ताउम्र देखी है जमाणे की साजिशे
खयाल आया क्यू ना मै भी करलु..??
जमाणे से छुपते-छुपातेही सही
क्यू ना तुझसे मै प्यार करलु..??
स्वरा अन्वयच बोलणं ऐकून चिडली होती तर तिला चिडलेलं बघून अन्वय हसत होता. अन्वयने आज पहिल्यांदा तीच हे रूप बघितलं आणि तो स्वतःला हसण्यापासून सावरू शकला नाही. ती केबिनमध्ये त्याला शिव्या देत होती तर तो तिच्या चेहऱ्यावरचे नटखट भाव बघून हसत होता. अन्वयने तिच्यात अस काय बघितलं होत माहिती नाही पण त्याला ती जगावेगळी वाटली होती. तिच्यात जे कुणी पाहू शकलं नव्हतं ते अन्वयने पाहिलं आणि अगदी काहीच दिवसात तो तिच्याकडे आकर्षिल्या जाऊ लागला. दिवसरात्र त्याला तीच वागणं, तीच हसन दिसायच आणि त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू पसरल जायचं. तिच्या त्या विद्रुप चेहऱ्याकडे त्याच कधीच लक्ष गेलं नाही उलट त्याने जो तिचा चेहरा फोटोमध्ये बघितला होता तोच चेहरा त्यांच्या लक्षात राहून गेला. तो घरी असतांनाही तिचा तो फोटो तासंतास बघत होता. ना त्याला कुणी अडवणार होत ना विचारणार. तो आपल्याच जगात जगत होता आणि ह्याबद्दल स्वराला काहीच अंदाज नव्हता. स्वराला ज्या प्रेम शब्दाचा विचार करून घाम फुटला होता तेच प्रेम तिच्या आयुष्यात पुन्हा येऊ पाहत होत. कशी असणार होती तिची कथा? पुन्हा प्रेमात पडणे तिला जमेल की पुन्हा एकदा कायमच स्वतःला हरवून बसेल?
दिवस हळूहळू जाऊ लागले. त्यांच्यात गोड तिखट संवाद सुरूच होता. अन्वयने तिला चिडविल्यापासून ती पूर्ण वेळ कामातच असायची तर तो तिला आपल्याच केबिनमधून तासंतास बघत बसे. तिला कितीही बघितलं तरी त्याच मन काही भरत नव्हतं. एखाद्या वेळी त्याला तिला बघायच असलं की मग तो सरळ तिला स्वताच्या केबिनमध्ये बोलावून घेत असे. कुठलतरी काम करण्याच्या बहाण्याने तो तिला तिथेच थांबवून घेत असे. ती काम करत बसायची तर अन्वय तिला बघत बसायचा. काम करता-करता तीच एखाद्या वेळी लक्ष गेलं की मग अन्वयच काही खर नसायच. तिचे ते मोठे मोठे बोलके डोळे त्याने बघितले की तो काही क्षण तिच्याकडे बघत नसे आणि एकट्यात असल्यावर ते सर्ग आठवून त्याला हसू आवरत नव्हतं. अन्वय तिच्याकडे आकर्षित होत चालला होता. त्याला त्याच्याच भावनांवर कंट्रोल नव्हता तर इकडे स्वराची काय स्थिती चालली आहे त्याला माहिती नव्हत.
अन्वयने तिला केबिनमधून बाहेर तर काढल होत पण ती केबिन काही सुटली नाही. ती कामासाठी बाहेर येत असे त्यानंतर पुन्हा एकदा त्याच केबिनमध्ये बंद होई. त्याला वाटलं होतं की लोक तिला सहज स्वीकारतील पण उलट लोकांनी स्वतःच पाठ फिरवली. ती समोर तर होती पण कदाचित कुणालाच नको होती. अन्वयला ह्या सर्वाच फार वाईट वाटायचं. तो फक्त बॉस होता म्हणून कदाचित त्याला तिची सर्व बंधने दूर करण्याचे अधिकार नव्हते त्यामुळे कधी कधी त्याला आपल्याच हतबलतेच वाईट वाटायच. त्याने फक्त काही दिवसातच तिला होणारा त्रास अनुभवला होता आणि त्याला कळालं तिने काय काय सहन केलं होतं. त्याची प्रत्येक रात्र आता अशीच जात होती. दिवसा तिला मनभरून बघण आणि रात्री तिला कस ह्या सर्वातून मुक्त करता येईल हा विचार त्याला मनातून तोडत होता. अन्वयने आजपर्यंत आयुष्यात सर्वच मिळविल होत पण ही पहिली गोष्ट होती जी त्याला करता येत नव्हती आणि तो मनातल्या मनातून तुटू लागला.
आणखी काही दिवस गेले. अन्वय आज ऑफिसमध्ये आला तेव्हापासून त्याला सतत कॉल्स येत होते. एक झाले की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. त्याला केबिनमध्ये काम करायला आज वेळ मिळाला नव्हता. तो ११ ला ऑफिसला तर आला होता पण त्याने अजूनही कामाला सुरुवात केली नव्हती. आता जवळपास १ वाजला होता. तेव्हाच पुन्हा त्याला एक फोन आला. तो विराजचा होता. अन्वयने कॉल उचलताच विराज म्हणाला, " अन्वय मेरी जाण हॅपी फ्रेंडशिप डे! "
अन्वयही हसतच उत्तरला," हॅपी फ्रेंडशिप डे मेरी रज्जो!! "
विराज पुन्हा एकदा म्हणाला," अन्वय मिस करतोय यार सर्व मित्रांना. काय गॅंग होती ना आपली! तो कट्टा, ती कॅन्टीन आणि कधीही न संपणाऱ्या गप्पा पण अलीकडे ना कामाच्या नादात सर्व मागे राहील. लग्न झालं आणि साला वेळच मिळत नाही. मिस करतोय यार. येना एकदा भेटू सर्व मित्र."
अन्वय हसतच उत्तरला," हो यार खूप मिस करतो ते दिवस. अलीकडे करिअर, जॉब ह्यामध्ये वेळच नाही मिळत पण खरंच ते दिवस आयुष्यात कधीच परत येणार नाहीत. आय रियली मिस इट यार!"
आता विराज खेचत म्हणाला, " आमचं ठीक आहे लग्न झालं त्यामुळे पैसे कमवावे लागतातच. तुझं तर झालं नाही मग एवढा पैसा कुणासाठी कमावतो आहेस भावा? कुणी गर्लफ्रेंड वगैरे नाही ना? "
अन्वयच बोलता बोलता लक्ष स्वराच्या केबिनवर गेलं आणि तो हसतच उत्तरला, " माहिती नाही यार बस कमवावेसे वाटतात. स्वतासाठी नाही पण का माहिती नाही? घरी स्वस्थ बसू शकत नाही. कदाचित हेच पैसे कुणाच्या कामी येणार असतील म्हणून कमावतोय. माहिती नाही काय लिहून ठेवल आहे माझ्या भाग्यात की एवढं कमावतोय तरी समाधान नाही?"
तो हसत हसत बोलत होता तर अन्वय फक्त कान लावून ऐकत होता कारण आता त्याच लक्ष स्वराकडे होत. स्वरा आज काम करून करून कंटाळली होती. तिने लॅपटॉप बंद केला. काहीच क्षणात ती चेहऱ्यावर पाणी घेऊन परतली आणि बांधलेले केस मोकळे सोडले. स्कार्फने चेहरा पुसून काढला आणि चेअर वर निवांत टेकली. ती आज पहिल्यांदा अशी मोकळी केसांवर होती त्यामुळे त्याच लक्ष क्षणभर हटलच नव्हतं. त्याने आपली चेअर तिच्या बाजूने वळवली आणि शांतपणे बघू लागला. स्वरा चेअरला टेकली आणि काहीच क्षणात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंची एक पुसटशी रेषा तिचा चेहरा भिजवून जात होती. अन्वयला ते बघून वाईटच वाटलं. त्याने आज पहिल्यांदा तिला रडताना बघितले होते आणि त्याच्याही पापण्या ओलावल्या. आता त्याच लक्ष फक्त तिच्याकडे होत म्हणून अन्वयने विराजला बाय म्हणून फोन ठेवला. अन्वय चेअरवरून उठून समोर गेला. त्या काचेतून ती स्पष्ट दिसत होती आणि तिचे अश्रू होते की थांबायचं नाव घेत नव्हते. अन्वयने क्षणातच काचेवरून हात फेरला. जणू त्याने तिच्या चेहऱ्यावरूनच हात फेरला होता. त्याने हात फेरताच तीने रडन बंद केलं आणि डोळे उघडू लागली. आता तिच्या हातात मोबाइल होता आणि समोर मोबाइल कडे बघू लागली. तिचे अश्रू पुन्हा बाहेर आले. इकडे अन्वय तिचे अश्रू बघून अस्वस्थ झाला होता. नकळत त्यांच्याही डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या होत्या. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. काचेवर हात तसाच होता आणि मनात काही ओळी ..
दिल से दिल का रिश्ता जो है
पल दो पल में मिटता नहीं
बंधन दिलों का टूटता नहीं
बंधन दिलों का टूटता नहीं
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है
इन आँखों से हर आंसू मुझको चुराना है
मुझको चुराना है, मुझको चुराना है
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है
तेरी बेचैनी का, तेरी तन्हाई का एहसास है मुझको सुन
मैं जो साथ तेरे हूँ फिर तुझे है कैसा गम
दर्द बाँट लेंगे हम सुन ओ ओ ओ…
इन पलकों में खुशियों का सपना सजाना है
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है
कैसे मैं बताऊँ ये तेरा इस तरह रोना
देखा नहीं जाता है सुन
शाम जब ढलती है सुबह मुस्कुराती है
खुशबुएँ लुटती हैं सुन
ओ ओ ओ…
उदासी के लम्हों में हमें मुस्कुराना है
तेरे दिल का मेरे दिल से रिश्ता पुराना है
इन आँखों से हर आंसू मुझको चुराना है
मुझको चुराणा है......
इकडे अन्वय अस्वस्थ तर तिकडे स्वरा. ती मोबाइल मध्ये बघून रडत होती तर तो तिला बघून. ती रडतच होती की थोडी पलटली आणि त्याला दुरूनच एक फोटो दिसला. त्यालाही तो फोटो दिसला. तो एका मुलीचा होता. फोटो बघताच तिच्या रडण्या मागचं कारण त्याला समजलं. त्याने हलकेच आपले अश्रू पुसले आणि अमर काकांना बोलावून घेतले. त्यांच्या कानात काहीतरी हलकेच त्यांनी सांगितले आणि काही पैसे देऊ केले. तसेच काका बाहेर पडले. अन्वय पुन्हा एकदा तिला पाहण्यात व्यस्त झाला. तिने आता आपले केस हळूच बांधले आणि कामावर लक्ष देऊ लागली तर अन्वय आताही तिच्याकडे बघतच होता.
दुपारचे २ वाजले होते. अचानक ऑफिसच शटर बंद झालं आणि सर्व एकमेकांकडे बघू लागले. अचानक ऑफिसमध्ये अंधार झाल्याने स्वराही काही क्षण दुरूनच सर्व पाहत होती. शटर बंद झाले आणि काही क्षणातच ऑफिसमधले सर्व लाइट्स ऑन झाले. पुन्हा एकदा ऑफिस प्रकाशमय झालं. सर्व ते बघतच होते की काका ऑफिसच्या मधोमध एक टेबल सेट करत होते. टेबल सेट करून झाला आणि त्यांनी टेबलच्या बाजूला खुर्च्या लावल्या. सर्वाना नक्की काय सुरू आहे कळत नव्हतं तेव्हा दीपक म्हणाला," काका हे काय? "
अमर काका हसतच उत्तरले, " आज फ्रेंडशिप डे आहे ना तर सरांकडून ट्रीट. आज कुणीही टिफिन खायच नाहीये. सरांनी पिज्जा मागवला आहे शिवाय पुढचे दोन तास कामाला सुट्टी. सर येतच असतील चला येऊन बसा लवकर लवकर. "
सर्व कलीग अन्वयला अकडू समजत होते पण आज त्याच हे रूप बघून सर्व हैराणच झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं आणि आपापले टिफिन बॅगमध्येच ठेवून सर्व गोलाकार चेअर वर जाऊन बसले. काहीच क्षणात अन्वयही तिथे येऊन बसला. त्याची नजर जिला शोधत होती ती अजूनही आली नव्हती म्हणून त्याने तिच्या केबिनकडे पाहिले. स्वरा बाहेर काय सुरू आहे कुतूहलाने पाहत होती. अन्वयला क्षणभर तीच हसू आलं आणि त्याने काकांना स्वराला बोलवायला सांगितले. अमर काका तिच्याजवळ गेले. तिला तर बाहेर काय सुरू आहे हे जाणून घेण्याची इच्छाच होती त्यामुळे काका आतमध्ये येताच ती म्हणाली, " काय सुरू आहे काका तिथे?"
आणि काका हसत उत्तरले, " फ्रेंडशिप डे स्पेशल!! चला हा टिफिन बाजूला ठेवा सरांनी तुम्हाला तिथे बोलावलं आहे. "
काका गेले तर स्वरा क्षणभर विचारच करत बसली. अन्वय राहून राहून तिच्याकडे पाहत होता हे तिला लक्षात आलं आणि ती हळूवार पावले टाकत तिथे पोहोचली. अन्वयने जाणून आपल्या बाजूची खुर्ची खाली ठेवली होती आणि ती येऊन बसली. तेवढ्यात दीपक म्हणाला, " सर आज कोणत्या खुशीत ही सर्व पार्टी?"
अन्वय हसत हसत उत्तरला," मी आल्या दिवसापासून कामात खूप स्ट्रिक्ट आहे अस वाटत असेल. खर सांगू तर मी कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे पण बाकी बाबतीत मीही असा एन्जॉयफुल आहे. आपली नीटशी ओळखीही झाली नाही आणि आज तर मैत्रीचा दिवस आहे तेव्हा म्हटलं इथूनच मैत्रीची सुरुवात करू. म्हणून ही पार्टी. हॅपी फ्रेंडशिप डे ऑल."
सर्व कलीग एकाच स्वरात उत्तरले, " हॅपी फ्रेंडशिप डे टू यु सर!!"
तेव्हाच अन्वय म्हणाला, " अरे बघत काय बसला आहात चला सुरू करू. "
सर्वांनी खायला सुरुवात केली तर स्वरा सर्वांकडे बघत होती. खाताना स्वराचा जळका चेहरा बघून खायला सर्वांच्या नाकी तोंडी येत होतं. स्वराला ते जाणवलं आणि ती चेअरवरून उठून जाऊ लागली. तीन एक पाऊल काढलेच होते की अन्वयने तिचा हात पकडला. त्याच तिच्यावर लक्ष नव्हतं पण ती त्याला बघतच होती. ती त्याने पकडलेल्या घट्ट हाताकडे बघत होती तेव्हाच त्याने पायाने चेअर सरकवली. ती काही क्षण पुन्हा चेअरकडे बघत होती. तिला कळलं होतं की अन्वय जोपर्यंत चेअरवर बसणार नाही तोपर्यंत तो हात सोडणार नाही. ती क्षणभर त्याच्याकडे बघून हसली आणि चेअर वर बसली तसाच त्याने हात सोडला. त्याच अजूनही तिच्याकडे लक्ष नव्हतं तर ती त्याच्याकडे लक्ष देऊन होती. तिने एक घास तोंडात टाकलाच होता की तो म्हणाला, " हे गाईज आज मैत्री दिवस आहे तर एक किस्सा होऊन जाऊ देऊ."
त्याच बोलणं ऐकून सर्वांनी त्याच्याकडे नजर फिरवली . स्वराही त्याच्याकडे बघतच होती आणि तो म्हणाला, " तो माझा पहिला दिवस होता जॉबचा. तेव्हा मी असा स्टायलिश वगैरे राहत नव्हतो. तेच साधे कपडे, साधारण शु आणि डोळ्यावर मोठासा गॉगल. काय म्हणतात त्याला ढापण्या!! घरच तस काही कमी नाहीये पण होतो मी तसा. मला ना तस बघून सुरुवातीला ऑफिसमध्ये कुणिच भाव देत नव्हते. टॅलेंट तर माझ्यात खूप होता पण मला लोक भाव का देत नाहीत ते कळत नव्हतं. दिवस जात राहिले पण परिस्थिती काही बदलली नाही पण एक होता तिथे. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा तरीही माझा मित्र. तो मला जेवायला घेऊन जायचा, काही चुकलं तर समजावून सांगायचा. हळूहळू त्याच्या सानिध्यात राहून मी स्वतःला बदलवल. ड्रेसिंग चेंज झाला, स्वतावरचा विश्वास वाढला आणि काहीच दिवसात माझे ऑफिसमध्ये फॅन झाले. एक दिवस मी त्याला विचारलं, " दादा तू नसतास तर माझं काय झालं असत?"
आणि तो म्हणाला," मी नसतो तर दुसरा कुणी असता. खर सांगू अन्वय तर तू आधीच हुशार होतास फक्त तुला जगाची रीत कशी आहे ते माहिती नव्हती आणि मी ती शिकवली. तुला ती समजली आणि आज बघ तू कुठे आहेस. "
त्या दादांच्या शब्दांनी मला एक गोष्ट समजली. टेन्शन प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कधी कधी ते जास्त असतात पण महत्त्वाचं काय तर आपला नजरिया. आपला नजरिया बेस्ट असेल ना तर आपण लोकांना चेंज करू शकतो. लोकांना जस वाटत तस वागू घ्यायच पण आपण आपला स्वभाव सोडायचा नाही. आपण समाधानी असलो ना तर मग दुसर आपल्याला काहीच नको असत. शेवटी आनंद म्हणजे समाधानच.
मैत्री दिवस हा खर तर एकच दिवस असू नये तो रोज असावा पण मला वाटत तो एकच दिवस का साजर्या केला जातो कारण आयुष्यात समोर जाताना भरपूर मित्र मागे सुटतात. त्यांची जागा तीच असते फक्त ते रोजच्या आयुष्याचा भाग नसतात. त्यांना त्यादिवशी आठवण करून पुन्हा सुंदर दिवस उभे करायला मैत्री दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी मित्रांना आठवण करून रडू नये उलट त्या आठवणी आठवून हसावं कारण त्या एकमेव असतात ज्या आपल्याला कोणत्याही क्षणी आनंद देतात. मीही तुम्हा सर्वांना सांगेन आज इथे आपण कलीग आहोत पण उद्या मित्र होणार आहोत. अशा आठवणी निर्माण करा की दहा वर्षाने भेटल्यावर सुद्धा आपण कुणालाच विसरू नये. मैत्रीचा हाच खरा अर्थ आहे."
अन्वयच बोलून झालं आणि सर्वांनी टाळ्यांचा वर्षाव केला पण स्वरा आताही त्याच्याकडे बघत होती. त्याचा आनंदी चेहरा तिला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देऊन जात होता. आज ऑफिसमध्ये धमाल सुरू होती. अशी कुठलीच व्यक्ती नव्हती जो आपले अनुभव शेअर करत नव्हती तर स्वरा फक्त अन्वयकडे पाहत होती. ते २ तासही आज सहज निघाले आणि सर्व आपापल्या डेस्कवर पोहोचले. स्वरा अजूनही त्याच्याकडेच बघत होती. जाताना अन्वयने खुर्ची बाजूला सरकवली आणि एक सुंदर हसू देऊन केबिनमध्ये गेला. ती क्षणभर स्वतःवरच हसली आणि केबिनकडे वळाली. अन्वय केबिनमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा तिच्याकडे बघत होता. आता ती धावतच केबिनमध्ये आली आणि तिने बाप्पाच्या मूर्तीला किस्सी केली. पुन्हा एकदा बांधलेले केस मोकळे केले आणि कामात व्यस्त झाली. आता तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं ना कसले विचार. तिचा आनंद होता की चेहऱ्यावर सामावत नव्हता. अन्वयला तो आनंद बघून समाधान मिळालं आणि आज दिवसात पहिल्यांदा तो खुल्या मनाने कामाला लागला. पण अधून मधून त्याची ती भिरभिरती नजर तिचा वेध घेऊन जायची.
तेरे हसी मे छुपी है लाखो कुर्बानिया
मुझे तेरे सुखो पे नही दुखो पे हक चाहीये …
ती सायंकाळची वेळ होती. ६ चा ठोका जसा घड्याळात पडला तशीच स्वरा ऑफिसच्या बाहेर पडली. अन्वय ती बाहेर पडण्याची वाटच पाहत होता. ती बाहेर पडताच तो धावत पळत तिच्याजवळ पोहोचला. ती त्याला बघून क्षणभर थांबली आणि अन्वय दीर्घ श्वास घेत म्हणाला," मिस स्वरा हॅपी फ्रेंडशिप डे!! "
अन्वय हात समोर करून तिच्याकडे बघत होता तर स्वरा काही वेळ त्याच्या हाताकडे बघत राहिली. तिने स्वतःहून कुणाला स्पर्श केला नव्हता त्यामुळे क्षणभर तिला विचार आला. ती विचार करतच होती तिला थोड्या वेळापूर्वीचा तो अन्वयचा आश्वासक हात नजरेस पडला आणि तिने आनंदाने त्याच्याशी हात मिळवित म्हटले," सेम टू यु सर! "
काही क्षण एकमेकांचे हात तसेच होते. स्वराने काही सेकंदात आपला हात सोडवला आणि दोघेही समोर चालू लागले. समोर चालताना पण दोघेही शांतच होते. ती काहीच बोलणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तोच म्हणाला, " मिस स्वरा आय एम जिलस ऑफ यु!! "
त्याच्या शब्दाने तीच लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ती डोळे मोठे करत म्हणाली," का सर मी काय केलं?"
अन्वयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि तो म्हणाला," एवढं सर्व करून आणखी विचारत आहात मी काय केलं ? धिस इज नॉट डन मॅडम!! "
स्वरा पुन्हा शांत होत उत्तरली," मला माहित असत तर तुम्हाला विचारलं असत का ? सांगा बघू तरी मी काय केलं?"
अन्वय तोंड पाडत म्हणाला, " मिस टॉपर तुमच्या आधी ना मी दिल्ली कॉलेजमध्ये टॉपर होतो. मला वाटलं होतं की माझ्या नंतर कुणाचंच नाव कॉलेजला घेतल्या जाणार नाही पण अलीकडे मी मित्राला फोन केला तेव्हा तो म्हणाला की अन्वय तुझी जागा मिस स्वरा मोहितेने घेतली. आता तुला कुणी ओळखत नाही. तुम्ही माझं नावच पुसून टाकलं आणि म्हणत आहात मी काय केलं? आता सांगा इर्शा व्हायला नको का?"
स्वराला क्षणभर त्याच्या बोलण्यावर हसू आवरत नव्हतं. पहिल्यांदाच अस होत की तिला हसू आवरत नव्हतं आणि ती म्हणाली," सर हा तर सिरीयस प्रॉब्लेम आहे मग तुम्ही प्रिन्सिपालला तक्रार करा ना? "
अन्वय पुन्हा तोंड पाडत म्हणाला," ते पण तुझेच फॅन आहेत. कोण ऐकणार माझं तिथे? "
स्वराला त्याच बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं आणि त्याच्या समोर हसताही येत नव्हतं तेव्हा ती बाजूला तोंड करत हसू लागली. तेव्हाच पुन्हा अन्वय म्हणाला, " कशा आहात ना तुम्ही? मी माझं दुःख सांगतोय आणि तुम्ही माझ्यावर हसत आहात? "
स्वरा आता आपलं हसू आवरत म्हणाली," बर बाबा सॉरी! "
स्वरा काही क्षण शांत होती आणि आता समोरून अन्वय स्वतःच मोठ्याने हसू लागला. त्याला बघून आता स्वरालाही हसू आवरत नव्हतं. स्वरा आज कितीतरी दिवसांनी मनमोकळं हसत होती आणि अन्वयच्या डोळ्यातून क्षणभर आनंदाचे अश्रू आले. आज तिला इतकं खुश बघून अन्वय खूप म्हणजे खूप खुश झाला होता शेवटी स्टेंशन आलं आणि हसतच त्यांचे रस्ते वेगळे झाले. तो जात होता पण आताही त्याची नजर तिच्याकडेच होती आणि तिचं हसू होत की थांबायचं नाव घेत नव्हतं.
ती रात्रीची वेळ होती. आज स्वराच्या चेहऱ्यावरच हसू क्षणभर गायब झाल नव्हतं. आज तिला पूजा, कियाराला कॉल करायचा असल्याने तिने पटकन स्वयंपाक बनविला आणि जेवण करून बेडवर पडली. तिने पटकन पूजाला कॉल लावला आणि क्षणात कियाराही त्यांना जॉईन झाली. आज तिघीही खूप दिवसांनी खुप बोलत होत्या. जुना आठवणी आठवताना स्वराही आपली सर्व दुःख विसरली होती. तिला आता अन्वयचे शब्द पटू लागले " मैत्री आठवून रडायचं नसत तर त्या आठवणी आठवून हसायच असत." ती त्यांच्याशी बोलत तर होती पण अजूनही अन्वयचे काही शब्द तिच्या डोक्यात घर करून होते आणि मधातच स्वरा उत्तरली, " कियारा, पूजा मैत्री म्हणजे काय?"
दोघीही विचार करतच होत्या की स्वरा पुन्हा म्हणाली, " पूजा तू सांग आधी!"
तशीच पूजा विचार करत म्हणाली, " मैत्री म्हणजे तू , मी आणि कियारा. सोबत कायम नसतो पण जेव्हाही असतो तेव्हा क्षणभर ओठांवरच हसू जात नाही. मैत्री म्हणजे आपुलकी जी दूर राहल्याने कमी होत नाही. मैत्री म्हणजे निरागस मन. जे एकमेकांसाठी कायम तरसंत असत. "
तीच बोलणं झालंच होत की कियारा म्हणाली, " दोस्ती एक एहसास है जो हर रिशतेसे परे है. दोस्ती जिना सिखाती है. दुःख मे साथीदार तो आनंद मे मजे लेती है. दोस्तही सबके सामने खेचते है पर जरूरत हो तो आधी रात को हाजीर हो जाते है. दोस्ती प्यार है, केअर है. कभी कभी दिखाई जाती है तो कभी कभी बिना दिखाये निभाई जाती है. अपणे जीवन मे कुछ ऐसेंभी इंसान होते है जो हमारे दोस्त है, ऐसें दिखाते नही पर हमारी खुशी के लिये हर पल प्रयास करते है. वो हमे जिंदगीभर बस खुश देखणा चाहते है. बिना स्वार्थ के जो की जाये वो दोस्ती है. "
तीच बोलणं होताच पूजा म्हणाली, " पर वो तो प्यार है!! जो हमे बताता नही फिर भी हमारे खुशी के लिये हर पल प्रयास करता है. क्या वो प्यार नही? "
कियारा आता हसतच उत्तरली, " दोस्ती ही प्यार है पूजा. अगर वो मेरी सबसे अच्छि दोस्त नही बन सकती वो प्यार नही हो सकता. प्यार दोस्तीसेही तो शूरु होता है पूजा. सही कहाना मैने?"
पूजा, स्वरा हसतच उत्तरल्या, " तुने नही शाहरुख खानने कहा है. कुछ कुछ होता है मे!! "
क्षणभर तिथे हसूच वातावरण होत. आज त्या तिघी कितीतरी वेळ बोलत होत्या पण मन भरत नव्हतं. पण वेळेला मर्यादा होत्या. उद्या पुन्हा जॉब असल्याने त्या झोपी गेल्या. स्वरा झोपायचा प्रयत्न करत होती पण आज कियाराचे शब्द तिला आठवत होते " कभी कोई दिखाता नही पर वो हमारे लिये बहोत कुछ करता है वो भी दोस्ती है. "
तिचे शब्द आठवताच तिला पुन्हा अन्वयचा तो हसरा चेहरा आठवला. त्याने तिचा पकडलेला तो आश्वासक हात आणि त्यानंतर दिलेला कानमंत्र सर्व आठवू लागलं आणि क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हसू तसच कायम राहील. ती आज कित्येक दिवसाने खुश झाली होती. त्याला मर्यादा नव्हत्या. तिच्याही नकळत अन्वय तिच्यातले वेगळे वेगळे रंग बाहेर काढत होता जे तिने कुठेतरी खोलवर लपवून ठेवले होते. ते नकळत बाहेर येत होते आणि स्वरा खुश राहू लागली . पुन्हा एकदा ती जुनी स्वरा परत येऊ लागली आणि त्या स्वराने अन्वयची झोप उडवली.
तेरी खुशीके अलावा मेरे कोई ख्वाब नही
अगर ख्वाब है तो तुझिसे है वरणा मेरे ख्वाब का कोई मोल नही
क्रमशा ......