कैसे जान लेते हो
हर राज मेरे दिलं के
क्या कोई किताब है
जीससे भावनाये समझ पाना आसान है
स्वराच्या आयुष्यात अचानक बदल झाला आणि ती आनंदी राहू लागली.तिला आता आनंदी राहायला कारण लागत नव्हती. ती पुन्हा एकदा स्वप्न बघू लागली. आयुष्य बेभान होऊन जगू लागली. हळूहळू जसजसे दिवस जात होते तसतस स्वराला जाणवू लागल की तुमची परिस्थिती काहीही असो पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही स्वतात बदल केला नाही तर कदाचित तुम्हाला आयुष्यभर एकट राहावं लागेल. मग तुमच्या हातात काहिच उरत नाही. भविष्य हे आभासी आहे. ते कसं असेल कुणालाच माहिती नाही आज जे आहे ते खरं आयुष्य आहे आणि ते जो जगेल त्याला कसलीच चिंता राहणार नाही. स्वराच्या एका सुंदर पर्वाला सुरुवात झाली होती आणि सोबत होता तिच्या अन्वय. कदाचित फक्त काही क्षण. स्वराला ह्याबद्दल माहिती नव्हतं पण अन्वयला माहिती होत म्हणून तो त्याच्या मुंबईच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खास बनवत होता. त्याने जणू तिच्या आयुष्यातून कायम जायचा निर्णय घेतला होता.
जिनेसे बडा कोई इमतेहान नही
मरने से बडा कोई सुकून नही
जिना चाहते हो तो जी लो हर पल
यहा जिंदगी का अगले पलही भरोसा नही
असाच एक रविवार. अन्वयने सर्वाना पार्टीच प्रॉमिस केलं असल्याने त्याने आज पार्टी दिली होती. पार्टी रात्री ८ वाजता शालिमार हॉटेलला होती. स्वराला आज सकाळपासूनच पार्टीची ओढ लागली होती त्यामुळे तिला आज रूममध्ये बसवत नव्हतं. आज दिवसात कितीतरी वेळ तिने घड्याळात बघितलं होत पण वेळही जात नव्हती. हळूहळू का होईना सायंकाळ झाली आणि स्वरा आपली तयारी करण्यात व्यस्त झाली. स्वराला मागील काही वर्षात तयारी करायला वेळ लागत नव्हता पण आज ती खूप जास्त वेळ घेत होती. गादीवर तर कपड्यांचा ढिगारा पडला होता तरीही आज ती एकही ड्रेस निवडू शकली नव्हती. आज नक्की कोणता ड्रेस घालायचा ह्याच विचारात तिने कितीतरी वेळ वाया घालवला होता. तेव्हाच तिची नजर पडली ती तिच्या आवडत्या लाल रंगाच्या सलवार कुर्त्यावर. तिच्या नजरेस तो पडताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे मोती पसरले. तिने बाकी सर्व ड्रेस नीट घडी करून ठेवले आणि तो लाल रंगाचा ड्रेस घालून तयार झाली. तिने स्वतःच आपल्यावर एकदा नजर टाकली आणि मनोमन खुश झाली. तस इतर मुलीप्रमाणे तयारी करायला तिच्याकडे काही नव्हतं म्हणून एक छोटीशी बिंदी तिने आपल्या कपाळावर लावली आणि छान केस आवरून तयार झाली. ती सकाळपासून सतत घड्याळात बघत होती तेव्हा वेळ जात नव्हती आणि आता जेव्हा तिने घड्याळात बघितले तेव्हा ७ वाजून गेले होते. तिला जाणवलं की आपल्याला निघायला उशीर झालाय म्हणून तिने सर्व कामे जसेच्या तसे ठेवून हॉटेलकडे प्रस्थान केले. स्टेंशनवर पोहोचताच तिला ट्रेनही मिळाली आणि ती आपल्याच विचारात हरवली. आज स्वरा खूप दिवसाने अशी तयार होऊन कुठेतरी बाहेर पडत होती. तिला नक्की कशाची ओढ होती माहिती नाही पण आज तिला एक एक क्षण जगावासा वाटत होता. आज ट्रेन मधुन जातानाही तिला लवकरात लवकर केव्हा पोहोचेल अस झालं होतं. आज एक एक सेकंद तिला जास्त वाटत होता आणि ती बाहेरचा गारवा अनुभवू लागली.
तेरे आने से बदल गया है मौसम
युही नही हम तुमको जादूगर केहते है
ती दादरला पोहोचली तेव्हा सव्वा आठ वाजून गेले होते. तिला अजूनही हॉटेलला पोहोचायला काही वेळ लागणार होता. दीपिकाचे तिला कॉल येऊन गेले होते त्यामुळे ती हॉटेलला पोहोचायला घाई करत होती. तिला आज लवकरात लवकर हॉटेलला पोहोचायच होत आणि आज पूर्ण जग तिला त्रास देऊ लागल. मुंबईचो ती ट्रॅफिक क्लिअर करत करत तिला पुन्हा अर्धा तास लागला होता. अन्वयने शालिमार हॉटेलचा खास हॉल बुक केला होता. स्वरा हॉटेलच्या खाली पोहोचली. तिने स्वतःच्या लुकवर पुन्हा एकदा नजर फिरवली आणि समोर जाऊ लागली. का माहिती नाही पण तिच्या हृदयाचे ठोके आज खूपच गतीने कार्य करत होते. वेटरने तिला हॉलचा रस्ता दाखवला आणि ती एक एक पाऊल टाकत समोर चालू लागली. थोडी उत्साही तर थोडी घाबरत ती हॉलच्या दारावर पोहोचली. तिला जाणवलं की सर्व मुली घोडका करून एका जागी बसलेल्या आहेत. ती पोहोचली तरीही कुणीही तिच्याकडे बघत नव्हतं आणि दीपक चिडवत म्हणाला," स्वरा मॅडम आपल्याच पार्टीत आपलं स्वागत आहे."
त्याच्या आवाजाने क्षणभर सर्वांच्या नजर तिच्यावर गेल्या. स्वराच नाव ऐकताच अन्वय त्या गर्दीतून स्वतःला बाहेर करत तिला बघू लागला. दीपिकाने धावतच जात तिला घट्ट मिठी मारली आणि आतापर्यंत खुर्चीवर बसून असलेला अन्वय अचानक तिला पाहून उभा झाला. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. स्वराची नजर क्षणभर दीपिकावरून हटली आणि त्याच्यावर पडली. तो तिला वेड्यासारख बघत होता आणि ती त्याला तस बघून क्षणभर लाजलीच. ती जस जशी एक एक पाऊल पुढे येत होती तिला सर्व हॅन्ड शेक करत होते तर अन्वय तिला अवाक होऊन बघत होता. स्वरात आज अस काय स्पेशल होत की तो तिच्यात हरवला होता. स्पेशल नक्कीच होत कारण पहिल्यांदा जेव्हा त्याने तिला फोटोमध्ये बघितलं होत तेव्हा ती अगदी ह्याच रंगांच्या ड्रेसवर होती. त्या रात्री जशी त्याला तिला बघून झोप लागली नव्हती अगदी तशेच आताही त्याचे होश उडाले होते. आज तिला तस बघून त्याचे होशच उडाले होते. त्याला लोक आपल्याकडे बघत आहेत की नाही ह्याचही भान नव्हतं. तो तिला बघतच होता की स्वरा त्याच्यासमोर हात करत म्हणाली," गुड इव्हनिंग अन्वय सर!"
अन्वयची क्षणभरही तिच्यावरून नजर हटली नव्हती आणि तो नकळत बोलून गेला," ब्युटीफुल! खूप सुंदर दिसत आहेस. मी तुला आधी अस कधीच बघितलं नव्हतं. खरच खूप सुंदर दिसत आहेस."
त्याचे शब्द ऐकून स्वराला ओशाळाल्यासारखं होऊ लागल. तिने क्षणभर कपाळावर आलेले केस हलकेच कानामागे केले आणि लाजत म्हणाली," थॅंक्यु सर! आज खूप दिवसाने मन केलं की तयार व्हावं."
अन्वय तिला बघतच उत्तरला, " रोज अशीच तयार होत जा! किती सुंदर दिसतेस शब्द नाहीत माझ्याकडे. अशी तयार झालीस ना तर पुन्हा एकदा निसर्गात बहर येईल."
स्वराकडे आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यामुळे ती लाजतच राहिली तर अन्वय केव्हापासून तिचा हात पकडून उभा आहे हे तिलाही समजलं नव्हतं. तेव्हाच साऊंड सुरू व्हावा आणि अन्वयने पटकन तिचा हात सोडला. स्वरा क्षणभर त्याच्यावर हसलीच होती तर अन्वयने घाबरून तिच्याकडे बघणेच सोडून दिले. स्वराला पार्टीला यायला उशीर झाला होता. तर इकडे सर्वांनी साऊंड सुरू होताच धिंगाणा घालायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये असताना सर्व कसे सीन्सिअर दिसत होते पण आज इथे कुणीच थांबायला तयार नव्हते. अन्वय ते सर्व पाहण्यात व्यस्त झाला. डान्स सुरू होताच स्वराला सर्व बोलावू लागले तर स्वरा तिथेच बसून राहिली. अन्वयने काहीच क्षणात सॉफ्ट ड्रिंक मागवल्या आणि सर्वाना एन्जॉय करताना बघू लागला. त्याच अधून- मधून स्वराकडे लक्ष जात होतं. आज पार्टीमध्ये स्वरापेक्षा कितीतरी मुली नखशिखांत सजून आल्या होत्या पण अन्वयची नजर फक्त तिच्यावर होती. कदाचित तिला अंदाज नव्हता कारण तिचे पाय थिरकायला बघत होते फक्त ती समोर जात नव्हती. अन्वयला ते बघून क्षणभर हसू आलं तरीही तो काहीच बोलला नाही. काही क्षण गेले आणि अन्वय हसतच उत्तरला, " मॅडम पाय थिरकत आहेत तर जा ना इथे कशाला बसून आहात?"
स्वरा क्षणभर हसत उत्तरली, " पाय थिरकत आहेत पण तुम्हाला एकट सोडून जायला मन मानत नाहीये. तुम्ही पण चला ना!!"
अन्वय हसतच उत्तरला, " डान्स आणि मी? नको बाबा. मी इथेच छान आहे. आपली सॉफ्ट ड्रिंक बेस्ट आहे. मी बघतो. पण तू नक्की जावं अस मला वाटत. बघू तरी मॅडम कशा डान्स करतात ते?"
स्वरा हसत उत्तरली, " जाईन पण एका अटीवर!! "
अन्वय हसतच म्हणाला," बर बोला कसली अट?"
स्वरा त्याच्या नजरेत नजर देत म्हणाली," तुम्हाला सर्वांसमोर कविता ऐकवावी लागेल."
अन्वय क्षणभर स्वतःवरच हसत होता. तो काही कवी नव्हता त्यामुळे त्याला सहज सुचन सोपं नव्हतं तेव्हा तो तिच्या जवळ जात म्हणाला," मिस स्वरा कविता नाही पण गाणं गाऊ शकतो. चालेल??"
स्वरा हसतच उत्तरली," क्या बात है! तुमच्या आवाजात जादू आहेच तेव्हा नक्की आवडेल."
स्वरा हसतच होती की तो म्हणाला, " मग आता जाणार ना?"
स्वराने त्याला अगदी गोड स्माईल दिली. बाजूच्या खुर्चीवरून ती उठली. केसांना बांधलेली क्लिप तिने वर काउंटरवर ठेवली आणि केस मोकळे करून समोर सर्वात मिसळली. तिने सर्वाना जॉईन केलं आणि क्षणात पार्टीचा रंगच बदलला. अन्वयला वाटलं होतं की तिला कदाचित डान्स येत नसावा पण तिने सुरुवात केली आणि क्षणात मौसम बदलला. काय मूल, काय मुली आज पूर्ण धिंगाणा घालत होते तर अन्वयची नजर एक सेकंद तिच्यावरून दूर झाली नव्हती. गंमत अशी की आज स्वराही वळून वळून त्याच्याकडे बघत होती. तो क्षण तिच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षण होता. आज पूर्ण स्टेज सजला होता. सर्विकडे धिंगाणा सुरू होता आणि अचानक साऊंड ऑफ झाले. साऊंड ऑफ होताच स्वरा स्टेजवर पोहोचली आणि दीर्घ श्वास घेत म्हणाली," सॉरी सॉरी! माहिती आहे फ्रेंड्स आज धुराळा घालायचा आहे पण त्याआधी ह्या पार्टीमध्ये आणखी एक गोष्ट घडणार आहे. आपल्या सर्वांचे लाडके डिअर अन्वय सर आज गाणं गाणार आहेत सो आर यु रेडी?? "
क्षणातच सर्व मोठ्याने ओरडत म्हणाले , " येस वी आर रेडी!! अन्वय सर प्लिज लवकर या."
अन्वय क्षणभर हसतच होता की स्वरा पुन्हा म्हणाली," अन्वय सर प्लिज आज ह्या पार्टीला आणखी खास बनवा. आमच्या आयुष्यप्रामाणे."
स्वराचा तो गोड आवाज त्याला ऐकू यावा आणि त्याचे पाय आपोआप समोर जाऊ लागले. तो एक एक पाऊल टाकत समोर पोहोचला आणि स्वराने त्याला वर चढायला हात दिला. अन्वयने तिचा हात हातात घेत तिच्या दिशेने पाऊल टाकले आणि हळूच तिच्या हातातून माईक घेतला. त्याला माईक हातात देताच ती खाली उतरली आणि त्याच्याकडे एकटक बघू लागली. अन्वय स्टेजवर चढतच हसत म्हणाला," हे गीत मी खूप दिवसापासून मनात साठवून ठेवलं होतं. एक कविता केली होती तिच्यासाठी. तेव्हा ती कशी असेल माहिती नव्हतं पण एक दिवस अचानक ती भेटली. तिला पहिल्यांदा बघितलं आणि पहिल्यांदा ते गाणं माझ्या डोक्यात राहील. तेच गाणं मी आज गाणार आहे. "
सर्व शांतपणे त्याच्यावर नजर देऊन होते की त्याने स्वराकडे बघत गायला सुरुवात केली.
एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा, जैसे
खिलता गुलाब, जैसे
शायर का ख्वाब, जैसे
उजली किरन, जैसे
बन में हिरन, जैसे
चाँदनी रात, जैसे
नरमी बात, जैसे
मन्दिर में हो एक जलता दिया, हो!
ओ... एक लड़की को देखा तो ऐसा लगा!
हो, एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा, जैसे
सुबह का रूप, जैसे
सरदी की धूप, जैसे
वीणा की तान, जैसे
रंगों की जान, जैसे
बलखायें बेल, जैसे
लहरों का खेल, जैसे
खुशबू लिये आये ठंडी हवा, हो!
ओ... एक लड़की को देखा तो ऐसा लगा!
हो, एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा, जैसे
नाचता मोर, जैसे
रेशम की डोर, जैसे
परियों का राग, जैसे
सन्दल की आग, जैसे
सोलह श्रृंगार, जैसे
रस की फुहार, जैसे
आहिस्ता आहिस्ता बढ़ता नशा, हो!
ओ... एक लड़की को देखा तो ऐसा लगा!
एक लड़की को देखा तो ऐसा लगा!
गाणं संपलं तेव्हा सर्वांचे हात टाळ्या वाजवत होते, कुणीे शिट्ट्या मारत होते तर स्वरा त्याच्याकडे एकटक बघत होती. जणू तो प्रत्येक शब्द तिच्यासाठीच गात होता. गाणं संपलं आणि तो खाली जाणारच की दीपिका समोर हात करत म्हणाली," सर आज तुमच्यासोबत एक डान्स करायची इच्छा आहे. जर शक्य असेल तर प्लिज चला ना!! "
अन्वयने हसत आधी माईक बाजूला ठेवला आणि तिच्या हातात स्वतःचा हात देत म्हणाला," नक्कीच शक्य आहे.आवडेल मला. "
तिने हात समोर करावा आणि सर्व कलीग बाजूला झाले. अन्वय स्वराला म्हणाला होता की त्याला डान्स करता येत नाही पण इकडे सर्व उलट झालं. अन्वयला वेस्टर्न डान्स इतका सुरेख येत होता की काही क्षण त्यांना बघतच राहिले. त्यांचा डान्स सुरू राहीला आणि सर्व टाळ्या वाजवत राहिले. स्वरा तर भारावून त्याच्याकडे बघत होती. डान्स संपला तेव्हा दीपिका त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिली तर अन्वय पुन्हा खुर्चीकडे जाऊ लागला. तो जातच होता की स्वरा त्याचा हात पकडत म्हणाली," अन्वय सर तिच्यासोबत डान्स केला? आमच्यासोबत नाही करणार का?आम्हाला काटे वगैरे लागून नाहीत बर. येताय ना मग??"
अन्वय क्षणभर हसला आणि ती हात ओढून त्याला खेचू लागली. अन्वय काहीच क्षणात मुलांमध्ये पोहोचला तर स्वरा मुलींमध्ये. अन्वय आधी शांत बसून होता पण आता स्टेजवर आला आणि त्याने सर्विकडे धिंगाणा घालायला सुरुवात केली. अन्वय आज कितीतरी वर्षांनी हे सर्व एन्जॉय करत होता म्हणून क्षणभर त्याला स्वतःचच भान नव्हतं. ऑफिमध्ये तो बॉस असला तरीही आज सर्वांसोबत तो मित्र बनून डान्स करत होता आणि सर्वाना त्याचा हा स्वभाव आणखीच वेड लावून गेला. अन्वय डान्स करतच होता की स्वराला डान्स करता करता कुणाचा तरी धक्का लागला आणि ती त्याच्या कुशीत जाऊन पडली. तिचा हात तिच्या छातीवर होता आणि नजर एकमेकांना भिडलेल्या . आज सर्विकडे धिंगाना सुरू होता पण त्या गर्दीतत ते दोघे एकमेकांशी नजरेने बोलत होते.ती त्याला बघतच होती की अन्वय तिला गोल गोल घुमवून डान्स करू लागला. तिने न सांगताच त्याने वेस्टर्न डान्स करायला सुरुवात केली. स्वरा त्याला आता भारावून बघत होती. एक वेळ तिला डान्स नको म्हणणारा स्वता तिच्यासोबत नाचतोय हे बघून तिचे डोळे त्याच्यापासून हटत नव्हते तर अन्वय होता की त्या डान्समधली एक एक स्टेप तिच्यासोबत नकळत करून जात होता. आज स्वरा अन्वयच्या रंगात अशी रंगली होती की ती अन्वय तिला जसा आकार देत होता तसतशी ती घडत होती. पार्टीचा प्रत्येक सेकंद आज ती त्याच्यात हरवली होती आणि तीच मन होत की त्याला पाहण्यापासून थांबवत नव्हतं.
थम जाये ये जमीन
थम जाये आसमाँ
हाथ हो हाथोमे तेरा
मेहक जाये ये समाँ
आज पार्टीमध्ये सर्वांनी धम्माल केली आणि हळूहळू घरी जाऊ लागले तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते. सर्व बाय म्हणून निघाले तर अन्वय बिल पे करून बाहेर पडला. स्वरा त्याच्या येण्याची वाट पाहतच होती. तो आला आणि स्वरा आनंदाच्या भरात बोलून गेली," थॅंक्यु सर पार्टीसाठी. आज खूप दिवसाने मनासारखं जगले. भारी वाटत आहे. पण आत वेळ झाली मला घरी जावं लागेल. बाय सर उद्या भेटू ऑफीसला. "
ती निघालीच होती की अन्वय हसत म्हणाला," मिस स्वरा मी असताना जर एखादी मुलगी ह्यावेळी एकटी गेली तर मला नक्कीच चांगलं वाटणार नाही. माझ्याकडे कार असल्याने मी तुमच्याकडे येऊ शकत नाही सो तेव्हा तुम्ही येणार का माझ्याकडे? अफकोर्स हा तुम्हाला माझी भीती वाटत नसेल तर?? मी काहीही करू शकतो हा रात्री. अगदी काहिही!!"
स्वराने त्याच्याकडे रागाने बघितले. पुढच्याच क्षणी गाडीचे दार उघडत आतमध्ये बसली आणि रागातच म्हणाली," आता जायचं ना की असच पांचट विनोद ऐकवत बसणार आहात??"
अन्वय हसत- हसतच कारमध्ये बसला आणि त्याने गाडी सुरू केली. काही वेळ सर्व शांतच होत की अन्वय पुन्हा म्हणाला," मिस स्वरा तुम्हींच म्हणाला होतात की तुम्हाला कुणीच काही करू शकणार नाही सो तेव्हा घाबरू नका. मी खरच जेंटलमन आहे काहीच करणार नाही. नाही तर म्हणाल की संधी मिळाली तर अन्वय पण मुलींवर लाइन मारायला मागे पुढे बघत नाही."
स्वराने त्याच्याकडे रागाने बघितले. तो तिच्याकडे क्षणभर शांतपणे बघत होता आणि तेव्हाच स्वरा हसत उत्तरली," तुम्ही पण ना सर? कायम गंमत करत असता माझी. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अशी भुतासारखी दिसत नसते तरीही थांबले असते तुमच्याकडे. आता असच चिडवत राहणार आहात का की घरी पण जायचं?"
अन्वय क्षणभर हसत पुन्हा गाडी चालवू लागला. आजसुद्धा गाडीमधील वातावरण शांतच होत पण त्या वातावरणात काहीतरी खास होत. स्वरा आजही आजूबाजूला बघत होती पण ती त्याच्याकडे बघायला लाजत होती म्हणून ते होत. तिच्या चेहऱ्यावर आज हसू होत. तिच्या चेहऱ्यावर लज्जेचे भाव होते आणि अन्वयच नकळत वागणं तिला सुखावून जात होतं. आज त्याच्या नजरेत बघून तिला काहीतरी वेगळंच जाणवलं होत. त्यामुळे ती खूप खुश होती. आज मनसोक्त ती जगली होती.
सुमारे पाऊण तास झाला जेव्हा ती आपल्या विचारातून बाहेर आली. अन्वयने अचानक कार थांबवली आणि स्वराच्या लक्ष्यात आलं की आपण त्याच्या रूमच्या जवळ पोहोचलोय. अन्वय उतरताच तीही त्याच्या मागे जाऊ लागली. अन्वय समोर समोर जात होता तर स्वरा मागे मागे. खर तर त्या रूममध्ये ते दोघेच होते पण तिला त्याच्यासोबत असताना क्षणभर भीती वाटत नव्हती. काही क्षण गेले. अन्वयने दार उघडलं आणि दोघेही आतमध्ये पोहोचले. स्वरा आतमधून घर बघतच होती की अन्वय कपाटाकडे बोट दाखवत म्हणाला, " स्वरा माझी ताई इथे येत असते सो तिचे काही कपडे आहेत. तुला येऊन जातील सो जा चेंज करून घे. मीही चेंज करून घेतो. "
अन्वय स्वराला सांगून आपल्या रूममध्ये गेला आणि कपडे चेंज करून पुन्हा किचनमध्ये परतला. त्याने फ्रिजमधून पाण्याची बॉटल काढत पाणी पिले आणि एक बॉटल घेऊन तिच्या रूम समोर पोहोचला. रूमच्या बाहेरूनच तो हळुवार आवाजात म्हणाला , " आतमध्ये येऊ का स्वरा??"
स्वराचे केव्हाच कपडे चेंज करून झाले होते म्हणून ती हसत म्हणाली," या ना सर. "
अन्वय आतमध्ये पोहोचला आणि पाण्याची बॉटल बाजूला टेबलवर ठेवत म्हणाला," इथे तू निवांत झोप. मी माझ्या रूममध्ये आहे. काही लागलं तर सांग. आज खूप थकली आहेस ना सो लवकर झोप गुड नाईट."
स्वराही हळूच उत्तरली," गुड नाईट सर."
अन्वय एक गोड स्माईल देत रूममधुन बाहेर पडला.
स्वरा आपल्या रूममध्ये एकटीच होती तर अन्वय अजूनही झोपला नव्हता. तो खिडकीजवळ राहून बाहेर काहीतरी बघत होता. १५-२० मिनिटे गेली तरीही त्याला झोप लागली नाही. तो उभाच होता की स्वरा हळुवार आवाजात म्हणाली, " आत येऊ का सर?"
अन्वय हसतच उत्तरला , " ये ! का ग झोप नाही लागत आहे का?"
स्वरा आतमध्ये येत म्हणाली, " हो. सर मला काहीतरी आठवलं म्हणून तुम्हाला सरळ विचारायला आले. "
अन्वय तिच्यावर मोठ्याने हसत म्हणाला, " बापरे! अजून एक प्रश्न ? "
स्वराही हसतच उत्तरली," हो पण माझ्या आयुष्याशी संबंधित नाही. तुमच्याशी संबंधित आहे."
अन्वय थोडा वेळ शांत होत म्हणाला," बर बोला मग."
स्वरा आता त्याच्या थोड्या जवळ येत म्हणाली," सर आज तुम्ही तिच्यासाठी गाणं म्हटलं ना म्हणून मला आठवल की तुम्ही मला वेळ आल्यावर तिच्याबद्दल सांगणार आहात. सो प्लिज सांगा ना तिच्याबद्दल मी जाणून घ्यायला उत्सुक आहे. कोण आहे ती लकी गर्ल?? "
अन्वय क्षणभर तिच्यावर हसला आणि पुन्हा त्याने नजर बाहेर खिडकीकडे वळवली. स्वरा आता हसतच म्हणाली," सर नक्की ना कुणी आहे की बस मला घुमवत आहात? मी आहे थोडी बुद्धू म्हणून असेल कदाचित, हो ना??"
अन्वय आता हळूच तिच्याकडे वळाला आणि हसत म्हणाला," अर्ज किया है …
उसने बडी सादगी से मुझसे पुछा
कोई है या युही फेक लेते हो
हमने आयना दिखाकर उससे पुछा
बता भी दो, इससे सुंदर बला कही और देखे हो? "
स्वराच्या तोंडून शायरी ऐकताच शब्द आले, " वाह वाह! पर सर उसका नाम तो बता दिजीए. युही पेहलीया ना बुझाइये. "
अन्वय अगदी तिच्या जवळ पोहोचला. त्याची नजर तिच्यावर भिडली. हृदयाचे ठोके अजून वाढले आणि तो हळुवार आवाजात उत्तरला, " तुला खरच जाणून घ्यायचं ती कोण आहे ? "
स्वराला स्वतःवरच कंट्रोल नव्हता म्हणून त्याच्या नजरेत बघत म्हणाली," हो नक्कीच ऐकायला आवडेल. "
अन्वय तिच्या नजरेकडे बघून हसत उत्तरला," ठीक आहे सांगेन पण आज नाही . १-२ दिवसात पक्का सांगेन. आता का वगैरे काही विचारू नकोस. एक-दोन दिवस वाट बघ आणि आता झोप. एक वाजून जास्त झालाय. गुड नाईट"
स्वरा त्याला गुड नाईट बोलून झोपायला गेली पण अजूनही तिच्या हार्टबिट कंट्रोल मध्ये आल्या नव्हत्या . त्याची ती जीवघेणी नजर तिला विसरता येत नव्हती. आज ते दोघेही एकाच घरात होते फक्त रूम बदलल्या होत्या. दोघांच्याही मनात काही विचार होते. एकीकडे स्वरा आनंदी होती तर अन्वयच्या मनात नक्की काय चालल तिला माहिती नव्हत? आज अन्वय, स्वरा दोघेही झोपले नव्हते पण दोघांचीही कारणे वेगवेगळे होते. तो खरच तिला मनातलं सांगणार होता का आणि स्वरा ते सर्व ऐकून पुन्हा कशी रिऍक्ट करणार होती??
तुझे कैसे बताये दिलं का हाल
ये हाल कही तूम्हे बेहाल ना कर दे
क्रमशा...