भाग्य दिले तू मला - भाग ५२ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ५२

किसीं के बेरहम ख्वाबो से खुद को
बाहर निकालना इतना भी आसान नही
देखा है हमने अंजाम प्यार का जिते जी
कैसे बताये ये दिलं फिर प्यार की आहट सुनेगा नही

आयुष्यात एकटेपणाची पण गंमत आहे. तो कधी कधी हवाहवासा होतो तर कधी तोच एकटेपणा नकोसा होऊन जातो. स्वराने ह्या दोन्ही फेज खूप जवळून आधीच बघितल्या होत्या. तेव्हा तिला आता फरक पडायला नको होता पण तिला अन्वयची इतकी सवय झाली होती की नकळत त्याचा विचार एकदा तरी तिच्या मनात येऊन जायचा. स्वरा जगत तर होती पण आनंद तिच्या चेहऱ्यावरून कुठेतरी गायब झाला होता. जीवन जगण्यासाठी काहीतरी कारण लागतात, आयुष्यात गोल्स असावे लागतात तेव्हाच जगण्याची मज्जा येते हे तिला आता खरच पटू लागलं होतं. आजपर्यंत ती फक्त जगायच म्हणून जगत होती पण आता तिला जगण्यात आनंद मिळत नव्हता, कामात आनंद मिळत नव्हता. अन्वय सोबत असायचा तेव्हा तो सहज तिचे प्रश्न सोडवून जायचा पण तो गेला आणि तिचे प्रश्न तिच्याच मनात बंदिस्त झाले होते. तिला सतत वाटायच की अन्वयने कॉल नाही केला तरी आपण करावा पण आपण स्वार्थी ठरू म्हणून तिनेही त्याला कधी कॉल केला नाही. अन्वय कसा आहे, तो काय करत असेल ह्याबद्दल तिला सतत प्रश्न पडायचे पण ती त्याच्याशी बोलायची हिम्मत करू शकली नाही. कदाचित आपण त्याला कॉल केला तर त्याला वाटेल की आपण त्याच उत्तर द्यायला कॉल केला आहे हा विचार येताच ती आपला विचार मागे घ्यायची. स्वयम तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी ती स्वतःलाच त्याला ओळखायला एक संधी देणार होती पण स्वयम आला आणि पुन्हा तिने एकदा स्वताच्या मनाला थांबवलं. ती त्याच्याशी बोलत नव्हती पण तो नसण्याचा प्रभाव तिच्या आयुष्यात नक्कीच पडत होता.

एक मुकाम हासिल करना है
अपणो के बगैर
फिर पुछती हु खुदसेही
उनके बगेर, हासिल क्या कर लोगी??


स्वरा आलेला दिवस ढकलत जीवन काढू लागली. नेहमीप्रमाणे ती आजही ऑफिसला पोहोचली. दिवसभर स्वतःला कामात गुंतवून घेऊ लागली. अलीकडे ऑफिसच वातावरण पूर्णता बदलल होत. अन्वय कामात स्ट्रिक्ट जरी असला तरी काम सोडलं की तो इतर वेळी सर्वांसोबत एन्जॉय करायला मागे पुढें बघत नसे पण कार्तिक तसा नव्हता. कार्तिक संकोचिंत स्वभावाचा होता. तो कुणाशी जास्त लावून घेत नसे त्यामुळे ऑफीसमध्ये गप्पा मारायला किंवा बोलायला फार कमी मिळत असे. त्याच काम असलं की तो सर्वांशी बोलायचा आणि पुन्हा एकदा ऑफिसच वातावरण शांत व्हायच. आता जणू सर्वांनाच वेळेच बंधन पाळाव लागत होतं. सकाळी ऑफिसला येन आणि वेळ झाल्यावर घरी जाण हा सर्वांचा नित्यक्रम होत गेला आणि अन्वयने काहीच महिन्यात ऑफिसमध्ये तयार केलेलं आल्हाददायी वातावरण अचानक नाहीस झालं. स्वराही आता फक्त मशीनसारख काम करत बसायची. दिवसभर काम केलं की रात्री कसातरी तिचा वेळ निघायचा. हळूहळू अन्वय नावाचा किस्सा नाहीसा झाला आणि स्वराही तो आपल्या आयुष्यात कधी आलाच नाही म्हणून जीवन जगू लागली.

अब तुमको भुलाना होगा
एक याद की तरहँ
भूल जाऊ तो अच्छा है
वरणा दफनाना होगा तुझे मेरे ख्वाब की तरहँ...


आजसुद्धा स्वरा काम करून खूप थकली होती. आज तिला केव्हा एकदा घरी जाते अस झालं होतं त्यामुळे कितीतरी वेळेपासून ती घड्याळावर नजर टाकून बसली होती. फायनली सायंकाळी ६ चा ठोका घड्याळात पडला आणि स्वरा सर्वांसोबत ऑफिसच्या बाहेर पडली. हळूहळू थंडीचे दिवस सुरू झाले होते म्हणून वातावरणात गारवा पसरला होता. स्वरा आपले हात एकमेकांवर घासतच रेल्वे स्टेशनवर पोहोचली. काही वेळ ती तिथेच उभी होती पण अजूनही लोकल आली नव्हती. ती वाट बघतच होती की मागून एक हात तिच्या खांद्यावर आला. तो हात खूप वजनदार होता त्यामुळे तो एखाद्या पुरुषाचा असेल ह्याबाबतीत स्वराला कुठलिही शंका नव्हती. तो कोण असेल आणि का माझ्या खांद्यावर हात ठेवतोय हा विचार करूनच स्वराला त्याच्या वागण्याचा खूप राग आला होता. तिचे हात त्याच्या कानाखाली सितार वाजवायला आतुर होते आणि ती मागे वळून त्याला मारणारच की तिचा हात अचानक थांबला. त्यांना बघताच स्वराच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव क्षणात बदलले आणि स्वरा त्यांना मिठी मारत म्हणाली," बाबा तुम्ही इथे? मला सांगितलं का नाही तुम्ही येत आहात म्हणून?"

बाबा तिला घट्ट मिठीत घेत म्हणाले," सांगितलं असत तर तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद पाहायला मिळाला असता का आम्हाला?आता बघ कसा प्रफुल्लित वाटतोय तुझा चेहरा? मग का सांगायचं बर??"

स्वराने क्षणात बाबांना सोडून आईला मिठी मारली. आईला बघून काही क्षण स्वरा तशीच मिठीत राहिली तेव्हा आईच म्हणाली," खूप आठवण येत होती बाळा तुझी. इतके दिवस तुझ्याविना राहण्याची सवय नाही ना? मग तुझे बाबा म्हणाले की आठवण येते आहे तर चल जाऊन भेटून येऊ म्हणून लगेच निघून आलो. बाबाना माहीत होतं की तू दादर वरून निघतेस. आम्ही केव्हाच इथे आलोय फक्त तुझी वाट बघत होतो. तू दिसलीस आणि बघ क्षणात इथे. आता आमच्या मुलीच सुंदर चेहरा बघितला आणि इतक्या दिवसाची बेचैनी क्षणात नाहीशी झाली."

स्वरा हसतच उत्तरली," बर केलत तुम्ही आलात ते! मीही खूप मिस करत होते तुम्हाला. यायचं म्हणत होते घरी पण कामात वेळच मिळत नव्हता. सतत कामावर काम येत होते."

स्वराला आणखी खूप काही बोलायच होत पण तेवढ्यात ट्रेन आली आणि स्वरा समोर उभी झाली. ती तेवढी गर्दी बघून स्वराची आई क्षणभर घाबरलीच होती. स्वरालाही असच काहीतरी होणार होत हे माहिती होत म्हणून स्वराने आधी आईला चढवल आणि नंतर स्वता चढली. काहीच क्षणात ट्रेन सुरू झाली आणि स्वराच्या आई म्हणाल्या," बापरे स्वरा किती ही गर्दी? आपल्याकडे नसते बाबा इतकी गर्दी. मी एकटी वगैरे आले असते ना माझं काही खर नव्हतं. काय हे लोक मशिनसारखे धावतात. कशी येतेस तू? तुला त्रास तर होत नाही ना?"

स्वरा आईवर हसत आईचे गाल ओढतच म्हणाली," मातोश्री आता सवय झाली आहे ह्या शहराची आणि गर्दीचीही. तेव्हा काहीच वाटत नाही. तुम्ही काळजी करू नका.मी आहे मजेत. आता इथल्याच लोकांना हरवते चढण्याच्या स्पर्धेत!! लोक घाबरतात मला इथले हा!! "

आज स्वरा खूप दिवसाने आनंदी जाणवत होती तर त्यांना आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघूनही फारच आनंद झाला होता. आज कितीतरी दिवसाने स्वराचा चेहरा त्यांनी प्रत्यक्ष बघितला होता. ती खूप खुश आहे शिवाय इतक्या मोठ्या शहरात तिला कुठलाच प्रॉब्लेम नाही हे बघून स्वराच्या आई- बाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल होत. स्वरा आज खूप बोलत होती आणि तिचे आई-बाबा तिच्याकडे फक्त बघायच काम करत होते.

बोलता - बोलता १०-१५ मिनिटांचा कालावधी निघून गेला. वांद्रे स्टेंशन आलं आणि माधुरी धावतच तिला मिठी मारत म्हणाली," लव्ह यु सो मच ताई!"

माधुरीने तिला पटकन मिठी मारत गालावर किस केले. तिला आजूबाजूला कोण आहेत ह्याच भानच नव्हतं आणि स्वराच म्हणाली," काय वेडाबाई आज काही स्पेशल इतक्या आनंदात? लग्न वगैरे जुळलं की काय? इतका आनंद ह्याआधी तर कधी झाला नव्हता."

माधुरी हसतच उत्तरली," लग्न करे माझे वैरी. मी तर दुसऱ्याच कारणाने खुश आहे. माझी सॅलरी वाढली ताई. आता मला मस्त शॉपिंग वगैरे करता येईल सोबत आपण पार्टी करू मस्त. तू भी सोचेगी क्या दिलदार बेहन मिली है करके!!"

स्वरानेही तिला मिठी मारत म्हटले," मोठी आली दिलदार म्हणे."

दोघीही आता एकमेकांवर हसतच होत्या की स्वरा पुन्हा उत्तरली," अभिनंदन मधु. तुझ्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते." पुढच्याच क्षणी स्वराने तिच्या कपाळावर किस केले.

त्यांचा मेलोड्रामा सुरूच होता की स्वराच्या आई म्हणाल्या," हीच आहे का माधुरी? जीच्याबद्दल तू सतत बोलत असतेस? तुझी लाडकी लहान बहीण!! भारीच आहे बाबा दिसायला आणि बोलायला तर विचारूच नये. जेवढं सांगितलं त्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे तुझी मधु!!"

माधुरीच स्वरावरून आता त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि स्वरा तिला मागून मिठीत पकडत म्हणाली," हो आई हीच तुझी छोटी मुलगी. थोडीशी अल्लड पण खूप समजून घेणारी. माझा जीव. माझी सवय आणि माझा टेडी."

माधुरी त्यांच्याकडे बघतच होती की स्वरा पुन्हा उत्तरली," मधु हे माझे आई-बाबा."

माधुरीची त्यांच्याशी भेट झाली आणि तिचे आईबाबा मधूचे फॅनच झाले. माधुरी अगदी चंचल, मनात येईल ते बोलणारी त्यामुळे त्यांच्याशी बोलताना देखील ती शांत झाली नव्हती तर माधुरीच्या गप्पा ऐकून तिचे आई-बाबा कितीतरी वेळ हसत होते. खूप दिवसाने स्वराचा चेहरा पुन्हा एकदा खुलून निघाला. तो ट्रेनमधला एक तास चौघेही कितितरी वेळ हसतच होते. शेवटी वसई आलं आणि सर्वच खाली उतरले. माधुरी तिला "बाय" म्हणून जाणारच तेव्हा स्वरा उत्तरली," मधू एक ना! आज खूप उशीर होईल स्वयंपाक बनवायला त्यापेक्षा मी आई-बाबांना फ्रेश व्हायला थोडा वेळ देते. नंतर आपल्या आवडत्या कॅफेमध्ये जाऊ जेवायला. तू पण ये आम्हाला बर वाटेल."

माधुरी उदास चेहरा करत उत्तरली," पण आई?"

स्वरा आता तिच्या अगदी कानाजवळ जात म्हणाली," इतक्या वेळ आईला टांग दिली आहेस ना मग आज नाही देऊ शकत का? चल हो फ्रेश आणि ये बहाणा करून. मी निघताना मॅसेज करते."

माधुरी हसत- हसत घराकडे निघाली तर स्वराचे आई-बाबा देखील तिच्यासोबत मागे-मागे चालू लागले होते. स्वराची आई आज पहिल्यांदा मुंबई बघत होती त्यामुळे काही क्षण तर ती मोठं मोठ्या बिल्डिंग आणि इतकी गर्दी बघून भारावून गेली होती. तर आईला तस बघताना बघून स्वराला समाधान वाटत होतं. त्यांचा शांत- शांततेचा हा प्रवास काहीच मिनिटांतच सर झाला आणि फायनली ते स्वराच्या रूमवर पोहोचले.

आज पहिल्यांदा ते तिची रूम बघत होते. स्वराने त्यांचं सामान नीट ठेवलं आणि बाबा वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला पोहोचले. आई रूम बघतच म्हणाली," स्वरा रूम लहान आहे पण मस्त आहे हा! गंमत अशी की नीटनेटकी आहे नाही तर मी ओरडून सांगायचे तरीही नीट आवरून ठेवायची नाहीस."

स्वरा आता हसतच उत्तरली," आईची गोष्टच वेगळी असते. ती असली की कसलं टेन्शन नाही आणि ती नसली की मग शिकाव लागत सर्वच. आता बाहेरच रहायच आहे तर शिकायला नको का? आई नसली की सर्व आपोआप येत फक्त आई असली की हजारे बहाणे देता येतात. बरोबर ना??"

स्वरा बोलतच होती की बाबा बाहेर आले आणि स्वरा फ्रेश व्हायला आत पोहोचली. तीही काहीच क्षणात बाहेर आली आणि चहा बनवू लागली. आता तिघेही फ्रेश होऊन काही क्षण गादीवर बसले आणि स्वरा म्हणाली," कसा गेला प्रवास? थकले असणार ना तुम्ही?"

बाबाही तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले," आधी थकलो होतो पण तुझा चेहरा बघितला आणि क्षणात थकवा नाहीसा झाला."

आईही बाहेर येत म्हणाली," थकवा कसला बाळा? उलट आनंद वाटतोय तुला बघण्याचा. आता तर आम्हाला ताजेतवाने वाटत आहे. आमची ऊर्जा आहे आमच्यासोबत मग कसा थकवा जाणवणार बर??"

स्वरा पटकन आपल्या बाबांच्या कुशीत शिरली आणि त्यांचं बोलणं ऐकू लागली. आज वेळेला मर्यादा नव्हत्या आणि स्वराच्या आनंदालाही..

ते आज खूप दिवसाने निवांत बसले असल्याने त्यांना गप्पा मारताना वेळेच भान सुद्धा नव्हतं. त्यांना बोलता- बोलता किती वेळ झाला होता त्यांचं त्यांनाच माहिती. ती बसलीच होती की स्वराचा फोन वाजताना दिसला. तिने फोन उचलला होताच की माधुरी ओरडत म्हणाली," किती वेळेची वाट बघते ताई फोनची पण तू करतच नाही आहेस. नक्की जायचं आहे ना की मला कल्टी दिलीस?"

स्वरा हसतच उत्तरली," सॉरी वेडोबा! बाबांसोबत गप्पा मारताना भान उरल नाही. तुला सोडून कस जाणार वेडोबा. येतोच आहोत आम्ही."

ती हसत होती तर माधुरी रागावतच उत्तरली," तुमच्याकडे पूर्ण रात्र आहे बोलायला. मी जर आता बाहेर निघाले नाही तर मला लाटण खायची वेळ येईल. कशीतरी आईला टांग दिली आहे. ती तयार सुद्धा झाली पण थोड्या वेळ निघाले नाही ना सो गेलेच मी. आता ते सर्व सोड आणि निघ लवकर.मीही येतेय आताच."

स्वराने काही बोलायच्या आधीच माधुरीने फोन ठेवला आणि स्वरा हसतच उत्तरली," बाबा चला आधी जेवन करायला बाहेर जाऊ मग निवांत गप्पा मारू."

स्वरा आणि स्वराचे आई-बाबा पटकन बाहेर निघाले आणि त्यांच्या आवडत्या स्वाद कॅफेमध्ये जाऊ लागले.
रात्री ९ च्या आसपास वाजत आले होते. बाहेर थोडा अंधार पडला होता आणि थंडीही वाढू लागली होती. स्वराचे आई- बाबा मोठं मोठ्या बिल्डिंग बघत, आजूबाजूच वातावरण बघत चालू लागले होते. स्वराही त्या पूर्ण एरियाबद्दल आवडीने सांगत होती. एक काळ असा होता जेव्हा स्वरा घराच्या बाहेर निघायला घाबरत होती पण आता मोठ्या शहरात राहून सुद्धा ती कुणाला घाबरत नाही हे बघून तिच्या आई- वडिलांना आनंद होत होता. ती आपल्या वडिलांचा हात पकडून त्यांना वेगवेगळ्या भागाबद्दल माहिती सांगत होती तर ते लहान मुलाप्रमाणे तीच सर्व ऐकत होते. काहीच क्षण झाले. ते बोलत येतच होते की माधुरी स्वरावर ओरडत म्हणाली," तू जर लवकर आली नसती ना तर तू मारच खाल्ला असता ताई माझा. किती हा आततायीपणा? बर झालं आलीस म्हणून वाचली. नाही तर आज माझ्यावर मर्डर केस लागलीच असती.!! "

स्वरा तिच्यावर हसतच होती की माधुरी पुन्हा म्हणाली," काकू सॉरी पण तुमची मुलगी ना एवढी मोठी झाली तरीही तिला काय करायचं, कस वागायचं कळत नाही. मी असते ना?"

स्वराची आई हसत म्हणाली," माधुरी तू हे खर म्हणालीस बघ!! ती आहेच वेंधळट. माधुरी मी ना तुला पूर्ण अधिकार देते आजपासून. तू हिला शिकवच सर्व. चांगला धडा शिकव हिला!! मी आहे तुझ्या पाठीशी."

माधुरीने हसतच काकूना मिठी मारत म्हटले," थॅंक्यु काकू. आता बघाच मी कस सरळ करते ताईला. बेटा देख ले अब आयेगा उट पहाड के नीचे. अब नही छोडने वाली मै तुम्हे!"

तीच बोलणं ऐकून सर्वच हसू लागले आणि स्वरा उत्तरली," ओय मॅडम! आता उशीर होत नाहींये का तुम्हाला की इथेच रहायच आहे बहुतेक लाटण खाणारच तू आईच!"

माधुरी गालातल्या गालात हसली आणि सर्व आतमध्ये पोहोचले. हॉटेल मध्ये येताच त्यांनी बिर्याणी मागवली आणि ऑर्डरची वाट पाहू लागली. ते आताही ऑर्डरची वाट पाहत असले तरीही माधुरी- स्वराची मस्ती बघून त्यांना हसू आवरत नव्हतं. माधुरी एक क्षण शांत राहत नव्हती त्यामुळे तिच्याकडे सर्व बघून हसायचे तर तिच्यामुळे नकळत स्वराच्या ओठांवर हसू यायचं. काहीच क्षण गेले आणि स्वराचे बाबा उत्तरले," तुमच भांडण असच सुरू असत का ग दिवसभर?"

स्वरा माधुरीचा हात पकडत म्हणाली," बाबा ही दिसते लहान पण खूप शैतान आहे हा!! खूप त्रास देते मला ही. खडूस कुठली!!"

माधुरी बाबांकडे बघत म्हणाली," काका, लहान बहीण नाही तर कोण त्रास देणार हो तुम्हीच सांगा?? माझा इतका अधिकार तर बनतो ताईवर?? "

स्वरा आणि मधूची जोडी मस्त होती. सीरीअस वेळी एकदम गंभीर तर बाकी वेळ त्यांना सोबत कोण आहेत ह्याने फरक पडत नव्हता. फायनली त्यांची बिर्याणी आली आणि सर्वांनी खायला सुरुवात केली. खाताना देखील माधुरी शांत बसली नव्हती त्यामुळे सर्वाना हसू आवरत नव्हत. काहीच वेळात सर्वांच जेवण आटोपलं आणि स्वराने सर्वांसाठी आइस्क्रीम मागवली. थंडीचे दिवस असल्याने सर्व नाही नाही म्हणत होते पण स्वराला आज खायची असल्याने तिने सर्वाना मागवून घेतली होती. काहीच क्षणात आइस्क्रीम आली आणि सर्व खाऊ लागले तेवढ्यात स्वराच्या आई म्हणाल्या," बेटा मधु! स्वरा तुझ्याबद्दल कायम बोलते. आज ते बघितलं. तू खरच खूप छान आहेस. स्वरासोबत कायम राहा. तुझ्यासोबत असतांना ती खूप खुश असते. तुझिच सोबत आहे तिला बाकी तर आम्ही दूरच राहतो. घे हा तिची काळजी. तुझ्याविना तीच इथे कुणीच नाही."

आई भावनिक झाल्याचं होत्या की माधुरी हसवत म्हणाली," काकू मग तुम्हाला काय वाटत मी हिला सोडणार आहे. आता आपलं ठरलं आहे ना मी सुधरवणार आहे हिला तर सोडायचा प्रश्नच येत नाही."

आईच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल आणि आई म्हणाल्या," आणि हो स्वरा सोबत एकदा तरी घरी ये आमच्या. आम्हाला खूप आनंद होईल तुला बघुन."

माधुरी गमतीच्या मूड मध्ये होती म्हणून सहज म्हणाली," हो येते ना ताईच्या लग्नाला. मग राहीन काही दिवस घरीच तुमच्या.धिंगाणा घालेन ताईच्या लग्नात. उसी दिन का तो इंतजार है. मग म्हणाल की उगाच हिला बोलावलं."

माधुरी सहज बोलून गेली आणि आता सर्विकडे सन्नाटा पसरला. स्वरा तर आई-बाबांकडे क्षणभर बघतच राहिली. आईबाबांच्या नजराणा तिला नजर मिळविन त्रासदायक जाऊ लागलं म्हणून तिने क्षणात नजर खाली केली तर माधुरीला आपण काय बोलून गेलो ह्याचा अंदाजच आला नाही. सर्व कस क्षणात शांत झाल. पुढे कुणी काही बोलणार त्याआधी माधुरीचा मोबाइल वाजला आणि आईचा कॉल आला म्हणून ती धावत पळत बाहेर पडली. ती तर गेली होती पण सर्विकडे वातावरण शांत करून गेली होती. स्वराला ते आता शांत वातावरण सहन झालं नाही आणि तिने पटकन आइस्क्रीम संपवली. बिल पे केलं आणि सर्व घराकडे निघाले.

ते सर्व घरी पोहोचले तेव्हा १० पेक्षा जास्त झाले होते. आई- बाबा खूप थकले होते म्हणून तिने गप्पा मारण्याऐवजी सरळ अंथरून टाकले. तेही थकले असल्याने लगेचच गादीवर पडले. बाबा तर पडताच झोपाही गेले. स्वरा आपल्या आईला घट्ट मिठी मारून झोपली होती तेव्हाच तिच्या लक्षात आलं की आई कसला तरी विचार करते आहे म्हणून स्वरा तिच्याकडे बघत तिला विचारू लागली," काही झालंय का आई? इतकी टेन्शन मध्ये का दिसत आहेस? "

आई पटकन बोलून गेली," माधुरी जे बोलून गेली त्याचाच विचार करतेय. नकळत का होईना ती बरच बोलून गेली."

स्वराच्याही मनातून ती गोष्ट गेली नव्हती पण आईला त्रास होऊ नये म्हणून ती हसतच उत्तरली," आई, तीच काय टेन्शन घ्यायच? ती पटर- पटर करते असते तेव्हा बोलून गेली. तू जास्त विचार करू नकोस. लहान आहे ग ती, तिच्या बोलण्याच काय वाईट मानायच? उलट छान आहे मनात येईल ते बोलून मोकळी होते."

तिने आईला समजवण्याचा प्रयत्न केला होता तरीही आईच्या चेहऱ्यावर हसू आलं नव्हतं आणि आई शांत स्वरात उत्तरली," ती फक्त बोलून गेली पण हीच गोष्ट सतत माझ्याही मनात सुरू असते स्वरा. मी रोज जग बदलताना बघते आहे पण तू आजही तिथेच आहेस. तुझ्या वयाच्या सर्व मुलींचे लग्न झाले आहेत फक्त तू एकटीच बाकी आहेस. तुझा अपघात झाला नसता तर कदाचित??( काही वेळ सर्व शांत) प्रश्न लग्नाचा नाहीये स्वरा. प्रश्न हा आहे की आमच्या नंतर तुझं काय होणार? तुला सांभाळणार कोण असेल? ह्याच विचाराने रात्र- रात्र झोप लागत नाही. माधुरी नकळत बोलून गेली पण हीच चिंता मला रोज सतावते. ज्या मुलीला फुलाप्रमाणे जपल तिच्या आयुष्यात साथ देणारा कुणीच नसेल हा विचार करून जीव तुटतो. स्वरा आज तुझ्याकडे सर्व आहे. जॉबवर, हळूहळू समाजात लोक स्वीकारू लागले आहेत पण तुला तुझ्या चेहऱ्यासोबत सस्वीकारणारा कुणी येणार नाही का ग? जो आमच्या नंतर तुझी सतत काळजी घेईल. तुला मायेची कमी जाणवू देणार नाही. तुझ्यावर सतत प्रेमवर्षाव करेल. तू त्याच्यासाठी त्याचा जीव असणार. कुणी नाहीये का असा? माझ्या मुलीच्या आयुष्यात लग्नाचा, संसाराचा आनंद नाहीये का?"

स्वराची आई बोलून गेली आणि काही क्षण आईला टेन्शनमध्ये बघून स्वरालाच वाईट वाटलं. तिच्या डोक्यात क्षणभर काहीतरी विचार येऊन गेले तरीही तिने स्वतःला सावरत आईला घट्ट मिठी मारली आणि हळूच हसत म्हणाली,"आई तुम्ही मला कुठेच सोडून जाणार नाहीत कळलं. मी तुम्हाला मला सोडून जाऊच देणार नाही. मी देवाशी भांडून तुम्हाला माझ्या जवळ ठेवेन बस आता मला ह्यावर काहीच बोलन नको. ही उदासी नको की अश्रू नको. आता आपण मस्त मज्जा करू. बाकी गेलं उडत."

स्वरा आईच्या मिठीत शिरली आणि आईही तिला प्रेमाने कुरवाळत झोपवू लागली. स्वराने आईला भावनिकरित्या समजावल होत पण हा विचार करून आज तिला स्वतालाच झोप येत नव्हती. आईच्या भावनांबद्दल तिच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. आई- वडिलांचा आता काळ संपेल त्यानंतर आपल्या मुलीच काय होईल हा प्रश्न प्रत्येक आई- वडिलांना पडेल ह्यात शंका नव्हती पण अगदी तोच प्रश्न स्वरावर नकारात्मक पद्धतीने काम करत होता. ते शब्द ऐकले आणि स्वरा पुन्हा कुठेतरी हरवली. काहीतरी होत तिच्या मनात जे कुणाला सांगू शकत नव्हती कदाचित आपल्या जीवापेक्षा जिवलग आई- वडिलांनाही नाही. काय घडलं होत अस मागच्या काही दिवसात की स्वरा सतत विचारात हरवली असायची आणि लग्न हा विषय ऐकून ती इतकी चिंतीत का झाली होती? काय होत रहस्य ह्यामागे?

एक कहाणी मेरी थि
जो अधुरी रेह गयी
नई लिखने का हौसला
किस भगवान से मांगु??

क्रमशा....