इंद्रजा - 22 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इंद्रजा - 22

भाग - २२

(👨‍✈️नवीन वळणं👩‍👦)
.
.
.
.
.
.
.
.
{चार वर्षानंतर..}
.
.
.
.

कोल्हापूर City🏢🌄

SP Industries Pvt.Ltd.








सगळीकडे टाळ्यांचा गदगडाट चालू होता.....आज SP Industries मध्ये मोठा समारंभ चालू होता....





अँकर - धन्यवाद धन्यवाद! आज आपल्या कंपनीची खूप मोठी सक्सेस पार्टी ठेवली आहे...आपल्या कंपनीला बराच प्रॉफीट झाला म्हणून...तुम्ही सर्वानी आज इकडे येऊन खऱ्या अर्थात आपल्या पार्टीला चार चांद लावलेत...मी सर्वांचे मनापासून आभार मानते....
तर आता आपल्या या समारंभाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊयात...यावर्षीचं Employee of the Year Award कडे....






सगळे - yehhhhh
(टाळ्या वाजवत...)





अँकर - अवॉर्ड देण्यासाठी मी आपल्या कंपनीचे CEO सार्थक परांजपे सरांना बोलवते.....






सार्थक - थँक्यु..






अँकर - तर आपले, Employee Of the Year आहेत...."मिस.जिजा शिवराज प्रधान"







टाळ्यांचा आवाजातून जिजा स्टेजवर येते.....जिजा स्टेजवर येते आणि अवॉर्ड घेते....






अँकर - मिस जिजा तुम्ही काही चार शब्द बोलावेत....






जिजा - हॅलो फ्रेंडज, आधी तर मी आपल्या SP industries चे आभार मानते, त्यांनी मला ही संधी दिली आणि आज माझ्या कष्टाचं फळ मला दिल....
आपलं लक्ष आपल्या कामावरच असावं,गोल ठरलेला असेल तर यश नक्कीच मिळत...आपल्या कामाशी इमानदार राहणं...हाच यशाचा मार्ग....थँक्यु...








जिजा अवॉर्ड घेऊन ऑफिस बाहेर उभी होती....तेवढ्यात एक कार तिथे आली.....त्या कार मधून एक तरुण उतरला......त्याच्या मागूनच तीन - साडे तीन वर्षाचा लहान,गोरापान, गुबगुबीत मुलगा पळत जिजाकडे येऊ लागला....






जिजा - शिवा....ये बाळा....हळूहळू...
(त्याला जवळ घेत...)






अनिकेत - शिवांश ऐकतच नव्हता अगं..नुसता रडत होता...म्हणून आलो घेऊन....






जिजा - शिवा काय हे? असं नाही करायच बाळा...





शिवांश - मम्मा मग ते मला तुझ्याकले घेऊन नव्हते येतं ना...म्हणून मी रडलो...
(गाल फुगवत म्हणाला....)






जिजा - अरे देवा हो का...





अनिकेत - अरे शिवा तुला ताप आलाय की नाही कालपासून म्हणून तुझ्या मम्मा ने मला सांगितलं होता ना तेव्हाच तुला घेऊन नव्हतो येतं....सॉरी बरं..






शिवांश - अरे अन्या तुला माहित आहे ना मी रोज बोलव्हिटा पितो मग मला ताप आलेला कसा राहील..कळत नाही वळत नाही आणि म्हणे माझं लगीन कला.... 😂😂😂






जिजा - अय्या शिवा कुठून शिकलास आता हे...🙄






अनिकेत - शिवा तू तर बाबांसारखा बोलास हा.... 😂😂





जिजा - काय तुम्ही अहो हस्ताय?😂बाबा पण ना काहीही शिकवतात...






शिवांश - आले आता घरी चला ना..आपल्याला फिरायला पण जायचंय ना..आपला फिक्ष झालेला..






जिजा - बापरे शिवा किती बडबड करतोस...बोलायला लागल्यापासून नुसतं नॉन stop इतर तीन वर्षाची मुलं बग कशी आणि हा बग कसा....






अनिकेत - अगं असुदे आपला शिवा वेगळाच आहे...बरं
अभिनंदन ❤️






जिजा - थँक्यु... 👀💕






शिवांश - अभिचंदन मम्मा....
आणि टॉल्फी दे माझ्याकडे....






जिजा - अरे 😂😂 अभिनंदन असतं बाळा...आणि ट्रॉफी.....
बट थँक्यु.... उउउम्मला😚 माझा गोलू...






शिवांश - किती किश करशील गं..गाल ओला केला...






अनिकेत - ह्म्म्म नखरेबाज 😂तुला तेवढं मिळत तरी...






जिजा - अअअ?🙄






अनिकेत - काही नाही अ निघूया...






जिजा - हो..




***************************





अमोल - या या या...आले का आमचे राजे....






शिवांश - आलो आलो...आणि सोबत टॉल्फी घेऊन आलो....






अमोल - अरे वाह वाह....
अभिनंदन जिजा...






जिजा - थँक्यु बाबा...
नमस्कार करते.....
(पाया पडत...)






अमोल - सुखी रहा...
मग आता पुढे प्लॅन काय?






अनिकेत - काही नाही..आम्ही जातोय फिरायला...येतंय तुम्ही पण??






अमोल - अरे मी या वयात कुठे..जाऊन या तुम्ही...मी सुद्धा माझ्या फ्रेंडज ग्रुप कडे जातो....







जिजा - काय बाबा तुम्ही....
बरं जा पण बाहेरच खाण पिणं नको हा...नंतर त्रास होतो तुम्हाला....आधीच तुम्हाला बीपी, शुगर चा त्रास बाबा....






अनिकेत - हो ना, तुमची तब्बेत पण नाजूक राहते....जाऊ नका सांगून पण जाता...






अमोल - जाऊदे रे, गेलो तर गेलो...आता काय बघायचं राहील आयुष्यात...






जिजा - बाबा..





अमोल - बरं बरं सॉरी...चला आवरायला घ्या...






जिजा - हो चला चला शिवा....






शिवांश - चल चल....






अमोल - खरच जेव्हापासून जिजा आणि शिवांश आलेत आपल्या आयुष्यात सगळं बदलून गेलंय...






अनिकेत - खरं आहे बाबा...शिवा जन्मल्यापासून तर माझं आयुष्यात ती पोकळीच भरून निघाली....जीं अपुरी होती....शिवा मला अन्या म्हणतो ना खूप छान वाटतं....






अमोल - हो ना... खूप गोड आहे आपला शिवा.... ❤️बरं जा तयार हो परत तो आला तर ओरडेल.....






अनिकेत - हो 😂
.
.
.
.
.
जिजा आणि अनिकेत शिवांश ला घेऊन Fun Fair मध्ये जातात......शिवांश तिकडे खूप खेळतो,वेगवेगळ्या राईड्स वर बसतो.....अनिकेत त्या दोघांचे छान फोटोज काढले....






शिवांश - मजा आली मम्मा.....






जिजा - आली ना मजा...आता कुठे जायचं सांग.... 😃






शिवांश - हॉल्स लाईडींग.....अन्या अन्या आता तू चल माझ्याशोभत...आता आपण बसू एकतलं...आणि तोबल्क तोबल्कsss बोलू.....






अनिकेत - मला भीती वाटते शिवा...😂






शिवांश - अरे एवढा मोठा तू घोडा आणि घाबरतोस...😂लहानपणी चॉकलेट मिल्क नाही पिल्लास का 😂






अनिकेत - नाही ना...तुझ्यासारखं नाही प्यायलो चॉकलेट मिल्क...😂😂😂





शिवांश - आले देवा....मम्मा तू अन्या ला उद्यापासून चोको मिल्क देतं जा...माझ्या सारखा स्ट्रॉंग होईल हा..






जिजा - हो हो... 😂






अनिकेत - चालेल...आता जाऊयात का राईड ला...






शिवांश - हो चल चल...तुबडूक तुबडूक.....







अनिकेत - हो,जिजा मी आलो थांबा...आणि हा आमचा फोटो काढा हा....






जिजा - हो नक्कीच....!!
एन्जॉय बाळा...







अनिकेत आणि शिवांश हॉर्स राईड वर बसतात....
जिजा फक्त त्यांना पाहतं होती....त्यांचे फोटोज ही काढत होती....







रात्री दमून तिघे ही घरी येतात.....शिवांश झोपी गेलेला......जिजाने त्याला बेडवर झोपवलं.....अनिकेत ही त्यांच्या खोलीत जाऊन झोपतो...



जिजा फ्रेश झाल्यावर शिवांश चे कपडे,शूज काढते...त्याला नाईट पॅन्ट घालून पुन्हा झोपवते....त्याच्या बाजूला झोपून त्याच्या कडे पाहतच बसते.....तिला अचानक इंद्रा आठवतो.....






जिजा - डोळे, वर्ण, तसंच.....बोलणं ही तसंच बेधडक.....तू ना अगदी तुझ्या ब...
न न नाही, नाही तुझ्या बाबावर जाऊ नकोस....नको..
जायचंय तर माझ्यावर जा शिवा...माझं गोड बाळ....

भूतकाळाच्या गोष्टी आठवल्या की अंगावर सरकनsss काटा मारतो....ती भयानक रात्र💔कधीच नाही विसरू शकत मी....त्या रात्रीने आमचं आयुष्य बदललं.....पण
त्याचं तिकडे कसं चाललं असेल...?? त्याचं पण आयुष्य बदललं असेल.का?..!!!
.
.
.
.

जिजा - बाबाsss बाबाsss
अनिकेतssss चला या नाश्ता करायला...






अमोल - गुड मॉर्निंग जिजा....





अनिकेत - गुड मॉर्निंग...






जिजा - मॉर्निग...या या लवकर नाश्ता करून घ्या..मी शिवाच आवरते तोवर हा...मला ऑफिस ला पण जायचंय...





अमोल - वाह वाह! जिजा कमाल झालाय उपमा....





अनिकेत - सुरेख!





जिजा - धन्यवाद 😂 आलेच मी....






अमोल - हो...





अनिकेत - त्याचं आवरून ये मग मी घेऊन जातो त्याला...






जिजा - ओके...






शिवांश - अअअअअअअअ मम्मा......मम्मा.....😭






जिजा - आली आली मम्मा आली...अगं माझी शोनी काय झालं....?
(त्याला जवळ घेत....)






शिवांश - काय नाय...तू दिशाली नाही का मी रडतो तुला माहिते ना.....






जिजा - ओ गं...बाळा मी कामं करतं होते ना....
बरं चला तुला स्कुलला जायचंय ना...मस्त मस्त अंघोळ करूया....







शिवांश - हुम्म्म...🤧






जिजा - वाह वाह....चला चला....माझा गुड बॉय....
शिवा माझा गुड बॉय.....शिवा माझा गुड बॉय....








जिजाने त्याला तयार करून ठेवलं.......पण तो स्कुलला जायला तयार नव्हता......पूर्ण खोलीत पळायला लागला.....अनिकेत खोलीत आला, जिजासोबत तो ही त्याच्या मागे पळायला लागला.....






अनिकेत - ए पकड पकड...पकडला...... 😂






शिवांश - अरे कशाला पकडलं....तू पण ना अन्या..मुर्ख...😏







जिजा - शिवाsss उलट जास्त बोलतोयस हा....मोठ्या माणसांना मारिन वैगेरा बोलास ना तर...फटका देईन....






शिवांश - मम्मा, मम्मा no स्कुल नो स्कुल 🤧😔
(केविलवाणा चेहरा करतं....)






जिजा - हम्म चेहरा नको भोळा बनवूस...जायचं आहेच तुला....
Play Gruop ला जातोयस तरी इतका कंटाळा, मोठा झालास की कसं जाशील....






अनिकेत - जाईल गं बरोबर...
चला बाळा....चल ये...






जिजा - बाय शिवा...
बाय अहो....






शिवांश - बाय मम्मा...







अनिकेत - बाय जिजा...!!






जिजा - बाबा जेवण बनवलंय हा...वेळेत खा गोळ्या पण घ्या.....ठीके ना....







अमोल - हो मी घेईन स्वतः ची काळजी तू जा....






जिजा - बाय बाबा....






अमोल - बाय..!! Have a Good Day....





****************************




किमया - या या..Employee of the year!!





राहुल - अभिनंदन जिजा मॅम....





नताशा - अभिनंदन मॅडम....





सनी - अभिनंदन!!





किमया - अभिनंदन बरं का....मॅडम....






जिजा - थँक्यु गाईज...आणि काय हे मॅडम मॅम...😂
काय गं किमया... जीवावर अभिनंदन का करतेस 🤣






किमया - काहीही हा...मी पण खुश आहेच की...






सनी - पार्टी बनते हा....






राहुल - हो मग....






जिजा - देणार ना.....तुम्ही मागवा काय ते....बिल मी देईन.....






किमया - ओहो.... 😂






जिजा - चला आता कामाला लागूया....






सनी - हो चल...






राहुल - हो आज कामं खूप आहे...






नताशा - हो ना...






किमया - जिजा, तुझा शिवा खूप क्युट आहे यार....❤️ खूप छान दिसतो हा..... नजर काढत जा त्याची....






जिजा - हो आहेच माझा शिवा तसा..🤧






किमया - हो ना..😂





जिजा - हम्म 😂
मी आले राउंड ला जाऊन...कामं बघून येते....






किमया -हो...







सार्थक - गुड मॉर्निंग ब्युटीफूल लेडी....💕






जिजा - अअ गुड मॉर्निंग सार्थक सर...





सार्थक - काय मग कुठे निघालात?






जिजा - सर राउंड ला चाललेय....






सार्थक - चला मी पण येतो..चालेल ना?






जिजा - विचारताय काय सर? कंपनी तुमचीच आहे..






सार्थक - ओह खरंतर विसरलो मी, तुला पाहिलं की सगळंच विसरतो......






जिजा - अअअअ चला....





सार्थक - हो...
आ अ जिजा कसं आहे ना माझ्या फ्लर्टींग चा चुकीचा समज नका करू...Genuinely मला आवडता तुम्ही...चांगल्या आहात....छान दिसता पण तुझा नकार आहे तर मी तुझ्या त्या नकाराचा आदर करतो पण हा हे फ्लर्टींग करण्यापासून रोखू नकोस 😂







जिजा - हम्म.... 😂
.
.
.
.
.
अनिकेत - हेय माय बॉय....
(त्याला जवळ घेताना..)






शिवांश - अन्या अन्या..तू आलाश मला घेला...






अनिकेत - हो मीच आलो तुला घेला.... 😂






शिवांश - मम्मा का नाय आली... 😏






अनिकेत - येईल मम्मा बाळा आपण घरी तर जाऊया...
आजोबा वाट बघतात....






शिवांश - आले देवा! चल चल मग लवकलं..






अनिकेत - हो हो चल...






संध्याकाळी अनिकेत आणि शिवांश घरी आले......त्यांच्या घरी कुणी पाहुणे आले होते.....







अनिकेत - अअअ बाबा हे??






अमोल - आ हा माझा मुलगा अनिकेत..software company मध्ये मोठ्या पदावर आहे....
अ अन्या हे माझे मित्र, गिरीश पटवर्धन आणि ही त्यांची मुलगी अमृता...






अनिकेत - नमस्कार!





गिरीश - नमस्कार!!





अमृता - हॅलो...






अनिकेत - हॅलो...
शिवाsss....






शिवांश - हो अन्या....
नमशकाल आजोबा, हॅलो दीदी.....







गिरीश - अरे वाह! छान छान संस्कार दिलेत याच्या आईने.....सुखी रहा, खूप मोठा हो बाळा....








अमृता - ओ किती गोड....पूर्ण नाव काय तुझं...?







शिवांश - शिवांश जिजा इंद्रजीत भोसले.....






अमृता - छान...
पण आई वडील दोघांच ही नाव का??






अमोल - याच कारण आम्हाला ही नाही माहित अजून....






गिरीश - हा कोणाचा मुलगा??






अमोल - तुला सांगितलं होतं बग गिरीश....






गिरीश - हा आठवलं तीच मुलगी ना? तिचा मुलगा आहे का हा??






अमोल - होय...






अनिकेत - आणि, मी याच उत्तरं देतो....शिवा त्याच्या आई वडील दोघांची नाव सांगतो कारण त्याच्या आईने त्याला कोणत्या परिस्थिती मध्ये जन्म दिलाय हे आम्ही जवळून पाहतं आलोय......म्हणून त्याच्या नावापुढे आईच नाव लागायलाच हवंय....आईच नाव लावणं ही लाजिरवाणी गोष्ट नाहीच, कधीच नसेल.....जीं आपल्याला जन्म देते तीच नाव लावणं म्हणजे भाग्यच आहे❤️.....आणि वडिलांचा नाव आडनाव यासाठी की त्यांच्यातले वाद हे त्यांचे पण त्याच्या वडिलांची यात काही चूक नाही असं जिजा मानते, तसंच या समाजात वडिलांच नाव न लावता जगणं एखाद्या लेकरासाठी आणि त्याच्या आईसाठी कठीण जात, आईच नाव लावणं समाजाला हे मान्य नसतं त्यांना फक्त पुरुषांची नाव पाहिजे असतात.....याला बाप नाही वाटतं मग हा कुणाचा? याची आई अशी तर नाही ना..असा कुणी बोलू नये..म्हणून समजासाठी, शिवासाठी इंद्रजीत वर अन्याय नको म्हणून त्याचं नाव आणि आडनाव लावतो शिवा.....हे जिजाची शिकवण.....







गिरीश - अच्छा....खूप उच्च विचार आहेत मुलीचे त्या....







अमृता -हो ना..








अनिकेत - हो उच्च विचार तर आहेतच तिचे...ते म्हणतात ना, शिवबा जन्मावे पण शेजारच्या घरी? का आपल्या घरीच का नाही? आणि मुळात महाराजांसारखं मुलाला घडवायचं असेल तर नुसतं नाव शिवा ठेवून नाही चालत, तर जिजाऊ घडावी लागते आधी.....आणि आमची जिजा तशीच आहे.....









अमोल - हो हो मग तशीच आहे अगदी लागवी....आता कामावर गेले नाहीतर भेट घडवून आणली असती....








गिरीश - हो पुन्हा कधीतरी करू... आता मुद्द्याचं बोलूया...






अमोल - हो...






अनिकेत - शिवाssss सोन्या आत जा आणि जाऊन टीव्ही बग जा...मस्ती नको करू हा...मी आलोच






शिवांश - ओके अन्या....






अनिकेत - बोला बाबा...






अमोल - बाळा गिरीश अमृतासाठी तुझा हात मागायला आलेत..... आणि माझी ही इच्छा आहे की तुझं अमृताशी लग्न व्हावं.....






अनिकेत - काय? बाबा मला न सांगता हे परस्पर ठरवलत....







गिरीश - नाही नाही बाळा, तुझ्या मर्जी शिवाय नाही...माझ्या अमृताला तू खूप आवडतोस...एका पार्टी मध्ये तुझी गाठ पडल्यापासून सारखं तुझाच विचार करते ती...आता स्पष्ट बोलली तस मी लगेचच आलो मागणं घेऊन....






अनिकेत - थँक्यु मी तुमच्या फीलिंग्स चा आदर करतो मिस अमृता पण मला सध्या लग्न नाही करायचंय आणि तुमचविषयीं काहीच फीलिंग्स नाहीत.....भावनाचं नसतील तर लग्न कसं करू? क्षमा करा....






अमृता - अहो माफी नका मागू...खरं बोलता तुम्ही...भावना महत्वाच्या....काही हरकत नाही मी तुमची वाट बघेन....तुमचा निर्णय झाला की कळवा....







अनिकेत - तशी वेळ येईल असं वाटतं नाही.....







अमृता - वेळ सांगून नाही येतं, ती बदलते ते ही न सांगताच.....बदलली की सांगा.....पप्पा चला.... चला काका येतो....







गिरीश - येतो अमोल....






अमोल - सॉरी...






गिरीश - असुदे....






अमोल - अरे काय केलंस हे अन्या...इतकी चांगली सुंदर मुलगी होती आता तुला काय अप्सरा हवी का....







अनिकेत - नीट नाही ऐकलंत का बाबा, भावना इच्छा महत्वाच्या......नाहीत तर कसं करू लग्न....इच्छा मारून जगू का???
(आत निघून गेला.....)







अमोल - अरे.....?!🙄







शिवांश - काय झालं अन्या चिलचील का कलतो.....







अनिकेत - नाही रे बाळा...






शिवांश - खोटं आता मला आवाज आना...






अनिकेत - ते असच मी आणि आजोबा मज्जा करतं होतो.....






शिवांश - ओते...
बग बग Shinchan कसा करतो बग 😂







अनिकेत - तूच बग तो...आणि आता लवकर फ्रेश होऊ चल तुझी मम्मा आली तर मारेल मला..... 😂







शिवांश - तुला हेच पाहिजे मग...पकलं पकलं मला.... 😂
(तो खोलीत पळत सुटला......)









शिवांश पळत पळत रूम बाहेर जातो........त्याच्या मागे पळताना अनिकेत चा तोल जातो समोरून येणाऱ्या जिजाच्या अंगावर तो जाऊन पडतो....
दोघांची नजरानजर होते...👀🤧अनिकेत जिजाकडे पाहतच बसतो.....तेवढ्यात शिवांश येतो....








शिवांश - ए अन्या उठ तू माझ्या मम्मा चा अंगावल का पडलास....उत उत...







अनिकेत - अअअअअ स स सॉरी जिजा, सॉरी शिवा....
अरे असं काय करतोस तुझ्याच मागे मी पळत होतो ना तेव्हाच सरकलो मी.....







शिवांश - ओ माय मिशतेत....







जिजा - अरे मिस्टेक....






अनिकेत - 😂







जिजा - ए तू असा का फिरतोयस कपडे न घालता....शिवा....चल आत लवकर तुला बा फटके देते आता..... 😡🤚






शिवांश - अअअअअ मम्मा नको नको..... 😭







अनिकेत - जिजा.... जिजा....







जिजा - करशील मस्ती हा...लिमिट असते की नाही मस्तीची.....😡सगळं मर्यादा पलीकडे करतोस.... ऐकत नाहीस....






अनिकेत - जिजा अगं नको मारू त्याला....
(शिवाला जवळ घेऊन....)






शिवांश - अअअअअ 😭😭😭







अनिकेत - अरे माझ्या बाळा...नको रडू हा....







अमोल - अरे अरे अरे शिवा काय झालं सोनू...जिजा अगं मारलस का त्याला?
ये बाळा ये....







शिवांश - आजोबा..... 😭







अमोल - हा हा चल बाळा हा नको नको रडू...गप माझं पिल्लू....







अनिकेत - काय जिजा अगं मारलस का त्याला? शिवाची मस्ती तर रोजच असते....आज तुला काय झालं? इतकं का चिडलेस?






जिजा - काही नाही....😔





अनिकेत - काय झालं?
सकाळी चांगली होतीस आता अचानक असं उदास, रागीट का झालेस?








जिजा - 😭
(जोरजोरात रडताना...)







अनिकेत - जिजा काय झालं? का रडतेस? अगं सांग...







जिजा - अअअअ अअअअअअअ 😭😭😩😫
(रडताना, ओरडत होती...)






अनिकेत - अगं ओरडू नकोस, जिजा शांत हो, शिवा ऐकेल......
(दार बंद करतं )






जिजा - अहो..ते ते.... 😭






अनिकेत - काय झालं शुईईई शुईईई शांत...शांत हो..






जिजा - हे बघा...






अनिकेत - मॅग्जीन.....
"POWER OF POLICE"
कोण आहे हा माणूस?
(मॅग्जीन बघताना...)







जिजा - नाव नाव व वाचा?






अनिकेत - "ACP INDRAJEET RAJARAM BHOSLE"
पण तुझा त त नवरा इंद्रा तर......







जिजा - नव्हता पोलीस तो...हे कसं मला पण नाही माहिती......मला समजलं मॅग्जीन बघून....
आज ऑफिस मध्ये झालं असं की.....







************ऑफिसमध्ये**************







किमया - wow what a man ❤️






जिजा - काय गं आज लंच करायच सोडून मॅग्जीन, पेपर बघतेस चक्क.... 😂






नताशा - आज कायतरी खास छापून आलंय का त्यात 😂






सनी - कुणास ठाऊक...एखाद्या मुलाचा फोटो असेल...😂






जिजा - बापरे किमु, 😂काय हे हॉट मुलांचे फोटोज बघतेस तू 😂






किमया - मग त्यात काय? लग्न व्हायचंय हू माझं अजून मग मी तर हेच करणार ना 😂






सनी - यापेक्षा लग्न कर... 😂






नताशा - Yahh that's better 😂








किमया - ए ताशा गप्प बस हा 😂








जिजा - अगं पण असं काय लिहिलंय त्यात सांग तरी वाचून....






किमया - ओके पेपर मध्ये पण आलंय ते वाचते......
"POWER OF POLICE"
आज पर्यंत आपण आपल्या भारतीय पोलिसांना खूप कमी लेखत होतो......बऱ्याच भ्रष्टाचारं करणाऱ्या पोलिसांच्या मुळे सगळेच पोलीस सारखे वाटू लागले आहेत.....पोलिसांवरून हळूहळू विश्वास उडत होता.....हे ह्यांचं कर्तव्य नीट पार पाडत आहेत का? हे कळत नव्हतं.....पण सगळेच सारखे नसतात....
यावर,आज करार असं उत्तरं आपल्याला सर्वांना सांगायचं आहे....


मुंबई,अंदेरी मधील ही घटना,


सकाळी पाच च्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडला.......ती तरुणी सोळा वर्षांची असल्याच कळलं.....तिच्यावर बऱ्याच जणांनी बलात्कार केल्याचं ही समोर आलं......यावर मंत्रीमंडळ चर्चा करतं बसले, कोणाला काहीच कळत नव्हतं.....पण....मुंबई मधील हुशार,बुद्धिमान आणि धाडसी ACP भोसले यांनी आरोपीला अवघ्या दोन तासात पकडून आणलं आणि ज्या मुलीवर त्याने बलात्कार केला त्या मुलीच्या घरासमोर सगळ्या माणसांच्या डोळ्यांसमोरच त्यांना फासी दिली गेली.....ही जगवेगळी घटना पहिल्यांदाच घडली......



सगळ्या परवानगी सह ACP भोसले यांनी हे कामं केले.......जिकडे बरीच वर्ष लागली जातात तिकडे त्यांनी अवघ्या काही तासातच त्या मुलीला न्याय मिळवून दिला...यावर ते म्हणाले...



"चर्चा करतं बसण्यापेक्षा मला त्वरित कामं केलेलं आवडत.....आपल्या देशातील मुलींवर बलात्कार होतोच कसा?....ज्या महाराष्ट्रासाठी शिवाजीं महाराजांनी इतके कष्ट घेतले आज त्याचं देशात जर माझ्या बहिणींना कुणी असं छेडत असेल तर मी का गप्प बसू...
माझ्या हातात जे सत्ता आहेत मी त्यांचा वापर करून हे कामं करतं आलोय......सत्तेचा वापर योग्यरित्या करावा असं मला वाटतं ते मी केल......पैसे आयुष्यभर राहत नाहीत, कमवलेलं नाव आयुष्यभर राहत......स्त्री म्हणजे समाजाची प्रॉपर्टी नसते....ती शान असते आपल्या कुटूंबाची,परिवाराची तिच्या आई वडिलांची....पोलीस कशासाठी असतात.....न्याय मिळवून द्यायलाच......मी आहे तोवर कुणी घाबरू नका.....आणि बलात्कार करणाऱ्यांनी तर जपूनच रहा..😡जय हिंद....🇮🇳"



आज खऱ्या अर्थाने वाटतय की पोलिसांची पॉवर दिसतेय.....भीतीच कारण खरच नसावं....

जय हिंद,जय महाराष्ट्र 🇮🇳









जिजा - wow खरच ग्रेट वर्क यार.....काय पोलिसावाला आहे हा....मानलं पाहिजे हा..... अशाच पोलिसांची नितांत गरज होती.....






सनी - Yess....आता बरं वाटलं बग...






नताशा - चांगली न्यूज दिलीस गं किमु....आता त्यांचा जो फोटो आलाय तो पण तर दाखव....आम्हाला पण बघू दे.....






सनी - हो मग...






किमया - हे घे...






सनी - भारी गं...काय पर्सोनालिटी आहे...बॉडी and all.....मुलांना ही लाजवेल अशी..... मुली तर लांबच...






नताशा - हो ना यार....आता समजलं का इतकं निरखून बघतेस ते किमु....







किमया - मी याची फॅन आहे.....बऱ्याच बातम्या आहेत यांचा अशा गुगल ला बग समजेल....






जिजा - चला टाइम ओव्हर...go back to work....






नताशा - तुला नाही बघायचं का..






जिजा - कशाला..कोणाला बघू...







नताशा - लग्न नाही करायचंय तुला 😂काय तू..






सनी - नाव काय गं त्याचं?






किमया - ACP INDRAJEET RAJARAM BHOSLE






जिजा - काय??? 🙁 त तू तू काय बोलतेस..
आ अअअ जरा दाखव दाखव....बघू...







सनी - हे घे...🙄







जिजा मॅग्जीन आणि पेपर मध्ये इंद्रा चा फोटो बघून आश्चर्यचकित होते.....तिच्या पायाखालची जमीन सरकते.....💔




**************************







अनिकेत - जिजा जिजा शांत हो....







जिजा - सगळं विसरून पुढे सरकली आहे मी, आणि आता परत तोच भूतकाळ समोर येतोय.... 😭
त्रास होतोय मला...







अनिकेत - कळतंय मला..😔शांत हो तू...
पण तुला प्रॉब्लेम कशाचा आहे? तो पोलीस झाला? की...






जिजा - नाही मला त्याच्या प्रगतीचा अजिबात त्रास हॉट नाही....त्याच्या खालची बातमी वाच..... 😔







अनिकेत - कुठं? अअअअ हं...


आताच दिलेल्या माहिती नुसार कळतंय, ACP इंद्रजीत राजाराम भोसले हे काही कामानिमित्त कोल्हापूर मधील गडहिंग्लज तालुक्यात आले आहेत.....
आमच्या काही पत्रकारांनी त्यांना तिकडे काही लोकांशी चर्चा करताना पाहिलंय....
म्हणजे पॉवर आता कोल्हापूर मध्ये ही...
जय हिंद 🧡









जिजा - समजलं आता....😭 भूतकाळ पुन्हा माझ्या समोर येणार असं मी का म्हंटल....








अनिकेत - बापरे हे हे खूप कठीण झालं गं? आता कसं करणार....कधी ना कधी तु त्याच्या नजरेत पडणारच...







जिजा - तीच भीती आहे मला...






अनिकेत - त्याला शिवा बद्दल??






जिजा - नाही...त्याला नाही माहित काहीच...त्याला मी जिवंत असेल ही सुद्धा खात्री नसणार....नसणारच.....
मग शिवा बद्दल तर लांबच...








अनिकेत - त्याला तू दिसलीस तर.....त्याला शिवा बद्दल पण समजेल....







जिजा - नाही नाही....शिवा बद्दल मी त्याला समजू नाही देणार....त्याला आणि शिवाला समोरासमोर आणायचं नाहीच...




अनिकेत - हे कसं शक्य आहे जिजा अगं एकाच ठिकाणी राहणार आणि समोरासमोर नाही येणार....?
अगं गडहिंग्लज वरून कोल्हापूर मध्ये यायला कितीसा वेळ लागतो...





जिजा - त्याचीच तर भीती आहे...मला थोडं जपून रहावं लागणार आहे आता आणि शिवाच टेन्शन नाही, त्याला शिवा बद्दल माहित नाही त्याला स्कुल मध्ये तुम्हीच सोडता....त्यामुळे काही प्रश्न नाही...प्रश्न माझा आहे...






अनिकेत - काळजी नको करुस मी शिवाला त्याच्या समोर नाही येऊ देणार, तू स्वतः ची काळजी घे..







जिजा - हो,






अनिकेत - आज एक प्रश्न विचारावंस वाटतय तुला?






जिजा - विचारा ना...






अनिकेत - नक्की काय झालं होत असं तुमच्यात..चार वर्षा आधी तुझं आम्हाला जखमी अवस्थेत सापडणं?.....त्याच्यापासून त्याच्याच मुलाला लपवणं??....लव्ह मॅरेज झालंय तरीही नवऱ्यापासून अलिप्त राहणं?....इंद्रा आणि तुझं असं काय बिनसलं की अशा अवस्थेत तू तिकडून पळालीस....?






जिजा - पळाली नाही....पळावं लागलं....😔






अमोल - का पळावं लागलं पण?
(मागून येताना....)






अनिकेत - बाबा....






अमोल - आज वर तुला हे प्रश्न नाही विचारले आम्ही...तुझ्या परिवाराबद्दल सगळं सांगितलंस, मग नवऱ्या कडील लोकांबद्दल का नाही सांगितलंस? का पळावं लागलं तुला....?







जिजा - हम्म,
(जिजा त्याना सगळं सत्य सांगते...)







अनिकेत - जिजाss अगं किती ते दुःख मनात ठेवलस गं..... 🙁






अमोल - हो ना...






जिजा - बाबा, अनिकेत आज मी शिवाला लांब ठेवते स्वतः ही लांब राहतेय कारण मला शिवा वरती पुन्हा तीच वाईट सावली नाही पडू द्यायची....त्यावेळी मी निघून आले कारण मला माझ्या बाळाला वाचवण महत्वाचं वाटलं.....निघाले ना तिकडून आता कोणत्या तोंडाने जाऊ....😭
बस्स झालं, मी आणि माझा मुलगा खुश आहोत....
खरंतर मला ताराची खूप आठवण येते 😭माझी बहीण त्या घरात माझ्याशिवाय कशी राहत असेल? इकडे सेटल्ड होण्याआधी ताराला घ्यायला बऱ्याचवेळा घरी गेले पण तिला भेटता नाही आलं...







अमोल - असुदे बाळा, नको रडूस होईल सगळं नीट, जाईल इंद्रा इकडून लवकरच.....







अनिकेत - हो ना, त्याचं कामं झालं की जाईलच तो....आणि आता आम्ही पण आहोत तुझ्यासोबत....







जिजा - हम्म,थँक्यु,तुमचे कसे आभार मानू समजतं नाही आहे....आजकाल कुणीच आपल्या माणसांवर विश्वास नाही ठेवत,तुम्ही परक्या मुलीवर ठेवलात,🙏







अनिकेत - तू आणि शिवा परके नाही आहात....






अमोल - मी माणूस ओळखायला कधीच चुकत नाही बाळा...पण मला ना असं वाटतं की कुठेतरी तू चुकतेस?








जिजा- हो पण बाबा.....







अमोल - असो,असो आता नको वेळ आली की सांगेन...
जा आता शिवाला मनव....






जिजा - हो... आलेच....
.
.
.
.
जिजा रूममध्ये गेली......शिवा मोबाईल वर गेम खेळत बसलेला......जिजा जाऊन त्याच्या जवळ बसली.....तस त्याने रागातच एक. नजर टाकली....





जिजा - नाकावरच्या रागाला औषधं काय? नाकावरच्या रागाला औषधं काय?






शिवांश - काय नाही... 😡






जिजा - आले बापले....किती तो राग...रागाला आवर आता शिवा....






शिवांश - मग तू मना बिनाकलन मानलाल का? मी येरा आहे का? 😡






जिजा - सॉरी ना बाळा....ए माझ्या सोन्या सॉरी....🙏
तू तरी असं सोडून नको जाऊस, माझ्याशी अबोला नको धरूस....तुझ्याशिवाय कोण आहे माझं....😔






शिवांश - आले तू ललते का? मी आहे ना नाही शोडणार तुला.....शिवा प्रॉमिस....







जिजा - हो बाळा..हो ❤️
सॉरी....माझं पिल्लू गं....







शिवांश - मना भूक लागले खायला आन आता....नुसतं प्ले्म करून भागवणाल का?







जिजा - बाई गं...किती बोलतोस रे चुरूचुरू...😂






शिवांश - तुझ्यावलं गेलोय ना.... 😂






जिजा - देवा...🤦‍♀️😂








क्रमश :


काय होईल ह्या नव्या वळणात? जिजा आणि इंद्रा येतील का समोरासमोर?




इंद्रा कसं झाला ACP? काय घडलं चार वर्षात भोसले निवास मध्ये?








©® Pratiksha Wagoskar