भाग्य दिले तू मला - भाग २४ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग २४

बिखर कर जी गये जिंदगी
अब निखरके देखणा चाहती हु
बंदीशो की सलाखे तोडकर
एक नया संवेरा धुंडने आयी हु

स्वरा हे एक अस पात्र होत जे कधी कुणाच्या लक्षात आलंच नाही. लहान असतानापासूनच तिला अन्यायाची चीड होती. शाळेत, कॉलेज मध्ये एखादी गोष्ट चुकीची होताना दिसली की ती कधीच शांत बसत नसे. तिच्याकडे बोलण्याच इतकं सुंदर वक्तृत्त्व होत की तिला बोलताना बघून लोक भारावून जात असत. कधी लोकांना तिची मत पटत तर कधी त्यांच्या विरुद्ध असल्याने तिला बोलणं सहन कराव लागत होतं पण ती आपल्या मार्गावरून कधीच हटली नाही. तोच जोश ती कायम स्वतःमध्ये ठेवत होती. हेच कारण होत की तिचे जेवढे सपोर्टर होतेच तेवढेच तिच्या मागे बोलणारे होते. तीच सर्व काही चांगलं असताना तिच्याकडे बोट दाखवायची कधी कुणी हिम्मत केली नाही पण जेव्हापासून हा प्रसंग घडून आला होता तेव्हापासून ज्यांचा आवाज तिच्यामुळे दाबल्या गेल्या होत्या त्याच लोकांनी तिच्याबद्दल वाईट साईट पसरवायला सुरुवात केली होती. स्वरा सुरुवातीचे काही दिवस स्वतःला हरवून बसली होती पण लोकांना फेस करता करता तिने स्वतःला इतकं मजबूत बनवून घेतलं होतं की लोक आता आपल्या शब्दांनी तिला तोडू शकत नव्हते. ती आता एक जळता निखारा बनली होती. जो कुणी तिला हात लावायचा प्रयत्न करेल तो नक्कीच जळून खाक होणार होता आणि तिला अस करायला भाग पाडल होत तेही समाजानेच. आता त्यातुन कोणती स्वरा बाहेर येते ह्याबद्दल कुणाला अंदाज नव्हता!!

स्वरा पुन्हा कॉलेजला जॉईन होऊन फक्त दोन-तीन दिवस झाले होते. तिची अभ्यासाची धावपळ सुरू झाली होती त्यामुळे ती एक एक सेकंद आपला योग्य पद्धतीने वापरत होती. आजही ती बरोबर वेळेवर कॉलेजला पोहोचली. तिला बघूनच कुणीतरी म्हणाल," छोटे देख ये हमारे भाई को ना बोलकर कितना पछता रही है. वो तो जलदी से लौटकर आ जायेंगे बाद मे इसका क्या होगा? इसका भूतजैसा चेहरा कोण देखेगा? अब कौन इससे प्यार करेगा? निकल गयी ना हेकडी कुछही दिनो मे वरणा कैसे तेवर थे मॅडम के?"

स्वराने त्याच बोलणं ऐकलं आणि स्माईल करत समोर जाऊ लागली. ती समोर जातच होती की तेच मूल पुन्हा तिच्या मागे येऊ लागले पण स्वरा त्यांना बघून घाबरली नाही उलट शांतपणे जाऊ लागली. स्वराला त्यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही म्हणून पुन्हा तोच मुलगा म्हणाला," भाई ने ना बहोत कम सजा दि इसको!! मैं होता तो?"

स्वरा चालता चालता अचानक थांबली. स्वराने थांबताच ते थोडे घाबरले. स्वरा अचानक पॉज घेत त्यांच्याकडे पलटली आणि हसतच म्हणाली," कुछ करणा बाकी है क्या ? मेरे खयाल से बस रेप करणा बाकी है? आओ!! डर क्यू रहे है? आज ये इच्छा भी पुरी कर लो. कहा करोगे सबके सामने ये अकेले मे? आओ आओ!! मेरे पास वक्त नही है. जो करणा है जलदी करलो. डर क्यू रहे हो? यही चाहते थे ना तो रुक क्यू रहे हो?"

स्वरा त्यांच्याकडे चालत होती तर ते आता तिला बघून पळत होते. स्वराने काही पावले त्यांचा पिच्छा केला आणि ते पळत गेले. कॉलेजमधले सर्व त्यांना बघून हसत होते. ते असे पळाले की पुन्हा स्वराकडे बघायची त्यांनी हिम्मत केली नाही. ते सर्व पळाले आणि स्वरा पुन्हा कॉलेजकडे येऊ लागली. ती हसत नव्हती की उदास नव्हती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. ना अशा लोकांचा द्वेष! लोकांनी स्वराला कस बनवून सोडलं होत ह्याच हे उदाहरण होत. आता तिला कशाची भीती वाटत नव्हतं कारण तिच्याकडे गमवायला आता काहीच उरल नव्हत. ती खरच निखारा झाली होती जो कुणाचा हात जाळून टाकेल सांगता येत नव्हतं.

बरोबर म्हणतात, परिस्थिती काही लोकांना कमजोर बनवते. जे कारण देऊन गपचूप बसतात तर तिच परिस्थिती काही लोकांना खंबीर बनवते. त्यांना परिणामाची चिंता कधीच नसते. त्यांच्या डोक्यात जग काय म्हणेल हा विषय येतच नाही. ते आपल्या समस्यांना बघून घाबरत नाही उलट ते आपल्या परीने प्रत्येक समस्यां स्वतःच सोडवतात. हा लढा होता स्वराचा जगाशी!! त्यामुळे ती त्यानंतर कधीच कुणाला घाबरली नाही. लोक तिच्याबद्दल बोलत राहीले. बोलून बोलून शेवटी थकून गेले पण स्वराने हार मानली नाही आणि तिला ते जमणार पण नव्हतं. तिला फक्त यशस्वी व्हायचं होत.

स्वरा जिद्दी होती. त्यानंतर तिने आपला पूर्ण वेळ अभ्यासाला दिला. तिच्यासाठी सर्वात कठीण काळ हा काही महिने होता पण ती प्रत्येक गोष्टीवर मात करून समोर जाऊ लागली. पंधरा दिवसाचे १० दिवस राहिले. क्लासेस संपले आणि ती दिवसरात्र अभ्यास करत राहिली. रात्री २ ते ५ फक्त तिची झोप व्हायची बाकी वेळ ती फक्त अभ्यासात बिजी असायची. तिच्या ह्या मेहनतीनच तिला फळ मिळाल आणि ती सेकंड सेमिस्टरला पास देखील झाली. ह्यावेळी ती टॉपर नव्हती आली पण तीच वर्ष वाया गेल नव्हतं हेही तितकंच खरं. ती आपल्या मेहनतीवर स्वता खूप समाधानी होती. तिने एक पाऊल टाकलं होतं आणि ते योग्य मार्गावर पडलं. आता बाकीच तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती.

खुदको खुदहीसे पुछना है
किस कदर जिंदगी से तुम्हे प्यार है
अगर बची हो ख्वाहिशे अबभी दिलं मे
तो बताना जमाणे को हमसे उलझना अब बेकार है

स्वराला फक्त एक संधी हवी होती आयुष्यात पुढे जाण्याची. तिने ती स्वतःला दिली आणि त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. तिने स्वतःला आणखीच कठोर बनवून घेतलं आणि मेहनत करू लागली. या संपूर्ण प्रवासात तिचे जे खास लोक होते ते सोबत राहिले बाकी सर्वांनी स्वतःच साथ सोडली. साथ सोडणार्यामध्ये स्वयम देखील होता. तिला त्याच सुरुवातीला वाईट वाटलं होतं पण नंतर तिला त्याचा सुद्धा फरक पडला नाही. ती फक्त चालत राहिली.

सेम बाय सेम गेले. आजूबाजूची लोक तीच होती. त्यांचा स्वराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच राहिला पण स्वरा मात्र जगाप्रमाणे बदलत गेली. तिने लोकांकडे दुर्लक्ष केलं आणि ती सर्वात यशस्वी व्यक्ती बनत गेली. तिच्या नात्यावरचा विश्वास उडत गेला आणि पुस्तकांशी मैत्री वाढत गेली. कधी कधी अस वाटायचं की स्वरा मोहिते अस्तित्वात आहेच नाही कारण तिने हॉस्टेल ते क्लास, क्लास ते हॉस्टेल एवढाच प्रवास सुरु ठेवला. तिने ह्या काळात भरपूर माणसे वाचली त्याहीपेक्षा जास्त वाचली ती पुस्तके. कदाचित त्या कॉलेजमध्ये स्वरापेक्षा दुसरा हुशार व्यक्ती कुणीच नव्हता. तिने पहिल्या दिवशी जे स्वप्न बघितलं होत तेच स्वप्न तिने पूर्ण करून दाखवलं होत. तिच्या प्रवासात तिला त्रास देणारी, तिला यशापासून दूर ठेवायचा प्रयत्न करणारी हजार माणसे आली पण तिने त्यांना कधीच जुमानल नाही. ती लढली आणि जिंकलीही. पुन्हा एकदा तिचा कॉन्फिडन्स वाढू लागला आणि स्वरा मोहिते हे नाव सर्वांच्या ओठी येऊ लागलं.

आज स्वराला कॉलेजमध्ये ५ वर्ष झाले होते. कॉलेजचा फायनल दिवस होता. काही यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार होता म्हणून पूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी भरलं होत. सर्व मुलांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून सर्वच खुश होते तर आता सर्वांची नजर होती ते प्रिन्सिपॉल सर काय बोलणार होते त्यावर. सर्व शांत बसून ऐकत होते आणि सर म्हणाले," डिअर स्टुडंट्स. आज मेरे लिये सबसे खुशी का दिन है. ऐसा नही की मैने स्टुडन्ट ऑफ द इयर पुरस्कार कभी दिया नही. पर आज ये अवॉर्ड एक ऐसी व्यक्ती को दिया जा राहा है जीसने हमे जिना सिखा दिया. कुछ दिन पेहले जीस लडकी के नाम से पुरा कॉलेज हिल गया था उसी लडकी ने इस कॉलेज को एक नयी पेहचना दि है. उसने जिंदगी मे कभी हार नही मानी. उसने सही मायने मे बता दिया संघर्ष क्या है! वो नारी शक्ती है, वही प्रेरणा. अगर जिंदगी मे किसीं को लगे वो ये नही कर सकता. तो वो ऊस लडकी से जाकर मिले. उससे मिलने के बाद खुद-ब-खुद जिने की तमन्ना जाग उठेगी. ऐसी है वो. कुछ पंक्तीया उसके लिये याद आती है.

तेरी तारीफो के पूल बांधणे की हमे कोई हसरत नही
तेरे संघर्ष की कहाणी बताने की किसींको जरूरत नही
अगर कहू तेरे बारे मे चंद लफजो मे
तो केहना चाहू इन बुढी आंखोने तेरे जैसा कोई देखा नही

उसके लिये जितना बोलू कम है इसलीये तालियो से स्वागत किजीए. इस कॉलेज की आन बाण शान मिस स्वरा मोहिते. द इरा ऑफ फायटिंग, द सिम्बॉल ऑफ एक्सलन्स अँड द ऑनर ऑफ ब्रेवरी!! मिस स्वरा मोहिते!! गाईज प्लिज किप अप युअर हँडस फॉर द लेडी हु नेवर स्टॉप!!"

स्वरा सर्वांच्या मागून समोर येत होती आणि पूर्ण हॉल टाळ्यानी गजबजला होता. ती मागून समोरून येइपर्यंत फक्त टाळ्यांच टाळ्या होत्या. कुणाचेच हात आज थांबायला तयार नव्हते. तिला अवॉर्ड मिळाला आणि ती माईक वर आली. तरीही टाळ्या सुरूच होत्या स्वराने बोलायला सुरुवात केली आणि संपूर्ण वातावरण शांत झाल. " हॅलो फ्रेंड्स!! आज क्या कहू समझ मे नही आ रहा. इस सम्मानके लिये बहोत बहोत शुक्रिया. सोच रही हु की आज मौका मिला है तो क्यू ना दो शब्द केह दु. सच कहू तो ये सम्मान मेरे अकेला का नही. ये मेरे दोस्त, पूजा, कियारा, शोभना, सभी टीचर्स और सबसे महत्त्वपूर्ण मेरे ममी पापा का है. शायद आपको पता नही लेकिन एक वक्त था जब मैने खुद को खतम करणे का पक्का कर लिया था. मैने खुद को फॅन पे लटका दियाही था की ममीने आकर बचा लिया. सोचती हु अगर ऊस दिन सच मे मर जाती तो? तो शायद दुनिया का एक बोझ कम हो जाता पर आज जिंदा हु तो एक बत केहना चाहती हु. शायद अच्छा हुवा की मै जिंदा हु नही तो लोग कायर समझकर मुझे भूल जाते. तकलीफे तो सब को है तो क्या सबको मरणा चाहीये? बिलकुल नही. ये जिंदगी हमारे अकेले की नही जो हम खतम कर ले. ये जिंदगी सबकी है इसलीये इसे वेस्ट मत करो. तकलीफे आती जाती रहेगी बस इंतजार करो सही वक्त का. कभी ना कभी तुम्हारा दिन जरूर आयेगा. लास्टली मेरी मा केहती है की पत्थर को घाव दिये ना जाये तो वो सुंदर कलाकृती नही बनती इसलीये जीसने जीसने मुझे ये घाव दिये ऊन सबको शुक्रिया. बस एक दरखवास्त है की किसीं को इतने घाव मत देना की वो जिनाही ना चाहे. जब इंसान तकलीफ मे हो ना तो उसे सहारे की जरूरत होती है. तो अगर बनना है तो किसीका सहारा बनो. ताने मारणे के लिये तो पुरा जमाना खडा है. कुछ पंक्तीया मैं भी आज अर्ज करणा चाहती हु.

जिंदगीसे बडी कोई उलझन नही
किनारोसे बडी कोई खुशी नही
सफर बन जायेगा आसान खुद-ब- खुद
करलो आबाद खुदको, तुझसे बडी और कोई तकलीफ नही

थॅंक्यु फॉर द लवली गिफ्ट. थॅंक्यु थॅंक्यु सो मच!!"

तिने आपलं बोलणं थांबवलं तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते आणि हात टाळ्या वाजवत होते. तिने ह्या काही वर्षात दाखवून दिलं की आपला संघर्ष असा असावा की शत्रूने देखील आपल्या विजयावर टाळ्या वाजवाव्या. लोक तिला बोलत राहिले पण तिने त्याकडे लक्ष न देता आपल्या यशावर लक्ष केंदित केलं. आता तेच लोक तिच्या यशाचे किस्से सांगत होते. तिच्यासाठी सोपं काहीच नव्हतं पण सोपं असेल ते जिंकण्यात मज्जाही काय? स्वरा एक व्यक्ती नव्हती. स्वरा एक पर्व होत! दुखाच पर्व! ज्यात प्रत्येक क्षणी ती आपल्या दुखाला मात करून समोर जात राहिली.

आज कॉलेजचा शेवटचा दिवस म्हणून सर्व मूल फोटो काढत होते. कधीतरी स्वराच्या चेहर्याला बघून घाबरणारे सर्व आज स्वतःहून तिच्यासोबत फोटो काढत होते. आज स्वराला क्षणभर उसंत मिळाली नव्हती. तिला एवढी मेहनत केल्यावर समजलं होत की तुमची कमी तुमचे विचार आहेत ना की शरीर. तुमची मेहनत सदैव सोबत असेल तर लोकांनाही हार मानावीच लागेल. सर्व तिच्यासोबत फोटो काढत होते आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले. पूजा तर स्वरापासून वेगळं व्हावं लागेल म्हणून अक्षरशा रडत होती. स्वराने तिला कसतरी समजवल आणि त्या दुःखात आनंद शोधू लागल्या. आज पूर्ण कॉलेज खुश होत कारण सर्वांची स्वप्न पूर्ण झाली होती. स्वरा इकडे-तिकडे बघतच होती की काही दूर अंतरावर स्वराला स्वयम दिसला. तो आज एकटाच इकडे-तिकडे बघत होता. त्याची मधातच नजर कधीतरी तिच्यावर जात होती पण तो तिला बघून घाबरून दुसरीकडे पाहायचा. स्वराला क्षणभर त्याच हसू आलं होतं. ती त्याच्याकडे बघू लागली. तिला जाणवत होतं की त्याला काहीतरी तिच्याशी बोलायच आहे फक्त तो हिम्मत करू शकला नाही. तिला समजलं आणि ती पूजाला काहितरी कारण सांगून त्याच्याकडे गेली. तो आताही बोलायला तयार नव्हता आणि तीच म्हणाली," फोटो निकालना है ना मेरे साथ तो घबरा क्यू रहे हो स्वयम? हम आज भी दोस्त है और दोस्ती के हकसे तुम मुझे कुछ भी बोल सकते है. आज वैसे भी आखरी दिन है कॉलेज का. कल से तुम कहा मै कहा? फिर मुलाकात ना होगी इसलीये बोलणा सिखलो शायद तूम्हे जिंदगी मे काम आज जाये. स्वयम हमेशा चुप रेहने से लोग कभी कभी ज्यादाही दूर चले जाते है इसलीये वक्त रेहते बात करना सिख लो नही तो जिंदगीभर पचताना पड सकता है."

तो काहीच बोलला नाही म्हणून तिनेच त्याच्या हातातून फोन घेत काही फोटोज काढले. ती फोटो काढतच होती की कियारा तिला ओढत घेऊन गेली. स्वरा दुसरीकडे जात होती तर स्वयम तिला भरलेल्या डोळ्यांनी बघत होता. आपण तिच्याशी किती चुकीच वागलो तरी ती कुणाशीच वाईट वागत नाही ह्या विचाराने त्याला स्वतःच्याच वागण्याच वाईट वाटत होतं पण त्याच्या हातात आता काहीच नव्हतं. ना तिच्यासोबत बोलायचा अधिकार नाही माफी मागायची हिंमत. त्यामुळे तो तिला फक्त बघतच राहिला. स्वरा आज खूप खुश होती. ती आयुष्याचा एक - एक क्षण आनंदाने जगत होती. ती कुणात आपलं, परक भेदभाव करत नव्हती तर स्वयम स्वरा कोणतं रसायन आहे म्हणून तिच्याकडे बघत राहिला. तिला त्रास देणाऱ्यानाच तिने आपलं बनवून घेतलं होतं आणि तिचे विरोधकही आता तिचे मित्र बनले होते.

खरच काय होती स्वरा ??????

क्रमशा .....