माझा होशील का ? - 3 Shalaka Bhojane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझा होशील का ? - 3

संजना ला कसं समजावून सांगावे सरीता ताईंना कळेना.
सरीता ताईं, " संजना अगं तुझे बाबा गेले ना तेव्हा मी ठरवलं होतं की, तुझ्या साठी घरजावई च शोधायचा. पण मग विचार केला की तो तुझ्या वर नाही तर तुझ्या संपत्ती वर प्रेम करेल. मग मी तो विचार मनातून काढून टाकला. मला तुझा आनंद बघयचा आहे . तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. प्रत्येक मुलीला कधी ना कधी तिच्या नवऱ्याच्या घरी जावेच लागते बेटा.माझ्यानंतर तुझी काळजी घेणार कुणीतरी असावं जे माझ्या इतकच तुझी काळजी घेईल. "

संजना सरीता ताईं च्या मांडीवर डोके ठेवून शांत पडुन राहिली. त्या तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या.
दोघी कधी एकमेकींना सोडून कुठे गेल्याच नव्हत्या. त्यामुळे संजना ला आईला एकटीला सोडून जाण्याच्या
टविचार मनात येऊन ती अपसेट झाली होती.

दुसऱ्या दिवशी रविवार होता म्हणून दोघी जरा उशीरा च उठल्या होत्या.दोघींनी मिळून नाश्ता बनवला.
संजना, "आई अगं मला त्या आदित्य ला एकदा भेटायचं आहे. इथे जेव्हा मी त्याला घर दाखवायला नेलं तेव्हा त्याने मला काहीच प्रश्न विचारले नाहीत. तो गप्प गप्प होता. कदाचित त्याला कम्फर्टेबल वाटलं नसेल आपल्या घरी म्हणून मला एकदा त्याला बाहेर भेटायचं आहे. मग आपण पुढची बोलणी करू.

आई, " बघते त्याच्या आईकडून त्याचा नंबर घेते. '"

संजना, " ठिक आहे. "

आई जेवणाच्या तयारी लागली. आईचा फोन वाजला.आईने च फोन उचलला. आदित्य च्या आईचा फोन होता.

वीणा ताई, " नमस्कार सरीता ताई कशा आहात तुम्ही? "

सरीता ताई, " मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? "

वीणा ताई, " मी पण मस्त आहे. फोन अशासाठी केला होता. तुम्हाला सोईचे होईल तर पुढच्या रविवारी आमच्या घरी याल का? म्हणजे पुढची बोलणी पण होतील आणि तुम्ही आमचं घर पण बघाल. "

सरीता ताई, " मी संजना शी बोलून तुम्हाला कळवते. मला असं वाटत होते की मुलं जर एकमेकांना एकदा बाहेर भेटली असती तर त्यांना एकमेकांशी मोकळे पणाने बोलता आलं असतं. "

खुप मोठा पॉझ घेऊन वीणा ताई म्हणाल्या, " ठिक आहे. मी आदित्य शी बोलून सांगते. बरं ठेऊ का फोन? "

सरीता ताईं, " ठिक आहे. "

त्या दोघी बोलत होत्या तेव्हा संजना त्यांच्या कडे बघत होती. सरीता ताईं च्या बोलण्यावरून तिला साधारण संभाषणाची कल्पना आली होती. त्या संजना म्हणाल्या,
"वीणा ताईं चा फोन होता. त्या विचारत होत्या पुढच्या रविवारी जमेल का? पुढची बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी यायला. "

संजना, " एवढी काय घाई आहे. "

सरीता ताई, " अगं पुढची बैठक झाली की साखरपुडा वैगरे करुन घेता येईल. बरोबर आहे त्यांचं. "

संजना, " पण मग आदित्य शी बाहेर भेटायचं होत त्याच्या बद्दल काय बोलल्या. "

सरीता ताई, " आधी तर किती वेळ बोलल्या च नाही त त्या. नंतर म्हणाल्या की आदित्य शी बोलून सांगते. "

संजना, " ठीक आहे तू बोलून घे मावशी काकांशी , आणि काका काकुंशी अंकीत दादा ला मी फोन करते. "

सरीता ताई, " बरं " असं म्हणून त्या जेवण करायला गेल्या. आदित्य भेटेल का ❓ याची तिला शंका वाटत होती. कारण तो तिला थोडा अबोल वाटला. बघुया कळेल च.
अंकीत ला तीने फोन करून पुढच्या रविवारी तो मोकळा आहे का ते विचारलं.

संजना, " हॅलो अंकीत दादा कसा आहे स? "

अंकीत, " मी मस्त आहे तू आणि काकी कशी आहे?

संजना, " आम्ही पण मस्त आहोत. "

अंकित, " सहजच फोन केला होता ना? "

संजना, " अरे आदित्य च्या आईचा फोन आला होता त्या म्हणत होत्या की पुढच्या रविवारी त्यांच्या घरी पुढची बोलणी करण्यासाठी यायला जमेल का? तुला वेळ आहे का पुढच्या रविवारी. "

अंकित, " पुढच्या रविवारी तसा माझा काही प्लॅन नाही आहे. जाऊया मग पुढच्या रविवारी. आफ्टरऑल माझ्या लाडक्या बहिणी च्या लग्नाचा विषय आहे . "

संजना, " हो हो तुलाच तर बघाव लागणार आहे सर्व. "

अंकीत, " म्हणजे काय ❓ बघणारच."

संजना, " ओके बाय. "

अंकित, " चल बाय. "

अंकित ला वेळ आहे असं संजना ने तिच्या आईला सांगितले. आईने मग मावशी ला फोन लावला.
संजना ची मावशी, " हॅलो हा बोल ग सरू कशी आहेस. "
सरीता ताईं, " मी बरी आहे. तुझी तब्बेत ठिक आहे ना?

मावशी म्हणाली, "माझं काय घटकेत चांगल घटकेत वाईट
तू बोल कशासाठी फोन केलास ? "

सरीता ताईं, " अगं आदित्य च्या आईचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की, पुढच्या रविवारी बोलणी करुन घेऊया तुला जमेल का यायला? "

संजना ची मावशी,"मी प्रयत्न करेन येण्याचा पण हल्ली माझी तब्बेतबरोबर नसते. त्यामुळे मी नक्की नाही सांगू शकत . तुम्ही करून घ्या पुढची बोलणी. "

सरीता ताईं, " बरं ठीक आहे. तू तुझ्या तब्बेतीची काळजी घे. ठेवते फोन. "

संजना ची मावशी, " ठिक आहे. "

अंकित च्या आई बाबांना पण त्यांनी फोन केला. पण त्यांनी सांगितले की, अंकित येणार आहे ना . थोड्या फार फरकाने मावशी सारखाच त्यांनी नकार दिला.

सरीता ताईं ना खूप वाईट वाटले पण संजना समोर त्यांनी तसे दाखवले नाही. पण आईचा चेहरा बघून संजना काय समजायचं ते समजली." आई तूला माहिती आहेत ना ते कसे आहे त मग तू अशा लोकांकडून अपेक्षा च कशाला करतेस. त्यांना असं वाटत असेल की, हिचे वडील नाही. तर आपण पुढे पुढे केल तर आपल्या ला हिच्या लग्नासाठी मदत करावी लागली तर त्यापेक्षा आपण मागेच राहीले ले बरे.म्हणून ते तुला कारण सांगत आहेत. यापुढे त्यांना सारखा कॉल करू नकोस. "संजना आईला म्हणाली.

सरीता ताईं, " तू असा डोक्यात राग घेऊन राहू नकोस. अगं लग्न जमवताना चार नातेवाईकांना सांगवच लागतं. "

संजना, " पण काय करायची आहेत अशी नाती आई. "

सरीता ताईं, " जाऊ दे गा आपण कुठे सारखं सारखं त्यांना सांगायला जाणार आहोत. बरं ते जाऊ दे. उद्या तुझ्या साठी काय बनवू डब्याला?

संजना, " काही नको करूस मी उद्या कॅन्टीन मध्ये खाईल काहीतरी. "

सरीता, " बरं . "

दोघी आपलं आवरून झोपायला गेल्या. संजना मोबाईल वर काही तरी बघत होती. पण तीच मन काही त्यात लागत नव्हतं. तीने रजनी मावशी ने पाठवलेला आदित्य चा फोटो बघितला.. फोटोत तर किती छान हसत होता. पण प्रत्यक्षात हसायला लाजत होता का?म्हणून च तर भेटायचं होते त्याला. पुढची बोलणी करायच्या आधी तीला त्याला एकदा भेटायचं होते. ह्याच विचारातच कधी तरी तिचा डोळा लागला .

सकाळी आई तिला उठवायला आली. तीने डोळे उघडले आईचा प्रसन्न चेहरा बघून तिला खुप बरे वाटले. उठल्या उठल्या आई चा चेहरा बघीतला की तिचा दिवस खुप चांगला जायचा. ती तीचं आवरुन ऑफिस ला निघायच्या तयारी तच होती इतक्यात आदित्य च्या आईचा फोन आला. आईने तिला थांबायला सांगितले. त्यांनी फोन उचलला.


हा भाग कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर स्टिकर्स द्यायला विसरु नका.