मॅनेजरशीप - भाग २ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग २

मॅनेजरशीप

भाग २

भाग 1 वरुन  पुढे वाचा ..

 

चक्रवर्ती गेल्यावर शिंदे मधुकर ला म्हणाला “सर, तुम्ही उगीच त्याच्याशी पंगा घेतला. तो फार वाईट माणूस आहे. परत आपले डायरेक्टर सुशील अग्रवाल यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तो आता त्यांच्या कानाशी जावून लागेल. तुम्हाला आता त्रास होणार बघा.”

“ते बघू आपण. तुम्ही नका टेंशन घेऊ.” असं बोलून मधुकर ऑफिस ला आला. नंतरचे आठ दिवस शांततेत गेले. चक्रवर्ती surprisingly दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागून गेला होता. आणि पूर्ण वेळ कामात लक्ष देत होता. मधुकरला वाटलं होतं की तो काहीतरी गडबड करेल पण झालं उलटच. तो एकदमच सिधा झाला होता. शांत झाला होता. मधुकर ने मग process आणि systems कडे लक्ष द्यायचं ठरवलं. काही सुधारणा सुचवल्या.

 

आठ दिवसांनंतर त्यांनी आठ दिवसांचे रिपोर्टस मागवले. या आठ दिवसांत rejections लक्षणीय रित्या कमी झालं होतं. त्यानी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर सातपुते होते, त्यांना बोलावलं आणि सांगितलं की “गेल्या आठ दिवसांत rejections नेमके कशामुळे झालेत याचं वर्गीकरण करा. म्हणजे आपल्याला कुठे जास्त लक्ष द्यायचं ते कळेल.”

संध्याकाळी हे वर्गीकरण माधुकरच्या हातात पडलं. ते लक्षपूर्वक पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सगळी प्रकरणं नाइट शिफ्ट ची आहेत. डे शिफ्ट च्या प्रॉडक्शन मध्ये एकही रीजेक्शन नाहीये. थोडा वेळ विचार केल्यावर त्यानी मनाशी काही ठरवलं.

 

दुसऱ्या दिवशी टाइम ऑफिस कडून नाइट शिफ्ट च्या लोकांची यादी मागवली. लॉग शीट्स वरुन कोण कुठे in charge होतं, आणि रीजेक्शन ची कारणं यांची सांगड घातल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक सुपरवायझर विक्रमसिंग आणि चक्रवर्ती यांची जोडी, त्या त्या वेळेस हजर होती. साधारणत: दोन सुपरवायझर एका शिफ्ट मध्ये आणि एक इंडक्शन फरनेस वर आणि दूसरा हीट ट्रीटमेंट वर अशी विभागणी असायची. रीजेक्शन दोन्ही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये झाले होते आणि त्या त्या वेळेला ही दोघं शिफ्ट मध्ये त्या त्या ठिकाणी होती. काय करावं यांचं, मधुकर विचारात पडला. बऱ्याच विचारानंतर त्यानी मनाशी काही ठरवलं. आणि एक निर्णय घ्यायचं पक्क केलं. 

 

दुसऱ्या दिवशी मधुकर नी “adviser team to general manager” अश्या एका नवीन डिपार्टमेंट ची घोषणा केली. आणि विक्रमसिंग आणि चक्रवर्ती दोघांची नेमणूक त्यात करून टाकली. आता हे दोघं नजरे समोर राहणार होती. जे काम मधुकर नी गेल्या आठ दिवसांत केलं होतं, ते काम त्यांना मागच्या वर्षभरासाठी करायला सांगितलं. वर्षभरात जेवढे रीजेक्शन झाले त्याचं अनॅलिसिस करायला सांगितलं.

ते गेल्यावर सातपुते आले त्यांना सांगितलं की “रोज च्या रोज आदल्या दिवसांचं अनॅलिसिस दुपारी तीन पर्यन्त पाठवा.”

आता रिपोर्टस आल्यावर त्या प्रमाणे अॅक्शन घेणं एवढंच काम उरलं होतं. प्रॉडक्शन आणि फिनिशिंग वर guidelines लिहून त्या काटेकोर पणे पाळायचे आदेश दिले. एवढ झाल्यावर तो निवांत बसला.

त्याला खात्री होती की आता rejection level एकदम खाली येईल. आणि पुढच्या आठ दिवसांत त्याचं प्रत्यंतर आलच. याचाच अर्थ विक्रमसिंग आणि चक्रवर्ती  हे दोघंच जबाबदार असावेत. कारण मागचा संपूर्ण आठवडा हे दोघं जनरल शिफ्ट मध्येच होते आणि मधुकरच्या समोरच बसत असल्याने फॅक्टरी च्या कामात ढवळा ढवळ करण्याची संधीच मधुकरने त्यांना मिळू दिली नव्हती.

 

जी काही रीजेक्शनस् आली होती त्यापैकी ५०  टक्के wooden pattern मुळे  आली होती. खरं म्हणजे ह्या  कास्टिंग ची रेग्युलर ऑर्डर होती त्यामूळे पॅटर्न aluminium  ची असायला हवी होती. ती लाकडी का होती यांचा शोध घ्यायला हवा. मधुकर नी सातपूत्यांना बोलावणं पाठवलं.

 

“पॅटर्न कोण अप्रूव करतं ?” – मधुकर.

“आमचंच डिपार्टमेंट साहेब.” – सातपुते.  

“पॅटर्न wooden  असावा की aluminium हे कोण ठरवत ?” – मधुकर.

“साहेब तुम्ही ब्रेक ड्रम च्या पॅटर्न बद्दल विचारता आहात ना ?” – सातपुते.

“हो” – मधुकर.

“साहेब खरं तर ऑर्डर चा volume बघता पॅटर्न aluminium चं पाहिजे पण लाकडीच वापरा अस सुशील बाबू म्हणाले.” – सातपुते.  

“का ? कारण काय ?” – मधुकर.

“स्वस्त असतं म्हणून. या कंपनी बरोबर रेट कॉंट्रॅक्ट आहे त्यामुळे मार्जिन कमी आहे अस साहेब म्हणाले.” – सातपुते.

“पण लाकूड लवकर झिजतं आणि कास्टिंगस च  dimensional rejection येतं त्याचं काय ? मशीनिंग ला अडचण जाते आणि वेळ पण जास्त लागतो.” मधुकरनी आपलं ओपिनियन सांगितलं.

“साहेब याबद्दल बऱ्याच वेळेला रिपोर्टस पाठवले आहेत.” – सातपुते.  

“मग काय झालं ?” – मधुकर.

“मग काही नाही.” – सातपुते.  

“मार्जिन कमी आहे हे खरं आहे पण रीजेक्शन मुळे जे नुकसान होतेय त्याचं काय ?” मधुकर बोलत होता. “परत ऑर्डर वेळेत पूर्ण करण्यासाठी डबल प्रॉडक्शन घ्याव लागतं ते वेगळंच. याला विशिष्ट प्रकारचं कास्ट आयर्न बनवाव लागतं आणि त्या करता Ferro silicon magnesium सारखं महाग मटेरियल वापराव लागतं ते वाया जातं यावर कोणी विचार केला आहे का ? परत तो जो वेळ वाया जातो तो दुसऱ्या हाय मार्जिन प्रॉडक्ट च्या schedule वर परिणाम करतो त्याचं काय ?”

 

सातपुते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या जवळ या प्रश्नाचं उत्तर नाहीये हे मधुकर

ला कळत होतं. या सर्वांच्या मागे खरं कारण वेगळंच असणार, आणि ते शोधून

काढावच लागणार हे ही मधुकरच्या लक्षात आलं.

 

“ठीक आहे तुम्ही जा”  आणि मधुकर विचारात गढून गेला. मुळात त्यांची स्टील

फाउंडरी होती आणि कास्ट आयर्न च्या ब्रेक ड्रम ची ऑर्डर घेतलीच कशाला आणि ती ही रेट कॉंट्रॅक्ट वर, तेच त्याला समजत नव्हत. त्यानी मार्केटिंग मॅनेजर वेणुगोपाळ ला बोलावल.

“आपण ब्रेक ड्रम ची ऑर्डर कुठल्या बेसिस वर घेतली ? आणि केंव्हापासून हे प्रॉडक्ट चालू आहे ?” – मधुकरनी विचारलं.

“साहेब सुशील बाबूंच्या भाच्याची कंपनी आहे, त्यांची ऑर्डर आहे. अत्यंत कमी रेट वर फायनल झाली आहे. आणि हे सगळं सुशील बाबूंनीच ठरवलं आहे.” वेणुगोपालनी उत्तर दिलं.

“प्रत्येक बॅच जेंव्हा dispatch होते तेंव्हा त्यांची अॅक्चुअल कॉस्ट शीट तयार केली जाते का ?” – मधुकर.

“नाही साहेब, आमचं डिपार्टमेंट नाही करत. कॉस्ट डिपार्टमेंट करत असेल तर माहीत नाही.” – वेणुगोपाल.

“ठीक आहे. जरा फिरके साहेबांना विचारा की वेळ आहे का ? आणि असेल तर बोलावलं म्हणून सांगा.” मधुकरनी सांगितलं.  दहा मिनिटांनी कॉस्ट अकाऊंटंट फिरके आले.

“फिरके साहेब, आपल्या इथे जेंव्हा ऑर्डर पूर्ण होऊन मालाची  डिलीवरी होते तेंव्हा अॅक्चुअल कॉस्ट शीट तयार करण्याची पद्धत आहे का ?” – मधुकर.

“आहे साहेब.” – फिरके.  

“मग मला ब्रेक ड्रम च्या गेल्या सहा महिन्यातल्या order wise कॉस्ट शीट मिळू शकतील का ?” – मधुकर.  

“हो साहेब पंधरा मिनिटांत घेऊन येतो.” – फिरके.  

फिरके प्रिंट आउटस् घेऊन आले. मधुकरने ते चाळले आणि म्हणाला

“अतिशय हुषारीने हे रिपोर्टस बनवलेले आहेत. यावर तुमचं काय म्हणण आहे ?”

फिरके गप्पच. ते काहीच बोलले नाहीत.

“फिरके मी तुम्हाला विचारतो आहे. याच्यात रीजेक्शन quantity चा उल्लेख नाहीये. डबल प्रॉडक्शन घेतल्याचा उल्लेख नाहीये. किती स्क्रॅप निघालं यांचा उल्लेख नाहीये. रॉ मटेरियल चे वेगळे वेगळे रेटस् दिलेले नाहीत. फिरके साहेब या रिपोर्ट प्रमाणे लॉगशीट मध्ये पण फेरफार केला आहे का ? याला तुम्ही कॉस्ट शीट म्हणता ? निव्वळ धूळफेक आहे ही.” मधुकर आता चिडला होता.

“साहेब, खरं तर कॉस्ट शीट कोणालाच दाखवायची नाही असा आदेश आहे.” फिरके आता बोलत होते.  “पण मी तुम्हाला दाखवली. इतक्या खोलात जाऊन कॉस्ट शीट फक्त तुम्हीच बघितली आहे. पण साहेब हे कोणाला सांगू नका, माझ्या नोकरीचा सवाल आहे. पण साहेब तुम्ही काही तरी कराल असा माझा विश्वास आहे. म्हणून तुम्हाला दाखवली.”

“कॉस्ट शीट दाखवायची नाही असा कोणाचा आदेश आहे ?” – मधुकर.

“सुशील बाबू.” – फिरके.  

“I see! ठीक आहे बघतो मी काय करायचं ते.” मधुकरनी समारोप केला.

“साहेब माझी नोकरी ?” – फिरके चिंतित.

“Don’t worry, I will take care.” मधुकरनी त्यान आश्वासन दिलं.

“Thank you साहेब.” – फिरके.

“बाकी ऑर्डर्स च्या बाबतीत काय आदेश आहे ? त्या पण कॉस्ट शीट तुम्ही दाखवू शकता का ?” – मधुकर.

“साहेब आदेश सगळ्याच कॉस्ट शीट बद्दल आहे.” – फिरके.  

“ओके , जा तुम्ही.” – मधुकर.  

 

मधुकर जरा विचारात पडला. सुशील बाबू डायरेक्टर असून अस का वागताहेत हे एक कोडं होतं. प्रथम चक्रवर्ती बरोबर प्रॉडक्ट मुद्दाम रीजेक्ट करायचं आणि आता समजलं की कॉस्ट शीट मध्ये फेरफार करायचा, म्हणजे कंपनी च्या खऱ्या आर्थिक परिस्थितीची कोणालाच कल्पना येऊ नये. लक्षात आलेल्या गोष्टी एवढ्याच होत्या , लक्षात न आलेल्या किती असतील माहीत नाही. हे सगळं असच करायचं होतं, तर आपली नेमणूक का आणि कशाकरता केली ? सगळाच गोंधळ.

 

संध्याकाळी मधुकर बाल्कनीत बसून कॉफी पित दिवासभरातल्या घडामोडी आठवून विचारात गढला होता. त्याच वेळेस लॅंडलाइन फोन ची रिंग वाजली, तो या शहरात फारसा कोणाला ओळखत नव्हता त्यामुळे कोण असाव असा विचार करतच फोन उचलला.

 

क्रमश:......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com