भाग्य दिले तू मला - भाग ४४ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ४४







उसने कुछ केह दि ऐसी बात
के दिलं बेचारा पिघल गया
सूनता नही था वो किसिकी पेहले
देख लो वो आज खुद बेहक गया

आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रेमाने साध्य होत नाही.कधीकधी झोपेतून उठवण्यासाठी खडे बोल सूनवावे लागतात. नेमकं तेच काम अन्वयने केलं होतं आणि स्वरा खडबडून जागी झाली. खर तर परिस्थिती आजही तीच होती पण अन्वयने तिला जगण्याचा दृष्टिकोन दिला. ती त्याला काही बोलली नाही पण त्याच्या प्रत्येक शब्दाची जादू तिच्यावर झाली होती. आज ती घरी पोहोचली तेव्हाही त्याचा प्रत्येक शब्द तिच्या मनात घुमू लागला होता पण ह्यावेळी तिला त्याचा त्रास होत नव्हता उलट ती आनंदी होती. कितीतरी दिवसाने तिला हक्काने कुणीतरी सांगितलं होतं आणि तिला ते आवडूनही गेलं होतं. पहिल्यांदा पूजाने तिला सांगितलं होतं तेव्हा तिने सहज स्वीकारलं होत पण अन्वय केवळ एक मुलगा आहे म्हणून कदाचित त्याच्या चांगल्या गोष्टी, चांगला स्वभाव स्वीकारायला तिला त्रास होत होता पण आता तेही बंधन दूर पळाल होत . तिला आता त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता म्हणून आज ७ वर्षात ती सर्वांत जास्त आनंदी होती .

ईबादत लफ्ज अगर मोहब्बत बया करता है
तो हमे मंजूर नही तेरा ये ईश्क
अगर बया करता है तेरी सादगी
तो तुझे सर-आंखो पर बिठाना ही मेरी ईबादत है


दुसरा दिवस उगवला तो नवीन पालवी घेऊन. स्वरा आज खूप दिवसाने मनमोकळी तयार होत होती. घरात आरसा नव्हता पण तिला तयार व्हायला आज आरशाची गरज नव्हती. खूप वर्षाने असा क्षण होता जेव्हा स्वराची स्वता तयार व्हायची इच्छा झाली आणि पुन्हा एकदा ती तयार व्हायला वेळ घेऊ लागली. खर तर तयार होणे हा स्त्रीचा मूलभूत अधिकार आहे. तो कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आज जेव्हा ती स्वता तयारी करू लागली तेव्हा जाणवू लागल की खर तर आनंद म्हणजे खूप काही मिळविणे नसतंच. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीत शोधायचो असतो. ती तयार झाली आणि तिची नजर गादीवर पडलेल्या स्कार्फवर गेली. स्कार्फला बघताच तिला अन्वयचे शब्द आठवले " स्वरा खर बंदिस्त तर तुला तुझ्या स्कार्फने केले आहे. तू का लोकांचा विचार करतेस? तू ह्या स्कार्फ पासून मुक्त होऊन बघ तुला कळेल की जग खूप सुंदर आहे. तुला टाळणारे टाळत राहतील पण कुणी खरच तुला समजून घेणार असेल तर तू त्याला अशीही सुंदर दिसशील. नजरेत सौंदर्य असत स्वरा चेहऱ्यावर नाही."

तिने स्कार्फकडे क्षणभर बघितलं. त्याला हातात घेतल आणि हळूच हसत म्हणाली, " स्कार्फ राजे आजपर्यंत तुम्ही खूप साथ निभावली त्यासाठी धन्यवाद पण आता तुमची जागा ह्या बॅगमध्ये आहे सो मला माफ करा पण आता मी मला मुक्त करून तुम्हाला बॅगमध्ये बंदिस्त करत आहे. सॉरी हा! आता तुम्ही रागावणार माहिती आहे पण म्हणतात की कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. पून्हा एकदा सॉरी."

ती क्षणभर हसली आणि स्कार्फला किस्सी करत बॅगमध्ये ठेवत बाहेर निघाली. आज जाताना तोच रस्ता होता. लोकही तीच होती पण स्वरा बदलली होती. आज प्रत्येक व्यक्ती तिच्या त्या चेहऱ्याकडे बघत होता पण तिला फार काही फरक पडला नाही. कुणी प्रेमाने बघत होता तर कुणी घृणास्पद नजरेने पण ती आज आपल्याच धुंदीत जगत होती. समोरचे लोक तिला बघत होते आणि तिच्या ओठी गाणं आलं...

" कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है केहना
छोडो इन बेकार की बातो मे
कही बीत ना जाये रैना "

ती जात होती पण आज तीच कुणाच्या नजरांवर लक्ष नव्हतं. तिने सुरुवात केलीच होती की तिला जाणवलं अन्वय बरोबर बोलतो आपण मुक्त झालो की बाकी कुणीच आपल्याला बंदिस्त करू शकत नाही. तिने स्वतःला मुक्त केलं आणि तिला जाणवू लागल की हे जग खरच सुंदर आहे. ती चालत-चालत स्टेंशनवर पोहोचली. तिला माधुरी समोर दिसली आणि स्वराने धावतच तिच्या डोळ्यांवर हात ठेवला. माधुरीने तिच्या हातावर हात ठेवत म्हटले, " ताई काय तू पण? तुला माहिती आहे ना तुझ्याव्यतिरक्त ह्यावेळी मला कोण भेटणार? "

स्वराने पटकन हात काढला आणि हसतच उत्तरली," माहिती आहे ग पण तुझ्यासोबत गंमत पण करू नको का? तेव्हढा पण हक्क नाही का मला? "

माधुरी तिच्या बाजूने वळाली आणि तिला बघतच राहिली. स्वराला बघताच माधुरीच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल आणि ती उत्तरली, " किती सुंदर ना ताई!! आज खरच खूप मस्त तयार होऊन आली आहेस. एकदम भारी दिसते आहेस. स्कार्फमुळे ना तुझा चेहरा झाकलेला असायचा पण आज खूप दिवसाने चेहरा बघतेय अस वाटत आहे. लव्ह यु ताई.!!कायम अशीच राहा.मला तर माहितीच नव्हतं माझी ताई इतकी सुंदर दिसते."

स्वरा तिला मिठीत मारत उत्तरली , " लव्ह यु माय जान. थॅंक्यु बर का ताईसाहेब. हो राहीन आता कायम अशीच . आता ह्यात बदल होणे नाही."

माधुरी क्षणभर तिच्या चेहऱ्यावरच हसू बघत होती तेवढ्यात ट्रेनचा हॉर्न आवाज आला आणि त्या दोघीही ट्रेनकडे लक्ष देऊ लागल्या . काहीच क्षणात ट्रेन आली आणि दोघीही चढल्या. ट्रेन पुन्हा सुरू झाली. लोक बदलत होते पण स्वराचा मूड आज काही बदलत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर तसाच होता आणि माधुरी हळुवारपणे म्हणाली, " ताई आज हा चमत्कार? अचानक नसेलच झाला. काही खास कारण?"

स्वरा तिला हसत म्हणाली, " हा एक बाबा आहे माझ्या आयुष्यात त्यांनी मला ज्ञान दिलं की तुला मुक्त कुणीच करू शकत नाही. तू एकमेव आहेस जी स्वतःला मुक्त करू शकतेस आणि सुरुवात कर म्हणे ह्या स्कार्फपासून मग काय मी केली सुरुवात आणि बघ आता मी अशी दिसते."

माधुरी स्वराला टाळी देत म्हणाली, " त्या बाबांच नाव अन्वय महाराज तर नाहींये ना? "

स्वराही टाळी देतच उत्तरली, " सही पकडे है. तेच बाबा मला कायम लेक्चर देतात. दुसर आहे तरी कोण ना जे माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतील."

आज एक एक सेकंद स्वराचा चेहरा खुलून निघत होता आणि माधुरीला जाणवलं की खुश राहायला चेहरा नाही तर मन लागत. मन खुश असलं की मग चेहरा कसाही असो तो आपोआप खुलतो. हे एक जगाच सत्य आहे की आपणच आपले शत्रू आहोत. आपण स्वतः जर एखादी गोष्ट स्वीकारली की मग काहीच अशक्य असत नाही. माधुरी तिला बघतच होती की स्वरा बाजूच्या छोट्या मुलीला बघत म्हणाली, " तुला भूत बघायला आवडतात परी? "

स्वराच बोलणं बघुन ती छोटी मुलगी क्षणभर हसली आणि स्वरा पुन्हा तिला म्हणाली, " वेडाबाई इतक लहान असताना भूत बघू नये. मोठी हो मग बघ. मी येईन तेव्हा तुला घाबरवायला. तू पण खोटं खोट घाबरायचं बर मला!! घाबरशील ना? "

स्वरा जसजशी बोलत होती तसतशी ती मुलगी आणखीच हसत होती. त्या छोट्याशा मुलीला देखील तिच्या चेहऱ्यांने फरक पडला नव्हता. स्वरा कितीतरी वेळ त्या मुलीसोबत खेळत होती. स्वराच आज कुणाकडेच लक्ष नव्हतं तर माधुरी क्षणभर सर्वांकडे लक्ष देत होती. तिला जाणवलं की लोकांना स्वराच्या दिसन्याने काहीच फरक पडत नाही. लोकांच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम आहेत की लोकांना इतरांकडे बघायला वेळच नाही आणि ज्यांना वेळ आहे त्यांना लोकांत चुका काढण्याशिवाय काम नाहीत. स्वराला खेळताना बघून माधुरी मनातल्या मनात म्हणाली, " अन्वय सर लव्ह यु. आज ताईला इतकं खुश बघण्यामागे फक्त तुम्हीच आहात. माहिती आहे तुम्ही खूप दिलं तिला तरीही स्वार्थी होऊन एक गोष्ट मागते. ताईला प्रेम करायला शिकवा. तुम्ही जर ते केलं ना तर मी तुम्हाला खूप मोठी ट्रीट देईल. प्लिज हा अन्वय सर. प्लिज. "

ती मनातल्या मनात बोलत होती आणि स्वतःवरच हसली. आज पूर्ण वेळ स्वरा हसत होती आणि वेळ कसा गेला कळला नाही. माधुरी आपल्या स्टेशनवर उतरणारच की तिच्या गालावर किस्सी करत म्हणाली, " ताई आज गोड दिसते आहेस खूप सो किस्सी तर बनते."

स्वरा तिला काही बोलणार त्याआधीच ती बाहेर पडली. स्वरा क्षणभर आपल्या गालावर हात लावत तिच्याकडे बघून हसत होती. अगदी १० मिनिटाने तीच देखील स्टेशन आलं आणि ती उतरली.

आज स्वराला ऑफिसमध्ये केव्हा पोहोचते अस झालं होतं. त्यामुळे ती आज चालत नव्हती तर धावत होती. आज १० मिनिटांच अंतर तिने ५ मिनिटांतच पार केल होत. ती ऑफिसच्या दारावर पोहोचलीच होती की दीपिका तिला भेटली आणि दीपिकाला ती गोल गोल घुमवू लागली. दीपिकाला चक्कर यायचंच बाकी होत पण ती थांबत नव्हती. धुमाकूळ घालताना तिचा हात सुटला आणि स्वरा कुणाला तरी जाऊन आदळली. तिने वर नजर करून पाहिले तर तो अन्वय होता. ती जरा आता घाबरली आणि त्याच्या थोडं दूर झाली तर अन्वय तिला बघून हसत होता. दीपिका आपल्या जागी जाऊन बसली होती तर स्वरा त्याला नजर चोरून बघत होती. अन्वय अगदी तिच्या जवळ गेला आणि दीपिकाला ऐकू जाणार नाही इतक्या आवाजात म्हणाला, " स्वरा मला चुकीच नको समजू पण आज राहवत नाहीये म्हणून सांगतोय. आज खरच खूप सुंदर दिसते आहेस. अशीच राहा कायम. अशी जगलीस ना तर जगण्याला सुद्धा लाजवशील. "

अन्वय तिची स्तुती करून समोर गेला तर ती काहीच बोलली नाही आणि गंमत अशी की तिला आज त्याच्या बोलण्याचा राग आला नव्हता. अन्वय गेला आणि तिने आपल्याच कपाळावर मारून घेतले. अन्वयने जाता जाता तिला पलटून पाहिले आणि ती लाजूनच डेस्कवर जाऊन बसली. आज सर्व काही मस्त वाटत होतं . अन्वय तर स्वराला बघण्यापासून स्वतःला थांबवू शकला नव्हता. इतकी सुंदर ती दिसत होती. सुंदर दिसायला चेहरा नाही तर आनंद हवा असतो हे त्याचेच शब्द आठवून तो स्वतःवरच हसू लागला होता. हळूहळू पूर्ण ऑफिस भरू लागल पण स्वराच्या मूडमध्ये काही बदल झाला नव्हता. ती पुन्हा जोमाने कामाला लागली होती.

ती कामासाठी डेस्कवर बसून काही क्षण झालेच होते की काका तिच्या हातात काहीतरी देऊन गेले. तिने तें लेटर उघडून पाहिलं आणि वाचून मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून सर्वच तिच्याकडे बघू लागले. ती आता स्वतःवरच लाजली आणि आपला चेहरा लपवत कामाला लागली. अन्वय केबिनमधून सर्व बघून हसत होता. सर्वांनी तिच्याकडे पाहणं बंद केलं आणि ती पुन्हा आपल्याच डोक्यावर मारत काम करू लागली. काही क्षण गेलेच होते की अन्वय बाहेर येत मोठ्याने म्हणाला, " लिसन गाईज!! "

त्याचा आवाज येताच सर्व त्याच्याकडे बघू लागले आणि तो पुन्हा म्हणाला, " सो आम्ही दोन दिवस आधी ज्या प्रोजेक्ट साठी गेलो होतो. तो आपल्याला मिळाला आहे आणि मला आनंदाने सांगायला आवडेल की हे सर्व क्रेडिट स्वराच आहे सो प्लिज क्लॅप युअर हँडस फॉर हर. कुणाचीही मदत न घेता तिने हे सर्व केलं."

तेवढ्यात दीपक ओरडत म्हणाला, " सर मग मोठी पार्टी हवी."

अन्वय त्याच्या बोलण्यावर हसतच उत्तरला," हो पक्का करू पार्टी. मिळून ठरवू केव्हा करायची तर चालेल?"

अन्वय आनंदाची बातमी देऊन केबिनमध्ये गेला तर स्वराने काकांना बोलावून घेतलं आणि कानात काहीतरी सांगू लागली. काका तीच बोलणं ऐकून क्षणभर हसलेच आणि कुठेतरी बाहेर गेले. स्वरा आता वाट बघत होती ती दुपार होण्याची. आज सर्व काही तिच्या मनासारखं घडत होतं. कदाचित आज वेळही तिच्याच इशाऱ्यावर चालत होती. दुपारची वेळ झाली. सर्व आपला टिफिन काढत होते की स्वरा मोठ्याने ओरडतच म्हणाली, " सॉरी फ्रेंड्स ! आज पण टिफिनला सुट्टी. आज माझ्याकडून सर्वाना पार्टी आहे. काका येतच असतील तेव्हा तयार व्हा. "

ती बोलतच होती की काका पिज्जा घेऊन आले आणि क्षणात टेबल सजविल्या गेला. काका खर तर आता अन्वयला बोलवायला जाणार होते पण तीच त्याना अडवत स्वता केबिनमध्ये जाऊ लागली. तो आतमध्ये बसूनच होता की ती परवानगी घेत म्हणाली," सर आतमध्ये येऊ का?"

अन्वय हसतच उत्तरला, " या स्वरा मॅडम! अभिनंदन!! "

स्वरा आतमध्ये येत म्हणाली, " थॅंक्यु सर पण हे सर्व नंतर. आज माझ्याकडून मी सर्वाना पिज्जा पार्टी दिली आहे सो प्लिज चला थंड होतील ते. "

अन्वय तिला बघतच होता की ती त्याचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जाऊ लागली. अन्वयला तीच ते अधिकाराने हात धरून नेनही आज फार आवडल होत. सर्व बसले आणि बॉक्स उघडल्या गेले . स्वरा बसताच सर्वात आधी स्वराला प्रत्येक व्यक्ती एक पिस भरवत होता. आज सर्वांच प्रेम बघुन स्वराला भरून आलं होतं. सर्वांनी तिला भरवल आणि अन्वय एक पिस घेऊन तसाच बसून होता. अन्वयला वाटलं होतं की कदाचित तिला राग येईल म्हणून त्याने पिस हातात पकडून ठेवला होता तर स्वराने त्याचा हात आपल्याकडे नेत तो पिस स्वतःच खाल्ला. आज ऑफिसमध्ये पूर्ण वेळ धिंगाणा होता. कायम शांत राहणारी स्वरा आज सतत बोलत होती आणि तिच्या गोड आवाजाने पूर्ण ऑफिस बहरून निघाल. आज स्वरा सर्वांशी हसत बोलत होतीं आणि नकळत अन्वयच्या डोळ्यातून एक अश्रू येऊन पडला. स्वराने तो बघितला पण त्याला जाणवू दिले नाही. आज सर्व कस एकदम मस्त होत. ती अल्लड, मस्तीखोर स्वरा परतली आणि पूर्ण वातावरणच आनंदाने न्हाहून निघाल.

है तुझे भी जिने का हक
किसींसे हक मांगा ना करो
खुदही बनजाओ पेहचान खुद की
यु किसींके दर पे झुका ना करो

ती सायंकाळची वेळ होती. अन्वय घराकडे जायला निघाला होता तर स्वरा त्याच्या मागून येत त्याला हात लावत म्हणाली, " थॅंक्यु सर!! तुमच्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. तुम्ही जर मला आधीच भेटला असता ना तर ही ८ वर्षे अशी गेली नसती. ह्या ८वर्षात माझ्या आजूबाजूचं सर्वच बदलल फक्त मी सोडून. मला वाटत ह्या ८ वर्षात मी काहीच केलं नाही. तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेन. लगेच शक्य होणार नाही पण करेन प्रयत्न. थॅंक्यु वन्स अगेन सर पण एक गोष्ट तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाहीत. "

अन्वय हसतच उत्तरला," कुठली गोष्ट?"

स्वरा त्याच्याकडे बघत म्हणाली, " तुम्हाला प्रश्न विचारून शांत करण्याचा अधिकार? तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे कारण मी टॉपर आहे ना सो हक बनतो माझा."

अन्वय आज तिच्या बोलण्यावर क्षणभर हसतच होता आणि तो म्हणाला, " मॅडम, आता तुम्ही कोणताही प्रश्न विचारा. माझ्याकडे उत्तर कायम असेल. शिकलोय मी उत्तर द्यायला."

ती त्याच उत्तर ऐकून क्षणभर हसली आणि पुन्हा तोच म्हणाला, " काय स्वरा प्रमोशन झालं आणि आज पण मिठाई नाही दिली तू. ह्याला काय अर्थ? "

अन्वय गमतीत बोलला आणि ती हळूच हसत म्हणाली, " अन्वय सर इथेच थांबा अजिबात हलायच नाही हा. "

तो तिला काही बोलणार त्याआधीच ती धावत सुटली. अन्वय तिला बघून हसत होता. साधरणाता ५ मिनिट झाले. ती धावत गेली तशीच पळत आली आणि दीर्घ श्वास घेत म्हणाली, " हा मिठाईचा पूर्ण डब्बा तुमचा. आता तर होईल ना तोंड गोड की पुन्हा हवी? "

स्वरा त्याची खेचत होती आणि तो फक्त हसायच काम करत होता. ते दोघेही समोर जात होते. अन्वयच आज स्वरावरून लक्ष हटत नव्हतं आणि ती होती की बोलायच थांबत नव्हती आणि अन्वय मनातल्या मनात म्हणाला, " थॅंक्यु स्वरा माझं वचन पूर्ण करायला मदत करायला. आता तुला कुणाचीच गरज नाही . आता तू तुला हवं तसं जग तुला कुणिच अडवणार नाही. माझे आता फक्त इथे काही दिवस उरले आहेत तोपर्यंत खेचून घे. उद्या मी नसेल तेव्हा तुला हेच क्षण आनंदी करतील. स्वरा मिस करेन तुला आणि तुझ्या ह्या गोड हसण्याला. खरच खूप मिस करेन. "

ती चालत होती पण तिला अंदाज नव्हता की ज्याने तिला जगायला शिकविल तो आता जास्त दिवस तिच्यासोबत राहणार नव्हता. कदाचित तो आता कायमचा तिच्यापासून दूर जाणार होता.

तुझे आज फिरसे मुस्कुराते देखकर
अजीबसा सुकून मिला है
तुझे पाना मेरी मंजिल नही
ये सच उसने बतलाया है

क्रमशा....