रिमझिम धून - ९ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

रिमझिम धून - ९


'लॉक उघडून जुई घरात शिरली. तिने आपली खांद्याची पर्स काढून टेबलवर ठेवली. थकली होती ती. थोडस पाणी पिऊन ती सरळ सोफ्यावर आडवी झाली नाही तोच एक हलकासा पर्फ्यूचा वास तिच्या नाकाशी रेंगाळत होता. हा ओळखीचा वाटणारा परफ्युम वासावरुन तिने ओळखला होता. पण हा वास इथे आपल्या जवळपास येणे निव्वळ अशक्य होते. आपण स्वप्नात तर नाही ना? असे तिला वाटले. आणि तिने चटकन डोळे उघडले. आपल्या घरी आपल्याशिवाय अजून कोण आहे का? हे पाहण्यासाठी ती आधी बेडरूममध्ये गेली, नंतर तिने किचन आणि हॉल चेक केला पण आजूबाजूला कोणीही नव्हते. हॉलच्या बाल्कनीतून तिला कसलातरी आवाज आला. आणि बाजुला करून ठेवलेल्या खिडकीच्या पडद्याकडे तिचे लक्ष गेले. ''कोण आहे तिथे? कोण आहे?'' ती घाबरत घाबरत बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागली.

पडदा बाजूला केल्यावर जुईचा विश्वास बसेना. ''अर्जुन तू?'' एवढेच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले. दुसऱ्याच मिनिटाला समोरून धक्का लावून ती खिडकीच्या काचेवर जाऊन आदळली. तिचा हात मागच्या मागे घट्ट धरून तो समोर अगदी तिच्या जवळ उभा होता.
''अर्जुन तू इथे? माझा हात. लिव्ह माय हॅन्ड.'' ती अडखळत म्हणाली. तरीही त्याने तो मागे पकडून ठेवला होता.

''आधी माझ्या प्रश्नांची उत्तर दे. का खोटं बोललीस माझ्याशी? कि तू पालघरला राहते. एअरपोर्टला ठाण्याला जाणार्या टॅक्सीत बसून आलीस. तेव्हाच मला समजलं होत. तूच जुई आहेस, जिच्याबद्दल मी बोलत होतो. ते सुद्धा माझ्यापासून लपवलंस. का?'' अर्जुन तिची मान वरती करून अगदी तिच्या समोर उभा होता.

''काय खोटं बोलले मी? घरचे सगळे पालघरलाच राहतात, तुला आधीपासून माहित आहे ना. मी तेच सांगितलं. आणि मी इथे राहते, कारण मी बाजूच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. अपडाऊन शक्य नाही म्हणून. मी काहीच खोटं बोलली नाही.'' जुई त्याच्या हातात अडकलेला आपला उजवा हात सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती.

''आणि मला तिथे नैनीताल ला असताना ओळखलं होतंस ना, मग तुझी ओळख का नाही सांगितलीस?''

''अर्जुन तू पण मला ओळखलं होतंस ना. मग तू का शांत राहिलास? मला वाटलं तू मला विसरला असशील.''

''कसा काय विसरेन. तुला वाटलंच कस? तुला माहित आहे, इथे आल्यापासून तुझी माहित काढतोय, ऍड्रेस शोधतोय. आज मला डिटेल्स मिळाले. आणि डायरेक्ट इथे आलो.'' अर्जुन खूपच रागात होता.

''का आलाय? मी नाही बोलावलंय तुला.'' आता तिच्या डोळ्यात पाणी साचलं होत. जुईने आपली नजर बाजूला फिरवून घेतली.अर्जुन अजूनही तिच्याकडे बघत होता.

''तुला माहित नाही का आलोय ते?'' अर्जुन तिची हनुवटी धरून तिला विचारात होता.

''माझा हात खूप दुखतोय रे. सोड ना, प्लिज.'' जुई त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

''लहान असताना खेळताना मीच पाडलं होत तुला. तेव्हापासून दुखतो तो हात. माहित आहे, दुखतोय. पण सोडला तर तू इथून पळून जाशील. माझ्या एकही प्रश्नच उत्तर देणार नाहीस.'' अर्जुन तिच्या हातावरची पकड थोडी सैल करत म्हणाला.

''दुसरीकडे कुठे जाणार आहे पळून? नाही जात. हात सोड. मी इथेच आहे.'' जुई म्हणाली आणि त्याने तिच्या हात सोडला. ती अजूनही काचेला टेकून तशीच उभी होती. आणि तिच्या दोन्ही बाजूला आपले दोन्ही हात मागच्या काचेला टेकून तो अगदी तिच्या जवळ उभा होता. तिला अवघडल्यासारखं झालं होत.
''अर्जुन बसून बोलूया.''

''का असं उभं राहून सुद्धा तुला त्रास होतोय का? कि माझाच त्रास होतो तुला? सांग, तस असेल तर मी निघून जातो.'' तो अजूनही तसाच उभा होता.

''माझ्या घरी आलायस, हि कोणती पोलीस चौकी नाहीय, उलट तपासणी घ्यायला. काय विचारायचं आहे? नीट बसून विचार.'' जुई रागावली होती.

''केवढा राग करतेस ग माझा. तिथे नैनितालला असताना माझ्या बाजूला बसून का रडत होतीस मग? तुला तर मी आवडत पण नाही. साधा मोबाइल नंबर पाठव म्हंटल, तर तुझ्याने ते होईना.'' अर्जुन. 

''ओरडू नकोस रे. मला वाटलं तू विसरला असशील सगळं. आणि उगाच जुन्या आठवणी काढत बसायचं कशासाठी? आपले आई-वडील एकमेकांशी बोलत नाहीत, भेटणे तर दूर. आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, हे समजलं, तरी त्यांना आवडणार नाही. मग आपण कशाला ओळख काढून उगाच संकट ओढवून घ्यायचं. असा विचार केला मी. बाकी काही नाही. आणि मी तुझा कधीच राग केला नाही, तुला हे चांगलं माहित आहे.'' जुई खोल त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती. ती अगदी त्याच्या जवळ उभी होती. उजवा जात त्याच्या गालावरून हळुवार फिरवत ती क्षणभर स्वब्ध झाली. साठवून ठेवलेले सगळे अश्रू टपटप तिच्या गालावरून ओघळू लागले होते. सावरू म्हंटल तरी तिला सावरता येईना. बघता बघता तिने त्याच्या छातीवर आपलं डोक टेकवलं. आणि अर्जुनला घट्ट मिठी मारून आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.
''ठरवलं होत, स्वतःला सावरेन, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या भावना तुझ्यासमोर येन देणार नाही. पण नाही जमल.'' ती आपले हुंदके आवरत बोलत होती.

अर्जुन फक्त शांत उभा राहून तिला ऐकत होता.
''एक दिवस असा गेला नाही कि तुझी आठवण आली नाही. कुठे जाईन तिथे, सोशल मीडियावर, नेहेमी तुला शोधत असायचे, पण मी तुझ्यासारखी कोण अधिकारी थोडी ना आहे, कि पाहिजे ती माहिती चुटकीसरशी मिळवू शकेन. तरीही मी माझे प्रयन्त सुरु ठेवलेले. कधीतरी वाटायचं तू येशील मला शोधत, कुठेतरी आपली पुन्हा भेट होईल. पण तस काही झालाच नाही. पण तू... तू... तुला केव्हा माझी आठवण आली नाही? तुझ्याकडं तर सगळे सोर्स आहेत ना, मला शोधावस वाटलं नाही? बोल ना?''

ती त्याच्या शर्टची कॉलर पकडून रागारागाने त्याला विचारात होती. तो अजूनही स्वब्ध उभा राहून तिचा तो अवतार बघत राहिला. काय बोलावं त्याला कळेना.

''जुई १२-१५ वर्षाचं वय असेल तेव्हा, तेव्हा तुझ्या मनात माझ्याबद्दल असणाऱ्या भावना मी समजू शकतो. पण आता मोठे झालोय आपण, मला वाटलं तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेली असशील. मुव्ह ऑन केलं असशील. म्हणून मी सुद्धा तुझा विचार मनातून काढून टाकला होता.'' तिचे डोळे पुसून अर्जुन तिला समजावत होता.

''१२-१५ वर्षाचं वय असलं तरीही अक्कल असते त्या वयात, अगदी लहान नव्हतो आपण. तेव्हापासून मी तुझ्याबद्दल विचार करायचे, किती पजेसिव्ह होते. मग विचार कर ना, कि आत्ता माझ्या तुझ्याबद्दल किती स्ट्रॉंग फिलीन्ग्स असतील. मी नाही विसरू शकले तुला. अजिबात नाही.'' जुईने प्रामाणिकपणे कबुली दिली होती. ती अजूनही हुंदके देत समोर उभी होती. अर्जुन आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला.

''काय बघतोयस? विश्वास नाही बसत का? कमीत कमी जवळ तरी घे ना मला.'' एखाद्या लहान मुलाप्रमाणे ती बोलून गेली.

''अजूनही लहान मुलीसारखी वेडी आणि खुळी आहेस तू.'' म्हणत आवेगाने अर्जुनने तिला आपल्या मिठीत घेतलं होत. त्याच्या हि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिच्या बालपणीच्या प्रेमाला बिलगून, त्याच्या शर्टला घट्ट पकडून ती कितीतरी वेळ रडत राहिली.

''जुई पुरे, डोळे पूस आता. एक ह्ग पुरे कि अजून काही पाहिजे. बघ नंतर कंप्लेंट करू नकोस.'' म्हणत त्याने हाताला धरून तिला बाजूला करत हॉलमधील सोफ्यावर आणून बसवलं. डोळे पुसून जुई त्याचा हात पकडून तशीच बसून होती. आता ती थोडी शांत झाली होती.

''तू बाल्कनीतून आलास?'' थोड्यावेळाने तिने विचारले.

''होय. मी असाच येतो. कारण सरळ दाराने नाही येऊ शकत. यापुढे लक्षात ठेव.'' अर्जुन हसत म्हणाला.

''अर्जुन माझ्याकडे एक एक्सट्रा चावी आहे. घेऊन ठेव, रोज रोज बाल्कनीची काच फोडत बसू नकोस.''

''काच फोडायची काय गरज, स्लाइड ग्रील ती बाहेरून उघडता येते. तू सेफ्टी ग्रील बसवून घे बाहेरून, नाहीतर चोर सुद्धा सहज आत येऊ शकतो. आणि चावी तर मला हवीच आहे. तू नाही दिलीस तरी मी घेणार.'' अर्जुन.

''आणि सध्या कुठे असतोस?'' जुई त्याची माहिती काढत होती.

''सध्या तुझ्या हृदयात. आणि राहायला बांद्राला गव्हर्नमेंट कडून रेसिडेंट असतो, त्यामध्ये.''

''सध्या नाही, माझ्या हृदयात तू खूप वर्षांपासून राहतोस. तुला त्याची कल्पना सुद्धा नव्हती.'' जुई त्याचा हात आपल्या हृदयाजवळ नेत म्हणाली.

''जु, खरचं वेडी आहेस तू? अजिबात बदलली नाहीस. जशी होतीस तशीच. पण आधीपेक्षा सुंदर दिसतेस, अगदी निरागस आणि गोजिरवाणं पिल्लू. जरा खातंपितं जा. केवढी नाजूक झालेस. '' तिच्या डोक्यावर किस करत तो म्हणाला.

''मी आधीपासून नाजूक आहे. आणि तू खातोस ना माझ्यावरच डबल, म्हणून तर एवढा स्टील मॅन झालास.'' जुई नाक फुगवत त्याच्या दंडाला चिमटा काढत म्हणाली.

''जुई जुई... केव्हढंस पिल्लू आहेस, डॉक्टर आहेस कोणी म्हणणार नाही. बाय द वे, तू डॉक्टर का झालीस? तुला तर टीचर व्हायचं होत ना.''

''तू प्रशासकीय अधिकारी का झालाय? आधी सांग.''

''पप्पा अधिकारी होते, आणि तुमच्याकडे सगळे, म्हणजे माझे परमप्रिय मामालोक विख्यात गुंड आहेत, सो पप्पांनी आधीपासून ठरवून ठेवलं होत, मला प्रशासनात टाकायचं. अर्थात मी थोड्या वेगळ्या दिशेने गेलो. पण ओके, त्यांची इच्छा पूर्ण झाली.''

''मग आमची सगळी फॅमिली गुंड आणि तुमची सगळी फॅमिली पोलीस. मार लागून जखमी होण्याचे १०० टक्के चान्सेस. मलमपट्टी करायला कोण नको का? म्हणून मी डॉक्टर झाले.'' खुप वेळाने जुई चक्क हसली. आणि अर्जुन तिचा हसरा चेहेरा बघत राहिला.

''मिस डॉक्टर, नंतर माझं ड्रेसिंग करशील, तू मस्त हळुवार करतेस, अजिबात दुखत नाही, आणि दुसऱ्याच क्षणी झोप येते.'' अर्जुन पोटावरची जखम दाखवत म्हणाल.

''आठवडा उलटला, ते ऑपरेशन अजून बर नाही झालं का? लहानापासून तुला स्वतःची काळजीच नाही, तेव्हा सुद्धा सारखा पडत असायचास. मग कुठे ढोपराला लागायचं, तर केव्हा कोपराला. अजिबात सुधारणा झालेली नाही.''

''तेव्हा काठी घेऊन माझ्या मागे लागायचीस, टीचर टीचर खेळत. आता डॉक्टर म्हणून इंजक्शन घेऊन फिरत बस.''

''लहानपण खूप छान होत. शाळेतल वय सुद्धा मस्त होत. आत्या आणि काका तुला घेऊन घरी यायचे, दोन्ही फॅमिली मिळून आपण मस्त सुट्टीभर एकत्र राहायचो ना. मजा करायचो. आता मात्र आपल्या दोन्ही घरच्यांचे मतभेद एवढे वाढलेत कि एकमेकांच्या जीवावर उठतात हे लोक. मोठेपणाची दुनिया नको वाटते हल्ली.'' जुई सांगत होती आणि अर्जुन भूतकाळ आठवून बोलत होता.

''जे व्हायचं ते होतच असत. केव्हातरी हे सगळं ठीक होईल. एवढीच आपण अपेक्षा करू शकतो. आणि तेव्हाचे चांगले दिवस आठवू शकतो.'' अर्जुन तिला समजावत होता.

''खरचं ते दिवस परत आले पाहिजेत रे. मी मिस्ड करते.''

''तुला आठवतंय तेव्हा आपण खेळायचो. आपल्या भतूकलीमध्ये बाजूची सगळी मूल मिळून रोज आपल्या दोघांचं लग्न लावायचे आणि तू जाम चिडायचीस, आणि खेळ सोडून निघून जायचीस. का? तर,सगळ्यांचं एकदाच लग्न होत, आपलं लग्न रोज रोज का लावतात म्हणून.'' अर्जुन तेव्हाचे दिवस आठवून हसायला लागला.

''तेच तर दिवस होते, माझ्या मनातील तुझं स्थान पक्क करणारे. नंतर त्या जागी मी दुसऱ्या कोणाचा विचार केलाच नाही. ना कॉलेगमध्ये, ना डॉक्टरेट च्या वेळी.'' बोलून जुई शांत झाली.

''मला वाटलं नव्हतं, तुझं अजूनही माझ्यावरती एवढं प्रेम असेल.'' अर्जुन तिला जवळ घेत म्हणाला.

''आहेच ना मग. आय एकसेप्ट इट. जाऊदे, तू असा काही विषय काढलास कि, मी सारखी इमोशनल होते. तू एवढ्या वर्षांनी भेटतोयस ना म्हणून असेल. '' जुई पुन्हा सेंटी झाली होती.

''ए रडूबाई आपण एवढ्या दिवसांनी भेटतोय. माझ्याकडे जास्त वेळ नाही. सारखी रडत बसू नको. मस्त गप्पा मारूया, बोलूया, नाहीतर बाहेर कुठेतरी जाऊया. जा फ्रेश होवून ये.''

''मला भूक लागलेय. तुला सुद्धा लागली असेल ना? आधी मी खायला काहीतरी बनवते. मग बाकी सगळं.'' म्हणत जुई डोळे पुसून उठली.

''जु ऐक ना, आज आपण दोघांनी काहीतरी बनवूया. भातुकली सारखं... मी हेल्प करतो ना तुला.'' बोलत अर्जुन किचनकडे निघाला.

''ओके.'' बोलून ती बेडरूमकडे निघाली. आणि अर्जुन तिची वाट बघत हॉलमध्ये बसला.

*****

क्रमश