्याच्यापासून लांब राहशील तितकं चांगल आहे..कारण आता तो तुझ्या आई बाबा च्या मागे लागलाय..तो त्यांना मारायचा प्लॅन करतोय...तुला भरोसा नसणार पण आता तुला कळेल की,तो कसा आहे...see uhh soon तुझाच हितचिंतक!!....... 📲
(फोन कट)
जिजा - हॅलो.... हॅलो.....अरे यार फोन बंद लागतोय आता....
कोण होता हा माणूस...? मला या सगळ्यावर भरोसा नाही... पण ती कोण मुलगी होती...? खरच होती का??खरच इंद्रा माझ्या...नाही हे काय विचार करतेय मी.. असं नाही करू शकत तो.. आणि जर काही असेळ. मला कळेलच.... हम्म...
त्या कॉल मुळे जिजा जरा अस्वस्थ झाली हे खरं होता....परीक्षा संपल्या तस जिजा इंद्राला भेटायला त्याच्या घरी गेली....सगळ्यांची भेट घेतली मग ती इंद्राच्या खोलीकडे निघाली...त्याच्या खोलीतून आवाज येत होता...ती दरवाजा बाहेर उभी राहूनच ऐकत होती..
इंद्रजीत - हा हा i know यार...हे बघ तुझा माझ्यावर विश्वास आहे ना...?......भरोसा ठेव काहीही होणार नाही मी आहे ना सगळं सावरून घेईन मी..........कुणाला कळणार ही नाही.........अग हो ग.........हो बाळा काळजी नको करुस सोन्या.............हो ग..........हे बग आता मी ठेवतो कुणीतरी ऐकेल ग...........आणि खाली जिजा आले बहुतेक ती केव्हाही वर येईल तिने ऐकायला नको काही.........हो बाळा........हम्म बाय टेक केअर!!
जिजाने सगळं ऐकलं एक क्षण तिच्याशी मनात शंकेची पाल पुटपुटली....पण तिने दुर्लक्ष केला आणि ती गपचूप आत गेली.....इंद्रजीत कोणत्यातरी वेगळ्या विचारात होता....जिजाने जाऊन त्याला मिठी मारली...
जिजा - इंद्रा............ ❤️(मिठी मारून )
इंद्रजीत - अअअअ आ हाय हाय जिजा.....(दूर करत )
जिजा - काय झालं? आज असं का?
इंद्रजीत - आ बस ना..बस... बोल कसे गेले पेपर...
जिजा - फस्ट क्लास...एकच नंबर..टॉप येईन असं वाटतय...
इंद्रजीत - अरे वाह्ह छान!!
जिजा आज इतकं खुलून गप्पा मारत होती पण इंद्रा तीच नीट ऐकत नव्हता सारखं फोन पाहत होता.....टाइम बघत होता.....जिजाला ते समजलं.....इंद्रा काम आहे सांगून तिला सोबत घेऊन निघाला.....तिला घरी सोडून तो निघून गेला.....
जिजा रात्रभर विचार करत होती.....मध्यरात्री ती अचानक उठली आणि त्यांच्या साखरपुड्याची व्हिडीओ सीडी फोटोज पाहत बसली......आणि त्यातच हरवली......नजरे समोर सगळं स्वप्न उभ राहील....
.
.
.
.
.
निलांबरी- जिजा काय झालं आहे ग??
जिजा - कुठे काय??
मनाली - बरेच दिवस झाले तू खूप अपसेट आहेस...तुझ्यात आणि इंद्रा मध्ये सगळं??
जिजा - नीट आहे सगळं..आमच्यात कशाला काय होईल??
मनाली - ओके नक्की ना पण? मला तर असं नाही वाटतं..
निलांबरी - खरं सांग हू?
जिजा - अग....... (त्यांना सगळं सांगते)
मनाली - हम्म फस्ट तर..असे कॉल येणं म्हणजे नॉट सिरीयस.. आणि दुसरं म्हणजे इंद्रा दुसरं कोणासोबत पण काय तरी विषयावर बोलत असेल ना..पण तू अर्धवट ऐकल्यास.. आणि बोलणारी व्यक्ती कोण? मुलगीच आहे का? त्याचं काय नातं? हे ओळखल्याशिवाय तू असं मनात संशय नको धरूस..
निलांबरी - हो, आणि वेळ देण हे नॉर्मल आहे कामात असलं माणूस की काय वेळ देईल? तुला हे नवं नाही ना... याधी पण असं झालंय की...
मनाली - सो मनात नको ते अनु नकोस..हेच तुमच्या नात्यासाठी योग्य आहे....
जिजा - हम्म बरोबर बोलताय...
मनाली - हम्म चिल्ल आता..
***********************
शिवराज - हॅलो...शिवराज प्रधान बोलतोय आपण??..... 📲
स.व्यक्ती - हो हो माहिती आहे आम्हाला आपण कोण ते......📲
शिवराज - बोला काय काम आहे तुमचं?..... 📲
व्यक्ती - माझं काय काम असणार तुझ्याकडे? तुझाच तर विचार करतो मी दिवस रात्री..तुला कस संपवू? तुझ्या परिवाराला कस त्रास देऊ? कस तुला तड्पवू? शेवटी तूच तर मला अनाथ केलंयस...... 📲
शिवराज - काय? कोण बोलतोयस तू? तुझ काय काम? आणि तुला मी अनाथ??...... 📲
व्यक्ती - तुला सगळं माहिती आहे आता नाटक नको करुस...संजू यादव... आठवला का?? संजू यादव सोबत काय केलता तू..आता बग मी तुझ्या फॅमिली सोबत काय करतो ते..त्यांना पण असं तडपवणार...सोडणार नाय तुझ्या जिजा,तारा ला...आणि तुझ्या लाडक्या जावयाला पण.......... 📲(फोन कट )
शिवराज - हॅलो...हॅलो...
हे काय नवीन संकट आलंय..हा माझ्या मुलींना काही करणार तर नाही ना......
.
.
.
{कोण असेल हा संजू यादव?? काय होता यांचा भूतकाळ.....याचा पुढचा काय डाव असेल?? या नवीन संकटामुळे जिजा आणि इंद्रमध्ये येईल ला दुरावा?? समजेल पुढील भागात...असच स्पोर्ट करा.... शेयर करा.... कमेंट करा फ्रेंडज प्लिज.....आजचा भाग काही कारणामुळे जास्त लिहिता नाही आला....... छोटा लिहिलंय जरा समजून घ्यावं अशी आशा🌈Thankuhhh❤️}
.
.
©Pratiksha Wagoskar