अंकिलेश - एक प्रेमकथा - 26 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 26

२६

@ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

आय टेल यू, आय ॲम सो प्राऊड आॅफ माय डाॅटर. यस,अंकिता हॅज पास्ड हर फायनल्स विथ फ्लाइंग कलर्स! दॅट्स समथिंग वर्थ सेलिब्रटिंग! मला वाटलंच होतं, अंकिता मोठी होणार. शेवटी मुलगी कोणाची आहे! आता ती डाॅक्टर अंकिता झालीय! आता एक वर्षाची इन्टर्नशिप.. मला वाटतं तिने माझ्यासारखे जनरल मेडिसिन करावे, शी इज गुड इन इट. पण तशी ती सगळ्याच विषयांत चांगली आहे. पण अंकिताला तिच्या मम्मीसारखे फार्म्याकाॅलाॅजी आवडते म्हणे. ती त्यातही जाईल पुढे.

पण खरी माझी चिंता आता सुरू होतेय.. केतन अस्थाना हातचा गेला.. जाऊ देत. अंकिताला काय मुलांची कमी? फक्त तिला तो जो कोणी असेल त्याने नीट सांभाळावे.. आणि अर्थातच तो तिच्या तोडीस तोड असावा! तुम्हाला सांगतो, तिच्या परीक्षेत व्यत्यय नको म्हणून मी इतके महिने शांत राहिलो.. शांत म्हणजे..

डाॅक्टर बेर्डेंच्या मॅरेज ब्युरोत नाव रजिस्टर केले मी. रीतसर बायोडेटा..

"अरूणा, वुई नीड टू हरी अप अ बीट.."

"कशासाठी?"

"अंकिता'स मॅच मेकिंग."

"अरे पण, आता एक्झामचे दिवस आहेत.. डोन्ट डिस्टर्ब हर.."

"पण वुई शुड नाॅट अननेसेसरिली डिले.."

"का? सगळी मुलं संपून जाणारेत? द लास्ट बाॅय आॅन द अर्थ बिफोर दे बिकम एक्स्टिंक्ट?"

"तुला गंमत सुचतेय? पहिल्यांदा बायोडेटा देऊन तर ठेवतो.. ऐक. लिहिलाय मी. 22, डाॅक्टर, फायनल एमबीबीएस, व्हिटिश काॅम्प्लेक्शन, इंटलिंजंट, फ्राॅम अ वेल टू डू फॅमिली.. विलिंग टू सेटल अब्राॅड.."

"हे तू तिला विचारलंयस? सेटल अब्राॅड?"

"त्यात विचारायचं काय आहे? पुढे ऐक.. सीक्स अलायन्स विथ अ डाॅक्टर, वेल टू डू.."

"हे वेल टू डू, वेल्टूडू.. कुठे मध्ये मध्ये घालतोयस?"

"म्हणजे? दॅटस् वन आॅफ द इंपाॅर्टंट क्रायटेरिया अरूणा.."

"मला नका दाखवू. लिहा काय लिहायचे ते.."

"तुला नाही कळणार.. बाप आहे तिचा मी.."

"हो ना! बाप आहात! लिहा मग.. एक बाप्या हवाय.. नाहीतर ए रीच डाॅक्टर सीक्स अलायन्स फाॅर हिज डाॅक्टर डाॅटर.. लिहा.."

"तुला काही कळत नाही.. आय विल डू इट मायसेल्फ. फक्त तिचा फोटो आणून दे एक.."

मी मग सगळा मजकूर स्वत:च फायनल केला.. डाॅ.गावस्कर हे नाव घालायला विसरलो नाही. म्हणजे बस नाम ही काफी हे! डाॅ.बेर्डेंचा तो ईगल मॅरेज ब्युरो एकदम हाय फाय होता. त्यांच्या ब्युरोचा लोगोत होती चक्क एक घार! त्यावेळी कुठे कुठे काँम्प्युटर्स दिसायचे, त्या ब्युरोत तसा काॅम्प्युटर होता. डाॅ.बेर्डे स्वत: मोठमोठ्या पोटेंशियल ब्राईड ग्रुम्सची माहिती ठेवायचे. बहुधा घारीसारखी नजर असणार त्यांची सर्वांवर! त्यात डेटाबेस मध्ये त्यांनी आधीच अंकिताचे नाव घालून ठेवलेले, म्हणजे मी लिहायच्या आधीच.

त्यानंतर ते सजेशन्ससाठी वाट पाहणे आले. माझा अंदाज खरा होताच! पहिल्या ग्रुमची माहिती मिळायला मला तीन महिने वाट पहायला लागली. मधून मधून मी डाॅ.बेर्डेंना फोन करायचो, ते म्हणायचे ते मला आवडायचे,"सर, मुलं खूप आहेत, पण तुमच्या तोलामोलाचा हवा ना.. द सुटेबल बाॅय!"

यस, तोलामोलाचाच मुलगा हवा! सुटाबुटातला सुटेबल वन! त्यानंतर मात्र लागोपाठ तीन आले.. पहिला मुलगा डाॅक्टर नव्हताच. एका मेडिकल कुटुंबातला पण इंजिनियर झालेला.. दुसरा वकील! तिसरा होता तो जनरल प्रॅक्टिशनर. अंकिताला कसा सुपर स्पेशालिस्ट डाॅक्टरच हवा! जी पी कसा चालेल? एकाच वेळी तीन स्थळं आली नि आय वाॅज स्पाॅइल्ट फाॅर द चाॅइस! मग मी ती तिन्ही कटाप करून टाकली. माय गर्ल डिझर्व्हस बेटर.. डेफिनेटली! त्यानंतर एक डाॅक्टरचाच मुलगा.. सर्जन.. पण एका रिमोट गावातला. स्वत:चे हाॅस्पिटल चालवणारा.. एक असाच, पण परदेशातून परत येऊन इकडे सेटल होऊ पाहणारा.. त्या उलट एक होता तो काही दिवसांठी येऊन लग्नबिग्न उरकून जाणारा होता. तो मला तसा पसंत होता. पण ऐन लास्ट टर्ममध्ये मी कुठे अंकिताला विचारणार होतो? तर अशी स्थळे येत राहिली. शेवटचा पसंत पडला तरीही टाइमलाइनमध्ये बसणारा नव्हता. थोडक्यात एवढे सर्व होईतोवर परिक्षेची वेळ आलेलीच जवळ..

मी अरूणाला म्हटले,"काय करावे? सहा सात आली मुले आजवर.. एक ही धड नाही.. आणि हा शेवटचा.. घोड्यावर आलाय डायरेक्ट वरात घेऊनच!"

"सुरेन्द्र, तू ऐकणार असशील नि एक्झाम मध्ये तिला डिस्टर्ब करणार नसशील तर एक सांगू? बट यू नीड टू प्राॅमिस मी.."

बाप रे! ही काय ऐकवणार आहे? मला टेन्शन आले.. आणि तुम्हाला सांगतो, ते पुढे आजवर टिकून आहे..

"बोल बाई.. ऐकतो.."

"अखिलेश साळवी. केईएम फायनल इयर. मुलगा खूप चांगला आहे. ही विल कम अप लाइक एनिथिंग.."

"हा कोण आहे?"

"अखिलेश हे आपल्यात मुलाचे नाव असतं.."

"तेवढं मला ठाऊक आहे.. आणि ही विल कम अप म्हणजे? मला रेडिमेड कम्ड अप हवा!"

हा कोण उपटसुंभ? मी इतका वैतागलेलो की अगदी कम्ड अप म्हणत इंग्रजीचा कोथळा बाहेर काढला.

"यू मीन अंकिता त्याच्या बरोबरीने अपकमिंग? आणि तुला कोणी सांगितले?"

"डोक्यात राग घालू नकोस.. अंकिताचा स्वत:चा चाॅइस आहे. ही इज गुड. घरचा बरा आहे.."

"बरा?"

मग सगळी फॅमिली हिस्टरी झाली.. माय डाॅटर अ मिल वर्कर्स डाॅटर इन लाॅ.. नो वे! अखिलेश साळवी म्हणे! असेल चांगला, हुशार, नाटक बिटक लिहितो म्हणे.. त्याला मी हे नाटक करू देणार? व्हायचे ते टळत नाही.. त्यामुळे मी विरोध केलाच.. तो टळणार नव्हता नि त्या पाठोपाठ अंकिता वेड्स अखिलेश हे ही टळणार नव्हते. अर्थात दॅट हॅपन्ड मच लेटर.. पण हे असेच होणार हे आमच्या भास्कराचार्य पंडित गुरूजींनी मला सांगितलेच होते!

अखिलेश साळवी! माझ्या पूर्ण आयुष्यात मी दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत.. एक, कोणीही स्टुडंट असो, त्याला शिकवायला नाही म्हटले नाही. मग तो स्वत: सिन्सियर असो की नसो.. माझा फेव्हरीट असो की नसो.. आणि दुसरे.. एक्झामिनर म्हणून कधीच कुठला बायस ठेवला नाही. उलट आय आॅलवेज ट्राईड टू हेल्प स्टुडंटस. आमच्याकडे ह्या गोष्टी फार. एका टीचरचे स्टुडंट दुसरा टीचर उगाच फेल करणार! आणि फेल करणे कठीण थोडीच आहे? मेडिकल ज्ञानाला अंत नाही. आणि एमबीबीएसला एम डी चा प्रश्न विचारा.. एम डी वाल्याला फेल करायला अगदी गहन फिजिआॅलाॅजी विचारा.. लाॅटस् आॅफ वेज टू फेल स्टुडंट्स.. तर थर्ड इयर फायनल.. केईएम हाॅस्पिटलात, वाॅर्ड नंबर अकरा! प्रॅक्टिकल एक्झाम सुरू आहे.. एक ब्राइट स्टुडंट.. मेडिसीन प्रॅक्टिकलमध्ये माझे स्टुडंटची लेव्हल ठरवायचे काही स्पेसिफिक प्रश्न असत, ते त्याने इतके काॅन्फिडंटली आन्सर केले.. आय चेक्ड हिज नेम.. इट वाॅज अखिलेश साळवी! मी केईएम मध्ये एक्स्टर्नल एक्झामिनर.. समोर माझ्याच मुलीचा होऊ घातलेला, नि मला चुकूनही नको असलेला.. नवरा! चांगला हातात सापडलाय.. माझी न्यायबुद्धी मात्र मला सांगत होती.. यू हॅव बीन स्टुडंट सेंट्रिक होल युवर लाइफ.. तू ह्याला फेल करशील तर मुलीला लग्नासाठी डिस्युएड करायला ते उपयोगी पडेल.. बघ, यू वाँट टू मॅरी अ फेल्युअर? पण डझ ही डिझर्व्ह धिस? तो फेल व्हायला हवा? शेवटी माझ्यातला टीचर बापावर वरचढ ठरला. आजवर अशा कुठल्यातरी व्यक्तिगत कारणांनी कित्येक चांगल्या स्टुडंट्सच्या करियरशी खेळणारे मोठमोठे इगोइस्टिक डाॅक्टर्स पाहिलेले.. माझ्या हातात होते ते.. बट आय डिडन्ट बिकम वन आॅफ देम! अजून एक.. मी ते आता सांगतोय.. उघडपणे मात्र मान्य करत नाही, द बाॅय रियली लुक्ड प्राॅमिसिंग.. अंकिता इज चुझी.. तिला आवडला म्हणजे..

मग मी खूप विचार केला.. बेर्डेंची घार कितीही उंच उडाली तरी हाती हाच मुलगा येणार की काय? अशावेळी एकच उपाय.. भास्कराचार्य पंडित गुरूजी!