रिमझिम धून - १० siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रिमझिम धून - १०

'फ्रीझ उघडून जुईने कणिक आणि भाजी बाहेर काढून ठेवली. थोडं सलाड करून तिने टेबलवर ठेवल. पोळी लाटायला सुरुवात केली तेव्हा अर्जुन किचनमध्ये आला होता. तो उगाच तिच्या मागे पुढे करत होता. त्याला स्वयंपाकाचं काहीही येत नाही, हे जुईने ओळखलं. तरीही तो केसात काहीतरी करत जुईच्या मागेच उभा होता.'
''अर्जुन पोळी भाजी चालेल ना? मी रात्रीचा राईस करत नाही. तुला पाहिजे तर करते.'' तिने पोळी भाजून घेतली आणि प्लेटमध्ये काढली. अर्जुन अजूनही तिच्या केसात मानेवर काहीतरी करत होता. काहीतरी चेक करावं असं तो तिला बघत होता. जुईला कळेना तो असं का वागतोय. तिने लाटण हातात घेतलं आणि ती मागे वळली.

''काय चेक करतोस, केसांची लांबी मोजतोय कि मानेची रुंदी? कि मीच जुई आहे, हे बघतोस?'' लाटण त्याच्यासमोर धरून तिने त्याला फैलावर घेतले. तिच्या कमरेला धरून स्वतःकडे ओढत तो तिच्याकडे बघत होता. त्याची अशी नजर बघून तिच्या हातातील लाटण गळून खाली पडलं होत.

''तुला बघतोय, नाही बघायचं का ?'' त्याने तिच्या नाकावर एक टिचकी मारली.

''केसात काय बघत होतास? ते जाऊदे, आधी मला सोड. असं पकडायला आपण आता लहान राहिलो नाही.'' जुई तशीच पुन्हा मागे वळली. आणि तव्यावरची पोळी काढून तिने प्लेटमध्ये ठेवली. अर्जुन तिच्या मागे तिच्या कमरेला घट्ट पकडून उभा होता.

''जु, ज्या गुंडानी तुझं किडण्यापिंग केलं होत. त्यांनी तुला काय त्रास दिला? आय मिन, फिजिकल काही?'' आता तो आपल्या मूळ मुद्यावर आला.

''ओह, तर तू मघापासून ते चेक करत होतास? आता माझ्या लक्षात आलं.''

''होय, फ्लाईटमध्ये तुझ्या मानेवर वेगैरे नखांचे निशाण होते, आणि पायाच्या बोटाला थोडं खरचटल्या सारखं दिसत होत. म्हणून विचारतोय.'' बाजूच्या सलाड मधला एक काकडीचा तुकडा तोंडात टाकत तो म्हणाला.

''जाऊदे ना तो विषय, मला त्रास होतो त्याचा. नको आठवूस काही.'' हातातली पोळी लाटायची तशीच ठेवून जुई स्तब्ध झाली.

''जुई, एकच प्रश्न, बस्स. बाकी काही सांगू नको. मी विचारणार हि नाही.''

''किडण्यापिंग करताना लागणार ना. आणि मी सुटण्यासाठी प्रयत्न केला. एकदा तिथून पळाले होते, त्यावेळी लागलं होत थोडं फार.''

''मी काय म्हणतोय तुला समजतंय? थोडस लागण, खरचटण साहजिक आहे. दुसरं काही. तुझ्याशी फोर्सफुली काही करण्याचा प्रयत्न.. वेगैरे.'' अर्जुन त्याच्या प्रश्नावर ठाम होता.

''केला होता, पण नशिबाने सुटले मी. कारण मी त्या माणसाशी लग्न करायला होकार दिला. लग्न तर झालच नाही. तोपर्यंत मी तिथून पळाले होते. पण त्या आधी त्याने प्रयत्न केला होता.'' जुईच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. अर्जुनला हे जाणवलं होत. त्याने चटकन आपल्या हाताची पकड सैल करून तिला सोडलं.

''नक्की प्रयत्न कि ?'' तो अजून कन्फ्युज होता.

''तुला काय माझी टेस्ट वेगैरे करून दाखवू का? असं का विचारतोस? विश्वास नाही आहे?'' जुई त्याच्यावर चिडली होती.

''सहज विचारलं. जर तस काही केलं असेल ना, तर माझ्या इनकॉउंटर लिस्टमध्ये अख्या नैनिताल मध्यल्या सगळ्या गुंडांचा एकामागोमाग एक नंबर लागेल. एकाला पण सोडणार नाही मी.'' अर्जुनच्या डोळ्यात फक्त तिरस्कार आणि राग दिसत होता.

''शांत हो आधी, मी ठीक आहे. तू पाहिलंस ना तेवढे लागलं होत मला. बाकी काहीही नाही. आणि तू... तू काय म्हणालास? इनकॉउंटर लिस्ट... म्हणजे तू इनकॉउंटर स्पेशालिस्ट आहेस?'' जुई डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. तिच्यासाठी हा धक्का होता. ती ज्याला प्रशासन अधिकारी समजत होती. तो तिच्या इमॅजिनेशनच्या बाहेर होता.

''इनकॉउंटर स्क्वाडचा हेड आहे मी. तुला माहित नव्हतं का? (M. E. S.) त्यादिवशी सांगितलं तर होत ना.'' तो बोलला आणि ती तशीच किचन कट्टयाला लागून सरकन मागे झाली.

''जुई आर यु ओके?'' तो तिच्या त्या शॉकिंग चेहेऱ्याकडे बघत राहिला.

''म्हणजे म्हणून तुझ्या मागे ट्रेन मध्ये ते गुंड होते. तू डॉक्टर सुद्धा हॉटेल रूमवर बोलावलास, मंगेश आणि तू सिक्युरिटी बद्दल खूपवेळा बोलत होतात. एरपोर्टला सुद्धा तू खूप सावध होतास. सतत चौफेर नजर ठेवून होतास. हे सगळं यासाठी कि तू इनकॉउंटर स्क्वाडचा हेड आहेस. M. E. S.म्हणजे काय मला समजलंच नाही रे.'' जुई सुन्न झाली होती. तिच्या डोक्याच्या पलीकडे काहीतरी तिने ऐकले होते.

''जसं तू लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचं ऑपरेशन करतेस ना, तसेच लोकांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून मला अपराधींना गोळ्या घालाव्या लागतात. आणि तशा सुचना द्याव्या लागतात. पण हे ऐकून तू एवढी का घाबरलीस.'' अर्जुनला तिच्या घाबरण्याचे कारण समजेना.

''सामान्य माणसाचा जीव वाचवणं वेगळं रे, पण कोणाला तरी गोळ्या घालणं. माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे. म्हणून घाबरले. मला याची कल्पना नव्हती.'' जुई अजून तिच्या ट्रॉमा मध्येच होती.

''कोणाला तरी नाही जुई, गुन्हेगारांना. नाहीतर सामान्य माणसाला समाजात शांततेने जगणं मुश्किल होईल. गुन्हेगार जेलमधून शिक्षा भोगून बाहेर आला ना तरीही तो गुन्हा करतो. अनेक निरपराध लोकांचे प्राण गेले तरीही काही गुन्हेगार बिना पुरावा सुटतात. रोजच्या रोज गुन्हे घडतील. निरपराधांचे जीव जातात. चोरी होते. खून होतो. हे थांबवण्यासाठी आम्ही काम करतो.'' अर्जुन तिला शांत करत म्हणाला. 

''सो मिस्टर स्पेशालिस्ट आपण जेवणार आहेत का?'' वाढू?'' तिने पोळीच्या पिठाच्या हाताने त्याला सॅल्यूट करत विचारले. आणि तिचा हात बघून अर्जुनला हसू आवरणे अशक्य झाले. 

''मिस डॉक्टर, हात धुवून घ्या. मग जेवूय आपण.'' त्याने तिच्या डोक्याचा हात खाली करून बेसिनमध्ये नळाच्या पाण्याखाली धरला. 

''अर्जुन दुसरं काही प्रोफेशन नाही भेटलं का रे तुला?'' ती हात पुसत त्याच्या जवळ आली. 

''सगळ्या गोष्टी आपला हातात नसतात. कदाचित वरच्याची मर्जी असेल तशी. का पण? तू एवढा का विचार करतेस?'' तिचे केस कानामागे करत तो बोलत होता. 

''तू वाईट वाटून घेऊ नकोस. यु आर द ट्रू पॅट्रीऑट. पण माझ्या सामान्य मनाला पटत नाही रे. माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे हे सगळं. कारण मी तुझ्याबद्दल असा काही विचार केव्हा केला नव्हता. हे पचवायला थोडा वेळ लागेल.'' त्याच्या शर्टचा निघालेला बटन लावत ती म्हणाली. 

''यामुळे मी तुला याआधी भेटण्याचा विचार नाही केला. नाहीतर मी तुला सहज शोधून काढू शकलो असतो. बघ तू अजूनही विचार कर. माझ्या आयुष्यात सेफ्टी काहीच नाही. ना स्थैर्य आहे. ना मी तुला वेळ देऊ शकत. असाच केव्हातरी भेटायला येत जाईन. बाकी गोष्टी तेव्हाच्या तेव्हाच समजतील. आता त्याबद्दल काय बोलणार.'' अर्जुन तिचा हात हातात घेऊन उभा होता. 

''अर्जुन, तुला खरोखर आवडते मी. प्रेम करतोस? कि जस्ट मी मागे लागले म्हणून मला भेटायला आलास.'' 

''तुला माहित आहे, मी पप्पा आणि आईला भेटायला चार-पाच महिन्यातून एकदा जातो. बाकी कोणत्याही नातेवाइकांना भेटत नाही.  तू फक्त काही दिवसांपूर्वी मला सापडलीस. एरपोर्टला सोडल्यापासून तुला भेटण्यासाठी आठवडाभर तुझा पत्ता शोधतोय. एक तासापूर्वी मला तुझी माहिती मिळाली आणि सरळ इथे निघून आलो. खरंतर असच भेटून परत जायचं ठरवलं होत. कारण मला माहित होत, मी कोण आहे समजल्यावर तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. मला नव्हतं माहित कि, तू अजून माझी वाट बघत असशील.  आज तू गळ्यात पडून हमसून  हमसून  रडत होतीस ना, ते बघून माझा माझ्या भावनांवर कंट्रोल नाही राहिला. नाहीतर तुला भेटून निघून गेलो असतो. मग माझा मार्ग वेगळा आणि तुझा मार्ग वेगळा असता. बट आय रिअली लव्ह यू. माझी लहानपणीची सवंगडी म्हणून, शाळेतली बेस्टी म्हणून. आणि माझ पाहिलं आणि शेवटचं प्रेम जु म्हणून.... आवडतेस तू मला.'' अर्जुन तिच्या निरागस डोळ्यात बघत म्हणाला. आणि जुई कमालीची खुश झाली होती. 

''आणि माझं सुद्धा तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे. एवढं आभाळाएवढं. खूप जास्त.'' जुई आपले हात पसरून लहान मुलीसारखी त्याला दाखवत होती.  

''माहित आहे मला. वेडी जु. आता खायला काही देणार आहेस कि फक्त गप्पा मारून पोट भरायचं?'' 

''ओह. जेवण लावते बस ना.'' 'म्हणत जुईने प्लेट्स लावायला घेतल्या. आणि भाजी पोळी वाढून ते दोघे जेवायला बसले. 


क्रमश