भाग्य दिले तू मला - भाग ७० Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ७०

ईश्क करणे की सजा
क्या सुनाई है जमाने ने
वजुद छिनकर पुछते है
क्या मोहब्बत रास आयी है तुम्हे?

आयुष्यात शाश्वत काहीच नसत. ना सुख, ना दुःख हे सत्य जवळपास सर्वानाच माहीत आहे पण स्वराच्या आयुष्यात ही म्हण कधीच लागू होत नाही. तिला फक्त काही क्षण सुख मिळायच आणि मग पुन्हा दुःख तिची आतुरतेने वाट बघत बसायचे. भाग्यदेखील तिची कसली परीक्षा घेत होत काय माहिती. मान्य की ती कणखर होती म्हणून देवाने इतकी परीक्षा का घ्यावी हा प्रश्न सर्वाना पडत होता पण त्याच उत्तर कुणाकडेच नव्हतं. ही स्वराच्या आयुष्याची शेवटची परीक्षा होती.आजपर्यंत स्वराने जितकी दुःख आयुष्यात सहन केली नव्हती त्यापेक्षा जास्त दुःख तिला ह्या प्रवासात मिळणार होती आणि स्वराने ते हसून स्वीकारलं होत. अन्वयसोबत सुखही मिळणार होतेच पण ते फक्त वेदनेवर फुंकर घालण्या इतके. अन्वयच्या पुन्हा एकदा विचार कर ह्या वाक्यातच तिला पुढचा प्रवास कसा असेल ह्याची जणीव झाली होती. ती ही परीक्षा द्यायला तयार झाली होती ते फक्त तिच्या प्रेमासाठी अन्यथा तिला आता कुठलीच परीक्षा नको होती. आजपर्यंतचा तिचा प्रत्येक प्रवास एकटीचा होता पण आता तो सोबत होता. तो तिला जसा आनंद देणार होता तसेच तिच्यामुळे त्याला आता बोल खावे लागणार होते म्हणून ती थोडी चिंतीत होती. कदाचित तिला हा दोष कायमच ऐकावा लागणार होता की तिने एक हसत-घरत खेळ उजळवल आहे. स्वराला ह्याची जाणीव होती आणि कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत हा दोष तिला सहन करावा लागणारच होता. ती तो दोष नाहीसा करेल की त्या दोषासाहित हे जग सोडेल हे फक्त तीच भाग्य सांगणार होत.

स्वरा... एक उदाहरण सर्व काही गमावून खूप काही जिंकण्याच. ती जिंकायला जन्माला आलीय तरीही प्रत्येक गोष्ट तिच्या हातात नाही. तिला प्रत्येक वेळी स्वतःच्या नशिबावर अवलंबून राहावे लागते ह्यापेक्षा एका व्यक्तीच दुर्दैव नक्की काय असेल. ह्या एका वाक्यात स्वराचा प्रवास सापडतो. ही तिची कथा नाही तर तीच जीवन आहे. असा संघर्ष जो कदाचित तिच्या शेवटच्या श्वासानेच नाहीसा होईल. कुणी विचार केला की नाही माहिती नाही पण प्रत्येक स्वरा जीच्यासोबत असा अपघात झाला असेल तिला जवळपास तीन प्रवासातून जावच लागत. एक तिचा एकटीचा प्रवास. ज्यात ती रडते, हरते आणि पुन्हा नवीन उमेदीने जगासमोर उभी राहते. दुसरा प्रवास पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवण्याचा आणि तिसरा जर तिला लग्न करायच असेल, आनंद मिळवायचा असेल तर तिच्या जोडीदाराच्या घराकडून मिळणाऱ्या वागणुकीचा प्रवास. ह्या तीन प्रवासाशिवाय कुठल्याही स्वराच आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही म्हणून स्वराच्या आयुष्यात हा प्रवास सर्वात कठीण होता. खूप सोपं असत हो आयुष्य म्हणणाऱ्या लोकांनी स्वराचा हा तिसरा प्रवास अनुभवून बघावा कदाचित नाते ह्या शब्दांचा सुंदर अर्थ सर्वाना इथेच सापडेल. मग ती स्वरा असो की संपूर्ण समाज. खरी नाती कोणती असतात ह्याच उत्तर कायम संघर्षात सापडत म्हणूनच कदाचित स्वरानेही हा प्रवास स्वखुशीने निवडला होता.

अन्वयने स्वराला लग्नाची तारीख कळवली आणि दिवस कसे पटापट जात आहे ह्याचा अंदाज येऊ लागला. स्वराला आता एकटीला दिल्लीला जायचं नव्हतं त्यामुळे स्वरा दोन दिवस गावीच थांबली होती. तिच्या आईवडिलांना कायमच इथून तिकडे न्यायच असल्याने स्वराने त्यांना वेळ दिला होता. ह्या दोनदा दिवसात स्वराचे बाबा-आई सर्वाना भेटून आले होते कदाचित त्यांनाही माहीत होतं की ह्यानंतर ते परत ह्याच जगात येणार नाहीत म्हणून कदाचित ते काही क्षण आपल्या लोकांत जगून घेत होती.

फायनली ती एक सकाळ उगवली. स्वरा आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली होती तर तिचे आई-बाबा अजूनही घराला चौफेर बघत होते. स्वराला फ्लाइटला उशीर होत असल्याने स्वरा मोठ्याने ओरडतच म्हणाली," आई, चला ना किती उशीर करणार? फ्लाइट सुटेल ना. चला पटकन आवरा सर्व."

स्वरा बोलून गेली तर आई-बाबा घरभर नजर टाकत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, चेहरा शांत जाणवत होता हे स्वराला जाणवताच ती अचानक शांत झाली. बाबा बाहेर येताच त्यांनी बाहेरून दाराला लॉक लावल. लॉक लावून झाल्यावरही ते काही वेळ तिथेच घराला बघत होते आणि स्वराने विचारले," बाबा, काही झालंय का?"

स्वराची आई डोळ्यावरून हात घेत उत्तरली," काही नाही वेडाबाई! त्यांनी हे घर स्वतःच्या मेहनतीने उभारल आहे ना सो त्यांना सोडून जाताना त्रास होतोय खूप. स्वरा तुझं बालपण असो की आमच्या लग्नाची पूर्ण कहाणी इथेच गेली. तरुण पनाच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ह्याच घरात आम्ही अनुभवला आहे. ह्यात आमचं हसन-रडन आहे, तुझं खेळण आहे. कधी वाटलं नव्हतं की हे घर सोडून जावं लागेल. खूप आठवणी आहेत ह्या घरासोबत म्हणून पाय निघत नाहीये स्वरा. फक्त तुझ्यासाठी आम्ही हे घर सोडतोय नाही तर आम्ही एकमेकांना वचन दिल होत की आमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण इथेच घालवू."

स्वराने आईबाबकडे नजर टाकली. ते थोडे भावुक जाणवत होते आणि स्वरा हळुवार आवाजात म्हणाली," सॉरी आईबाबा!! माझ्यामुळे तुम्हाला हे घर सोडाव लागत आहे ना. तस असेल असेल तर तुम्ही राहा इथेच. मी येत राहीन तुम्हाला भेटायला. माझ्या लक्ष्यात नाही आलं की कितीतरी आठवणी जुळून असतील तुमच्या ह्याघराशी. सॉरी!! तुम्ही राहा इथेच, अन्वय सरांना पण समजावते मी. ते समजून घेतील मला विश्वास आहे."

बाबांची नजर आताही घरावर फिरत होती आणि आतापर्यंत शांत असलेले बाबा उत्तरले," स्वरा घर म्हणजे चार भिंती नाहीत ग! घर म्हणजे कुटुंब आणि ते तुझ्याविना पूर्ण होऊ शकत नाही. मान्य की इथे आमच्या आठवणी आहेत पण आम्ही इथे आणि तू तिथे राहिलिस तर तुझी चिंता सदैव आम्हाला सतावत राहील. तूच आमचं जग आहेस बाळा. तुझ्याविना आमचं आहे तरी कोण? काळजी करू नको आपण आपलं नवीन घर बनवू, आपली वेगळी दुनिया बनवू. बनतील पुन्हा एकदा आठवणी नव्याने पण तुझ्याविना आम्हाला जगणं शक्यच नाही. आज भावुक होतोय हे खरं आहे पण उद्या तुझ्यासोबत असताना आम्ही तितकेच समाधानी असू ह्यात शंका नाही."

बाबांच बोलणं ऐकून स्वरा क्षणभर हसली आणि सर्व बाहेर पडले. बाहेर पडताना आई-बाबांनी कितीतरी वेळा घराला वळून बघितले होते. संपूर्ण आयुष्याच्या आठवणी त्यांनी डोळ्यात साठवून घेतल्या आणि तेदेखील स्वरासोबत एका नवीन प्रवासास सज्ज झाले. त्यांनी बाहेर पाऊल टाकलच होत की उषा काकू म्हणाल्या," अग सारिका! गावात ऐकण्यात आलय ते खरं आहे का? तुझ्या मुलीच लग्न ठरलंय म्हणे म्हणून जात आहात का तुम्ही?"

स्वराची आई हळुवार उत्तरल्या," हो ग उषा!! एकुलती एक मुलगी आहे. इथेच लग्न करणार होतो पण लेकीची इच्छा आहे की कोर्टात करायचं म्हणून दिल्लीला जाऊन करणार आहोत लग्न. आम्हीही आता तिकडेच राहणार आहोत कायमचे. येत जात राहू. उषा माझ्या घराकडे लक्ष दे जरा!"

उषा बाई हसत म्हणाल्या," वा मस्त बातमी दिलीस सारिका!!पोरीचे चांगले दिवस सुरू झाले हे बघून आनंद होतोय. स्वरा अभिनंदन हा लग्नासाठी. सुखाचा संसार कर आणि कधी- कधी आम्हालाही आठवण कर."

स्वरा हसतच उत्तरली," चला ना काकू दिल्लीला लग्नाला!"

काकू हसतच उत्तरल्या," हेच आमचे जग स्वरा इथून कुठे जाणार. तू जा आणि सुंदर आयुष्य जग. ह्या जगाने तुला खूप त्रास दिलाय. आता तरी तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस ह्यावे अशी भगवंताला प्रार्थना करते."

स्वराने हसत- हसत त्यांचं अभिनंदन स्वीकारलं आणि समोर जाऊ लागल्या. सकाळची वेळ असल्याने गाव जरा चमकत होत. घरोघरी लोकांचे आवाज येत होते आणि त्या गर्दीतून स्वरा, तीच कुटुंब समोर जात होत. ह्या दोन दिवसात पूर्ण गावाला माहिती झालं होतं की स्वराच लग्न जुळलं आहे त्यामुळे आज तिला इथून जाताना पूर्ण गाव बघत होत. स्वराच लग्न म्हणजे गावासाठी जणू चमत्कारच होता. हया गावात कुणीच विचार केला नव्हता की स्वराच लग्न होईल पण तोही दिवस आल्याने लोक विचित्र नजरेने स्वराकडे बघत होते. त्यात तीही मूल होती ज्यानि तिला क्षणाक्षणाला डिवचले होते पण आता जेव्हा त्यांना माहिती पडलं की तीच केवळ लग्नच जुळत नाहीये तर तिचा नवरा कितितरी हुशार, देखणा आहे तेव्हा त्यांच्या नजरा खाली झाल्या. त्यांच्या नजरा खाली झाल्या होत्या तर एक वेळी गावात नजर खाली करून आलेली स्वरा आज नजर वर करून सर्वाना पाहत होती. ते समोर जात होते आणि लोक त्यांना बघत राहिले. सर्वच लोक तिला विचित्र नजरेने बघत नव्हते तर काही तिचे हितचिंतकसुद्धा होते. स्वराला कायम सपोर्ट करणाऱ्या लोकांच्या नजरेत तिला आज अश्रू दिसत होते म्हणून ती क्षणभर सुखावली होती. आज स्वराला बोलणाऱ्या लोकांकडे बघून एकच गोष्ट लक्ष्यात येत होती, म्हणतात ना वेळ सर्वांची येते फक्त दुखाला हरवता आलं पाहिजे मग तुम्ही जे डिजर्व करता ते मिळतच. मग पैसे, संपत्ती किंवा मग सुंदर जोडीदार असो. वेळ बदलते फक्त त्यासाठी मेहनत करून वाट बघावी लागते. स्वराने ते केलं आणि आज ती समाजासाठी आदर्श बनली होती.

तिने काही पावले पुढे टाकलेच होती की तिला शांती आजी दिसली. शांती आजी दिसताच स्वराने त्यांना नमस्कार केला. आजी आशीर्वाद देताना म्हणाल्या," बाळ स्वरा खूप सुखी राहा! तुला अंगाय- खांद्यावर खेळवल तेव्हापासून ओळख आहे आपली. आता तू जाते आहेस तर वाईट वाटत आहे पण बर आहे. इथे राहून फक्त तुला त्रासच मिळाला असता. जा बाई आणि सुखाचा संसार कर. ह्या आजीचे आशीर्वाद कायमच तुझ्यासोबत असणार आहेत."

शांती आजी ही त्यातली होती जी तिला कायमच मदत करत असे. स्वराचा अपघात झाला होता त्या काळातही त्या तिची विचारपूस करायला येत होत्या आणि तिचे अश्रू पुसत होत्या. त्यामुळे त्यांना भेटून स्वरा जरा भावुक झाली होती. स्वरासोबतच सर्वच आजीला भेटले आणि समोर निघून आले. काही अंतरावरच त्यांची टॅक्सी वाट बघत होती. तिघांनीही एकदा गावाकडे डोळे भरून बघितले. काही त्यांचे हितचिंतक त्यांना बघायला आले होते. त्यांना नजरेनेच त्यांनी अभिवादन केले आणि टॅक्सी सुरू झाली..टॅक्सी जात होती आणि तिघेही मागे वळून त्या लोकांना बघत होते. ह्या गावाने तिला नक्कीच त्रास दिला होता पण काही लोक असेही होते ज्यांनी त्यांना कायम साथ दिली म्हणून ते आज भावुक झाले होते. कदाचित त्यांचे आभार मानायची ही शेवटचीच वेळ होती..

दुसरीकडे अन्वयच घर.. दोन-तीन दिवस झाले होते. अन्वयने स्वराबद्दल घरात सांगितलं आणि कधी तरी हसणारे- खेळणारे लोक अचानक शांत झाले. अन्वय घरात तर राहत होता पण मनाने तो घरात कधीच नव्हता. त्याने कुणाशी बोलणं सोडलं नव्हतं पण त्याला घरात मनमोकळंपणे वागणं जमलं नव्हतं. तो सकाळी लवकर ऑफिसला निघायचा आणि रात्री उशिरा घरी पोहोचायचा. त्याने स्वतःकडे लक्ष देणे सोडलं आणि त्याचा त्याच्या तब्येतीवर परिणाम होताना दिसू लागला. कदाचित घरच्यांना दुखावलं म्हणून तो स्वतालाच शिक्षा देत होता. त्याला घरात वाद नको होते म्हणून तो शांत बसला होता. अन्वय- अन्वयची आई म्हणजे त्यांच्या घराची शान. ते सतत बोलत असत त्यामुळे घराला शोभा होती पण आता ती शोभा ते शांत असल्याने कुठेतरी हरवली होती. अन्वय आजही उठला आणि फ्रेश होऊन सोफ्यावर बसला. तो शु घालतच होता की आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," ए निहारिका तुझ्या भावाला सांग की नाश्ता बनवून तयार आहे. खाऊन जा. दोन- तीन दिवस झाले नीट काही खात नाहीये तो. त्याला हेही विचार की आता आमच्या हातच जमणार आहे की सरळ बायकोच्या हातचच खाणार आहे! नाही तस असेल तर तोंड उघळून सांग म्हणावं. तस पण लग्नाची बातमी तर दिलीच तोंड उघडून मग आता काय जात घळाघळा बोलायला? आता का बसला आहे मूग गिळून?"

आईच बोलणं होताच निहारिका ओरडतच म्हणाली," ए आई मला नको ओढू हा तुमच्या भांडणात! तू ना जास्तच करतेस कधी-कधी..तो लग्नाचं सांगत होता तेव्हा किती खुश होतीस. जात- धर्म पण विचारला नाहीस त्या मुलीचा पण सुंदर नाही हे ऐकून इतक बोलून गेलीस त्याला. लग्न त्याला करायचं आहे ना मग त्याला ठरवू दे त्याची बायको कशी असेल तर. त्याच प्रेम आहे तिच्यावर मग तो नाही करणार का लग्न? तुला तर अभिमान वाटायला हवा की त्याने प्रेम करून तिला तसच सोडून दिलं. अभिमान तर नाहीच पण त्यालाच बोलत असतेस. मी म्हणते काय चुकीच केलं माझ्या भावाने?"

निहारिकाच बोलणं होताच अन्वयची आई मोठ्यांने ओरडतच म्हणाली," निहारिका अलीकडे तुझी जीभ जास्तच तुरुतुरु चालू लागली आहे अस नाही वाटत का तुला?? ही जीभ ना सासरी चालव माझ्याकडे नाही समजलं ना?? आणि काय ग कुणी अडवलं त्याला लग्न करायला? म्हणतेय की कर म्हणून पण हे सत्य आहे की ती त्याची बायको असेल माझी सून नाही. त्याने खुशाल करावं तिच्याशी लग्न पण माझ्याकडून कसलीच अपेक्षा करू नये. त्याला काय माहीत जीवन जगत असताना समाज किती महत्त्वाचा असतो? त्यांचे नियम पाळावे लागतात रोज आणि मी नाही जाऊ शकत समाजाच्या विरोधात. तू म्हणतेस ना त्याने काय चूक केली मग मला सांगा मी कुठे चुकले? काय कमी केलं ग तुम्हाला? बदल्यात एक इच्छा माझी फक्त सुंदर सुनेची. त्यात काही गैर आहे का? आईने इतकीही अपेक्षा करू नये का मुलांकडून? माझ्या सोन्यासारख्या देखण्या मुलाला त्याला शोभेल अशी मुलगी शोधावीशी वाटली तर त्यात काय चुकलं माझ? बर सुंदर नाही म्हणजे काळी- सावळी पण नाही ह्याची बायको तर सरळ जिच्या चेहऱ्याला बघून घाबरून जावं अशी मुलगी आणली ह्याने. अजून बघितलं नाही तरी इतकी भीती वाटतेय, बघितलं तर काय होईल?? ऍसिड अटॅक झालाय म्हणजे नक्किच काहीतरी कारस्थान करून ठेवल असणार तिने, ती झळ तिच्यासोबत येईल ते वेगळंच राहील. इतके सर्व प्रॉब्लेम एका मुलींमुळे घरात येत असतील तर त्या मुलींना न स्वीकारणं शहाणपणा की स्वीकारणं शहाणपणा? आम्ही काय जग बघितलंच नाही ना ग? आम्हाला काहीच कळत नाही का? अशा मुली फक्त मुलांना फसवायला येतात. तुझा भाऊ पैसेवाला दिसला तर फसवलं तिने एवढं पण समजत नाही का त्याला? असो इथे कशाला ओरडत बसले मी. नुसत दगडावर डोकं आपटण्यासारखा आहे हे. आमचं इथे ऐकतय तरी कोण? सर्व आपल्या मर्जीचे मालक. आता ह्याच्या एका निर्णयामुळे फक्त आम्हालाचं नाही तर निहारिका तुझी सासू पण ऐकवणार आहे. जग ऐकवणार. कुणाकुणाच बोलणं ऐकायचं आम्ही आणि कोणत्या चुकीची शिक्षा देतोय तुझा भाऊ आम्हाला?"

आईला बोलून- बोलून श्वास लागला. निहारिका पुन्हा काही बोलणार त्याआधीच अन्वयने तिला नजरेने शांत केले. निहारिका पुढच्याच क्षणी नाश्ता घेऊन आली. अन्वयने शांतपणे नाश्ता केला आणि बॅग घेऊन बाहेर पडला. तो जात होता आणि सृष्टी रडायला लागली. तिला रडताना बघुन अन्वय तिथेच थांबला. तिला हातात घेतल आणि समोर अंगणात जात तिला खेळवू लागला. तो आईच बोलणं ऐकून शांत होता आणि हळूच सृष्टीला म्हणाला," आजी खडूस आहे ना तुझी!! सतत ओरडत असते. तिला कळतच नाही आपलं जग म्हणजेच कुटूंब असत. तिला फक्त जगाची पडलेली असते. आपला मुलगा खुश आहे त्याने तिला फरक पडत नाही. जाऊ दे तिला. तुला नक्की भेटवेन मी मामीला. खूप सुंदर आहे ती. तू भेटशील ना तर तिची फॅन होशील?? भेटू हा आपण लवकरच!!"

अन्वय बोबड्या शब्दात तिच्याशी बोलत होता तर निहारिका मागून सर्व ऐकत होती आणि हळूच हसत म्हणाली," तीच ठीक आहे पण मला केव्हा भेटवणार रे?"

अन्वयने तिच्याकडे बघितलं पण तो काहीच बोलला नाही. त्याने पटकन सृष्टीला निहारिकाकडे सोपवलं आणि बॅग घेऊन बाहेर पडला. बाहेर कार पार्क केली होती. त्याने हळूच दार उघडले आणि कार मध्ये बसला. सिट बेल्ट बांधला पण गाडी सुरू केली नाही. काही क्षण त्याने निहारिकाकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडे बघत होती. तिला बघून त्याने हलकेसे स्मित केले आणि गाडी सुरू केली. तो प्रवास करत होता पण त्याच्या आईच्या एक-एक शब्द त्याच्या मनात तसाच घर करून बसला होता..

कभी अभिमान था माँ
तुझे मेरी हर बात पे
एक रास्ता क्या चुन लिया मैने
तुणे मुझसे मेरा गुरूर छिन लिया...

************

मुंबई…

स्वराच्या तीन- चार दिवस सुट्ट्या झाल्या होत्या. वसईला येऊन ती आता स्थिरावली होती. ऑफिसचे काही काम बाकी असल्याने, ते लवकरात लवकर पूर्ण करायचे असल्याने ती आज ऑफिसला आली. ती ऑफिसच्या दारावर पोहोचलीच होती की तिने आत डोकावून पाहिलं. सर्व कस शांत वाटत होतं. ती इकडे- तिकडे नजर फिरवत मध्ये पोहोचली. तिला येताना पाहताच दीपक म्हणाला," काय स्वरा मॅडम!! अलीकडे सुट्ट्यावर सुट्ट्या सुरू आहेत. कुठे फिरायला गेल्या असणार तर आम्हाला पण घेऊन जायचं होतं. मिळून एन्जॉय केला असता. तुम्ही तर एकट्या-एकट्याच फिरत आहात."

स्वरा त्याच्या बोलण्याने क्षणभर हसली आणि हळूच हसत म्हणाली," नाही हो सर घरी गेले होते. काहीतरी महत्त्वाचं होत काम म्हणून गेले होते. आताच आले."

दिपक हसत उत्तरला," हरकत नाही. मी गंमत करतोय. वेलकम स्वरा मॅडम."

स्वरा दीपकला मिश्किल हसू देत टेबलवर पोहोचली. तिने बॅग बाजूला ठेवली आणि डोळे मिटून बाप्पाला प्रणाम केला. दीपिका बाजूलाच बसली होती पण तिच्याशी नजर मिळवायची स्वराची काही हिम्मत झाली नाही कारण लग्नाची शंका असताना दीपिका अस वागत होती तर लग्नाची बातमी ऐकल्यावर ती कशी वागनार होती तिला समजत नव्हतं म्हणून नजर चोरत ती आपल्या कामाला लागली तेवढ्यात दीपिकाच म्हणाली," काय स्वरा मॅडम? आज गुड मॉर्निंग नाही काही नाही. वरून इतक्या दिवसापासून गायब आहेस. लग्नाची बोलणी पक्की झाली वाटत तेव्हाच तर घरी गेली होतीस. तस काही असेल तर बिनधास्त सांग हा. आम्ही येऊ मदत करायला."

स्वराने तिच्यावर नजर फिरवली. दीपिकाचा चेहऱ्यावर मिश्किल हसू होत पण तिच्याशी नजर मिळविण्याची हिम्मत तिची झाली नाही. ती पहिल्यांदाच तोंड उघडून बोलली," गुड मॉर्निंग ताई!"

दीपिकाही हसत उत्तरली," गुड मॉर्निंग स्वरा मॅडम!! पण मी विचारलं त्याच तर उत्तर द्या. लग्नाची बातमी तर नाहीये ना?"

तिचा प्रश्न ऐकून स्वराचे श्वास वाढले होते. तिला काय बोलू सुचत नव्हतं आणि तेवढ्यात कार्तिक समोर आला. त्याचा चेहरा आज जरा रागीट वाटत होता. कार्तिकने तिला बघितले आणि तो तिथेच थांबत म्हणाला," स्वरा इन माय केबिन राइट नाऊ?"

त्याचा मूड खराब असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे तिने केबिनला जायला क्षणभरही उशिर केला नाही. तो केबिनमध्ये पोहोचलाच होता की स्वरा उत्तरली," मे आय कम इन सर?"

तो रागातच उत्तरला," प्लिज!!"

स्वरा आता त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. तो आज बऱ्याच रागात होता म्हणून त्याचे काम नीट होत नव्हते. कितीतरी वेळा फाइल पडल्या होत्या. तो उचलत जायचा पुन्हा त्या फाइल पडत होत्या. स्वरा ते सर्व बघत होती. फायनली त्याने फाइल्स रागातच टेबलवर आपटल्या आणि खुर्चीवर बसत म्हणाला," स्वरा तुम्हारा क्या शुरु है? मैने कहा था ना छुट्टी नही मिलेगी. मैने नही कहा तो सिधे उपर से फोन करवाया. वो तो ठीक है पर अब सिधे ट्रान्सफर वो भी दिल्ली. क्या चल रहा है स्वरा? मुझे लगा तूम्हे काम से प्यार है पर तुम तो कामसेही भाग रही हो. सच बोलू तो मुझे कामसे भागणे वाले लोग बिलकुल पसंद नही. क्या चल रहा है तुम्हारा??"

स्वरा फक्त त्याच बोलणं ऐकत होती, तिने कसलच उत्तर दिलं नाही आणि कार्तिक मोठ्याने ओरडत म्हणाला," गिव्ह मी अँन आंसर डॅम ईट! आय एम वेटिंग."

स्वराने त्याच्याकडे बघितले तो रागात होता. तिला भीती वाटत होती तरीही त्याच उत्तर द्यायला तिने आता पहिल्यांदा तोंडातून आवाज काढला," सर मै काम से नही भागती और ना मुझे भागणे का शौक है. बस कामसेभी ज्यादा कुछ महत्त्वपूर्ण काम था इसलीये गयी थि. सॉरी इफ यु हर्ट!!"

तो पुन्हा ओरडला," काम से ज्यादा महत्त्वपूर्ण क्या होता है स्वरा? टेल मी!! मुझे सुनना है आज. या मुझे बेवकूफ बना रही हो."

त्याचा राग वाढत होता आणि स्वरा त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली," मेरी शादी. भला इससे भी ज्यादा काम जरुरी है क्या सर? एक भूत जैसे दिखने वाली लडकी की शादी. आपसे पेहले यहा अन्वय सर आये थे. उनहोणे मुझे जिने की उम्मीद दि, हौसला दिया वरणा पडी थि मै इसी ऑफिसके किसीं कोणे मे! उनहोणें सिर्फ राह नही दिखाई वो मेरा हर पल साथ भी दे रहे है. कुछ दिलं पेहले वो मेरे घर आये थे शादी की बात करणे. उसी के बारे मे बात करणे घर गये थे. मैने कहा उनसे सर नही मानेंगे पर वो वहा दिल्ली मे अच्छि पोस्ट पे है इसलीये उनहोणें सब मॅनेज कर लिया. मै तो रेसग्नेशन देणे वाली थि पर सरने कहा की काम मत छोडो मै ट्रान्सफर करवा देता हु. काम से भी ज्यादा महत्त्वपूर्ण है शादी. सॉरी सर पर काम से भाग रही हु ऐसें फिर मत केहना. काम ईबादत है मेरी बस फरक इतना है की काम के अलावा भी एक जिंदगी है जो शायद आपको समझने की जरूरत है."

ती रागात केबिन सोडून जाणारच होती की हळुवार आवाजात कार्तिक म्हणाला," सॉरी स्वरा! एक्सट्रेमली सॉरी!!"

ती थांबली आणि तो पुन्हा नजर खाली करत म्हणाला," मुझे पता नही था ये सब इसलीये सॉरी! हा सही केह रही हो काम के अलावाभी एक जिंदगी है. ये बात हमेशा याद रहेगी. काम से ज्यादा प्यार करता हु, तुमसे ज्यादा उम्मीद है इसलीये अपणा मानकर गुस्सा आ गया. सॉरी वन्स अगेन अँड हार्टली कॉंग्रेचूलेशन्स फॉर युअर अपकमिंग लाइफ. वैसे कब जाणे वाली हो?"

स्वरा शांतपणे उत्तरली," अगले वीक. १४ फेब को शादी है हमारी. कोर्ट मॅरेज! यु आर ऑल्सो इनवाईटेड."

कार्तिक आता हसत उत्तरला," एन्जॉय द डे डिअर स्वरा! अँड सॉरी वन्स अगेन. और एक बात वो पुना वाला एक प्रोजेक्ट और मिला है. तुम्हारी मेहनत काम आयी. काम बहोत है और तुम साथ नही इसलीये ज्यादा बोल गया. स्वरा एक और प्रोजेक्ट की बधाईया."

ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू परतल. कार्तिकने हात समोर केला आणि तिने त्याच्या शुभेच्छा स्वीकारून आनंदात केबिन सोडलं..

ती आज खूप खुश होती. ती बाहेर आली तेव्हा तिला जाणवलं की सर्व तिच्याकडेच बघत आहेत कारण कार्तिक मोठ्याने ओरडला होता म्हणून काही वेळ ऑफिसमध्ये शांतता होती. स्वरालाही थोडं ऑकवर्ड वाटलं आणि ती कामाला लागली. आज सर्वच शांत होते आणि सर्वांच्या नजरा राहून- राहून तिला बघत होत्या. त्यामुळे स्वरा खूपच गोंधळली होती. अस काय झालं होतं ज्याने स्वराप्रति लोकांची नजर बदलली होती. आज सर्वांच्या नजराणा नजर देतच स्वरा काम करत होती पण त्यांच्या नजरेतले भाव काही बदलले नव्हते.

घड्याळात ६ चा ठोका पडला आणि सर्व यंत्रासारखी पटापट धावपळ करू लागले. त्यांच्यात दीपिकाही होती. स्वराने अजूनही लॅपटॉप बंद केला नव्हता. दीपिकाला जाताना बघून स्वराने पटकन लॅपटॉप बंद केला आणि ऑफिसमधून बाहेर पडली. दीपिका बऱ्याच समोर गेली होती म्हणून तिची भेट व्हावी म्हणून स्वरा धावतच पोहोचली. सुमारे २ मिनिटे ती धावतच तिच्याजवळ पोहोचली. ती दमछाक होत तिच्याजवळ पोहोचली आणि दीपिका हसत म्हणाली," हे काय स्वरा इतकी धावत- पळत का आली आहेस? काही बोलायच आहे का तुला नाही तर अशी वागत नाहीस तू. टेल मी काय झालंय?"

स्वराने क्षणभर श्वास घेतला आणि हळुवार आवाजात उत्तरली," ताई मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायच आहे म्हणून धावत- पळत आले."

दीपिका हसतच उत्तरली," नंतर बोललो असतो की फोनवर त्यात काय एवढं? असो आता एवढी मेहनत केलीच आहेस तर बोल काय बोलायचं आहे तुला!"

स्वरा आता जरा शांत झाली होती. एक नजर तिच्या नजरेला नजर देत तिने दीर्घ श्वास घेतला आणि हिम्मत एकवटून बोलून गेली," ताई, तू विचारत होतीस ना ते अन्वय सरच आहेत का? हो ते अन्वय सरच आहेत आणि आम्ही खरच घरी लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. १४ फेब ला लग्नाची तारीख ठरली आहे. माझं ट्रान्सफर पण केलं सरांनी आता फक्त काहीच दिवसात मी दिल्लीला जाईल. तिथेच लग्न आणि तिथेच कायमची सेटल होईल."

स्वरा एका श्वासात सर्व बोलून गेली आणि आता हसणारी दीपिका शांत झाली. तिला काय बोलू काहिच कळत नव्हतं. इतके दिवस तिला शंका होती तेव्हा त्रास होत होता पण आता जेव्हा ते सत्य निघालं तेव्हा काय बोलू तिला कळत नव्हतं. ते शांत- शांततेत समोर गेले. दीपिका कसला तरी विचार करत होती आणि स्वरा अधून- मधून तिच्याकडे बघत होती. तिला समजत होत की तिला त्रास झाला आहे म्हणून ती काहीच बोलली नाही. फायनली स्टेशन आलं आणि दोघीही काहीच न बोलता वेगळ्या झाल्या. स्वरा तिच्या उत्तराची वाट बघत होती पण पुन्हा एकदा तिच्या हाती निराशा लागली. पुन्हा एक व्यक्तीला दुखावल्याचा दोष जणू तिच्या जिव्हारी लागला. पुन्हा एक व्यक्ती दुखावला आणि स्वरा विचारत पडली. इतका विचार की तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू यायचे बाकी होते.

आज स्वरा जरा दुःखी झाली होती कारण तिने दीपिकाला दुखावलं होत. तिला एकट- एकट वाटत होतं पण आज नेमकी माधुरी आली नव्हती. ती विचार करतच होती की तेवढ्यात ट्रेन आली आणि स्वरा घराकडे निघाली. तिला हा शांत- शांततेचा प्रवास अजिबात सहन होत नव्हता म्हणून तिने मोबाइल काढला आणि पटकन पूजाला कॉल लावला. पूजा फोन रिसिव्ह करत म्हणाली," बोला मॅडम!! काय आनंदाची गोष्ट घेऊन आलात? सांगितलं ना तुम्ही अन्वय सरांना मनातलं. हेच सांगायला कॉल केला होता ना?"

तीच उत्तर ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल आणि ती म्हणाली," तुला कस माहिती ग?"

पूजाही हसतच उत्तरली," ते तर होणार होतच मॅडम आणि मला माहित होत तू हेच सांगायला कॉल करणार आहेस. त्याशिवाय तू काही कॉल करणार नाहीस. आता सांग झालंय सर्व मनासारखं??"

स्वराही मिश्किल हसत उत्तरली," मॅडम जरा अंदाज चुकला आहे तुमचा! मी प्रेमाबद्दल सांगायला नाही सरळ लग्नाबद्दल सांगायला कॉल केलाय. तारीख १४ फेब्रुवारी, स्थळ दिल्ली कोर्ट आणि आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. येणार ना अन्वय सरांना भेटायला?"

पूजा आता शॉकच झाली होती. तिने स्वतःला आवरल आणि हसत उत्तरली," हे कधी घडलं?"

स्वराच्या चेहऱ्यावर हसू तसच होत आणि मॅडम म्हणाल्या," सरांना सांगितलं मनातलं आणि साहेब म्हणाले की इतके दिवस होकार द्यायला लावले तेव्हा आता आणखी वाट बघण्याची रिस्क नको. उद्याच जाऊन बोलू घरी. मग काय गेलो घरी आणि हे सर्व घडलं. पूजा तुला यायचं आहे हा लग्नात मला कारण नकोत समजलं??"

पूजा गमतीत म्हणाली," इसको बोलते है चट मंगणी पट ब्याह! दोघांनाही बहुतेक वाट पाहन झालं नाही. आग दोनो तरफसे लगी खास शायद. हो येईल ग हे काय सांगणं झालं. बर ते सोड मला सांग, तुझ्या घरच्यांकडून तर परवानगी मिळाली पण अन्वयच्या घरच्यांना माहिती आहे सर्व तुझ्याबद्दल? म्हणजे त्यांनी होकार दिला?"

स्वरा आता काही क्षण शांत झाली होती आणि पूजा हळू आवाजात उत्तरली," मॅडम काही प्रॉब्लेम? बोल बोल बिनधास्त. मला काय घाबरत आहेस!!"

स्वराने मिश्किल हसू ओठांवर आणले आणि हळूच म्हणाली," तुझ्या पासून काय लपवायच आहे पूजा. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. अन्वयच्या घरच्यांना सुंदर सून हवी होती आणि मी नकळत त्यांच्या गळ्यात जाऊन पडले. तसा मला अंदाज दिला होता सरांनी पण आशा होती एक मनात पण ती क्षणात फोल ठरली नेहमीप्रमाणे. माझ्या आयुष्यात चेहरा सोडला तर शाश्वत काहीच नाही माहिती आहे ना तुला मग इथे तरी कसं सर्व सुरळीत होईल? काय माहित देवाने माझं भाग्य कोणत्या मूडमध्ये लिहिलं साला प्रोब्लेमच संपत नाही यार."

पूजा आता जरा रागातच उत्तरली," कोड्यात नको बोलुस स्वरा. स्पष्ट स्पष्ट सांग नक्की काय झालंय, मला भीती वाटते आहे. "

स्वराही हसतच उत्तरली," काय होणार मॅडम!! मी कुरूप आहे हे सत्य जसच्या तस आहे, जगाने आतापर्यंत ऐकवलं मग अन्वयच्या आई नाही का एकवणार? त्यांनी नकार दिला लग्नाला माझ्या चेहऱ्यावरून पण अन्वय सर नाही हटले आपल्या निर्णयावरून. तेही जिद्दीच. ते म्हणाले की मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू बदलशील प्रत्येक लोकांचे विचार. ते माझ्यासाठी इतकी झटत आहे तर मग मी का मागे हटाव ना म्हणून घरच्यांचा नकार असतानाही आम्ही एक व्हायचं ठरवलं. मग काय आहे आता दिल्लीला आहे लग्न. कोण असतील कोण नसतील काही अंदाज नाही. कस असेल तेही माहिती नाही पण आहे इतकं पक्क."

पूजा हसत उत्तरली," दुसऱ्यांच माहिती नाही पण मी नक्की येईल. अन्वय सर बरोबर म्हणाले, तू जिंकशील प्रत्येकाच मन अगदी सहज. ऑल द बेस्ट डिअर. मी येते मग करू धम्माल. खरच मस्त बातमी दिलीस तू. आय एम हॅपी फॉर यु डिअर बेस्टीं.."

स्वरा काही वेळ शांत होती आणि हसतच उत्तरली," खर सांगू पूजा मला माझ्या भाग्यावर विश्वास नाही म्हणून मी जास्त आशा धरणार नाही. मी आनंदी आहे की अन्वय सोबत आहे बाकी काहीच नकोय मला. पण हे आनंदाने सांगेन की अन्वय- स्वरा ची प्रेम कथा फार गाजनार आहे. जिंकलो तरीही हिट असेल आणि हरलो तरीही डोळ्यात अश्रू आणणारी. मला जगायच आहे अन्वय सरांच प्रेम अनुभवायला. अस प्रेम करायचं आहे की आमच्या प्रेमाला कुणीच विसरू शकणार नाही. भारी आहे ग माझं आयुष्य. एकीकडे आहे माझ्या चेहऱ्यावर राग करणारा समाज तर दुसरीकडे अन्वयने मला स्वीकारलं म्हणून दावणीला लागलेले नाते. मध्ये आमचं प्रेम. कोण जिंकेल माहिती नाही? अशी ही आमची कहाणी."

पूजा हसतच उत्तरली," काय म्हणतात बर त्याला फिल्मी लाइन आहे ' अमर प्रेम'. हरल तरीही डोळ्यात अश्रू आणेन आणि जिंकल तर कथा लिहिल्या जातील. बरोबर ना?"

स्वरा क्षणभर हसत उत्तरली," हा काहीसं तसच फिल्मी! पण पूजा सांगू जर मी ह्या प्रवासात हरले ना तर मी स्वतालाच मुक्त करेन, माझ्या श्वासाना मुक्त करेन, ह्या कुरूप चेहऱ्याला मुक्त करेन कायमच ह्या दुनियेतून. कारण एवढ्या लोकांना दुखावून मी जीवन जगू शकणार नाही. त्यामुळे मी खरच आनंदाने जग सोडून जाईल. समजेल की हेच भाग्य आहे माझं. माझ्या जाण्याने सर्वांचे प्रॉब्लेम्स सुटतील आणि आता तर आईबाबांना सांभाळायला अन्वय आहेच. ते माझ्यापेक्षा छान सांभाळतील त्यांना विश्वास आहे मला. मला माहित आहे आता म्हणशील की अस नको बोलू पण पूजा तू समजू शकते माझी स्थिती. इतक्या लोकांना तोडल्यावर मी खरच खुश राहू शकेल का?"

पूजा हसतच उत्तरली," मी काही म्हणणार नाही तुला. कारण ज्याच जळत त्यालाच कळत. मला विश्वास आहे तू जिंकशील आणि नाही जिंकलीस आणि हे जग सोडून गेलीस तरी कायम आठवणीत राहशील माझ्या. कदाचित तुला तिथेच शांतता मिळेल. खर सांगू स्वरा तुझ्या जागी मी असते तर आतापर्यँत गेले असते ढगात पण तू काहितरी वेगळी आहेस. तुझ्यासारख कुणीच नाही. ऑल द बेस्ट डिअर नवीन प्रवासासाठी पण जायचं असेल तर शेवटच्या क्षणी मला कॉल करून जा. मला तेव्हढंच समाधान. मी नाही अडवणार तुला. एवढं तर करशील ना?"

स्वरा हसत उत्तरली," थॅंक्यु समजून घेतल्याबद्दल. नक्कीच करेन तुला कॉल. तुझ्याशिवाय देवाचा प्रवास सुरु नाही करणार मी. ती रात्र खूप बोलू आपण नंतर नाही मिळणार बोलायला. चलो मॅडम माझं स्टेशन आलं बोलू नंतर बाय."

काहीच क्षणात स्वराने फोन कट केला. सरविकडे शांतता पसरली होती. शांतता एक पण जागा तीन होत्या. अन्वय कारमध्ये शांत बसून आईच्या शब्दांचा विचार करत होता. जणू स्वराला होणाऱ्या यातना तो स्वता समोर बघत होता. स्वरा ट्रेनमध्ये आपल्या भविष्याचा विचार करत होती तर पूजा रिक्षा मध्ये स्वराची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तिघेही नकळत एकाच गोष्टीबद्दल विचार करत होते पण कुणालाच माहिती नव्हत काय असणार आहे तीच आयुष्य?"

स्वरा ट्रेनमध्ये असताना हसत होती तर पूजा ट्रेनमध्ये विचार करत होती पण दोघींच्याही मनात फिरत होते स्वराचे ते शब्द" हरले तर हा शेवटचा प्रवास असेल कारण इतकी नाती तोडून मी खुश राहू शकणार नाही.."

बडी नाजूक है ये मंजिल
मोहब्बत का सफर है
धडक आहिस्तासे-ए-दिलं
ए-दिलं, ए-दिलं
मोहब्बत का सफर है…
बडी नाजूक है ये मंजिल
मोहब्बत का सफर है…...

क्रमशा….