चंद्रीचा इत Geeta Gajanan Garud द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

चंद्रीचा इत


चंद्रीचा इत
©®गीता गरुड.

बांधेकरीन : ऊ ऊ ऊ,गे सुसले आसस काय गे घरात.

चव्हाणीन : व्हयतसीच आजून दोन कोसावयना आरडत ये.गे माझे काय कान फुटले हत?
(चव्हाणीन सुनेक चायचा पानी ठेऊक सांगता.)

बांधेकरीन :नको गे बाय चाय,आताच चाय खाऊन इलय घराकडसून.
गे चंद्री गाय इयाली आमची.
आमी लावनीसून इलाव,वायच पिठीभात खालव नी निजलाव.
आजून पंधरा दिस तरी लागतले चंद्रीक असा डाक्टरान सांगलला.
म्हनान आमी सूस निजलव अगदी.
नी लावणीत चिखलात उभ्या रवला काय रातीक माझा मडाच जाता.
कोनी माका उचलून नह्यत फेकून दिल्यान तरीदेखूल माका कळाचा नाय.
हातापायानी वाती येतत निसते,थंडात वावरुन.

हा शीरा पडला त्या तब्येतीर, काय सांगी हुतय तुका🤔🤔
हां तर निजलाव सगळी नी फाटफटी हे आमचे भायर जाऊच्यासाठी उठले.
नी वाड्यात वायच नजर टाकल्यानी तर बघतत तर काय,गाय इयाली हुती नी वासरु तिच्या
बाजूक बसलला.
नी आमची चंद्री चाटी हुती गे त्याका.
हेंनी वासराक गवतान पुसल्यानी.
तेच्या पायाची गेलका काढल्यानी.
मगे त्याका गवतार उब येवचेसाठी बसवल्यानी.
तेचे अंगार कांबळा घातल्यानी.

मग बाय मिया न्हानीत आग घातलय.
बरा मडक्याभर पानी तापवलय.
तवसर हेंनी गोड्या तेलान चंद्रीक कमरेकडचे बाजूक चांगली मालीश केल्यानी.
मगे मिया दोन बादले गरम पानी वतून दिलय.
हेंनी तिका शाप आंघूळ घातल्यानी.
चंद्रीक आंघुळ झाल्यार वायच तरतरी इली.
तवसर आमच्या सुनेन दोन नाल किसले,गुळ चिरलो.नी नालाचा चुन,गुळ घालून गरम गरम बादलीभर सुरय तांदळाची पेज बनयली.
चंद्रीक भुक लागलली.तिका घमेल्यात ती पेज दिलय नी तिच्या पाठीर मायेन हात फिरयीत रवलय.
तिना पेज आवडीन खाली.

मगे हेंनी दुध काढला. वासराक लुचवल्यानी.
ह्या चंद्रीचा तिसरा इत. पयली गाय असा.
तिच्या पाठीर येक पाडो झालो नी ह्यो येक.
कधी कुनाक शिंग लावल्यान नाय आमच्या चंद्रीन काय कधी कुनाच्या परड्यात घुसली नाय.
येकदम सोन्याच्या गुनाची हा माझी चंद्री.

तीन दिसाचो चीक बरो दोन लीटर साठलो.
मगे गुळ चिरलय.
दोन नाल किसून तेचो रस काढलय.
जिरा भिजत घातलय.
जिरा नी येलदोड्याची बरी गंधासारी गोळी वाटलय.
चिक गाळून घेतलय.
तेतूर गुळ,खोबर्याचो रस,जिर्याची वाटलली गोळी ,हळद घातलय.सगळा स्वैन येकजीव केलय.नी खरवस उकडत ठेवलय.
केळीच्या पानांवयनी काढून देवाक ,तुळशीक देखवलय.
बाकीची वाडीतली येऊन खाऊन गेली गे.
तुझोच खय पत्तो नाय,तवा तुका खरवस घेऊन इलय.
ह्यो डबो धर.
काजीबुडल्या इलासाकडे निरोप दिललय,तेना सांगला नाय तुका?

चव्हाणीन : होय इलस्यान सांगला म्हंजे झाला. तेका खयला काम जमताहा.
निसता आपला इसारलय करता नी दाताचे फळये काढून फिदीफिदी हसता.
त्यो बघ इलस्याचो बापूस व्हाळावरसून येताहा.

बांधेकारीन :गे बाय बघलस काय ता.
इलसो थय झाडाबुडी बसललो तो उठलो,नी बापसाच्या तोंडातला इडयेचा थोटूक घिऊन व्हाळाहारी गेलो.
खेतुरव फिफ्टी फिफ्टी करतत मेले.
नी व्हाळार घान करुन ठेयतत.
थय कसल्या कामाक जावचीव चोरी बाईलमानसांका.
इटमना झाली हेंचेपुढे.

चव्हाणीन : बरा पैसे नसत असा नाय हां.
मुंबयच्या झिलान गुदस्ता घर दुरुस्त करुन दिला.
हिरीर पंप बसवलो.
संडास मोठोसो बांधलोहा.
गोबरगेस कायती बांधलीहा.पन हे दोघाव त्या सांडसात पाय ठेइत नायत.

बांधेकरीन : कित्या गे?भियाले की काय ते जागेर?
तसा काय आसला तर सांग अगुदर, मगे मिया पन पोराटोरांका ते सायटीक जावचा बंद करीन.
ओगीच इकतचा दुखना नको.

चव्हाणीन : झाला तुझा सुरु.
गे आवशी वायच ऐकान घेशीत की नाय.तुझाच तुनतुना सुरु.
अगे तो गोबरगेस बांधलोहा ना तेतूर ढोरांचा शँण टाकतत.
मगे गोबरगेसचे शेगडीर सगळा जेवान बनयतत.
काय भकभकावून पेटता शेगडी!
व्हयती बारदाना(सिलेंडर)झक मारतीत तिच्यापुढं.

बांधेकरीन : पन हे बापलेक त्या सांडसात कित्या नाय जानत?🤔🤔

चव्हाणीन : गे त्या सांडसात गेले तर त्यांचे दोन नंबराचोव गेस तयार होतलो मगे तो जेवनाक कसो वापरुचो म्हनान इलस्याची आऊस आपनव भाकरात जाता नी हे दोघांकाव व्हाळार पिटाळता.😇

बांधेकरीन : काय बाय करशीत हेंका.
ही मानसा काय सुधरुची नायत.
चल,गजालेक बसलय.
घरात कामा पडली हत ढोपारभर.
सुनेचा कपाळ धरलाहा.
पटी बांधून निजलीहा.
माकाच सगळा करुक व्हया जाऊन.
उद्या ऐतवारी कुडाळात परब डाक्टराकडे धाडतलय तिका झिलावांगडा.
सगळी ए टू झेड तपासणी करुन घेतले ते.
मगे समजात तरी कशान डोसक्या धरता तिचा ता.
का खय भियाला हा का काय माह्यत,बघुक सांगतय हेंका.
तशी आळशी नाय हा गे ती.
पन दुखता तेका काय करीत?
डोळ्यातना पिटी पिटी दुखा काढता.
मगे माझा काळीज हालता निसता.
माकाव लेकी हत.
माझ्या लेकीसारीच ती माका.

चव्हाणीन आत जाता नी येकांड घिऊन येता.

चव्हाणीन: गे ह्या येकांड घी नी साणीर उजळून लाव तिचे कपाळार.वायच चंदनाचो फेरोव घाल भुतूर.
चंदन देऊ काय?

बांधेकरीन : नको,चंदन हाडल्यान हा झिलान गुदस्ता गणपतीवक्ता.
देवाचे होवरेत असतला.
मगे येतय सावशीत गजाली करुक.💐💐