भाग्य दिले तू मला - भाग ५८ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ५८

दिलको दिलसे ये पुछना है
मोहब्बत कैसा गुनाहँ है
तकलीफ हो ही जाती है किसीं को
कैसा ये भवर है जहा सजा को अपनानाभी मना है

आयुष्यात प्रत्येक सकाळीच एक विशेष महत्त्व असत. आयुष्यातले सुख जसे जातात तसेच दुःखही कधीतरी जाणारच. तेव्हा महत्त्वाचं काय तर वाट बघत बसने आपली वेळ येण्याची. म्हणतात ना " समय को भी बदलना होगा समय के साथ बस समय जाणे की देर आहे." कधी विचार केलाय का की ज्यांच्या आयुष्यात कायम सुख असतात आणि त्यांच्या आयुष्यात अचानक दुःख येतात तेव्हा ते काय करतात. त्यांच्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे आत्महत्या. म्हणून थोड्या फार प्रमाणात का होईना आयुष्यात दुःख असावी. एकदा आपण आयुष्यात दुःख सहन केले की मग आयुष्यात कोणत्याही स्थितीला सावरण्याची ताकद आपण ठेवू शकतो. स्वराच्या आयुष्यात आनंद- दुःखाच्या फेज सतत आल्या होत्या म्हणून ती आज टेन्शनमध्ये नव्हती पण हे खरं की तिला आता एकच निर्णय घ्यायचा होता. आजपर्यंत स्वराच भाग्य तिला जिकडे घेऊन जायचं तिकडे ती जात होती पण आता ती जो निर्णय घेणार होती त्यावर स्वराच भाग्य अवलंबून होत. पहिल्यांदा स्वराला स्वतःच भाग्य निवडायचं होत त्यामुळे तिची सतत चलबिचल सुरू होती.

आयुष्यात पुन्हा एक सकाळ. स्वरा फ्रेश होऊन स्टेंशनवर पोहोचली होती. माधुरी अगदीच तिच्या समोर होती त्यामुळे स्वराने तिला आनंदातच मिठी मारली. स्वराला बघून माधुरी खूपच खुश झाली होती तरीही जरा चेहऱ्यावर रुसवा आणत म्हणाली," काय ताई, किती दिवस गायब होतीस?? मला करमतच नव्हतं तुझ्याविना!! जाताना गेलीस तेही एक मॅसेज टाकून नंतर रिप्लाय नाही की काही नाही. आता तरी सांग कुठे गेली होतीस?"

स्वराने हसतच म्हटले," मॅडम मी गेले होते दिल्लीला म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला."

बॉयफ्रेंडच नाव घेताच माधुरी हर्षोल्हासित होत उत्तरली," अय्या! अन्वय सरांना भेटायला गेली होतीस!! किती मस्त ना!! शेवटी नाहीच राहवलं ना तुला त्यांच्याविना. प्रपोजच उत्तर द्यायला गेली होतीस ना? काय म्हणाले सर. सांग ना?"

स्वरा तिच्या बोलण्यावर क्षणभर हसतच होती. ती पटापट बोलून गेली आणि स्वराला हसू आवरेना. माधुरी पुन्हा चिडत म्हणाली," सांग ना, काय म्हणाले सर?"

स्वरा आता तिचे गाल ओढत म्हणाली," तुला कुणी सांगितलं मी अन्वय सरांना भेटायला गेले होते. मी तर माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला गेले होते. तो अन्वय पेक्षाही हँडसम आहे. काळजी घेणारा आहे म्हणून त्याला भेटण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही."

माधुरी आता चिडतच उत्तरली," सांगायचं असेल तर सांग. नाही तर नको सांगू पण मला उल्लू नको घुमवू. अन्वय सरांच्या व्यतिरिक्त कुणीच नाही तुझ्या आयुष्यात आणि म्हणे बॉयफ्रेंडला भेटायला गेले होते. मी इतकी पण बुद्धू नाहीये मला बनवायला. कळलं?"

माधुरी तिच्याकडे रागाने बघत होती तर स्वरा अजूनही तिला बघून हसत होती. माधुरी पुढे काही बोलणार त्याआधीच ट्रेन आली आणि त्या ट्रेनमध्ये बसल्या. आज सुदैवाने त्यांना बसायला सिट देखील मिळाली होती. माधुरी स्वराच्या बाजूला बसून होती. आताही तिचा राग गेला नव्हता म्हणून स्वरा मोबाइल हातात घेत म्हणाली," मधू हा बघ माझा बॉयफ्रेंड स्वयम. छान दिसतो ना? हँडसम, गुड लुकिंग. अन्वय सरांपेक्षा तर भारीच दिसतो. तू अन्वय सरांना विसर आणि ह्याला बघ. मग कधीच अन्वय सरांच नाव घेणार नाहीस. बघ तरी??"

माधुरीने तिरकस नजर मोबाईल वर टाकली आणि थोड्या रुड शब्दात बोलून गेली," ठीक ठाक दिसतो पण अन्वय सरांपेक्षा काही छान दिसत नाही आणि काय ग ताई हा अचानक तुझ्या आयुष्यात कुठून आला? इतके दिवस का नव्हता तुझ्यासोबत? आणि आला तर सरळ बॉयफ्रेंड कसा? पुन्हा तू मला मामु बनवत आहेस ना? खर बोल मला ऐकायची आहे तुझ्या ह्या बॉयफ्रेंडची कथा."

स्वरा आताही तिच्यावर हसत म्हणाली," अचानक नाही आला ग वेडाबाई!! आधीच होता पण काही गैरसमज झाले आमच्यात म्हणून आम्ही दूर झालो. आता ते गैरसमज क्लिअर झाले म्हणून आता पुन्हा एकत्र आलोय आम्ही. आता नव्याने सुरुवात करणार आहोत आयुष्याची. सिम्पल आणि स्वीट रिलेशनशिप!!"

तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत आणि माधुरी रागावतच उत्तरली," ते ठीक आहे पण म्हणून मधल्या काळात जे घडलं ते तर विसरता येणार नाही ना? त्या काळात तो कुठे होता? तू विचारायचं नाही का त्याला? तो आला म्हणून अन्वय सरांना इतक्या लवकर विसरायचं का?"

स्वरा आता जरा नम्र स्वरात उत्तरली," मला त्याच उत्तर माहिती आहे म्हणून मी माफ केल त्याला. एवढंच काय त्याने मला लग्नाचं देखील विचारलं. त्याच्या आईने पण विचारलं मला. सो विचार सुरू आहे त्यावर. वाटलं तर एक दिवस लग्न करूनच येईन तुमच्यासमोर. कशी आहे कल्पना??"

माधुरी आता काही क्षण शांत झाली. स्वराकडे एक बारीक नजर टाकत ती उत्तरली," काय उत्तर दिलंस मग तू त्याला?"

स्वरा हसतच उत्तरली," अजून दिलं नाहीये पण होकार देणार आहे. आई पण म्हणाली होती की आम्ही गेल्यावर कुणीतरी सावरायला हवं तुला शिवाय तुझे अन्वय सर देखील मला म्हणाले होते की आयुष्यात स्वप्न बघ आणि पूर्ण कर. आता सर्वांची इच्छा आहे तर करते लग्न. गंमत अशी की इतरांच्या घरी गेले तर ह्या चेहऱ्यामुळे प्रॉब्लेम्स होतील पण स्वयमकडे अस काहीच होणार नाही. दोन लोकांची फॅमिली ती. मला काहीच त्रास होणार नाही. म्हणून विचार करतेय की आयुष्याने एक संधी दिलीच आहे तर ती पटकन स्वीकारून घ्यावी कारण वाट पाहणारे कायम पाहतच असतात."

स्वरा आज काहीतरी वेगळी भासत होती म्हणून माधुरी तिला विचित्र नजरेने बघत होती. ती काही क्षण तिला तशीच बघत उदास स्वरात उत्तरली," म्हणजे तू खरच स्वयमशी लग्न करणार आहेस? आणि अन्वय सरांच काय? ते तुला प्रेम करायला आवडत नाही म्हणून सोडून गेले ना? त्यांचं काय? त्यांना काय उत्तर देणार आहेस? त्यांच्याशी नजर मिळवू शकशील? बोल??"

स्वरा हसतच उत्तरली," मधू मला नाही माहीत सध्या ह्या प्रश्नाचं उत्तर पण देईन काहीतरी. तू नको काळजी करूस. एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत तर हे पण शोधेन."

माधुरी काही बोलणार त्याआधीच स्वरा पुन्हा म्हणाली," मधू नो मोर क्वशन्स प्लिज. आधीच डोकं तापल आहे पुन्हा नको हे सर्व. शांत राहा आणि मलाही राहू दे. "

स्वरा आता शांत बसली होती तर माधुरी खिडकीतून बाहेरचा नजारा पाहण्यात बिजी झाली. आज एक क्षण माधुरी स्वराशी बोलली नव्हती. स्वरा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. माधुरीच स्टेंशन आलं आणि ती आज स्वराशी न बोलताच बाहेर गेली. स्वराला तीच क्षणभर हसू आलं होतं पण ती काहीच म्हणाली नाही.

पावणे अकराच्या आसपास झाले होते जेव्हा ती ऑफिसला पोहोचली. सर्वात आधी तिने डेस्कवर जात बाप्पाला प्रणाम केला आणि हळूच आवाजात म्हणाली," गुड मॉर्निंग दीपिका दि!"

स्वराच्या आवाजाने दीपिकाने आपलं डोकं लॅपटॉपमधून काढलं आणि हळूच आवाजात उत्तरली," गुड मॉर्निंग स्वरा. कशी होती मग दिल्लीची ट्रिप?"

स्वरा काही बोलण्याआधीच अरुण काका जवळ येत म्हणाले," स्वरा मॅडम, कार्तिक सरांनी तुम्हाला लगेच केबिनमध्ये बोलावलं आहे."

कार्तिक सरांचा फर्मान येताच स्वरा सरळ केबिनकडे वळाली आणि बाहेर जात तिने परवानगी मागितली," मे आय कम इन सर?"

कार्तिक हसतच उत्तरला," प्लिज."

स्वरा मध्ये गेली आणि नम्र आवजात ती उत्तरली," सर आपने मुझे बुलाया था?"

कार्तिकने तिला हसतच म्हटले," हो गये हॉलिडे? क्या अब हम काम कर सकते है या कोई और प्रॉब्लेम है. पेहले सोचा पुछ लु वरणा बाद मे और छुट्टी मांगणे लगोगी. है कुछ काम?"

स्वरानेही हसतच रिप्लाय केला,"हा सर हो गया हॉलिडे. अब मुझे कोई काम नही. बाहर के सारे काम निपटा दिये है. अब मै छूट्टी नही लेणे वाली. बोलीये क्या काम है सर?"

कार्तिक तिच्या हातात फाइल देत म्हणाला," ठीक है. ये फाइल है इसे पढ लो. अगले कुछ दिनो मे तुम्हे फिरसे पुना जाना पडेगा इस प्रोजेक्ट के लिये. देख लो और कोई प्रॉब्लेम रही तो बात करते है. काम जलदी खतम करणा है इसलीये तुम्हे इतनी जलदी बता रहा हु. वक्त पर कर लोगे ना??"

स्वरा त्यांना क्यूट स्माईल देत उत्तरली," आपण टेन्शन फ्री हो जाइये सर. काम के वक्त मै कभी बहाणे नही करती. मै आऊ सर?"

कार्तिकने जायची परवानगी दिली आणि स्वरा फाइल घेऊन बाहेर पोहोचली. दीपिकाही आपल्या लॅपटॉपमध्ये मान घालून काम करत बसली होती. त्यामुळे तिच्याशीे बोलण्यापेक्षा स्वराने फाइल बघायला घेतली. आज फाइल बघून तिने सर्व पॉईंट्स हायलाइट्स करून घेतले आणि त्यानंतर ती सुद्धा लॅपटॉपमध्ये बिजी झाली. स्वराने एक तर सतत सुट्ट्या घेतल्या होत्या त्यामुळें आज पेंडिंग काम खूप बाकी होत आणि आता तर नवीन प्रोजेक्टमुळे तीची आणखी डोकेदुखी वाढनार होती. जेव्हापासून स्वरा कामात भिडली तेव्हापासून तीच फक्त कामावर लक्ष होत. आज तिने दुपारचा टिफिनदेखील खाल्ला नव्हता. आज पूर्ण दिवस तिने फक्त कॉफीवर काढला. स्वराची हीच खासियत होती. ती एकदा कामात व्यस्त झाली की मग कामासमोर तिला काहीच सुचत नसे. आज सकाळपासून कामाला लागलेली स्वरा सायंकाळ झाली तरी काम करायचं थांबली नव्हती. सायंकाळ झाली आणि सर्व ऑफिसमधून बाहेर जाऊ लागले तेव्हा दीपिकाच म्हणाली," स्वरा निघायच नाही का?"

स्वराने आता नजर वर केली आणि घड्याळात बघितले. ऑफिसचा टाइम झाल्याचे लक्षात येताच तिने लॅपटॉप बंद केला आणि दोघीही बाहेर जाऊ लागल्या.

दोघीही शांत शांत चालतच होत्या की दीपिका उत्तरली," काय स्वरा मॅडम कशी झाली ट्रिप? आता मस्त फ्रेश वाटत असेल ना काम करायला?"

स्वरा चेहऱ्यावर हसू आणत उत्तरली," हो खूप जास्त फ्रेश वाटत आहे. आपल्या लोकांना भेटण्याची मज्जाच वेगळी. ते सोबत असले की चेहऱ्यावर आपोआप हसू येत म्हणून कधी कधी सुट्ट्या घेऊन फिरून यावं. कामात पुन्हा मन लागत."

स्वराच उत्तर ऐकून दीपिका काही वेळ शांत झाली आणि पुन्हा उत्तरली," पण मला सांग तू अन्वय सरांना का भेटली नाहीस दिल्ली जाऊनसुद्धा? ते नाही म्हणाले होते तर तू जायच होतस त्यांच्याकडे?"

स्वराने तिच्याकडे पाहत म्हटले," ताई तुला कस माहिती आम्ही भेटलो नाही ते?"

दीपिका हसतच उत्तरली," अग मला सरांची खूप आठवण येत होती तर मी कॉल केला होता त्यांना आणि सांगितलं की तू दिल्लीला आली आहेस. त्यांना विचारलं स्वरा भेटली की नाही म्हणून?"

स्वरा तिला मधातच अडवत उत्तरली," काय म्हणाले मग सर? रागावले का?"

दिपिका हसतच उत्तरली," सर म्हणाले की तिने मला विचारलं होत पण मीच म्हटलं माझ्याकडे वेळ नाहीये. सो नाही झाली भेट. भेटू मी फ्री होईल तेव्हा. मी सॉरी म्हणाले म्हणे तिला भेटू शकलो नाही म्हणून."

दीपिकाच्या शब्दाने स्वरा शांतच झाली कारण तिला वाटलं होतं की त्यांना स्वरा दिल्लीला आल्याचं कुणीच सांगणार नाही. स्वरा दिल्लीला येऊनही त्यांना भेटली नाही हे माहिती झाल्यावर त्यांना कस वाटल असेल म्हणून स्वरा स्वतःच विचारत पडली. तिला आता स्वतःच्याच वागण्याच वाईट वाटत होतं. ती विचार करत होती की स्टेशन आलं आणि दीपिका आपल्या ट्रेनकडे गेली.

दीपिकाच्या शब्दाने आता स्वराचा मूड खराब झाला होता. अचानक तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी गायब झाला. ती विचार करतच होती की ट्रेन आली आणि ती धावतच चढली. ट्रेन धावत होती तर स्वराच डोकंही तेवढ्याच स्पीडने धावत होत. स्वयमच्या प्रश्नांनी तिचा पिच्छा सोडला नव्हता तर आता अन्वयच्या विचाराने ती बेचैन झाली होती. काही क्षण गेले. वांद्रेला ट्रेन आली आणि माधुरीही चढली. स्वरा अगदी तिच्यासमोर होती पण माधुरी काही बोलायच नाव घेईना म्हणून स्वरा जरा हळू आवाजात उत्तरली," काय झालं वेडोबा अजून राग गेला नाही का?"

माधुरीने ऐकून सुद्धा न एकल्यासारख केलं होतं. काही क्षण स्वरा शांत होती आणि हसत उत्तरली," म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी लग्न करायला हवं पण केवळ अन्वयशीच!! बाकी कुणाशीच नाही. मला एक सांग आपल्या मुलींना एक चॉइस नसते का ग मुलगा निवडण्याची?? तुझ्यासाठी मी लग्नाचा निर्णय घेतला आहे ते महत्त्वाचं आहे की मी अन्वयशी लग्न करणार नाहींये हे महत्त्वाचं आहे? तुला काय वाटत मधू माझा गोंधळ उडत नाहीये. मीही तोच विचार करत असते दिवसरात्र पण उत्तर मिळत नाहीये. खर सांगू तर अन्वयमुळे प्रेम करायला शिकले पण एकाच वेळी दोन लोक आयुष्यात येतील आणि प्रेम करतील अस कधीच वाटलं नव्हतं. तरीही मी माझ्या परीने घेतेय निर्णय. माहिती आहे की माझ्या निर्णयामुळे कुणितरी एक दुखावला जाईल पण माझ्याकडे काय पर्याय आहे. तूच सांग मधू मी काय करायला हवं? कुणाच मन तोडू आणि कारण काय देऊ? की त्यांचा विचार करताना हसन विसरून जाऊ? ते अचानक आयुष्यात आले तर त्यात माझी काय चूक?"

स्वरा हसता- हसता केव्हा सिरीयस झाली ते तिलाच कळलं नाही आणि माधुरी तिचा हात पकडत म्हणाली," सॉरी ताई! माझ्या लक्षात नाही आलं ते. तू काय फिल करत आहेस ते खरच कळलं नाही. सॉरी!!! आणि तुला हवा तो निर्णय घे. मी नाही करणार अट्टहास!! कदाचित माझ्या मनात अन्वय सरांची प्रतिमा बसली आहे म्हणून मला ते बेस्ट वाटत आहे तुझ्यासाठी. मी स्वयमला बघितलं नाही ओळखत नाही म्हणून त्यांच्याबद्दल माहिती नाही. असो तू माझं मनावर घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना मी लहान आहे काहीही बडबड करत असते सो माझं मनावर नको घेऊस. तू घे निर्णय. मी नाही करणार हट्ट आणि नाही घेणार नाव आता सरांच पुन्हा कधीच. माझ्या शब्दांमुळे दुखावली असणार तर सॉरी पुन्हा एकदा."

त्या दोघीही अस काही बोलल्या होत्या की समोर त्यांना बोलायला काहीच उरल नाही. तो एक तास दोघीमध्ये भयानक शांतता होती आणि ती संपली ट्रेनच्या वसईला पोहोचण्याने. त्यांनी एकमेकांना खोट हसू दाखवून आपल्या वाट बघितल्या होत्या. स्वरा सहसा रागावत नसे पण आज ती तिच्यावर रागावून गेली आणि त्यानंतर तीच तिलाच वाईट वाटत होतं. तर आपण ताईला दुखावलं म्हणून माधुरीलाही वाईट वाटत होतं पण सध्या कुणीच कुणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या..

खबर है मुझे उनके प्यार की
मेहसुस करती हु मै उनकी सादगी
पर क्या हक नही है मुझे खुदकी राह चुनने का?
मै लडकी हु येही वजह है इस बात की??

ती रात्रीची वेळ होती. स्वरा जेवण करून निवांत गादीवर पडली होती आणि तिच्या डोक्यात पुन्हा एकदा विचार येऊ लागले. तिला आता माधुरीवर रागावल्याच वाईट वाटत होतं. माधुरीच काय असे कितीतरी लोक होते ज्यांना अन्वय खूप आवडून गेला होता त्यामुळे ते त्याच्याबद्दलच विचार करणार होते तर स्वयम तिच्यासोबत भविष्याचे स्वप्न पाहू लागला होता आणि तिचा दुहेरी गोंधळ उडाला होता. तिला नक्की काय निर्णय घ्यावा कळत नव्हतं. ती विचार करतच होती की स्वयमच्या आईचा फोन आला आणि ती उचलत म्हणाली," हा बोलीये आंटी. कैसी हो आप?"

स्वयमच्या आई हसतच उत्तरल्या," बस सब कुछ ठीक. तुम्हारी बहोत याद आ रही थि ना सो कॉल कर लिया. तुम बताओ कैसी हो? बिजी तो नही?"

स्वरा हळूच हसत उत्तरली," मै ठीक हु. नही बिजी नही. इस वक्त कोणसा काम. अच्छा हुवा आपणे कॉल किया. वैसे भी अकेले बैठकर बोर हो रही थि. वो छोडीये आपका बेटा कैसा है? कहा गया वो? कॉल भी नही किया उसने?"

त्याच्या आई जरा उदास होत उत्तरल्या," शायद ठीक नही है. कलसे घर आया है तबसे गुमसुमसा बैठा है. ना कुछ बात कर रहा है, ना कुछ खा रहा है. शायद तुम्हे बहोत याद कर रहा है. पता नही उसके दिलमे क्या चल रहा है पर ऑफिससे आया है तबसे दरवाजा लगाकर अकेलेही बैठा है.काम का टेन्शन है या किसीं और बात का पता नही."

स्वरा त्यांच्याशी टेन्शन कमी करायला बोलली होती पण स्वयमबद्दल ऐकून अजून तीच टेन्शन वाढलं होत. सेम फिलिंग तर तिचिही होती. त्यांचं बोलून ऐकून आता स्वरा शांतच झाली. पुढे फक्त त्याच्या आईच बोलत राहिल्या. स्वरा तर केवळ हो ला हो लावत होती. स्वरा काहीच बोलत नाहीत, ती थकली असेल म्हणून शेवटी काही वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला आणि स्वराने हातातला फोन बाजूला ठेवला. तिने फोन ठेवलाच होता की तिचा मोबाइल पुन्हा एकदा वाजला आणि ती मोबाइल बघू लागली. त्याच्यावर स्वयमचा मॅसेज होता. तिने तो लगेच वाचायला घेतला.

" स्वरा मेरी हिम्मत नही हुयी तुम्हे सामने बताने की इसलीये मॅसेज करके बता रहा हु. तुम्हे याद है जब तुम घर से कॉलेज जॉईन करणे आयी थि तब तुम्हे कुछ लडको ने छेडा था. तब मैं तुम्हे वहा से देख रहा था. सोचा था की उनको जाकर मारू पर पैर वही रुक गये ये सोचकर की किस हकसे? तभी मैने सोच लिया था की अगर तुम मेरी जिंदगी मे वापस लौट आयी तो तुम्हे सब से बचा लुंगा. तुमपर किसीं की परछायी पडणेसे पेहलेही माई हाजीर जो जाऊंगा. इसलीये शायद ऊस दिन खुद को रोख ना सका. आगे भी तुम्हे बचाने के लिये कुछ करणा पडे तो शौक से कर जाऊंगा. तुम्हे मेरे सामने कोई कुछ बोले मुझे मंजूर नही. आगेभी ऐसें हालात आये तो मै वही करुंगा. ऊस वक्त साथ न दे सका तो क्या हुआ? आगे जिंदगीभर साथ निभाउंगा."

तिने मॅसेज वाचलाच होता की दुसरा मॅसेज आला

" मैने तूम्हे जो गिफ्ट दि है उसे जरूर देख लेना."

स्वयमचा मॅसेज बघताच तिला गिफ्टबद्दल आठवलं आणि तिने पटकन बॅग मधून गिफ्ट काढल. तिने पटकन रॅपर अनपॅक केलं आणि गिफ्ट बघू लागली. त्यात तीच रिंग होती. फक्त त्यात एक नोट लिहिला होता.

" स्वरा तुम्हारे दिलं मे जो है उसके नामसे ये रिंग पेहेन लेना. वक्त चाहे जितना लो पर इस रिंग का सम्मान करणा."

स्वराला ती रिंग आणि ते शब्द पुन्हा त्रास देत होते. तिने ती रिंग तशीच बाजूला ठेवली आणि विचार करू लागली.

" कोण आहे तिच्या मनात?"

तो जो तिच्यासाठी जगाशी भांडण करून तिला सुरक्षित ठेवू इच्छितो की तो ज्याने तिच्यात ऊर्जा भरून जगायला शिकविल. हा प्रश्न जणू कोड नाही तर तीच जीवन बनत चालला होता. नेमकं कोण होत मनात?

तिला काहीच सुचत नव्हतं आणि तिने बाजूला पडलेलं एअरफोन कानात टाकले. काहीच क्षणात गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले. ते बोल जे खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याच्या गोंधळाशी निगडित होते.

मेरे मन ये बता दे तू,
किस ओर चला है तू ?
क्या पाया नहीं तुने,
क्या ढूँढ रहा है तू ?

जो है अनकही, जो है अनसुनी
वो बात क्या है बता
मितवा…
कहे धड़कने तुझसे क्या
मितवा…
ये खुद से तो ना तू छुपा

मितवा…

जीवन डगर में, प्रेम नगर में
जीवन डगर में, प्रेम नगर में
आया नज़र में जब से कोई हैं
तू सोचता है, तू पूछता हैं
जिसकी कमी थी क्या ये वही है
क्या ये वही है ,क्या ये वही है??

तू एक प्यासा और ये नदी हैं
काहे नहीं इसको तू खुलके बताये
जो है अनकही, जो है अनसुनी
वो बात क्या है बता
मितवा…
कहे धड़कने तुझसे क्या
मितवा…
ये खुद से तो ना तू छुपा

तेरी निगाहें, पा गयी राहें
पर तू ये सोचे, जाऊं ना जाऊं
ये ज़िन्दगी जो, है नाचती तो
क्यूँ बेड़ियों में है तेरे पाँव
प्रीत की धुन पर, नाच ले पागलं
उड़ता अगर है, उड़ने दे आँचल
काहे कोई अपने को ऐसे तरसाए

जो है अनकही, जो है अनसुनी
वो बात क्या है बता
मितवा…
कहे धड़कने तुझसे क्या
मितवा…
ये खुद से तो ना तू छुपा

मेरे मन ये बता दे तू,
किस ओर चला है तू ?
क्या पाया नहीं तुने,
क्या ढूँढ रहा है तू ?

वरवर किती सोपं वाटत ना एकाला निवडन पण जर प्रेम दोघांचही खर असेल तर मग काय करायचं. स्वरा कायम स्वतःला एक प्रश्न विचारत होती माझी काय चूक? इथेही तोच प्रश्न होता. नेमकी कुणाची चूक? स्वयम ज्याने वडिलांना वचन दिले म्हणून तो तिचा होऊ शकला नाही. अन्वय ज्याने तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्यापासून दुरावा बनविला की स्वराची जी फक्त कुना एकाला निवडू शकत होती??

बडी बारिकी से धुंड रही वो नजर
जो सच्चे प्यार को मेहसुस कर सके
क्या कला है ये कोई नयी
या नये अनुभव को समेंटना है??

क्रमशा.....