प्रॅक्टिकलमध्ये गंमत करता करता आता सबमिशन सुरू झाले होते. पहिल्या सेमच्या पेपरला काहीच दिवस असल्याने सर्वच अभ्यासाला लागले होते. स्वराला अभ्यासात काही त्रास झाला की स्वयम तिची मदत करत असे किंबहुना सर्व बुक्स तोच तिला आणून देत असे त्यामुळे त्याचा स्वभाव पाहून ती त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागली होत. तर तो कुठल्याही अपेक्षेविना तिच्या आनंदासाठी काहीही करायला तयार होता. हळुहळु स्वराही त्याच्या स्वभावाची मोठी फॅन झाली.
आज स्वरा, पूजा आणि स्वयम अभ्यास करायला लायब्ररीला थांबले होते. स्वयम तिला कुठलातरी टॉपिक समजावून सांगत होता तर पूजा अगदी मन लावून सर्व एकत होती नेमकं त्याच वेळी स्वराला काय सुचलं माहिती नाही ती पूजाला बघून जोक मारू लागली. स्वयम फार सिरीयस होऊन सर्व सांगत होता आणि रागावत त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली. त्याचा हात डोक्यावर बसावा आणि ती अगदीच शांत झाली. पूजा बाजूला बसून हळूच स्माईल करत होती कारण पूजाने कधी जर तिला डोक्यावर मारलं असत तर तिचा राग कुणीच सहन करू शकत नसे पण आज स्वयमने मारल्यावर मात्र ती अगदीच शांत झाली होती. शायद प्यार का असर उसके सर चढ बोलणे लगा था. असे कितीतरी छोटे छोटे प्रसंग होते जे तिला त्याला ओळखून घेण्यात मदत करत होते आणि ती त्याच्यात एकरूप होऊ लागली.
टेन्शन टेन्शन मध्येच पेपर निघून गेले आणि पुन्हा मज्जा मस्ती करण्यात सर्व गुंग झाल. काही मूल आपल्या गावाला गेले होते तर काही आताही हॉस्टेलवरच होते. क्लास सुरू व्हायला आणखी काही दिवस होते त्यामुळे पूजा, स्वराअगदी निवांत बसून होते.
आज रविवार होता त्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. विद्यार्थ्यांच्या आणि जॉब करणाऱ्यांच्या आयुष्यात रविवार काय असतो हे सांगून व्यक्त होता येत नाही इतकं महत्त्व असत ह्या रविवारच. रविवार म्हटलं की आनंद आणि थकवा दूर करण्याची वेळ. रविवार म्हणजे फिरायला जायचा घाट तर कधी कधी एकांतात काहीही न करता बेडवर पडून राहण्याच समाधान. त्यांच्या दोन्ही रूम पार्टनर आज होस्टेलवर नव्हत्या. त्या नसल्यामुळे आज संपूर्ण रूमवर दोघांचंच वर्चस्व होत. दुपारची वेळ होती आणि तितक्यात पूजाच्या नंबरवर कॉल आला. तिने कॉल रिसिव्ह केला तेव्हा समोरून स्वयमने त्यांना कॉलेजच्या आवारात बोलवून घेतले. पूजाही स्वराला सोबत घेऊन आवरात पोहोचली. त्याने तिला दुरूनच इशारा करून स्वतःकडे बोलावले. त्याला बघताच पूजा घाईघाईने म्हणाली, " क्या हुआ स्वयम इतनी जलदी क्यू बुलाया तुमने? कुछ काम था क्या? "
स्वयम जरा आज गमतीच्या मूडमध्ये होता म्हणून तिची खेचत म्हणाला, "अरे यार आज ना अर्जित सिंग का लाइव्ह कॉन्सर्ट है. कितने दिनसे मै इस का इंतजार कर रहा था और नसीबसे आज तिकीट मिली है लेकिन प्रॉब्लेम ये है की एकही तिकीट है इसलीये सोच रहा हु की पूजा तुम्हे साथ ले चलू. तुम चलोगे ना मेरे साथ? "
पूजा उड्या मारतच म्हणाली, " सच मे अर्जित सिंग? वो तो क्रश है मेरा. क्यू नही चलुंगी. चलो मै अभि फ्रेश होंकर आती हु. "
पूजा जायला खूपच एक्साइटेड होती म्हणून धावत जाऊ लागली तर स्वयम तिला अडवत म्हणाला," ए पागल जरा रुक शो शाम को है. "
स्वयमने म्हणताच ती लाजून तिथेच शांतपणे उभी राहिली. स्वयम पूजावर आता खूप हसत आणि चेहरा पाडत स्वरा म्हणाली, " ए यार एकही तिकीट क्यू? मैने क्या किया है. मुझे भी ले चलो. "
स्वयमने तिच्याकडे रागातच पाहिले आणि चेहऱ्यावर खोटा राग पसरवत म्हणाला, " मिली नही तो क्या करू? अब जाने दो पूजा तयार हुयी है तो उसेही ले जाऊंगा. "
स्वयमकडून तिने अशी अपेक्षा केली नव्हती म्हणून त्याच बोलणं ऐकताच स्वराचा चेहरा खाडकन उतरला आणि तिने खाली पाहायला सुरवात केली . तिला अस बघून पूजा त्याला नकार देणार होती. ती त्याला काहीतरी म्हणणारच तेव्हाच त्याने तिला डोळा मारला आणि पूजाला प्लॅन कळून चुकला. आता तिची मज्जा घ्यायला दोघेही सज्ज झाले. स्वराचा उतरलेला चेहरा पाहताच स्वयम म्हणाला, " पूजा सोच लो तूम्हे अपणे दोस्त के लिये नही आणा हो तो कोई प्रॉब्लेम नही मै किसीं और को साथ ले जाऊंगा. इट्स युअर कॉल. "
आणि पूजा हसतच उत्तरली , " अर्जित के लिये तो मै किसीं को भी छोड सकती. ये तो सिर्फ दोस्तही है. तू सिर्फ बता कब जाना है? मैं टाइम पर आ जाऊंगी. "
आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीकडून तिला अशी अपेक्षा नव्हती म्हणून ती काहीच न बोलता निघून जाऊ लागली. स्वयमला हे समजताच तो धावतच तीच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि हसतच म्हणाला, " स्वरा वेट वेट ! हम तो मजाक कर रहे थे. तुम्हारे बिन हम सच मे जा सकते है क्या? "
आणि त्याने तिच्यासाठी आणलेल तिकीट समोर धरलं. तिच्या चेहऱ्यावर अचानक आनंद दरवळू लागला. तिला त्याला रागातच मारावस वाटत होतं पण तिने स्वतःच्या मनातल्या विचाराणा थांबवून घेतलं आणि फक्त चेहऱ्यावर हसू आणत ती म्हणाली, " पर स्वयम वॉर्डन रातको बाहर जाने नही देगी. "
तिच्या चेहऱ्यावर क्षणात उदासी पसरली. पण स्वयम जिथे असेल तिथे काहीच कठीण नव्हतं म्हणून तो तिच्याकडे बघून हसतच म्हणाला, " बस इतनाही. जाओ तयारी करके जलदी से आना. ऊनको मै मॅनेज करता हु. ऐसी कोई चीज नही जो मैं कर नही सकता सो चिल. तुम सिर्फ टाइम पर तैयार हो जाणा. नही आई टाइम पर तो मै अकेले चला जाऊंगा. "
त्याने सर्व प्रोब्लेमचं क्षणात दूर केले आणि त्या दोघीही आनंदाने उड्या मारत हॉस्टेलला पोहोचल्या...
****************
सायंकाळची वेळ होती जेव्हा त्या दोघीही हॉस्टेलच्या बाहेर आल्या. स्वयम दूरवर कुठेतरी उभा होता. आज ती पांढऱ्या कलरचा सलवार परिधान करून होती. त्यात तिचे ते मोकळे सोडलेले लांब केस तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत होते. तिला दुरूनच तो दिसला आणि तीच मन त्याला भेटण्यास आतुर झालं. तो आज जीन्स शर्ट वर इतका सुंदर दिसता होता की त्याला क्षणभर ती डोळ्यांपासून दूर करू शकत नव्हती. त्याचीही तिला पाहून आज अशीच अवस्था होती म्हणून तोही तिच्यातच हरवला होता. दोघांची नजरानजर होऊ लागली. तो आपल्याकडे सतत बघतोय म्हणून तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव आले होते. ती इतकी लाजत होती की तिला त्याच्याकडे मान वर करून पाहनसुद्धा शक्य होत नव्हतं. ती कशीतरी त्याच्याजवळ पोहोचली. तिला अस बघून तोही अगदी तिच्यात हरवून गेला होता पण पूजाला कळू नये म्हणून त्यानेही तिच्याकडे पाहण्याएवजी पूजाकडे पाहायला सुरवात केली.
कॅन्टीन पासून गेटकडे जाताना फक्त पूजाच बोलत होती तर ते दोघेही एकमेकांकडे लपून लपून पाहण्याचा बहाणा शोधत होते तर पूजा त्यांच्यात अडथळा बनत होती. चालताना सुद्धा त्यांच्यामध्ये पूजा येत असल्याने त्यांना एकमेकांना मनभरून पाहताही येत नव्हते. हळूच लपत - छपत एकमेकांना बघत ते शेवटी गाडीजवळ पोहोचले. स्वयम आज कार घेऊन आला होता. त्याची मनोमन इच्छा होती की स्वरणे त्याच्या बाजूला बसावं पण पूजाने समोर बसून त्याचा प्लॅनच उधळवून लावला. स्वयमला ते अजिबात आवडल नव्हतं पण तिच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता. त्याच वेळी स्वराही मागचं दारू उघडू लागली आणि स्वयमने स्वतःच समोर होऊन दार उघडलं. तिचा हात दारांच्या हँडलवर होता आणि नेमका त्याच वेळी त्यानेही आपला हात तिच्या हातावर ठेवला. हात हातावर येताच स्वराची नजर त्याच्याशी भिडली आणि दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. तसे ते रोज एकमेकांकडे बघायचे पण आज त्या बघण्यात काहीतरी खास होत. जणू आज ते पहिल्यांदाच एकमेकांना पाहत होते असा त्यांचा चेहरा सांगत होता. प्रेम तर होतच पण असे क्षण त्यांच्या आयुष्यात कधी आले नव्हते म्हणून ते दोघेही लाजरे - मोजरे झाले होते. त्यांना तो क्षण हवाहवासा वाटत होतां. ते कधीच संपु नये असं वाटत होतं. ते एकमेकांच्या डोळ्यात हरवलेच होते की पूजा ओरडत म्हणाली, " क्या कर रहे हो यार तुम हमारा शो छुट जायेगा . चलो जलदी. "
तिच्या आवाजाने ते भानावर आले आणि दोघांनाही तिचा राग येऊ लागला. एकाच वेळी दोघांच्याही चेहऱ्यावर सारखेच भाव असल्याने स्वराही त्याच्यावर हसतच गाडीमध्ये बसली.
स्वयम स्वतः गाडीत बसला. त्याला मागे ती बसून असताना तिचा चेहराच दिसत नसल्याने त्याने आतमधला आरसा सेट केला आणि पूजा मनातल्या मनात हसू लागली. गाडी एकदाची सुरू झाली. संपूर्ण प्रवासात पूजाची बकबक काही थांबेना तर स्वरा रात्रीची दिल्ली पाहण्यात व्यस्त होती आणि स्वयम तिला पाहण्यात व्यस्त होता. तिच्या चेहऱ्यावरचे ते शांत भाव बघून तो आणखीच तिच्यात हरवू लागला फक्त तिला त्याची चाहूल लागली नव्हती. कितीतरी वेळापासून तो तिला तसाच पाहत होता आणि अचानक तिची नजर आरशाकडे गेली. तिने अस पाहावं आणि तो पुरता गोंधळून गेला. इतका गोंधळला की त्याने नंतर आरशात पाहण्याची हिम्मतसुद्धा केली नाही. स्वराला ते आदरयुक्त प्रेमही आवडलं होत. जेव्हापासून आज ती त्याच्यासोबत होती असा एकही क्षण गेला नव्हता जेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल नव्हतं पण स्वयमच हे रूप तिच्यासाठी काहीतरी वेगळंच होत म्हणून त्याला बघण्याचा मोह तिला आवरेना.
पूजाची बकबक आणि दोघांचा रोमांस सुरू असतानाच गाडी थेट पोहोचली ती अर्जित सिंगच्या कॉन्सर्टला. त्या दोघांना समोर सोडून तो गाडी पार्क करून पुन्हा परत आला. शो आधीच सुरू झाल्याने पूजा त्यांच्यावर ओरडत होती तर ते दोघेही तिच्याकडे हसत होते. शेवटी तिची बकबक बंद करण्यासाठी ते आत गेले. अर्जितचा शो असल्याने मैदान पूर्णपणे भरलं होत. गर्दी इतकी होती की समोर जाण्यासाठी वाट सापडेना. स्वयम समोर जात होता आणि त्याच्या लक्षात आलं की स्वराला गर्दी पास करताना फार त्रास होतोय त्यामुळे क्षणाचाही विलंब न करतो तो तिच्याकडे आला. त्याने तिचा हात घट्ट पकडून घेतला आणि स्वतःच गर्दी सावरत तिला समोर घेऊन जाऊ लागला. ती त्याच्यात पुन्हा हरवली. तो तिची एवढी काळजी करतो, तिच्यावर एवढं प्रेम करतो हे बघून ती आनंदून गेली होती. त्याने धरलेला तिचा घट्ट हात कधीच सोडायचा नव्हता म्हणून तिनेही त्याचा हात घट्ट धरला. त्याच्या चेहऱ्यावरची इंनोसंस बघत ते गर्दी सर करू लागले.
अर्जित आपले एक एक गाणे गाऊ लागला होता आणि सर्व स्टेडियम आवाजाने बहरल. पूजा तर केव्हाच नाचायला लागली होती. सुरुवातीला थोडा लाजणारा स्वयमही आता जोरा जोराने ओरडू लागला होता. स्वराने त्याला यापूर्वी अस कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे ती फक्त त्याच्याकडे लक्ष देऊन होती. अर्जितचे गाणे तर तिच्या कानावर पडत होते पण ती हरवली मात्र त्याच्यात होती. स्वयम आज आपल्या स्वभावाच्या विरुद्ध म्हणजे खूप खूप ओरडत होता आणि ती त्याचा आनंद बघून आणखीच खुश होत होती. अगदी तरुण वयात मुलांना आपल्या भावना सांभाळता येत नाही तसंच तिच्यासोबत झालं होतं. ती त्याच्यात इतकी हरवली होती की आपला आवडता अर्जित समोर आहे हेसुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. सुमारे ३ तास अर्जितचा शो सुरू होता. अर्जित गाणे गात होता आणि अर्जितच्या गाण्यातील प्रत्येक शब्दात तिला स्वयम दिसत होता. तिची नजर आता त्याच्यापासून दूर जात नव्हती आणि अर्जितने शेवटच अ गाणं सुरू केलं. ही वेळ होती पुन्हा एकदा दूर जाण्याची. स्वराला ह्या क्षणातून दूर पळायच नव्हतं. तेव्हाच अर्जित गाऊ लागला.
हाए , मर जायेंगे हम तो लूट जायेंगे
ऐसी बाते किया न करो
आज जाणे की जिद ना करो
युही पहलू मे बैठे रहो
आज जाणे की जिद ना करो
तुम ही सोचो जरा क्यो ना रोके तुम्हे
जान जाती है जब उठके जाते हो तुम
तुमको अपनी कसम , जाण- ए - जा
बात इतनी मेरी मान लो
आज जाणे की जिद ना करो ..
वक्त की कैद मे जिंदगी है मगर
चंद घडिया है यही जो आजाद है
इनको खोकर मेरी जाण - ए- जा
उम्रभर ना तरसते रहो
आज जाणे की जिद ना करो
कितना मासुम संगीन है समा
हुस्न और इशक की आज मेराज है
कल की किसको खबर जाण - ए- जा
रोक लो आज की रात को
आज जाने की जिद ना करो ..
हाए , मर जायेंगे हम तो लूट जायेंगे
ऐसी बाते किया न करो
आज जाणे की जिद ना करो
युही पहलू मे बैठे रहो
आज जाणे की जिद ना करो
गाणं संपल होत पण अर्जितचे शब्द तिच्या तनामनात साठविल्या गेले. शो संपताच पब्लिक बाहेर जाऊ लागली तरी ती शब्दातच हरवली होती. स्वयम आता जायला घाई करू लागला आणि स्वयमच्या आवाजाने ती भानावर आली. तिला तिथून जावंस वाटत नव्हतं पण तिच्याकडे कुठलाच पर्याय उरला नाही आणि तिला त्यांच्यासोबत निघावं लागलं.
आज अर्जितने जेवढेही गाणे गायले होते तेच सर्व गाणे तिच्या मनात सुरू होते. स्वयमचा शांत चेहरा तिच्यासमोर आला की ती गाणी तिला आणखीच तिच्या प्रेमात पाडत होती. शो संपल्यावर सुद्धा ते दोघे खूप बोलत होते तर स्वरा त्याला बघण्यात व्यस्त होती. सुमारे अर्ध्या तासाने गाडी कॉलेजसमोर पोहोचली. पूजा स्वयमला बाय म्हणून स्वराला सोबत घेऊन जाऊ लागली. स्वयम मात्र अजूनही कारच्या बाहेर उभा होता. तशी इच्छा तिचीही जायची नव्हती पण पर्याय नव्हता. स्वयमला पूर्ण वेळ तिच्याशी काहीच बोलायला मिळालं नव्हतं म्हणून आज जाताना तरी तिच्याशी बोलायला मिळेल म्हणून तो तिथेच थांबला. ती थांबली तर नव्हती पण तिने आता एकदा पलटून पाहावं म्हणून वाट पाहू लागला. तिने पलटून पाहणं म्हणजे आज त्याच्या मनात जे सुरू होत तेच आणि तो पलटण्याची वाट पाहू लागला. आज इतके सुंदर क्षण ते जगले होते की त्याला त्याच मन सांगत होत की ती नक्कीच पलटनार आणि त्याच उत्तर त्याला मिळणार. ती समोर जात होती आणि त्याच्या हाती निराशा येऊ लागली. तो थोडा नर्व्हस झाला होता. त्याने लगेच फिंगर क्रॉस केले आणि हळूच बोलून गेला , " पलट.. पलट.. पलट. " शेवटच पलट म्हणताच ती खरच पलटली आणि तो तिथेच उड्या मारू लागला. तर स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती. ते दोघेही एकमेकांना सोडून आज जात होते पण मनात एकच विचार होता.
" आज जाणे की जिद ना करो. "
क्रमशः ...