भाग्य दिले तू मला - भाग ११ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ११


स्वरा आज आपल्या मनातल सांगता सांगता राहिली होती त्यामुळे रूमवर आल्यापासून तिचा चेहरा उदास जाणवत होता. रूमवर आल्यावर पूजाला तिने पूर्ण हकीकत सांगितली आणि सकाळी खुश असलेली पूजाही आज नाराजच बसली होती. रूम आज पूर्णता शांत भासत होती. आज स्वराचा अभ्यास करायचा मूड नव्हता म्हणून बाहेर गॅलरीमध्ये ती एकटीच बसली होती. स्वराच्या डोक्यात सकाळी घडलेल्या गोष्टी तर सुरूच होत्या पण त्याच्या बाबांची तब्येत चांगली नाही हे ऐकून तिला आणखीच जास्त वाईट वाटत होतं. तिने रूमवर आल्यापासून त्याला कितीतरी कॉल केले होते पण त्याने एकाही कॉलला उत्तर दिले नव्हते. अगदी साधी विचारपूस सुद्धा केली नव्हती. तेवढ्याच वेळात तिच्या मोबाइलवर मॅसेज आला म्हणून लगबगीने ती मोबाईलवर लक्ष देऊ लागली. तिला वाटलं की तो स्वयमचा असेल पण तो तिच्या मैत्रिणीचा होता. तिने मॅसेज तर बघितला होता पण तिला उत्तर दिले नाही. तिने मोबाइल बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा आपल्या विचारात हरवली. खर तर तिलाही माहीत होतं की तोही आपल्यावर खुप प्रेम करतो पण जसजसे दिवस जात होते तिला एक अनामिक भीती सतावू लागली. घाबरायला कारण काहीच नव्हतं पण तरीही तिच्या मनातून ते विचार जात नव्हते. ती रात्र ती बराच वेळ विचार करत होती पण तिच्या डोक्यातले प्रश्न आज काही केल्या जात नव्हते. जेव्हा जेव्हा ती त्याला मनातलं सांगायचा प्रयत्न करत होती तेव्हा काहीतरी विघ्न येत होती त्यामुळे ती थोडी घाबरली होती. ती रात्र तिला सुखाची झोप लागली नव्हती.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला पोहोचली. क्लासमध्ये पोहोचताच तिने स्वयमच्या बेंचकडे लक्ष दिले पण तो आज आला नव्हता त्यामुळे पुन्हा एकदा तिचा चेहरा कोमेजला होता. तो नसला की तीच अभ्यासात मन लागत नसे. काहीतरी खाली खाली वाटत होतं. आज ती पुन्हा एकदा विचार करून आली होती की योग्य वेळेची वाट पाहण्याऐवजी आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्याला मनातलं सांगायचं. हाच निर्धार करून ती कॉलेजला आली होती पण आज तोच कॉलेजला आला नाही आणि तिचा प्लॅन फसला. आज पूर्ण दिवस तिने कसातरी काढला आणि थकूनच हॉस्टेलला पोहोचली. रूमवर गेल्यावरही ती आज शांत नव्हती. तिने त्याला कितीतरी कॉल केले होते पण त्याने एकही उचलला नाही. कॉल काय मेसेजेस काय तिने आज पाऊसच पाडला होता पण त्याचा एकही रिप्लाय त्यावर आला नाही. त्याच्या अशा वागण्याचा तिच्यावर प्रभाव पडला होता म्हणून तिचं मन अभ्यासातही लागत नव्हत. ती मोबाइल धरून कितीतरी वेळ त्याच्या कॉलची वाट पाहत होती पण तो काही आला नाही आणि मोबाईलवर लक्ष देता - देता तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी पण सेम स्थिती. ती कॉलेजला गेली पण तो अजूनही आला नव्हता. एवढंच काय कालपासून त्याने एका मॅसेजलाही उत्तर दिला नव्हत त्यामुळे त्याला अचानक अस काय झालं काहीच कळत नव्हतं. स्वयम एक तर शांत मुलगा त्यामुळे त्याच्याकडून ही अपेक्षा नक्कीच नव्हती . कियारा कडून त्याच्या घरी सर्वच छान आहे ते तर कळलं होतं पण तो सर्वांशी बोलत असताना केवळ माझ्याशिच का बोलत नाहीये ते कळत नव्हतं. तिला आजही राहवलं नाही आणि हॉस्टेलवर पोहोचून तिने त्याला कॉल केला पण आज मोबाइल सरळ बंद येत होता त्यामुळे स्वराने रागातच आपला फोन ठेवून दिला. स्वराला नक्की काय झालं कळत नव्हतं त्यामुळे तिची रात्रीची झोप उडाली होती. एवढे दिवस तिला काहीतरी अगणित घडणार आहे अस वाटत होतं पण आता प्रत्यक्षात त्याचा प्रत्यय येऊ लागला. एक एक सेकंद आता तिच्यासाठी जड जात होता आणि भीतीने तिची झोप उडवली.

तिसरा दिवस उगवला. स्वराची रात्री झोप न झाल्याने ती आज फ्रेश वाटत नव्हती. त्यामुळे डुलक्या देतच ती कॉलेजला पोहोचली. तिने त्याच्या बेंचकडे नजर टाकली आणि आज नशिबाने तो आला होता. तो नॉर्मल दिसत होता म्हणून तिची चिंताही मिटली होती. तो दिसला आणि ती सरळ त्याच्याजवळ बोलायला गेली पण आज स्वयम तिला बघताच दुसरीकडे पळाला. तिला तो असा का वागत आहे तेच कळत नव्हतं. तो दुसरीकडे पळाला आणि बरोबर क्लास सुरू होण्याच्या वेळेवर आपल्या जागेवर येऊन बसला. क्लास सुरू झाले होते पण स्वराच लक्ष अजूनही त्याच्यावर होत. तो आज शरीराने नॉर्मल वाटत असला तरीही चेहऱ्यावरून नॉर्मल वाटत नव्हता. याआधी ती त्याच्याकडे बघत असली की तोही बघत असे पण आज जेव्हा ती त्याला बघत होती तेव्हा तिने त्याला आपल्याला बघू नये म्हणून बसायची जागाही बदलली. स्वराला स्वयमच्या वागण्याचा आता त्रास होत होता पण ती काहीच करू शकत नव्हती. स्वयम का अस वागतो आहे ह्याच उत्तर तिच्याकडे नव्हतं पण ते उत्तर मिळाल्याशिवाय स्वरा नक्कीच शांत बसणार नव्हती.

एक - एक क्लास करता करता दुपारच्या रिसेसची वेळ झाली. स्वयम तिची नजर चुकवून लायब्ररीमध्ये पोहोचला. त्याने लायब्ररीमधून बुक्स घेतले आणि तिथेच निवांत वाचू लागला. स्वराही आज हार मानणार नव्हती म्हणून ती त्याला शोधू लागली. ती आधी कॅन्टीनमध्ये जाऊन त्याला शोधत होती पण तो तिला तिथे काही दिसला नाही. आज कॅन्टीन मध्ये कियारा बसून होती. स्वराला बघताच तिने स्वराला चहा घ्यायला बोलावले. खर तर तिला घ्यायचा नव्हता पण कियारा समोर तिचं काहीच चाललं नाही. पण ती थांबली त्याचा फायदा तिला नक्कीच झाला कारण नकळत कियाराच बोलून गेली होती की स्वयम तिला लायब्ररीकडे जाताना दिसला होता. तिने कियाराच बोलणं ऐकलं आणि पटकन चहा संपवत लायब्ररीमध्ये पोहोचली. तिने आपली नजर लायब्ररीमध्ये फिरवली. एका कोपऱ्यात तो एकटाच बेंच वर बसला होता. त्याच्या बेंचवर दुसर कुणीच नसल्याने तिला त्याच्याशी बोलायला काहीच प्रॉब्लेम होणार नव्हता त्यामुळे हळूच ती त्याच्याजवळ जाऊन बसत म्हणाली, " स्वयम तुम्हारी तब्येत तो ठीक तो है ना? मैने कितने कॉल, मॅसेज किये तुमने जवाब क्यू नही दिया? चलो छोडो. ये बताओ पापा कैसे है? "

ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती तर स्वयमने हळूच मान वळवीत तिला पाहिले. त्यांच्या नजरेत आज काहीतरी वेगळंच होत जे तिने ह्याआधी कधीच पाहिलं नव्हतं. ती त्याला पाहतच होती की तो म्हणाला, " स्वरा मेरा आज मूड खराब है प्लिज लिव्ह मी अलोन! सिर्फ आज के लिये नही. जिंदगीभर के लिये. प्लिज इससे ज्यादा मुझे कुछ मत पुछना वरणा गुस्सेमे मै कुछ भी बोल सकता हु. प्लिज! "

तो हळूच वाट शोधत निघून गेला तर स्वरा आताही शॉकमध्ये होती. तो अस का म्हणाला तिला काहीच कळत नव्हतं. त्याच बोलणं ऐकून तर ती भानच हरपून बसली होती. काही वेळ ती त्याच जागेवर बसून राहिली. तिला पुढे काय करावं काय नाही ह्याच काहीच भान नव्हतं. बराच वेळ ती मृत शरीरासारखी तिथेच बसून राहिली. तिची क्लास करायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून कॅन्टीनकडे जायचा निर्णय तिने घेतला. ती आता त्याला काहीच म्हणाली नव्हती पण पुढे त्याला बरच काही विचारायचं होत म्हणून ती कॅन्टीनला त्याची वाट पाहत बसली. आता फक्त दोन क्लास बाकी होते. ते क्लास झाल्यावर तो नक्कीच येईल तेव्हाच बोलू म्हणून वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. या दोन क्लासमध्ये विचार करून करून तीच डोकं फुटायची वेळ आली होती पण तरीही ती स्वतःचा राग आवरत एकटीच कॅन्टीनमध्ये बसून राहिली.

दोन क्लास संपले. तिला माहिती होत की काहीच वेळात तो आपली गाडी घ्यायला नक्की येईल म्हणून ती त्याच्या गाडीजवळ जाऊन उभी राहिली. अपेक्षेप्रमाणे काही क्षणात तो पार्किंगमध्ये आला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत आपली गाडी सुरू करू लागला. स्वराने बराच वेळ त्याच हे अस वागणं सहन केल होत पण आता तिला ते जमणार नव्हतं. त्याने गाडी सुरू करताच त्याची चावी तिने काढून हातात ठेवली आणि हळूच आवाजात म्हणाली, " स्वयम तुमने मेरा सिर्फ प्यार देखा है गुस्सा नही . इसलीये आज मुझे तुमसे बात करणी है. लोग कम होणे दो फिर बात करेंगे तब तक चुप चाप यहा खडे रहो. मुझे यहा और तमाशा नही चाहीये. गॉट ईट? "

त्याने तिच्या डोळ्यात बघितलं. ती खूपच तापली होती म्हणून तो पुढे काहीच बोलला नाही आणि शांतपणे उभा राहिला. दोघेही गर्दी कमी होण्याची वाट पाहू लागले होते . जवळपास २० मिनिटे झाली ते तसेच उभे होते. आता गर्दीही कमी झाल्यासारखी वाटत होती आणि ती ओरडतच म्हणाली, " स्वयम क्या लगा कर रखा है तुमने? जिंदगीभर के लिये चली जाओ मतलब क्या? मैने किया क्या है वो तो बताओ फिर चली जाऊंगी. पर मेरी गलती क्या है वो मुझे जाणना है . मै ऐसेही नही जाणे वाली. सो टेल मी फास्ट.!! "

ती एकटीच रागात नव्हती तर दोन दिवस तोही रागातच होता त्यामुळे तो तिला जशास तस उत्तर देत म्हणाला, " गलती तुम्हारी नही मेरी है की मैने तुम्हे अपणे करिब आने दिया. वो गलती अब मै आज नही करुंगा. क्यू मै ऐसा केह राहा हु ये बात जाणणे की जरूरत नही है लेकिन आज एक बात जान लो. तुम ऊस दिन जो मुझे केहणे आयी थी उसकी जवाब आज लेती जावो. आय डोन्ट लाईक यु. आय डोन्ट लव्ह यु. फिर से कभी मुझे दिखाई नही देणा. वरणा मैं क्या कर जाऊंगा मुझे भी नही पता. "

तो रागात बोललाच नव्हता तर तिच्या हातातून जबरीने चावी घेऊन सुसाट पळाला. तिने ह्याआधी त्याला अस कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे तो जाईपर्यंत ती त्याला बघतच राहिली. तो गेला पण त्याचे शब्द तसेच राहिले. " आय डोन्ट लव्ह यु. आय डोन्ट लाईक यु. डोन्ट ट्राय टू मीट मी अगेन. "

त्याच्या एका वाक्याने तिची सर्व स्वप्न धुळीस मिळाली होती. तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू आले होते त्यामुळे ती तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली आणि मनात एकच प्रश्न होता, " स्वयम का? "

क्रमशा ...