सत्व परीक्षा - भाग ९ Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्व परीक्षा - भाग ९

भाग ९

वेटर त्यांच्या टेबलवर ऑर्डर घेण्यासाठी आला .
अनिकेत," चिकन मंचाऊ सूप घेऊन या आधी आणि चिकन लॉलीपॉप घेऊन या. बाकीचं नंतर सांगतो. "
ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला.
अनिकेत," जेवण मध्ये काय मागवायचं ? तुला काय आवडतं. ?"
रुचिरा," मला चायनीज ‌आवडतं . नॉनव्हेज पदार्थ‌ मला खूप आवडतात.‌?
अनिकेत," मला पण खूप आवडतं नॉनव्हेज.‌"
कोकणी लोकं पक्की नॉनव्हेजीटेरियन असतात.

अनिकेत," लग्नानंतर ‌आपण आधी गावाला जाऊया गावदेवी च्या आणि कुलदेवी च्या दर्शनाला. "

रुचिरा ," हो नक्कीच जाऊया."

अनिकेत, " तुला कोणता रंग आवडतो ?"

रुचिरा," मला मोरपिशी कलर आवडतो. "

अनिकेत," तुला आपण लग्नात मोरपिशी रंगाचा शालू घेऊया की. लेहेंगा घ्यायचा."

रुचिरा," अनिकेत मी लग्नात पैठणी च नेसणार आणि तुम्ही मॅचिंग जॅकेट घाला."

अनिकेत," ओके मॅडम."

दोघं बोलत होते. मागे गाणं चालू होते.

ये लम्हा जो ठहरा है
मेरा है या तेरा है
ये लम्हा मे जी लू जरा

तुझमे खोया रहू मै
मुझमे खोयी रहे तू
खुद को ढूंढ लेंगे फिर कभी
तुझसे मिलता रहू मै
मुझसे मिलती रहे तू
खुद से हम मिलेंगे फिर कभी.....

दोघेही एकमेकात हरवून गेले होते. फक्त एकमेकांना च बघत बसले होते. इतक्यात वेटर सूप घेऊन आला. सूप पित पित दोघे बोलत होते.

अनिकेत," मला खूप भूक लागली आहे. "

रूचिरा," मला पण खूप भूक लागली आहे. "

अनिकेत," संध्याकाळ कधी होतेय असं झालं होतं त्यामुळे व्यवस्थित लंच पण नाही केला."

रूचिरा," माझं पण सेम असचं झालं होतं . त्यामुळे आता खूप भूक लागली आहे."
‌‌
वेटर नंतर लॉलीपॉप घेऊन आला.‌मस्त कुरकुरीत लॉलीपॉप , चिकन शेजवान फ्राईड राईस हे पदार्थ ‌मागवले . दोघेही पोटभर जेवले.‌जेवणानंतर दोघेही निघाले. दोघेही स्कुटी जवळ आले.

अनिकेत," निघायचं का रुचिरा? "

रुचिरा," हो निघुया."

दोघेही निघाले . मगाच पेक्षा थोडा मोकळेपणा आला होता दोघांमध्ये. अनिकेत आणि रुचिरा तिच्या घराजवळ आले. पण दोघांचाही पाय निघेना .‌रूचिरा त्याला घरी यायला सांगत होती.
पण तो नाही म्हणत होता.

अनिकेत," आता परत कधी भेटणार.
रुचिरा," भेटू लवकरच."

अनिकेत," असं वाटतयं तुला आताच माझ्या बरोबर घेऊन जावे .

रुचिरा," जास्त दिवस नाही आहेत आता."

अनिकेत," पण एक एक दिवस किती किती मोठा वाटतो आहे.

रुचिरा," हो,का असं आहे तर" आणि रुचिरा गालातल्या गालात हसायला लागली.

अनिकेत ला तिला असं हसताना बघत राहावंसं वाटत होतं.‌तिच्याशी अजून बोलत राहाव‌ं असं त्याला वाटत होतं.

रुचिरा,"चला , मी येते आता. नाहीतर आई रागवेल.‌"

अनिकेत," ओके. बाय. "
फायनली रुचिरा ला बाय करून तो निघाला. वेगळ्याच मुडमध्ये होता तो.तो खूप. खूब होता. आजच्या दिवसाच्या गोड आठवणी घेऊन. तो परतला. रुचिरा च्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि आनंद बघून आई बाबा एकमेकांना बघून हसले.

आपलं मुल जेव्हा आनंदी ‌असतं ना आई वडील ‌त्यांच्या आनंदाने आनंदी होतात.‌घरात एकदम पॉझिटिव्हीटी वाढली.‌रुचिरा आणि तिचा भाऊ बाहेर हवेवर बसले होते. आईचे पण काम झाले होते. मी पण निवांत होती.

रुचिरा चे बाबा तीच्या आईला म्हणाले," आपली रुचीरा आता थोड्याच दिवसांत तिच्या सासरी जाईल ना."

त्यांच्या चेहऱ्यावरचे उदास भाव‌ बघून आई त्यांना समजावत म्हणाली," प्रत्येक मुलीला सासरी जावचं लागतं . ही जगाची रित च आहे आणि ‌ती कुठे एवढी लांब जाणार आहे.
‌‌आपण काय तिला आयुष्य भर पुरणार आहोत का? तिला आयुष्य भर सांभाळणारा जोडीदार मिळाला. त्यांच्या बरोबर ती आनंदात आहे. तिचा संसार आनंदाने करते आहे. हेच खूप मोठं आहे आपल्या साठी. तेव्हा मन‌ घट्ट करा आणि आनंदाने मुलींची पाठवणी करा. "

रुचिरा चे बाबा ," तुला नाही वाटतं का वाईट? "

रुचिरा ची आई," आम्हा बायकांच मन तुम्हा पुरुषांपेक्षा कठीण असतं. किंबहुना ते तसे ठेवावेच लागतं. मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते. प्रत्येक घराच्या चालीरीती , पद्धती वेगवेगळ्या असतात. त्यात ती स्वतः ला ॲडजेस्ट करते. दूधात साखर मिसळावी तशी विरघळून जाते. कधी त्या परिवारात मिसळते कळतच नाही. मी पण नाही आले का माझं माहेर सोडून. त्यामुळे वाईट तर वाटत आहे. पण त्या पेक्षा आपल्या मुलीला चांगला जोडीदार मिळाला त्याच्या सोबत ती आनंदात आहे. हे पाहून समाधान वाटतं.


हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत.