सत्व परीक्षा - भाग ३ Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्व परीक्षा - भाग ३

भाग २
ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे ना त्याला असं मला वाटत होते. "
रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी बोलता येतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे?
रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. "
रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. "
रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार.
रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे भाव बघून कळाले होते की, रुचिरा ला पण अनिकेत आवडला आहे.

अनिकेत आणि त्याच्या घरचे पण आता घरी पोहोचले होते. सगळ्यांनी मग कपडे चेंज करून जेवण केले. रात्री सगळे आवरल्यावर सगळे जण एकत्र बसले. अनिकेत ची मावशी म्हणाली की, " मला मुलगी आवडली आहे. तुमचं काय मत आहे. "
अनिकेत ची आई म्हणाली, " माका आवडली हा मुलगी".
अनिकेत चे वडील त्याच्या आई च्या शब्दा बाहेर नसत. काकांनी मग अनिकेत ला विचारले "तुला आवडली आहे ना मुलगी. "काकांनी अनिकेत ला हळूच डोळा मारला. काकांच आणि अनिकेत च गुपीत होत ते.
त्यावर अनिकेत म्हणाला, " हो काका, मला मुलगी आवडली आहे. पण तुम्ही काय तो निर्णय घ्यावा असे मला वाटते. "
अनिकेत चे काका, " आम्हाला पण मुलगी पसंत आहे. मग होकार कळवायचा ना त्यांना. "
" हो कळवा." मावशी म्हणाली.
"उद्या त्यांना फोन करून कळवतो. त्यांचा होकार असला तर पुढची बोलणी पण करता येतील. "काका सगळ्यांना उद्देशून म्हणाले. मग सगळे झोपायला गेले.
पण का कुणास ठाऊक? अनिकेत ला आज काही झोप येत नव्हती. त्याला रुचिरा आवडली होती. सारखा त्याच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा येत होता. देवाकडे त्याने प्रार्थना केली की, त्यांचा होकार येऊ दे.
इकडे रुचिरा ची पण हालत फार काही वेगळी नव्हती. तिने पण देवाला प्रार्थना केली की, त्यांचा होकार येऊ दे.
रुचिरा आणि अनिकेत या दोघांनी केलेली प्रार्थना देवाने ऐकली होती. पण अजून रात्र बाकी होती. ही गोड बातमी पण त्या दोघांना उद्याच मिळणार होती.
दुसरा दिवस उजाडला. रुचिरा ऑफिस ला जायची तयारी च करत होती. इतक्यात तिच्या बाबांचा फोन वाजला. फोन वरचं नाव बघून ते आपल्या पत्नीला म्हणजे च रुचिरा च्या आईला उद्देशून म्हणाले, " अनिकेत रावांच्या काकांचा फोन आहे. " रुचिरा ने पण आपले कान टवकारले. ती भासवत अशी होती की, तीला काही इंटरेस्ट नाही आहे. पण कान मात्र बाबांच्या बोलण्याकडे च लागले होते.
रुचिराचे बाबा, " हॅलो, हा बोला काय म्हणतात? "

अनिकेत चे काका, " हॅलो, हा आमच्या कडून होकार आहे. आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्हाला आमचा मुलगा पसंत आहे का ❓ "

रुचिराचे बाबा, " हो आम्हाला पण तुमचा मुलगा पसंत आहे. "
अनिकेत चे काका, " मग पुढच्या बोलणी चे कसे करूया? माझं असं म्हणणं होतं की, अनिकेत चे आई बाबा मुंबईत आले आहेत तर पुढची बोलणी करून घेतली असती. तुम्हाला चालेल का❓
रुचिराचे बाबा, " हो, चालेल ना. चांगल्या कामाला उशीर कशाला? "
अनिकेत चे काका, "ठिक आहे मग आपण परवा भेटूया का❓ आमच्या घरी चालेल का❓
रुचिराचे बाबा, " हो चालेल. परवा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आम्ही येतो . "
अनिकेत चे काका, " हो चालेल . भेटू परवा. बाय. "
रूचिराच्या बाबांनी रुचिरा आणि तिच्या आईला सांगितले की, त्यांना रुचिरा पसंत आहे. परवा त्यांच्या घरी पुढची बोलणी करायला जायचे आहे. रुचिरा च्या आईने देवापुढे साखर ठेवली. रुचिरा आणि तिच्या आई बाबांनी मिळून देवाला नमस्कार केला.
काकांच्या बोलण्यावरून अनिकेत ला अंदाज आला की, पसंती आली आहे. पण चेहऱ्यावर तसं काही तो दाखवत नव्हता. मनातून तर त्याला खूप च आनंद झाला होता. काका सगळ्यांना उद्देशून म्हणाले, " आनंदाची बातमी आहे त्यांचा होकार आहे. परवा बोलणी करून घेऊ म्हणजे पुढच्या तयारी ला लागता येईल.
" ठिक आहे "सगळे एकदम म्हणाले.
परवा चा दिवस कधी येतोय असे दोघांना पण झाले होते.
परवा काय होते ? ते बघूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा.