सत्व परीक्षा - भाग ६ Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्व परीक्षा - भाग ६

भाग ६
दोघांचे पण फोनवर बोलणे चालू होते. आता त्यांना असं वाटतच नव्हतं की, त्यांचं अरेंज मॅरेज आहे. इतके दोघे एकमेकांना ऒळखायला लागले होते. साखरपुड्याची तारीख जवळ आली होती. म्हणून दोघांची पण तयारी जोरात सुरू होती. रुचिरा चे ब्लाऊज वैगरे शिवायला जाणे, पार्लरवालीला भेटणे, मेकअप ट्रायल , फेशियल यामध्ये ती खूप बिझी झाली होती. त्यामुळे त्यांना भेटता येत नव्हते. अनिकेत ला रुचिरा च्या साखरपुड्याच्या साडी ला मॅचिंग जॅकेट घेण्यासाठी ते दोघे उद्या भेटणार होते.
रुचिरा ला अनिकेत चा फोन आला..
अनिकेत, " हॅलो, रुचिरा. "
रुचिरा, " हॅलो बोला. "
अनिकेत, " अगं मी काय म्हणत होतो उद्याचं कसं करायचं? ऑफिस सुटल्यावर भेटूया ना? तू घरी सांगून ये की, उशीर होईल. मी येईन तुला सोडायला. "

रुचिरा" हो, ठिक आहे सांगते. ७:३०पर्यंत येते मी स्टेशनला. "

अनिकेत, " नको मी येतो तुझ्या ऑफिस च्या खाली. मी उद्या स्कूटी घेऊन येतो. ओके. "

रुचिरा," ठिक आहे. "

अनिकेत, " ओके उद्या भेटू मग. "

रुचिरा, " ओके बाय. "

अनिकेत, " बाय. "

दोघेही उद्याच्या भेटीची स्वप्नं रंगवत होते. कारण काढून एकमेकांना भेटायची संधी शोधत होते. हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडत होते. रुचिरा घरी आली तीचं दुसऱ्या दिवशी ची तयारी करू लागली. कपाटात काहीतरी शोधत बसली होती. उद्या काय ड्रेस घालायचा ह्या कनफ्यूजन मध्ये होती. आई तीची गडबडं बघून गालातल्या गालात हसत होती. ड्रेस शोधता शोधता तिचं लक्ष आईकडे गेलं . आईला अस़ं गालातल्या गालात हसताना बघून तिला लाज वाटली. ती धावत आईकडे गेली आणि तिला मिठी मारली. आईने पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.
रुचिरा, " काय झालं गं आई? अशी का हसलीस?"

आई, " माझं पिल्लू मोठं झालं गं . प्रत्येक मुलीच्या आयुष्यातले हे दिवस खूप सोनेरी असतात गं. तुझ्या चेहऱ्यावरची लाली, अनिकेत रावांना बघण्यासाठी ची, भेटण्यासाठी ची चाललेली धडपड, तळमळ बघते तेव्हा खूप समाधान वाटतं की, आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे तू खूष आहेस हे बघून बरं वाटलं. "

रुचिरा, " आई तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार हे माहीती आहे मला. "

आई, " आपल्या मुलांना आई जेव्हा खूष बघते ना तो आनंद ती शब्दात नाही सांगू शकत. आमच्या वेळी काही फोन वैगरे नव्हते. चाळीत कोणाच्या तरी एका च्याच घरात फोन असायचा. त्यावेळी ज्याच्या घरी फोन तो माणूस खूप श्रीमंत. तुझे बाबा मला बघायला आले. त्यानंतर डायरेक्ट साखरपुड्याच्या वेळी भेटले. पण जास्त काही बोलणं नाही झालं कारण त्यावेळी असं बोलल तरी लोकं नावं ठेवायची. पण आता तुम्ही एकमेकांशी फोनवर बोलू शकता. तुम्हाला संधी मिळाली आहे एकमेकांना समजून घ्यायला. सासरी जाशील तेव्हा सगळ्यांची मन जिंकून घ्यायचा प्रयत्न कर. आता ती तुझी माणसं होतील कळलं का? "

रुचिरा, " हो गं आई. "

दोघी मायलेकी एकमेकांना मिठी मारून रडु लागल्या . इतक्यात रुचिरा चे बाबा आले. दोघींना असे रडताना बघून बोलले, " अगं अजू वेळ आहे पाठवणीला . आतापासूनच प्रॅक्टिस चालू आहे की काय? "

दोघी पण रडता रडता हसायला लागल्या. आई उठून बाबांसाठी पाणी आणायला जाऊ लागली. पण बाबांनी तिला थांबवलं, " अगं, बस जरा कशाला उठतेस. " वातावरण थोडं हलकं फुलकं करत बाबा म्हणाले. घरचे वातावरण कसे प्रसन्न झाले होते. रुचिरा पण दुसऱ्या दिवशी ची तयारी करू लागली. ग्रीन कलरचा प्लाजो चा सेट निवडला तिने उद्या घालण्यासाठी. त्यावर ग्रीन कलरचा मॅचिंग झुमके काढून ठेवले.
अनिकेत पण उद्या च्या तयारी ला लागला होता. पीच कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरचा ट्राऊझर घालायचे त्याने ठरवले. अनिकेत मावशीला सांगत होता की, उद्या तो रुचिरा ला भेटायला जाणार आहे.जॅकेट खरेदी करण्यासाठी. त्यामुळे उद्या त्याला यायला उशीर होईल.
इतक्यात त्याच्या मामाची मुलगी मिनाक्षी आली. तीने अनिकेत चे बोलणे ऐकले होते. "

मिनाक्षी ,"काय कुठे जायची तयारी चालू आहे. "

मावशी, " अगं त्याला जॅकेट घ्यायला जायचे आहे ना उद्या. तेच सांगत होता तो. "

मिनाक्षी, " हो का चांगले आहे. "
पण तिचा स्वर उपहासात्मक होता. अनिकेत च्या चेहऱ्यावर नाराजगी पसरली. अनिकेत उठून माळ्यावर गेला. मावशी आपल्या कामात दंग होती. काका अजू आले नव्हते. मिनाक्षी ला अनिकेत च्या आसपास राहायला आवडायचं . तिला असं वाटत होते की, अनिकेत च्या आसपास राहिल्याने तो तिच्या प्रेमात पडेल.
अनिकेत माळ्यावर गेला तसं मावशी चं लक्षं नाही हे बघून ती पण माळ्यावर गेली. अनिकेत कपाटात काहीतरी शोधत होता. मिनाक्षी आवाज न करता गुपचूप वर आली
आणि पाठमोऱ्या असणाऱ्या अनिकेत ला तिने मागून मिठी मारली.

अनिकेत ची रिॲक्शन काय आहे ? ते बघुया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला ? हे तुमच्या प्रतिक्रियेतून सांगायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या साठी खूप मोलाच्या आहेत.