Satva Pariksha - 4 books and stories free download online pdf in Marathi

सत्व परीक्षा - भाग ४

परवाचा दिवस कधी येतोय असे दोघांना पण झाले होते. कारण दोघांना पण एकमेकांना बघायची ओढ लागली होती. रुचिरा ची आई रुचिरा ला म्हणाली, " रुचिरा साडीच नेस ग परवा. "
रुचिरा, " ठिक आहे आई. " कोणती साडी नेसायची असा विचार ती करू लागली. राणी कलरची खणाची साडी नेसायची तिने ठरवले. बघता बघता परवाचा दिवस उजाडला. घर छोटसं होतं पण टापटीप आणि नीटनेटके होते. मावशीने घर छान असं सजवलं पण होतं. चाळीतले घर असले तरी ते सुंदर होतं. माळ्यावर जाण्याचा जीना पण गोल बसवून घेतला होता. त्यामुळे घराला एक वेगळाच लूक आला होता. मावशीने अनिकेत ला येताना मिठाई चा बॉक्स, ढोकळा, आणि समोसे आणायला सांगितले होते. संध्याकाळची सर्व कामे त्यांनी आटपून घेतली.

अनिकेत पण आज लवकर येणार होता. संध्याकाळी ७ वाजता रुचिरा आणि तिच्या घरचे आले. रुचिरा ची नजर अनिकेत ला शोधत होती. पण तो काही तिला दिसत नव्हता. मावशीने सगळ्यांना पाणी दिले. थोड्यावेळाने अनिकेत माळ्यावरून खाली आला. तो खूप च हॅन्डसम दिसत होता. आज त्याने ब्लॅक ट्राऊझर, आणि बेबी पिंक कलरचा शर्ट घातला होता. रूचिरा त्याला बघतच बसली. रुचिरा ला पण राणी कलरची खणाची साडी खूप खुलून दिसत होती.
चहा नाश्ता झाल्यावर काकांनी मुख्य मुद्याला हात घातला. काका, " मग पुढचे कसे करायचे? माझं असं मत आहे की, साखर पुडा आपण पुढच्या महिन्यात करू आणि लग्न आपण मे महिन्यात करू. "

रुचिरा चे बाबा, " आता मार्च एंडीग आहे. साखरपुडा आपण पुढच्या महिन्यात केला की, लग्नाची तयारी करायला एक महिना पुरेसा आहे. देण्या घेण्याचं आणि खर्चाचं कसं करायचं? "

अनिकेत चे काका, " तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुमच्या मुलीसाठी करा. लग्नाचा खर्च दोघे अर्धा अर्धा करु. "

रुचिरा चे बाबा, " साखरपुडा आमच्या इथे आम्ही करु.
मुलाचे कपडे आम्ही करू. "

अनिकेत चे काका, " साड्या आणि दागिने जे रीतिरिवाजा
प्रमाणे असेल ते आम्ही करू. "
अशाप्रकारे काही मतभेद न होता व्यवस्थित लग्नाची बोलणी झाली.

दोघांनी आपापले फोन नंबर एक्सचेंज केले. दोघेपण एकमेकांशी बोलू लागले. एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ लागले. उद्या शनिवार होता. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर दोघांनी भेटायचे ठरवले. फोनवर त्यांचं बोलणं चालूच होतं . पण लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा च ते भेटणार होते. तिला काय गिफ्ट घ्यावं असा तो विचार करत होता. साडी घेऊ का ❓ की, ड्रेस घेऊ. तो कनफ्यूज झाला होता. मग त्याने त्याच्या ऑफिस मधील एक कलिग होती. नेहा तिला विचारले की,

अनिकेत,"मी आज रुचिरा ला पहिल्यांदा च भेटायला जात आहे. तरा तीच्या साठी काय घेऊ? असा प्रश्न पडला आहे. साडी घेऊ का ड्रेस घेऊ त्याने त्याचे ऑप्शन तीला सांगितले. "

नेहा, " साडी आणि ड्रेस घेण्यापेक्षा एक छानसं रिस्टवॉच घे. साडी आणि ड्रेस ती कधीतरी घालेल पण रिस्टवॉच नेहमी तिच्या जवळ राहिल. ती ते नेहमी युज करु शकते. साडी आणि ड्रेस च्या किंमती मध्ये चांगले वॉच येईल.बघ तुला काय घ्यायचे ते मी जस्ट सजेस्ट केले. "

अनिकेत, " ओके डन मला पण तेच वाटते. "

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघे आर सीटी मॉलमध्ये भेटणार होते. संध्याकाळची तो आतुरतेने वाट बघत होता. तशीच ती सुद्धा वाट बघत होती. आज हाफ डे होता त्यामुळे तो ऑफिस मधून थोडा लवकरच निघाला. तिच्या साठी त्याने स्मार्ट वॉच घेतलं. कॅडबरी सिल्क पण घेतलं. तो मॉलच्या बाहेर पोहचला. तिची वाट बघू लागला. मुली वाट बघायला लावतात हे तो ऐकून होता.
इतक्यात रुचिरा समोरून येताना दिसली. काय भारी दिसत होती ती. तीने मरुन कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. केसांना क्लिप्स लावून केस मोकळे सोडले होते. ड्रेस ला मॅचिंग हँगिंग कानातले घातले होते. एका हातात कडा एका हातात घड्याळ. खूप सुंदर दिसत होती ती. अनिकेत तिला बघून एक क्षण आजूबाजूचे वातावरण विसरून च गेला. ती त्याला बघून हसली. किती गोड दिसत होती ती हसताना. त्याने तिच्या हाता कडे बघितले तिने स्मार्ट वॉच घातलं आहे का? पण तिच्या हातात साधसं ब्लॅक पट्टयाच घड्याळ होतं. त्याला वाटलं तिच्या कडे आधी च स्मार्ट वॉच असतं तर आपण घेतलेल्या गिफ्ट्स महत्त्व कमी झाले असते असे त्याला वाटले.
तो पण भारी दिसत होता. नेव्ही ब्लू कलरचा शर्ट, ब्लॅक ट्राऊझर, छान सेट केलेले केस, क्लीन शेव. रुचिरा पण त्याला बघतच बसली. एकमेकांना बघताच ओळखीचे हसू त्यांच्या गालावर आले.

पहिल्या भेटीत अजून काय काय घडतं ? ते बघूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला? हे तुमच्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्या साठी खूप मोलाच्या आहेत.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED