मल्ल प्रेमयुद्ध - भाग 44 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 44

मल्ल प्रेम युद्ध

घर हसण्या खिदळण्याने भरून निघाल होत. रत्ना, रत्नाचा लहान भाऊ, आई वडील सगळे क्रांतीच्या घरी आधी आर होते.
क्रांतीचे दोन्ही मामा माम्या पडेल ते काम करत होते. सगळ्यांची गडबड सुरू होती. आज मेहंदीचा कार्यक्रम होता. क्रांती अगदीच वेगळी दिसत होती. अबोली रंगाची साडी, सैलसर वेणी, वेणीमध्ये गजरा, छोटी टिकली, कानामध्ये झुमके "सुंदर"
आपोआपच रत्नाच्या तोंडून आवाज आला.
"तायडे पण तू साडी का नेसली? मेहंदी काढल्यानंतर परत तुला बदलता येणार नाय..." चिनू म्हणाली.
"व्हय की हे माझ्या लक्षात व्हत पण अजून मेहंदी काढणाऱ्या कुठं आल्यात. मी सगळ्यांना नमस्कार करते अन लगेच ड्रेस घालते." सगळेच हसायला लागले. क्रांतीने सगळ्यांना नमस्कार केला. तेवढ्यात मेहंदी काढणाऱ्या ताई आल्या. मेहेंदीला सुरुवात झाली.


इकडे तेजश्रीने सर्वांना मेहेंदी काढायला बोलावून घेतले होते. वाडा गच्च पाहुण्यांनी भरला होता. आबांचे चुलत भाऊ त्यांची मुलं लांबचे जवळचे असे सगळे नातेवाईकांना आधीच आले होते. एक नाही तर पाचजणी मेहेंदी काढायला आल्या होत्या.
तेजश्रीची घाई सुरू होती. भूषण नुसता कामासाठी पळत होता.
बाकी स्वप्नाचे सगळं लक्ष भूषणकडे होते. तर कोणालातरी घाई झाली होती चिनूला भेटायची.

"भाऊजी थोडीच काढा मेहेंदी मी म्हणत न्हाय हातभर काढा म्हण... थोडी काढा शुभ असत." तेजश्रीने वीरला आग्रह केला.
"अरे लेका कधी की... उगच कशाला न्हाय म्हणतो." भूषण म्हणाला.
"आर मला पोरीनसारखी न्हाय आवडत मेहेंदी काढायला." तेवढ्यात मेसेज आला. वीरने मेसेज ओपन करून पाहिला. क्रांतीने मेहेंदी काढलेले हाताचे फोटो पाठवले होते. आणि खाली मेसेज होता.
"तुमी काढली...?"
"न्हाय....मला न्हाय आवडत..."
"नाव काढा फक्त... "
"कोणाचं?"
"कोणाचं काढायचं ते काढा." आणि स्माईल पाठवला.
वीर शांत बसला. तेजश्री वैतागून निघून गेली होती.
वीर तेजश्रीकडे गेला.
"वहिनी काढतो मेहेंदी फक्त तीच नाव काढा." सगळे पुन्हा हसायला लागले.
"हा वहिनी आता आपण सांगत व्हतो तर ऐकलं न्हाय गड्यांन अन आता बघा कोणाच्यातरी मेसेज आला की लगीच तयार झाला गुलाम..." परत एकच हशा पिकाला अन वाडा आनंदाने उजळून निघाला. एकीकडे संगीताची तयारी सुरू होती तर वीरला आबांना काहीतरी सांगायचे व्हते.

"आबा मला बोलयचंय तुमच्याशी."
"आबा परवानगी कसली मागताय बोला की..."

"चिनूचा फोन आला व्हता संगीतासाठी आपल्याला सगळ्यांना बोलवलाय उद्या तिकडं...कस करूया?"
"एवढ्या सगळ्यांना न्यायचं म्हंजी अवघड हाय. ते तर परवा इकडच येणार हायत त्यापेक्षा त्यांना उद्या बोलवू..."
"आबा पण त्यांच्याकड गाडीचा प्रश्न? अन उद्या घाणा हाय..."
"गाड्या पाठवू आपण करण आपल्यापेक्षा त्यांची माणसं आणणं सोपं...मी बोलतो दादांशी... अन अस किती लांब हाय"


आबांनी दादांशी बोलून संगीताचा प्रश्न मिटवून टाकला.

आज घाणा होता. गावातल्या सगळ्या बायका क्रांतीच्या घाण्याला जमल्या होत्या. जात्यावर हळद दळायला सुरुवात झाली.बायका घाण्याची गाणी म्हणायला लागल्या.

घाणा जी घातिला खंडीभर,
भाताचा घाणा जी घातिला खंडीभर
भाताचा मांडव, गोताचा दणका,
भारी घाणा जी घातिला खंडीभर भाताचा
आधी मान देती कुंकवाला
आधी मान देती हळदीला...


घाणा भरीला । सवाखंडी सुपारीमांडवी व्यापारी । गणराजघाणा भरीला । सवा खंडी गहूनवर्या मुलीला गोत बहू । गणराजघाणा भरीला । सवा खंडी भाताचानवरा मुलगा गोताचा । गणराजमांडवाच्या दारी । उभा गणपतीनवर्या मुलाला गोत किती । गणरायामांडवाच्या दारी हळदीचे वाळवणनवर्या मुलाला केळवण । गणरायालामांडवाच्या दारी । रोविल्या ग मेढीमूळ ग वर्हाडी । आंबाबाईमांडवाच्या दारी । कोण उभ्यान घास घेतोचहूकडे चित्त देतो । गणराजमांडवाच्या दारी । इथ तिथ रोवालोडाला जागा ठेवा । माणसांच्याघाणा भरीला । सवा खंडी कणिकमांडवी माणीक । आंबाबाई...

गाणी एकून घरातल्या सगळ्यांचेच डोळे भरून आले. क्रांती कायमची आपलं घर सोडून जाणार याची जाणीव सगळ्यांना झाली. संतु एक बाजूला जाऊन डोळ टिपू लागला. लहानपणापासून जिला बहीण म्हणूनही तर जास्त मैत्रीण म्हणून वाढवलं ती आता परक्या घरची होणार...
चिनूला हुंदका आवरेना. आपला ओरडा आपल्या अंगावर न येऊन चिनूला कितीतरी वेळा तायडीन वाचवलं होत. तायडींवर कितीतरी प्रेम होतं चिनूच... आता तिच्या नसण्याची सवय कशी होईल या कल्पनेन तिला अश्रू अनावर होत होते. ती दादांच्या गळ्यात पडून रडायला लागली.
दादांच्या नजरेला नजर मिळवू न देता क्रांती म्हणाली.
"अस रडताय का सगळेजण मी निघाली पण हाक मारली की लगीच येईन की..."अस म्हणत तीच दादांच्या गळ्यात पडून रडायला लागली.



संगीतासाठी वाड्याच्या मागच्या बाजूला मंडप टाकला होता. सजावट अगदी संग्रामने लक्ष देऊन केली होती. बसायला खुर्च्या स्टेज सगळं फुलांनी सजवलं होत. ऋषि आतुरतेने चिनूची वाट बघत होता. संग्राम त्याची बैचेनी बघत होता.

"माणूस प्रेमात एवढा वेडा झालाय हे मी पहिल्यांदा बघत नसलो तरी प्रेम ही भावना भारी असतीया हे मात्र ऋषिकडं बघून समजायला लागलंय. डोळ्यामधी प्रेम, वाटकड डोळ, कशी दिसत असलं, काय घातलं असलं साडी का ड्रेस, केस मोकळे असतील का बांधलेलं? माझ्याकडं कधी बघल... माझ्याशी बोलायला माझ्याइतकी ती पण आसुसली असलं का? का घाबरून बोलणार न्हाय सगळेजण असत्याल म्हणून किती प्रश्न असत्याल नाय का ऋषि...?"

"दादा अस काहीही नाही..."
"आर अस खोटं बोलण्यान डोळ्यातलं भाव बदलणार हायत व्हय?"
"दादा तू पण ना..."
"हे बघ अस बैचेन हून ती लवकर येणार हाय व्हय... चल खुर्च्या लागल्यात का बघ मंजि येळ जाइल तुझा अन लवकर इल चिनू..." संग्राम म्हणाल अन ऋषि बावरल्यासारखा खुर्च्या बघायला गेला.
"दादाला माझी अवस्था समजायला वेळ लागला नाही म्हंटल्यावर बाकीच्या लोकांना समजायला वेळ लागणार न्हाय..." ऋषि एकटाच बडबडत होता. तोच त्याच्या कानावर आवाज पडला.
"आव एवढं मेकअप करायची गरजच नव्हती. तुम्ही अश्याच लई देखण्या दिसता. आम्ही ह्याचाच प्रेमात पडलो ना..."
"आणि मेकअप केल्यावर???"
"अजून सुंदर...." ऋषीला पडद्याच्या मागे आवाज येत होता. दोन्ही आवाज ओळखीचे वाटत होते. म्हणून त्याबे पडदा बाजूला केला. पाहिले तर (तुम्हाला अंदाज आलाच असेल तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे पहायला मी कंसात काय लिहिले आहे हे सुद्धा वाचणार नाही कदाचित😊)
भूषण आणि स्वप्ना होते. भूषणने स्वप्नाचे हात हातात घेतले.
"माझं नाव लिहिलय का?"
"शोधा दाजी..." ऋषि पटकन म्हणाला तसे स्वप्नाने भूषणच्या हातातले हात सोडवून घेतले.
"मी होतो म्हणून ठीक बाकी कोण असते तर लग्न बाजूला राहिले असते तुमचं काही खरे नव्हते." स्वप्ना पळून गेली.
"ठीक हाय बाबा चुकलो पण तू आत्ता कोणाला सांगू नको वेळ आल्यावर मी संगणारच हाय..." भूषणने ऋषीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
"हो नको लाडीगोडी..."तेवढ्यात बसचा आवाज आला. ऋषीच्या काळजात कसस झाले.
"जा बॅग उचलायला..." भूषण हसत म्हणाला.
" हो जातो की.." ऋषी लगबगीने जात होता तेवढ्यात भूषण ने त्याला आवाज दिला.
" अरे क्रांतीवहिनींच्या..." ऋषी मागे बघून मोठ्याने हसला. आणि बस कडे धावत गेला चिनू कुठे दिसत नव्हती त्याने क्रांतीच्या हातातल्या बॅगा घेतल्या आणि सगळ्यांना जिथे थांबायची व्यवस्था केली होती तिथे नेले. चिनू कुठे अडकली. क कळत नव्हतं. आता विचारावं तरी कोणाला क्रांतीने त्याच्या मनातले ओळखलं.
ऋषी भाऊजी चिनु संतूबरोबर गाडीवर येती वाट बघा.
रत्ना आणि क्रांती हसायला लागल्या.

संतुने गेटमधून गाडी आत घातली.
"चिने खाली उतर मी गाडी लावून येतो." चिनू फिकट गुलाबी रंगाचा घागरा, मोकळे केस, साईड पिनअप केलेली ओढणी, हँडबॅग सगळं सावरत आत येत होती आणि ऋषि बाहेर येत होता.
त्याने चिनूला त्या अवस्थेत बघितले आणि तो बघतच राहिला. त्याला काय करावं सुचत नव्हते.
"चिनू कसली भारी दिसती ना...?"
"अरे गुलाबी घागरा वा क्या बात है..." भूषण आणि संग्राम दोघे त्याची खेचत होतते ते मात्र ऋषि चिनूला बघण्यात गुंग झाला होता.
"हो ना... कसली भारी दिसती..." ऋषि भानात म्हणाला. संग्राम आणि भूषण जोरात हसायला लागले. ऋषीला समजले. त्यांच्याकडे न बघता तो चिनुकडे गेला नि तिच्या हातातली बॅग घेतली.
"वा अप्रतिम दिसतीयेस..." चिनू लाजली.
"खरंच...?"
"किती वाट बघायला लावली?"
"सॉरी... sss " तिच्या नजरेत एक वेगळी चमक होती. ऋषी तिच्या त्या अल्लड सॉरी म्हणायला भाळला त्याला सॉरीच पुढे काय म्हणावं हेच समजत होतं तो डोळे भरून तिच्याकडे बघत बसला तिचे ओठ, बारीक डोळे, कान पकडून सॉरी म्हणन सगळंच वेगळं वाटत होतं.

तेवढ्यात स्वप्ना मागून आली.
"चिनू अग तुला सगळे शोधतायेत." ऋषीच्या हातामधून स्वप्नाने बॅग घेतली अन चिनूला हाताला धरून घेऊन गेली.

ऋषि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.
एकमेकांना ठरवून सगळ्यांनी बोलू दिले नाही.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत