सत्व परीक्षा - भाग ७ Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्व परीक्षा - भाग ७

भाग ७
अनिकेत पटकन मागे वळला. त्याने पटकन मिनाक्षी ला दूर ढकलले, आणि तिला वाॅर्निंग दिली.

अनिकेत, " हे बग मिनाक्षी मला तू अजिबात आवडत नाहीस. ही गोष्ट डोक्यात पक्की बसवून घे. मला तू कधीच आवडली नाही. तू जे हे माझ्या आजूबाजूला सारखी घुटमळत असतेस ना ते बंद कर समजलं. "

तो तिथून निघून गेला. मिनाक्षी तो गेला त्या दिशेला बघत राहीली. अनिकेत ला मिनाक्षी अजिबात आवडायची नाही. कारण तिचा स्वभाव खूप फटकळ होता. ती सगळ्यांना उलट उत्तर करायची . कोणाशी धड बोलायची नाही. तिची आई म्हणजे अनिकेत ची मामी पण तशीच होती. मामाला सारखं भडकवत बसायची त्यामुळे तिच्या मुलीवर पण तिचेच संस्कार असणार. हे सगळे जाणून होते. त्यामुळे घरात ती कुणालाही आवडत नव्हती.
पण मामीला तिचं लग्न अनिकेत शी लावायचं होतं. कारण त्याची गावाला भरपूर प्राॅपर्टी होती. अनिकेत आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अनिकेत शी लग्न झाल असतं तर ती त्यांच्या जवळच राहिली असती.
अनिकेत खाली आला मावशी ला त्याने घडलेला प्रकार सांगितला, आणि तो घराच्या बाहेर निघून गेला. मिनाक्षी खाली आली आणि मावशी ला जाते म्हणून जाऊ लागली. तिला वाटलं नव्हतं की, अनिकेत ने मावशी ला सगळं सांगितले आहे. कारण या आधी पण तिने असे प्रकार केले होते. अनिकेत ने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. त्यामुळे तीला काहीच कल्पना नव्हती . " मिनाक्षी थांब " मावशी ने मिनाक्षी ला थांबवले. मावशी च्या आवाजाचा बदललेला टोन मिनाक्षी ने ओळखला.
"काय झालं? मिनाक्षी म्हणाली.

मावशी, " बस जरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. "
मिनाक्षी, " हा बोलना. "मावशी, " मिनाक्षी मला माहीत आहे की, अनिकेत शी तुला लग्न करायचे होतं. पण अनिकेत ला तुझ्याशी कधी च लग्न करायचे नव्हते. लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे. संसार गाडा चालवायला दोन चाकांची गरज असते. दोघांच्या संमतीची, आवडीची, प्रेमाची गरज असते. जर त्यातल्या एका चीही संमती नसेल किंवा मन नसेल तर दोघांच्या ही आयुष्याची वाट लागते. तुझ्यासाठी आम्ही अनिकेत च लग्न तुझ्याबरोबर लावले ना तर तो खष राहणार नाही त्यामुळे तू पण खूष राहणार नाही.
आता त्याचं लग्न ठरलं आहे. तसचं उद्या तुझं पण लग्न ठरेल. तेव्हा अशी कुठलिही गोष्ट करु नकोस ज्याची खंत तुला आयुष्य भर वाटेल. त्यामुळे या गोष्टी इथेच राहू दे. यापुढे असं होणार नाही याची काळजी घे. "

मिनाक्षी, " माझ चुकलचं तुझं बोलणं मला पटतय यापुढे मी कधीच असं वागणार नाही. सॉरी आणि अनिकेत ला पण सांग सॉरी. मी असं वागायला नको होते. "

मावशी, " झालं गेलं विसरून जा. तु काय कमी सुंदर आहेस. अनिकेत पेक्षा पण चांगला मुलगा मिळेल तुला जोडीदार म्हणून."

मिनाक्षी, " येते मी थॅंक्यु "

मिनाक्षी निघून गेली मावशी आपल्या कामात दंग झाली. जेवायच्या वेळेला अनिकेत घरी आला. तो थोडा टेन्शन मध्ये दिसत होता. मावशी ने त्याला मिनाक्षी बरोबर तिचं झालेलं बोलणं त्याला सांगितले. त्यामुळे तो थोडा निर्धास्त झाला.
उद्या तो रुचिरा बरोबर जॅकेट घ्यायला जाणार होता. उद्या चा दिवस कधी येतोय असे त्याला झाले होते.
मावशी आणि काका दोघेपण होते. तेव्हा त्याने त्या दोघां समोर घर घेण्याचा विषय काढला. हा विषय जर त्याने लग्नानंतर काढला असता तर कदाचित रुचिरा ने त्याला बोलायला सांगितले असं वाटेल.

"मावशी - काका लग्नानंतर मी घर घ्यायचं म्हणतोय."
अनिकेत म्हणाला

काका, "अरे वा छानच आहे.

अनिकेत, " मावशी काका तुम्हाला राग नाही आला. "

काका, " अरे वाईट काय आहे त्यात. मुंबई त तुझं स्वतः च घर झालं तर आनंदच होणार आहे आम्हाला. "

अनिकेत, " मग काका तुम्ही च बघा घर. "

काका, " अरे म्हणजे काय? बघणारच. "

अनिकेत, " काका मला इथे तुमच्या जवळच घर घ्यायचं आहे. "

काका, " अनिकेत बिल्डिंग मध्ये घेणार आहेस का घर? "
जर घर घ्यायचं आहे तर बिल्डिंग मध्ये च घे. आपल्या बाजूला इथे बऱ्याच बिल्डिंग बनत आहेत. त्यात भाव काढून घेवू. बिल्डिंग मध्ये. एजंटला व आजूबाजूच्या परिसरात पण सांगून ठेऊ."

अनिकेत "ठिक आहे तुम्ही दोघे आहात म्हणून मला कसली काळजी नाही आहे. "

मावशी, " काय मगं उद्या च्या भेटीची तयारी झाली का?
"
अनिकेत", ते जऍकेट घेण्यासाठी भेटणार आहोत. "

काका,. 'ओके ओके. "

रुचिरा अणि अनिकेत ची भेट बघुया पुढच्या
भागात. "