सत्व परीक्षा - भाग १० Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्व परीक्षा - भाग १०

फ्लॅट बघायला जाऊया? " अनिकेत म्हणाला. परवा साखरपुडा आहे तर उद्या आपली गडबड असेल तर साखरपुडा झाल्यावर च जाऊ म्हणजे निवांतपणे फ्लॅट बघता येईल.

अनिकेत," ठिक आहे.‌आई बाबा पण बघतील."
काका," हो चालेल."
दुसऱ्या दिवशी ची सुरुवात जरा गडबडीची होती. आई आणि मावशी दोघी जेवण आवरून मार्केट मधून काय काय आणायचं त्याची तयारी करत होत्या.
विड्याची पानं, सुपाऱ्या , नारळ , नवरी साठी गजरा आणि वेणी. बरीच मोठी लिस्ट होती. दोघी ही मार्केट मध्ये गेल्या. काका आणि बाबा पण बाहेर गेले होते. मावशी ची मुलं पण क्लासला गेली होती. अनिकेत एकटाच घरी होता.
अनिकेत ने रुचिरा ला फोन केला.

खूप वेळ रिंग जात होती पण तीने फोन उचलला नाही. त्याने परत फोन केला. तीने फोन उचलला.

. रुचिरा, " हॅलो"

अनिकेत, " हॅलो काय करते आहेस. "

रुचिरा, " पार्लर ला आली आहे . "

अनिकेत, " तयारी कुठपर्यंत आली.? "

रुचिरा, " काही च नाही झाली अजून. "

अनिकेत, " का गं? "

रुचिरा, " तुम्ही तयारी करू द्याल तेव्हा तयारी करणार ना? "

अनिकेत, "हो का ठिक आहे मग ठेवतो फोन. "

रुचिरा, " नको नका ठेऊ फोऩ़. "

अनिकेत, " का? माझ्या मुळे तयारी राहीली आहे ना? "

रुचिरा, " ते मी असचं बोलले. पार्लर ला आली आहे. नंतर नाही बोलता येणार. मेहेंदी पण काढायची आहे. "

अनिकेत, " बर बर चालू दे तुझं. "

रुचिरा , " ठेऊ उद्या बोलूया बाय. "

अनिकेत, " ओके बाय"

त्याची अशी काही तयारी नव्हती त्यामुळे तो निवांतच होता. रुचिरा ची मात्र खूप सारी तयारी चालू होती. आयब्रो , फेशियल,मेहेंदी, बांगड्या भरायच्या होत्या उद्याची साडी ची तयारी, उद्याची मेक अप आणि हेअरस्टाईल साठी तिने पार्लर वाली बुक केली होती. उद्या तर तिला अजिबात च वेळ नव्हता.
आईची पण काय काय तयारी चालू होती. दिवस कसा गेला कळलच़ं नाही. त्यांच्या घराजवळ असणारा हॉल रुचिरा च्या बाबांनी बुक केला होता. बाबा तेच बघायला गेले होते आणि कॅटरिंग वाल्याला पण सांगायला गेले होते. दिवस भर सगळ्यांची गडबड चालू होती. थकून भागून सगळे झोपले. रुचिरा आणि अनिकेत ला झोप येत नव्हती. दोघेजण एकमेकांचा विचार करत जागेच होते.
रुचिरा ला अनिकेत ला मॅसेज करायचं मन करत होते कारण तयारी च्या गडबडीत तिला त्याच्याशी बोलता आलं नाही. पण तीने मोठ्या मुश्किलीने ते टाळलं. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. जाग आली ती आईच्या आवाजाने, " रुचिरा ऊठ आता आज साखरपुडा आहे ना आज.." रुचिरा हसतच उठली सगळ्यात आधी तीने हातावरची मेहेंदी बघितली. छान रंग चढला होता मेहैंदिचा. ती खुप खुष झाली. दिवसाची सुरुवात तर छान झाली.
आज तिचा स्पेशल दिवस होता. ५ वाजेपर्यंत हॉलला पोहोचायचे होते. ३ वाजल्यापासून च तिची तयारी चालू होती. पार्लर वाली आली होती साडी नेसवायला आणि मेक अप करायला. मरून कलरची नारायण पेठ साडी ती नेसली होती. ओटी भरल्यावर परत तिला साडी चेंज करावी लागणार होती. रुचिरा नटली तशी आईने तिला नजर लागू नये म्हणून काजळाचा तीट तिच्या कानामागे लावला.
सगळे निघाले ५ वाजता सगळे हाॅलवर पोहोचले. ५:१५ मिनिटांनी अनिकेत आणि त्याचे आईबाबा, काका मावशी आले. रुचिरा च्या घरच्यांनी अनिकेत आणि त्यांच्या घरच्यांचे स्वागत केले. हळूहळू नातेवाईक येत होते.. हॉल पूर्ण भरून गेला. मग मोठ्या लोकांनी विड्याची पाने वैगरे मांडले. मग मुलीला म्हणजेच रुचिरा ला बोलावले.
रुचिरा आली तसं अनिकेत तिला बघतच बसला. बाकी साऱ्या जगाचा त्याला विसर च पडला.‌ तिला बघताच त्याच्या मनात गाणं वाजलं .

‌. केवढ्याचं पानं तू. कस्तुरी च रान तू
पाघुळल्या जीवाचं गं भान तू

सागराची गाज तू गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याचं सपान तू

खुप च सुंदर दिसत होती ती आणि आज ती त्याची होणार होती. रुचिरा ने पूजा केली. पाच जणींनी तिची ओटी भरली. मग रुचिरा साडी चेंज करायला गेली.‌अर्ध्या तासाने रुचिरा हिरवी साखरपुड्याची साडी नेसून आली. मग अनिकेत ला पण बोलावले. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दोघांनी एकमेकांना पेढा भरविला.सगळे जेवण तेवढ्यात बिझी झाले. एकमेकांच्या नातेवाईकांशी ओळख करून देणे झाले.
अनिकेतच्या मामांची मुलगी मिनाक्षी ने पण त्या दोघांचे अभिनंदन केले. तेवढ्यात च अनिकेत चा मित्र आशुतोष पण त्याचवेळी तिथे आला .त्याने अनिकेत चे आणि रुचिरा चे अभिनंदन केले. मीनाक्षी ची आणि त्याची नजरानजर झाली.जेवायला गेले तेव्हा पण ते दोघं समोरासमोर आले होते. आशुतोष ला मीनाक्षी आवडली होती.आणि मिनक्षिला पण आशुतोष आवडला होता.
मीनाक्षी पण खूप भारी दिसत होती. ती नेव्ही ब्लू कलरची सिल्व्हर काठ असलेली मुनिया बॉर्डर पैठणी साडी नेसली होती. त्यावर तिने सिल्व्हर ची ज्वेलरी घातली होती.ती सुद्धा खूप सुंदर दिसत होती. आशुतोष पण हँडसम होता. आकाशी कलर चा शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर त्याने घातली होती. उभ्या चेहऱ्याचा गोरापान, काळे भोर डोळयांचा आशुतोष पण भारी दिसत होता. त्याला मीनाक्षी आवडली आहे हे अनिकेत च्या लक्षात आले होते. साखरपुड्या तून निघे पर्यंत दोघांची नजरानजर चालू होती.
अनिकेत आणि रुचिरा च्या साखरपुड्यात आणखी एक लग्न जमणार होतं .

हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. तुम्हाला माझं लेखन आवडलं असेल तर स्टिकर्स द्यायला विसरू नका.