भाग्य दिले तू मला - भाग २८ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग २८

बेखबर थी मै दुनिया मे
हो रही साजिश से
तुम चैन ले गये मेरा
मै जी रही हु मजबुरी से

आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला नकोशा असतात. ज्याचा आपल्याला तिरस्कार असतो पण नशीब त्याच गोष्टी आपल्याला स्वीकारायला भाग पाडत. त्या गोष्टींबद्दल आपले विचार तर बदलत नाहीत पण आपण हळूहळू त्या स्वीकारत जातो हे खरं. मग त्या घट्ट मनात कुठेतरी दाबल्या जातात आणि आपण जगाला हवा असणारा आनंदी चेहरा सर्वाना दाखवू लागतो. जे आवडत, जे आपण डीजर्व करतो ते न मिळणे आणि जे आवडत नाही तोच आयुष्याचा भाग होणे कदाचित ह्यालाच भाग्य म्हणतात आणि भाग्याच्या खेळातून कुणीच वाचला नाही. भाग्य तर स्वराची एक वेगळीच परीक्षा घेत होत. अस म्हणतात की भाग्य ज्या व्यक्तीची सर्वात जास्त परीक्षा घेत तेच भाग्य अंती खूप काही मिळवून देत. खरंय का माहिती नाही पण ऐकण्यात आलं आहे. स्वराच्या आयुष्यात तस होईल का कल्पना करने खरंच कठीण आहे आणि आलंही तरीही अनंत यातना सहन केल्यावर त्या सुखाच महत्त्व तिच्या आयुष्यात किती असेल हेही सांगता येत नाही.

किसींके मन मे चोर बसा है
तो किसी की नियत मे
भला धुंडे कैसे हम उनको जगमे
चोर तो खुद हमारे करिबी है

स्वरा स्वतंत्र विचारांची मुलगी. तिला अन्याय कधीच सहन होत नसे. कदाचित स्वरा नॉर्मल असती तर तिने ही जॉब कधीच स्वीकारली नसती पण आज नाईलाजाने तिने हे सर्व स्वीकारलं होत. ऑफिसच्या पहिल्या रात्री तिला झोपच आली नव्हती. ती सतत सर्वांचे चेहरे आठवत होती. त्यात तिला अपमानास्पद वागणूक दिसत होती. तिला सांशक चेहरे डोळ्यासमोर दिसत होते त्यामुळे तिने डोळे घट्ट मिटण्याचा प्रयत्न केला की पुन्हा डोळे सहज उघडले जायचे. आज तीच तिच्या तत्त्वाशी युद्ध सुरू होत. तिचे तत्त्व म्हणत होते की लाथ मार ह्या नौकरीला आणि तू काय आहेस जगाला दाखव तर परिस्थिती म्हणत होती की स्वरा आता तत्वापेक्षा जगणं महत्त्व आहे. तुझ्या निर्णयावर तुझ्या आईवडिलांच आयुष्य अवलंबून आहे सो हे तत्त्व सोड आणि परिस्थितीला सामोरे जा. कदाचित तुझ्या भाग्यात हेच लिहिलं आहे. आज पूर्ण रात्र तीच ह्याच विषयावर युद्ध सुरू राहील आणि शेवटी तिला पटलं की हे जीवन तत्त्वावर नाही पैशावर चालत आणि जिवंत रहायच असेल तर पैसा कमवावा लागेल मग त्यासाठी वेगळी वागणूक सुद्धा मान्य आहे. तिने त्या रात्री जुन्या स्वराला आपल्या आयुष्यातून पूर्णता काढून टाकल होत आणि एक नवीन स्वरा जन्माला आली. अशी स्वरा जिला जगाच्या विचाराने फरक पडत नव्हता बस तिला जगायच होत आणि त्यासाठी ती काहीही करू शकत होती.

दुसऱ्या दिवशी ती पुन्हा एकदा सकाळी उठली. पटापट आवरत तयार झाली. समोर गादीवर स्कार्फ पडलेला होता. तिने तो उचलला आणि गोड हसू आणत चेहऱ्याला घट्ट बांधला आणि सज्ज झाली एका पुन्हा नवीन प्रवासास. ती वसई स्टेशनला पोहोचली आणि इकडे तिकडे नजर टाकू लागली. खर तर तिला माधुरीला शोधायच होत पण आज माधुरी आसपास सुद्धा तिला जाणवली नाही त्यामुळे ती गपचूप बाजूला उभी राहिली. काही क्षण तसेच गेले. समोरून लोकल येताना दिसली आणि स्वरा लोकलमध्ये चढण्यास सज्ज झाली. तिला खर तर चढायला भीती वाटत होती पण ह्यावेळी ती तयार होती. लोकल अगदी जवळ आली आणि कुणीतरी स्वराचा हात पकडतच तिला वर चढविले. स्वराने वर चढताच पलटून बघितले. ती माधुरी होती. माधुरीला बघताच स्वराचा मूड बदलला आणि तिने हसतच विचारले," काय माधुरी आज उशीर, आईचा ओरडा खाल्लाय वाटत सकाळी सकाळी? "

माधुरी जरा उदास चेहरा करत म्हणाली," हो ना! मातोश्री पण ना!! भावाला काम सांगत नाहीत आणि माझ्यावर उगाच रुबाब दाखवतात. आज माझं जरा तिच्याशी वाजलच म्हणून उशीर झाला. "

स्वरा तिच्यावर हसतच होती की माधुरी पून्हा उत्तरली," स्वरा ताई तुझ्यावर नाही ओरडत का ग आई?"

स्वराच हसन क्षणभर गायब झाल होत. कदाचित तिला आईची आठवण आली होती. क्षणभर तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि ती हळुवार आवाजात म्हणाली," माधुरी मी मिस करते आईचा ओरडा! ह्या शहरात तर खूप जास्त मिस करते. वाटत कधी कधी की हे सर्व सोडून आईच्या कुशीत जाऊन मस्त पडाव पण नाही जमत आता. जस जस वय वाढत जात तस तशी ती कुशी सुद्धा आपल्याला दूर करत जाते. जगाची रीत आपण सहजासहजी बदलू शकत नाही. "

स्वरा जरा इमोशनल झाली होती म्हणून माधुरी एकटक स्वराकडे पाहत होती. माधुरी जरा अल्लड त्यामुळे तिला बघतच म्हणाली, " इकडे माझं उलट आहे! आईची कुशी नाही पण बेलन रोज मिळत. ते नसलं की दिवसाची सुरुवात छान नाही होत बघ. तुला हवे असेल माझ्या आईच बेलन तर चल ते फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. "

माधुरीच बोलणं ऐकताच स्वरा हसू आवरू शकली नाही आणि दोघीही निवांत हसू लागल्या. काही क्षण असेच गेले. माधुरी बोलत होती तर स्वरा तीच बोलणं ऐकून हसत होती. स्वराच हसता हसता लक्ष समोर गेलं आणि तिची नजर तिथेच क्षणभर थांबली. ती बघत होती की एक किन्नर समोर पैसे मागत होता. काही लोक त्याला पैसे देत होते तर काही त्याला तिरस्कारयुक्त नजरेने बघत होते. तरीही तो किन्नर सर्वांच्या केसांवरून आनंदाने हात फेरीत होता. स्वराला ते सर्व बघून क्षणभर वाईट वाटलं आणि तिच्या मनात विचार आला," बघ स्वरा! किती विचित्र आहे ना समाज? ज्यांचा काहीच दोष नाही त्यांच्यासोबत हा समाज कसा वागतो. ह्यांनाही तर जन्म इतरांसारख्या नॉर्मल पुरुष-स्त्रीनेच दिलेला आहे मग नॉर्मल लोकांपासून जन्मलेल्या अपत्याला अशी वागणूक का दिली जाते ? स्वरा तू तर केवळ फक्त काही वर्षे हे अनुभवत आहेस पण बघ त्यांना जन्मापासून ते सर्व सहन करतात तरीही आनंद कमी झालेला नाही. "

स्वरा मनातल्या मनात विचार करतच होती की माधुरीचदेखील लक्ष त्याकडे गेलं आणि माधुरी शांत चेहरा करत म्हणाली, " ताई हे जग खूप क्रूर आहे ग! इथे ना लोकांना फक्त सुंदर चेहरे आवडतात, सुंदर मन नाही. आपल्याच समाजाचा भाग असून त्यांना कुणी स्वीकारत नाही किती मोठ दुर्दैव ना हे? कधी कधी ना वाईट वाटत की हे सर्व का होत त्यांच्यासोबत. आयुष्यभर संस्काराचे धडे देणारे आपण सुशिक्षित लोक ह्यांच्यावेळी अशिक्षित का बनतो? का ह्यांना स्वीकारण इतकं कठीण आहे? "

माधुरी बोलत राहिली आणि स्वरा विचार करत बसली कारण स्वरानेही हे काहीच वर्षात अनुभवलं होत. स्वराकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तर ती काय बोलणार त्यामुळे तिने गप्पच राहणं पसंद केलं. पुन्हा माधुरी शांत झाली तर स्वराच त्या किन्नरवर लक्ष गेलं. तो आता अगदी तिच्या जवळ आला. त्याने सर्वाना पैसे मागितले फक्त स्वराला सोडून. ती त्याला बघण्यात इतकी व्यस्त होती की तो निघून जातोय जे लक्षातच आलं नाही. तो बाहेर जाणारच की स्वराने त्याचा हात पकडला. तो क्षणभर हसतच तिच्याकडे बघू लागला. स्वराने पर्समधून पैसे काढले आणि २० ची नोट त्याच्या हातात दिली. तो क्षणभर हसला आणि तिच्या केसांवरून हात फेरत म्हणाला, " तुला हवं ते सर्व मिळणार आहे फक्त ही वेळ जाऊ दे."

ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती तर तो माणसांसोबत कुठेतरी दूर पळाला. तीच लक्ष अजूनही त्याच्याकडे होत आणि त्याने जाता-जाता पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. ह्यावेळी दोघेही एकमेकांना बघून क्षणभर हसत होते. काय होत त्या क्षणात माहिती नाही पण एकाच वेळी दोघेही हसले होते. तो किन्नर तर गेला पण तिच्या मनातले सर्व भाव ओळखून गेला होता. त्याच्या आशीर्वादाने स्वराचा चेहरा अचानक खुलला आणि स्वराला प्रसन्न वाटू लागलं. इकडे माधुरीची पटर पटर सुरूच होती. दुसरीकडे स्वरा मात्र त्या किन्नरच्या हसण्यावर लक्ष देऊन होती. काही क्षण गेले आणि माधुरी हसत म्हणाली," ताई चल माझं स्टेशन आलं भेटू नंतर बाय."

ती पटकन खाली उतरली तर स्वरा अजूनही आपल्याच विचारात हरवली होती. तिने माधुरीला बाय तर केले पण तरीही तीच पूर्ण लक्ष तिच्यावर नव्हते.

पंधरा-वीस मिनिट गेले असतील जेव्हा ती ऑफिसला पोहोचली. आज त्या किन्नरला बघून स्वराला खूप जास्त आत्मविश्वास लाभला होता म्हणून आज ऑफिसला आल्यावर सुद्धा तिचे पाय अडखडले नव्हते. ती आली तेव्हा ऑफिसला कुणीच नव्हतं त्यामुळे पटापट केबिनमध्ये पोहोचली. गणेशाच्या मूर्तीसमोर दोन मिनिटं शांत मनाने डोळे मिटले आणि काम सुरू केले. तीच मन आज खूपच शांत वाटत होतं. तिने डोळे उघडले आणि समोर बघितले. हळुहळु तिचे कलीग ऑफिसमध्ये येऊ लागले होते. ते कालप्रमाणे तिच्याकडे विचित्र नजरेनेच बघत होते पण स्वराची नजर मात्र त्यांना बघताना बदलली होती. आज तिला त्यांच्या बघण्याचा फरक पडत नव्हता. तिने त्यांच्याकडे आज हसूनच बघितले आणि कामाला सुरुवात केली.

कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात फक्त २४ तासांचा फरक होता पण स्वरासाठी सर्व काही बदललं होत. एकाच दिवसात तिने जगण्याची समाजातली पद्धत स्वीकारली आणि तिला वाटणारी भीती अचानक नाहीशी झाली. आज ती दिवसभर फक्त कॉम्प्युटरवर काम करत होती. एवढंच काय आज तिची नजर क्षणभर सुद्धा विचलित झाली नव्हती. तिने पटापट फाइल्स पूर्ण केल्या . सायंकाळ होता होता तिने पूर्ण कामावर एक नजर टाकली. काम पूर्ण झालं होतं म्हणून निवांत चेअरला टेकून बसली तेवढ्यात सर समोरून मध्ये आले. सरांना बघताच स्वरा उभी राहिली. सरांनी आत येताच तिला विचारले," स्वरा काम नसेल झालं ना आज पण हरकत नाही. दोन तीन दिवस पुन्हा सूट तुला."

स्वराचा मूड मात्र आज वेगळाच होता. तिने काहीही न बोलता सरांना कॉम्प्युटर समोर बसविले आणि सर तीच काम चेक करू लागले. सर चेअरवरर बसले आणि पुढचे १५ मिनिट फक्त कॉम्प्युटरकडे चेहरा करून बघत राहिले. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. स्वराच्या चेहऱ्यावर आनंद होता तर सर खूपच शांत झाले होते. आणखी काही क्षण गेले . सर चेअरवरून उठून दाराकडे जाऊ लागले. स्वरा त्यांच्याकडे बघतच होती. सर समोर गेले आणि मागे पलटत म्हणाले, " गुड वर्क स्वरा! मला आनंद आहे की मी ह्या कामासाठी तुला निवडल. तू आमच्या कंपनीला खूप मोठं बनवशील ह्यात मला शंका वाटत नाही."

सर फक्त एवढंच बोलून निघून गेले तर स्वराचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. तिने गणेशाच्या मूर्तीला किस्सी केली आणि पुन्हा एकदा समोर बघितले. समोर कुणीच नव्हतं. क्षणभर वाटलं की ते ऑफिस नसून खंडर आहे आणि क्षणातच चेहऱ्यावर उदासी पसरली . तिच्या डोक्यात क्षणात विचार आला," स्वरा किती छान झालं असत ना, तुला लोकांनी चेहर्याऐवजी तुझ्या हुशारीने ओळखलं असत तर?"

तिच्या मनात विचार आला आणि ती स्वतःच हसली कारण तिला माहीत होतं आपण अशक्य गोष्ट शक्य करू पाहतो आहे. तिने पटकन आपल्या कपाळावर एक मारून घेतली आणि पुन्हा एकदा जगाच्या गर्दीत विसावली. काय कोड होती स्वरा? माणूस की यंत्र? तिला ह्यातना खरच होत नसेल का? ती बेटर लाइफ डिजर्व नाही करत का? का तिला पावलो-पावली हे सर्व सहन कराव लागत. कधी बदलेल का हे सर्व आणि कोण बदलेल हे? तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नक्की कोण देईल. प्रश्न हजार आहेत पण उत्तर एकही नाही. कदाचित ते होईलही अथवा तिला असच जीवन जगाव लागेल पण अस म्हणतात की भगवान के घर देर है अंधेर नही. उशिरा का होईना तिला न्याय मिळेल?

ए खुदा तेरे दर पे
मन्नत मांगना अब छोड दिया है
सुना है तेरा अमिरोसे अच्छा
और गरिबोसे दूर का रिशता है

क्रमशा ...