भाग्य दिले तू मला - भाग ८६ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ८६

पल भर की दुरी तेरी
मेरा क्यू चैन ले गयी
हुवा करता था हौसला अकेले लढ जाणे का
तुम आये और वो मेरी आदत बिघड गयी...

ती सकाळची वेळ होती. स्वरा अन्वयची बॅग भरत होती तर अन्वय आपल्या इतर वस्तू बॅगमध्ये नीट ठेवल्या आहेत की नाही म्हणून सर्व नजरेखालून काढत होता. त्याने सर्विकडे बघितले आणि जवळपास सर्वच वस्तू घेतली असल्याची त्याची खात्री पक्की झाली. तो काम करत असतानाही स्वराकडे लक्ष देऊन होता. ती ह्या पूर्ण वेळात त्याच्याशी एकदा देखील बोलली नव्हती. रुसवा तिच्या चेहऱ्यावर अस बसला की तिने त्याच्याशी बोलणेही पसंद केले नव्हते. तिला बघून अन्वय क्षणभर हसला आणि मागून मिठी मारतच म्हणाला," काय झालं आहे स्वरा? रुसली आहेस का माझ्यावर? अजून किती वेळ अस गप्प राहायचा विचार आहे?"

स्वराने हळूच त्याच्या डोळ्यावरून हात फिरवत म्हटले," मग रुसायला नको का?मिश्रा सर म्हणाले होते ना की तुम्ही दोघे पण जा लंडनला मग तुम्ही मला सोडून एकटेच का जात आहात? मला घेऊन गेले असते तर काही बिघडल असत का तुमचं? पैसे पण कंपनी देत आहे मग मला एकटीला का सोडून जात आहात तुम्ही? वाटल्यास मी माझे पैसे भरते पण मला घेऊन चला ना सोबत."

अन्वय क्षणभर तिच्यावर हसला आणि मिठी घट्ट करत म्हणाला," तुला काय वाटत मला नव्हतं वाटत काम पूर्ण झाल्यावर तुझ्यासोबत वेळ घालवावा. कामाच काम झालं असत आणि फिरण्याची फिरण. अशी संधी सोडली असती का मी?"

त्याचे शब्द ऐकून स्वरा हळूच हसली आणि अन्वय पुन्हा म्हणाला," तुला काय वाटत मला आवडलं नसत तुला सोबत न्यायला पण दोघेही गेलो तर तुझ्या आईबाबांची काळजी घ्यायला कुणी असणार नाही आणि त्यांना अस एकट सोडण बर वाटत नाही म्हणून एकटाच जातोय. त्यांना काही गरज पडली तर अटलिस्ट तू सोबत तरी असशील. तुही आलीस तर त्यांचं काय होणार? तू असशील तर मी तिकडे निवांत काम करू शकेन म्हणून तुला इथे सोडून जातोय तस पण ४-५ दिवसच आहेत पटकन जातील."

स्वरा जरा रागावतच म्हणाली," हो मोठे आले ४-५ दिवसच आहे म्हणणारे. माझ्यासाठी एक-एक दिवस पण किती मोठा असेल तुम्हाला काय माहिती. तुमच्याविना एक क्षण पण जगायची हिम्मत माझ्यात नाही आणि म्हणे ४-५ दिवसच तर आहेत."

ती रुसलीच होती की अन्वय क्षणभर विचार करत म्हणाला," मग एक काम करतो, जायचं कॅन्सल करतो आणि बाहेर दारावर चार दिवस बोर्ड लावतो ' डू नॉट डिस्टर्ब'. कुणीच नको जाऊ, उलट आपण हनिमूनला जय एक महिना. थांब करतोच कॅन्सल."

त्याने मोबाइल हातात घेतलाच होता की स्वरा हसतच उत्तरली," नको बाबा. तुमचं हनिमून मला परवंडणार नाही त्यापेक्षा जा तुम्ही मी काढेन ४-५ दिवस. महिना भर मला तुम्हाला सहन करायची अजिबात इच्छा नाहीये."

अन्वय पुढच्याच क्षणी रुसत म्हणाला," अच्छा म्हणजे तू मला सहन करत असतेस तर?"

त्याने क्षणात मिठी सोडली आणि आपली बाग आवरू लागला. स्वराला त्याच अस रूप बघून हसू आलं आणि तिने पटकन त्याच्या गालावर किस करत म्हटले," तुम्ही म्हणत असाल तर लावू पाटी डू नॉट डिस्टबची.."

तीच बोलणं ऐकून अन्वयला क्षणभर हसू आवरल नाही. त्याचा रुसवा क्षणात गायब झाला. तो हसतच होता की त्याच मोबाइलवर लक्ष गेलं. त्याला जाणवलं की त्याला निघायला उशीर होतोय म्हणून त्याने तिनेे मागून मारलेली तिची मिठी सैल केली आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाला," काळजी घे स्वरा. काही लागलं तर सरळ सौरभला सांग. मी त्याला सांगून ठेवलंय तस. तो अर्ध्या रात्री पण येईल तू बोलावसं तर. सोडून जातोय तुला पण माझंच मन लागत नाहीये तेव्हा इकडे काय सुरू आहे ते कळवत रहा मला."

स्वरानेही त्याच्या कपाळावर किस करत म्हटले," तुम्हीही काळजी घ्या स्वतःची. आता मी नाहीये ना सोबत तेव्हा तुम्हालाच घ्यावी लागेल काळजी. मलाही कठीण आहे तुमच्याविना दिवस काढणे पण करेन मॅनेज. तुम्ही लवकर या हा. मी आतुरतेने वाट बघत आहे तुमची. विसरू नका ही वेडी तुमची वाट पाहत आहे ते."

अन्वय जरा नौटंकी करतच उत्तरला," विसरलो तर?? माझा विचार तर आहे की तिथल्याच एका गोऱ्या मुलीशी लग्न करून सेटल व्हायचं त्यामुळे परत येण्याचा विषयच येत नाही. तू बघत बस वाट मी नाही येणार.."

अन्वय स्वराकडे हसून बघत होता तर स्वरा डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती आणि जरा अकडू होत म्हणाली," करून तर बघा. तिच्या झिपर्या पकडून इथे मारत नाही आणलं तर म्हणा मग. तुम्हालाही नाही सोडणार. तुम्हालाही फटके देईल सर्वांसमोर. त्यादिवशी निहारिका फक्त गंमत करत होती पण मी सत्यात उतरवून दाखवेन. दोघांनाही मारत मारत भारतात नाही आणलं तर स्वरा अन्वय इनामदार नाव सांगणार नाही."

अन्वय क्षणभर तिच्या बोलण्याकडे बघत राहिला आणि त्याला हसू आवरल नाही. स्वराही त्याच्या सोबत क्षणभर हसू लागली होती. तसे होते प्रगल्भ पण इतके मोठे होऊनही त्यांनी आपल्यातल लहान बाळ काही हरवू दिलं नव्हतं. त्यांचा हसण्या-हसण्यातच बराच वेळ गेला.

आता टॅक्सी बाहेर आली होती. अन्वय बॅग घेऊन बाहेर पडला. आई-बाबा हॉल मध्येच बसले होते. अन्वयला बघताच बाबांनी विचारल," काय अन्वय कुठे निघाला आहेस सकाळी सकाळी?"

अन्वय बाबांचे आशीर्वाद घेत म्हणाला," बाबा लंडन ला जातोय. सेमिनार आहे तिथे. आता आताच ठरलं म्हणून कुणाला सांगायला वेळ मिळाला नाही? येईल ४-५ दिवसात, काळजी घ्या स्वतःची."

अन्वयच्या बाबांनी आता जरा रागावतच विचारले," का रे आम्हाला सांगणं पण जमत नाही का तुला? आताच ठरलं म्हणे. विसरलास की जाणून केलंस?"

अन्वय क्षणभर शांत होता आणि हसतच उत्तरला," बाबा काही लोक तोंड फुगवून बसले आहेत, मग त्यांना काय सांगायचं. त्यांना थोडी फरक पडतो माझ्या येण्याने, जाण्याने. त्यांना तर फक्त लोक काय म्हणतात त्याने फरक पडतो म्हणून म्हटलं ज्यांना फरकच पडत नाही त्यांना काय सांगायचं पण तुम्हाला सांगतोय ना आता."

बाबांना समजलं की तो आईला ऐकवतोय म्हणून ते काही क्षण हसतच राहिले. अन्वयच्या आईने त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघितले आणि त्यांचं ते हसू पण गायब झाल. अन्वयने पुढच्याच क्षणी आईकडे हळूच नजर टाकली आणि तिच्या पायांना स्पर्श करून म्हणाला," येतो बाबा- आई."

आई काही बोलली नाही पण बाबा उत्तरले," हॅपी जर्नि अन्वय!!"

अन्वयने हसूनच त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि क्षणात बाहेर पोहोचला. बाहेर टॅक्सी त्याची वाट बघतच होती. अन्वयने बॅग टॅक्सीमध्ये ठेवली आणि ड्राइवरला जायला सांगू लागलाच होता की स्वराने विचारले," अन्वय सर मी येऊ तुम्हाला सोडायला? प्लिज!! आता इथे तर नाही म्हणू नका. प्लिज!!"

अन्वय तिच्याकडे क्षणभर बघतच होता. त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि टॅक्सीमध्ये बसला. स्वरा त्याच्याकडे बघतच होती की तो बाजूला सरकत म्हणाला," ये कुणी अडवलं. तेवढाच माझा वेळ मस्त जाईल. तू स्वता माझ्यासोबत येत असताना मी का नको म्हणेल."

अन्वयचे शब्द येताच स्वरा पटकन मध्ये बसली आणि एकदाची टॅक्सी सुरू झाली. हळूहळू का होईना शेवटी प्रवास सुरु झाला. अन्वय सिटला निवांत टेकून बसला होता तर स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती. ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती त्याच्यापासून दूर राहणार होती म्हणून तिला अस्वस्थ वाटत होतं. ती त्याला बघतच होती की तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि अन्वयने डोळे उघडत मोबाइल बघितला. त्यावर मिश्रा सरांचा कॉल होता. अन्वयने हळूच फोन रिसिव्ह केला आणि मिश्रा सर म्हणाले," अन्वय फ्लाइट टाइम पर है ना? तुम निकल गये हो?"

अन्वयही हसतच उत्तरला," हा सर फ्लाइट टाइम पर है. विदीन ऐन हवर मै पोहोच जाऊंगा एअरपोर्ट पे. डोन्ट वरी अबाउट दॅट."

अन्वय हसतच बोलून गेला आणि मिश्रा सर म्हणाले," पता है. पेहली बार थोडी जा रहे हो. ऑल द बेस्ट. हॅप्पी जर्णी.. बाय अन्वय.. कुछ लगे तो कॉल करना.."

अन्वय हसतच उत्तरला," थॅंक्यु सर.. बाय.."

अन्वयने फोन ठेवला पण टॅक्सीमध्ये अजूनही शांतताच होती. टॅक्सी सुरू होऊन पाऊण तास झाला होता. जवळपास पाऊण तास कुणिच कुणाशी बोललं नव्हतं. कदाचित स्वराला तो आपल्यापासून दूर जातोय हे बघवत नव्हतं म्हणून तिनेही शांत राहनच पसंद केल होत.

जवळपास पाऊण तास झाला होता. ते एअरपोर्टवर पोहोचले. अन्वयने तिकीट्स कलेक्ट केले आणि स्वरासोबत शांत बसला. स्वरा काही बोलत नव्हती पण त्याला सौरभचा, निहारिकाचा कॉल येऊन गेला होता त्यामुळे त्याचा वेळ कसातरी निघाला. जवळपास पुन्हा अर्धा तास गेला होता. फ्लाइटसाठी फायनल कॉल आला आणि अन्वय जाऊ लागला तेव्हाच स्वरा म्हणाली," अन्वय सर स्वतःची काळजी घ्या. तिकडे खूप थंडी असते. मी गरम कपडे दिलेत भरून सो त्याचा वापर करा. मिस करेन तुम्हाला खूप. जास्त काम करू नका आणि पोहोचलात की कळवा आठवणीने."

अन्वय हसतच म्हणाला," हो बाबा घेईन काळजी आणि नाही घेतलीस तर तू आहेस ना आठवण करून द्यायला. मग कस विसरेन बर. बर येऊ मग??"

स्वराच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू परतल होत. अन्वय तिला बाय बोलून निघालाच होता की काही दूर अंतरावर जाऊन थांबला आणि पुन्हा स्वराकडे परतला. काही सेकंद त्याने पॉज घेतला आणि जरा शांत स्वरातच म्हणाला," स्वरा तू घरी थांबू नकोस. आईकडे जा ४-५ दिवस आणि मी येत नाही तोपर्यंत परत घरी नको येऊस. तिथून हलायच पण नाही."

स्वराने गोंधळतच विचारले," अस का?"

अन्वय आताही शांत स्वरातच म्हणाला," मी असताना लोक तुझ्यासोबत असे वागतात तर मी नसताना काय होईल मी विचार सुद्धा करू शकत नाही. तेव्हा जा आईकडे आणि ह्यावर मला वाद नकोय. मी तुझं ऐकतो ना सर्व मग ह्यावेळी माझं ऐक. मी येणार नाही तोपर्यंत परत नको येऊस. तस पण त्यांनाही वाटत असेल की तुझ्यासोबत वेळ मिळावा सो आठवणीने जा."

स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती आणि अन्वय रागावतच म्हणाला," काय म्हणतोय मी?"

स्वराने मिश्किल हसू ओठावर आणत म्हटले," हो जाईन. आता तुम्ही जा नाही तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मग म्हणू नका मला काही."

अन्वय क्षणभर हसतच समोर जाऊ लागला. तो निघाला आणि स्वराच्या डोळ्यात क्षणभर अश्रू आले. तो मागे वळून बघेल म्हणून तिने ते पटकन पुसून घेतले आणि त्याने मागे वळायची वाट बघू लागली. त्याने काही पावले टाकलीच होती की वळून बघितले. त्याने हाताने इशारा करूनच बाय म्हटले. जातानाही त्याच्या चेहऱ्यावर हसू होत. त्याने तिला बाय म्हटले आणि क्षणात गायब झाला. स्वरा अजूनही तिथेच उभी होती. हा एकमेव क्षण होता जेव्हा जो इतक्या दिवसात तिच्यापासून दूर जात होता म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू आपोआपच जमा झाले होते. तिच्या अश्रूंचा खेळ सुरूच होता की मोबाइल वाजला. त्यावर अन्वयचा मॅसेज होता. तिने तो पटकन उघडला आणि वाचू लागली…

" माहिती आहे तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण रडू नकोस कारण मला नाही आवडत तुझ्या डोळ्यात अश्रू बघायला आणि इथे जास्त वाट नको बघुस, घरी जा. तुला त्रास झाला तर मलाही होईल. आणखी एक महत्त्वाचं, तू म्हणाली होतीस ना रोमँटिक जास्त झालो तर सोडून जाशील तर आता चान्स आहे माझ्याविना जगण्याचा. तेव्हा जगून घे कारण मी आल्यावर खरच ' डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावणार आहे. मग महिनाभर तुला बाहेर निघता येणार नाही. बाय मिस यु स्वीटहार्ट!! लव्ह यु सो मच आणि मलाच करमणार नाही तुझ्याविना.सो लवकर येईन, त्याची काळजी नको करुस..बाय बाय.."

रडता रडता आता स्वराच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू पसरल होत. हे फक्त अन्वयच करू शकत होता. तिने त्याचा मॅसेज वाचला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे घराकडे तिने प्रस्थान केले..

एक पल की दुरी सही नही जाती मुझसे
तुम गये हो कुछ दिनो के लिये
समझाये दिलं को कैसे बता दो
तुम्हारे कमी भला कैसे पुरी की जाये??

दुपारची ३-४ वाजताची वेळ होती. अन्वय जाऊन फक्त दोन- तीन तास झाले होते. स्वरा बेडरूममध्ये एकटीच बसून होती. तिला काही तासातच घर खायला उठल होत. बाहेर आई-बाबा बोलत होते पण तिच्याशी कुणीच काहीच बोलायला तयार नव्हत. तो होता तर घरात वेळ कसा जायचा कळत नव्हतं पण तो गेला आणि तीच मनही घेऊन गेला. हीच परिस्थिती समोर काही दिवस राहणार होती म्हणून अन्वयने सांगितल्याप्रमाणे तिने आई-बाबांकडे जायचा निर्णय फायनली पक्का केला. तिने १०-१५ मिनिटातच आपले कपडे पटापट बॅगमध्ये भरले आणि बाहेर जाऊ लागली. बाहेर अन्वयचे आई-बाबा टीव्ही बघतच होते. तिला बॅग घेऊन जाताना बघून आई म्हणाल्या," म्हणजे अन्वय बरोबर म्हणाला होता तर!! तो म्हणाला होता की मी जर तुला स्वीकारलं नाही तर तू स्वतःच हे घर सोडून जाशील पण इतक्या लवकर सोडून जाशील अस कधीच वाटलं नव्हतं. चला शेवटी सुखाचा क्षण ह्या घराला पाहायला मिळालाच. म्हणतात ना देर आये दुरुस्त आये. चांगल्या गोष्टी नेहमी उशिराच होतात."

त्यांच्या आवाजाने स्वराच त्यांच्यावर लक्ष गेलं. स्वरा केविलवाणा चेहरा करून त्यांच्याकडे बघतच होती की बाबा म्हणाले," कशाला ग लता त्रास देतेस मुलीला. नेहमी मनाला लागणार कशाला बोलतेस. जात असेल कुठे, तुला काय?? तू तर नाही मानत ना तिला सून मग कशाला इतकं टोचून बोलतेस? बिचारी जात होती बाहेर तर बोलायची काय गरज होती? माहिती आहे ना बाहेर जाताना कुणाला टोकू नये. एवढं पण कळत नाही का ग??"

अन्वयच्या आईने त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या," तुम्हाला खूप पुळका येतोय हो तिचा. तुमचं पण जिंकल वाटत मन हिने काहीच महिन्यात. आधी माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं केलं, नंतर मुलीला आता तुम्हाला पण वेगळं करायचं बघते आहे. काय जादू येते हिला काय माहिती. सर्वच बाजूने होतात हिच्या. आधी माझी मुलगी, नंतर मुलगा आणि आता तुम्ही. मीच चुकीची दिसते का हो तुम्हाला? अन्वयने जे केलं ते दिसत नाहीये का? तुम्ही बघता ना मला लोक कसे बोलतात तरीही अस बोलत आहात? माझा त्रास नाही दिसत का तुम्हाला? आणि काय चुकीच बोलले? त्याच्यासमोर तर मूग गिळून बसावं लागत? आता ह्या घरात मला बोलायची देखील मुभा नाही की काय?"

अन्वयचे बाबा शांत होत म्हणाले," लता मी कुणाच्याच बाजूने नाहीये. ह्या तीन महिन्यात जसे लोक तुला बोलत आहेत तसेच तिलाही बोलत आहेत पण तिने कधी पलटून उत्तर दिलं नाही. ती तुझी सून नसली तरी त्याची बायको आहे हे सत्य आहे आणि ते तुला स्वीकारावं लागेल. तू तिला आपलं मानत नाहीस वरून तिला ओरडत असते पण कोणत्या हक्काने? खर सांगू तर मी तुझ्या- अन्वयमध्ये कधी बोललो नाही आणि आताही बोलणार नाही पण कंटाळा येतो ग सतत वाद ऐकायला. मग ते तुझ्याकडून असो की कुणाकडुनही. घरात काही क्षण शांती असावी अस नाही वाटत का तुला? ती तुला काही बोलली नाही मग तू कशाला तोंड उघडून बोलते आहेस. गेली असती बाहेर ती तर तुलाच मनाप्रमाणे घरात राहायला मिळालं असत मग इतकं बोलायची काय गरज? तू पण ना कधी कधी हद्द करतेस लता."

अन्वयच्या बाबांनी त्यांना समजावून सांगितलं होतं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आई अजून रागावतच म्हणाल्या," मी करते प्रयत्न पण समोर दिसते ही त्याच काय करू? माझ्या घरातून ही निघून का जात नाही? मग मी बोलणारच नाही. ना हिला त्रास सहन करावा लागणार. म्हणा तिला माझ्या घरून जा म्हणून तेव्हाच मिळेल मला समाधान."

अन्वयचे बाबा आता जरा रागातच म्हणाले," घर तुझं एकट्याचच आहे का? त्याच्या आजोबांचं आहे. तस पण माझ्या बाबांनी त्याच्याच नावांनी केलंय हे घर. सो तू कोणत्या हक्काने तिला तिच्याच घरातून बाहेर काढतो म्हणत आहेस? रागात काहीही बोलण्यापेक्षा जरा डोकं शांत ठेवून बोलावं माणसाने. विनाशकालिन विपरीत बुद्धी."

अन्वयच्या आईही रागातच म्हणाल्या," हो बरोबर मग त्याने आपल्यालाच काढायला हवं बाहेर. आता ह्या महाराणीला कळलं की घर तिच्या नवऱ्याच्या नावाने आहे तर कोणत्या दिवशी आपल्याला बाहेर काढेल सांगता येत नाही. तुम्ही ना घर बघून घ्या नवीन आपल्यासाठी. मुलगाच आपला नाही झाला तर ही काय होणार आपली? तुम्हीही मलाच बोला, मेले माझ्याच जीवावर उठलेत सर्व. वाटत असेल केव्हा एकदाच हीच तोंड बंद होत. माझ्या मरण्याचीच वाट बघा ना किंवा मग स्वतःच मारा म्हणजे सर्व सुखी राहणार.."

अन्वयचे बाबा काही बोलायच्या आधीच त्या पाय आपटत बेडरूममध्ये गेल्या. जाताना सुद्धा बेडरूमचे दार त्यांनी मोठ्याने आपटले होते. काहीच क्षणात अन्वयचे बाबाही आता रागात तिथून बाहेर पळाले. स्वरा आताही तिथे एकटीच उभी होती. कदाचित मनात वेदनांचा काहूर घेऊन. अस नव्हतं की तिला कधी त्रास होत नव्हता फक्त अन्वय खचून जाईल म्हणून ती कधी दाखवत नसे पण आज तिला आईचे शब्द चांगलेच जिव्हारी लागले होते त्यामुळे तिच्या आपोआप डोळ्यात अश्रू उभे राहिले. घरात दुसर कुणीच नव्हतं. ती एकटीच कितीतरी वेळ तिथे उभी होती. आज तर अन्वय सुद्धा सोबत नव्हता. कितीतरी वेळ उभे राहिल्यावर तिने स्वतःचे अश्रू पुसले आणि बॅग घेऊन बाहेर पडली.

पुढे काही अंतरावर टॅक्सी स्टॅण्ड होता. तिथून तिने टॅक्सी केली आणि स्वतःच्या आई-बाबांकडे जाऊ लागली. टॅक्सी काही क्षणात सुरू झाली. टॅक्सी जशी धावत होती, तसेच तिच्या डोक्यात विचार धावत होते. आईचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला लागून गेला होता. आजपर्यंत तिला खूप लोक बोलले होते. तिला त्याने फरक पडला नव्हता पण अन्वयच्या आई तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने त्यांचे शब्द तिलाच फार यातना देत होते. आज अन्वय सोबतीला नव्हता त्यामुळे त्याची कमी तिला त्याक्षणी फारच जाणवत होती. तिने कसातरी तो अर्ध्या तासाचा प्रवास सर केला आणि घरी पोहोचली.

दारावर पोहोचताच तिने डोरबेल वाजवली पण दार कुणीच उघडत नव्हतं म्हणून तिची जरा चिडचिड होत होती. तिने तीन-चार वेळ बेल वाजवली आणि फायनली दार उघडल्या गेलं. आईला समोर बघताच तिने आईला घट्ट मिठी मारली. तिला नक्की काय झालं आईला समजत नव्हतं. तरीही आईने तिला मिठीतच ठेवले. काहीच क्षण गेले. तिने मिठी सैल केली. आईची नजर आता तिच्या बॅगवर पडली आणि आईने हसतच विचारले," काय ग, जावई बापूशी भांडून आलीस की काय? नाही म्हणजे अशी बॅग घेऊन आलीस म्हणून विचारते आहे."

आईच्या चेहऱ्यावर हसू होत आणि स्वरा चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत म्हणाली," ते गेले लंडनला ४-५ दिवसासाठी. तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. आई आता मी जाऊन पडते नंतर बोलते तुझ्याशी. थकले आहे खूप. आता काहीच विचारू नको नंतर बोलू."

तिने आईच्या बोलण्याची वाटही बघितली नाही आणि बॅग घेऊन सरळ बेडरूममध्ये पोहोचली. बेडरूममध्ये पोहोचताच बेडरूमचे दार लावले आणि बॅग बाजूला फेकून बेडवर पडून राहिली. आज तिला फार भरून आलं होतं. जगाच्या सानिध्यात असताना तिला आपले अश्रू कुणाला दाखवताही येत नव्हते म्हणून प्रवासात तिने ते अश्रू घट्ट मनात दाबून घेतले होते पण आता ती एकटीच होती आणि तिने क्षणातच आपले अश्रू मोकळे केले. आज ते अश्रू नव्हते, जणू अश्रूंचा पाऊस होता.आजपर्यंत स्वराला ज्या ज्या लोकांनी हिनवल होत तो प्रत्येक क्षण, प्रत्येक त्रास तिला आठवू लागला आणि ती सतत रडत राहिली. रडण्याचा आवाज नव्हता पण तिला किती त्रास होत होता हे तिलाही माहिती नव्हत. आज स्वरा एकटीच होती कदाचित स्वतःसोबत पुन्हा एक क्षण घालवत. आज कितीतरी वेळ ती बेडवरच पडून राहिली. रडून रडून अश्रू संपले होते पण मनातला त्रास अजूनही कमी झाला नव्हता. ती जागत होती शरीर, मनाला मारून कारण पुन्हा बेडरूमच्या बाहेर निघताच तिला खोटा मुखवटा धारण करायचा होता..

ती सायंकाळची वेळ होती. स्वरा फ्रेश होऊन हॉल मध्ये बसली होती. आईने तिच्या हातात चहा आणून दिला. स्वराचा चेहरा जरा पडलेला जाणवत होता म्हणून आईने चहा देताच विचारले," स्वरा काही झालंय का? माझ्यापासून काही लपवत आहेस का? आलीस तेव्हापासून बघते आहे. कुणाशी काहिच बोलत नाही आहेस? सांग ना काय झालं?"

स्वराचे अश्रू केव्हाच संपले होते म्हणून आता चेहऱ्यावर गोड हसू आणत तिने म्हटले," काहीच नाही झालं ग. अन्वय सर गेले ना तर करमत नाहीये म्हणून जरा चेहरा पडला आहे. ते असतात तर दिवस कसा जातो कळत नाही. आज ते सोबत नाहीत ना म्हणून बाकी काही नाही.."

स्वराची आई तिला चिडवतच म्हणाली," बापरे!! जावई बापुची इतकी सवय झाली आहे तुला की माहेरी येऊनही त्यांचीच आठवण येत आहे. इतकीच आठवण येत आहे तर मग त्याच्यासोबत का गेली नाहीस?"

स्वरा हळूच हसत म्हणाली," जाणार होते ग पण ते नको म्हणाले म्हणून राहून गेलं. बर ते सोड बाबा केव्हा येणार आहे?"

आई हसतच उत्तरली," ८ पर्यंत येतात रोज. शरद सोडतो त्यांना. बर ते सोड मी आता स्वयंपाक बनवायला घेणार आहे. तुझ्यासाठी काय बनवायच ते सांग? आज खूप दिवसाने लेक घरी आली म्हणून तुझ्या आवडीच बनवेन म्हणतेय. सांग काय बनवू स्पेशल??"

स्वरा जरा तिच्या कुशीत शिरत म्हणाली," खर तर काहीच खायची इच्छा नाही पण तुला आवडेल ते बनव. खाईन मी आवडीने थोडस."

पुढच्याच क्षणी आई तिची गंमत करत म्हणाल्या," अस कस? जर तुला उपाशी ठेवलं ना तर जावई बापू ओरडतील माझ्या बायकोला उपाशी ठेवलं म्हणून. आम्हाला ओरडा खायचा नाही हा त्यांचा. किती प्रेम करतात तुझ्यावर ते बघितलं आहे आम्ही. तुझ्यासाठी कुणावर ओरडतील ह्याचा भरवसा नाही."

आईच बोलणं ऐकून स्वरा फक्त काही क्षण हसली होती. हे खरं होत की तो तिच्यासाठी कुणासाठी पण लढू शकत होता पण ह्याक्षणी तिला त्याची गरज असतानाही तो सोबत कुठे होता? आज ती एकटिच होती आपल्या एकटेपणाची सवय करून घेत.

स्वरा आईच्या कुशीत झोपून किती तरी वेळ मनाला शांत करायचा प्रयत्न करत होती पण तीच मन आज काही शांत होत नव्हतं. आता आईच्या कुशीत झोपूनही बराच वेळ झाला होता. आई काही क्षणात स्वयंपाक करायला मध्ये गेल्या आणि स्वरा तिथेच बसली पण आज तीच मन टीव्ही मध्ये लागत. ती अस्वस्थता, तो एकटेपणा आज तिला मधून तोडत होता. ती काही वेळ घरी राहिली असती तर आणखी काय फिल केलं असत तिलाच माहिती नव्हत म्हणून ती थोडी फ्रेश हवा घ्यायला बाहेर पडला. कदाचित त्यामुळे तिला बर वाटणार अस तिला वाटत होतं.

ते जून महिन्याचे दिवस होते. अजून पाऊस यायला थोडा वेळ होता त्यामुळे उकाळा जाणवत होता तर स्वरा स्वतःच्या मनाला शांत करायला एकटीच चालत होती. तिला माहीत होतं की जवळपास तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर एक छोटंस गार्डन होत. तिथे जाऊन तिला शांत बसायचं होत. कदाचित हा निसर्गच तिला शांत करू शकत होता त्यामुळे ती चालत राहिली. काही क्षणातच ते गार्डन आलं. स्वराने सरविकडे नजर टाकली. फार जास्त लोक तिथे नव्हते. स्वरा सर्वांची नजर चोरत एका बेंचवर जाऊन बसली आणि इकडे तिकडे लक्ष देऊ लागली. बाहेर उकाळा होता तरीही झाडांची पाने हलल्याने थोडा फार थंड वारा येत होता आणि स्वरा त्या वातावरणात मिसळू लागली. त्या वातावरणाने जरा तिच्या मूडमध्ये बदल केला आणि ती विचारातुन बाहेर येऊन समोरच दृश्य बघू लागली पण इथे सुद्धा तीच मन स्वस्थ झालं नव्हतं. तिची नजर लोकांवर गेली. तिला लोक नेहमीप्रमाणे विचित्र नजरेने बघत होते. तसा तिला फार फरक पडायचा नाही त्याने पण आईचे शब्दच इतके त्रास देणारे होते की त्या लोकांच्या नजरेतही तिला ते भाव दिसू लागले. ते चेहरे तिला सतत प्रश्न विचारत होते की का असा चेहरा घेऊन लोकांत फिरतेस? तुला नसेल वाटत काही पण आम्हाला तुझ्या चेहऱ्याची किती भीती वाटते ह्याचा तुला अंदाज नाही. ह्या भयावह रात्री तरी बाहेर निघू नकोस. तिने जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न बघितले होते आणि तिची अस्वस्थता आणखीच वाढू लागली. मन घाबरु लागलं होतं. श्वास जड झाले होते. तिला त्यांच्या नजराणा उत्तर देणे कठीण होऊ लागल होत म्हणून ती धावत- पळतच बागेच्या बाहेर पडली. तिला वाटलं होतं की बागेतून बाहेर पडल्यावर लोकांच्या नजरा तिला त्रास देन सोडतील पण रस्त्यावरून जातानाही तिला त्यांची भीती तशीच वाटत होती. रस्ता बदलत होता पण त्या नजरा काही बदलत नव्हत्या. त्यामुळे सुरुवातीला डोळ्यात डोळे घालून सर्वाना बघणारी ती आता खाली नजर करून चालत होती. घरी पोहोचायची तर तिला इतकी घाई झाली होती की ती किती पटापट चालत आहे ह्याचा अंदाज सुद्धा तिला येत नव्हता. आज काही वाक्याने तिला मनातून इतकं तोडल होत की आज सकारात्मकता हा शब्द तिच्यापर्यंत पोहोचला नाही. ती घाबरली आणि विचार तिच्यावर हावी होऊ लागले. स्वरा खूप दिवसाने ढासळली होती. तिला माहिती होत की हे क्षण देखील जातील पण त्यासाठी महत्त्वाचं होत हे क्षण जाण. आज स्वरा अशी हरवली की तिला काहीच सुचत नव्हतं कदाचित वेड लागनच बाकी उरल होत.

रात्री घरी पोहोचली तेव्हा बाबा आले होते. आईने जेवण बनविल होत ते कसतरी तिने पोटात ढकलल. तिला आपल्या मनाची अवस्था कुणाला समजू द्यायची नव्हती म्हणून जेवण होताच बेडरूममध्ये पोहोचली. मधून दार लावून घेतले आणि बाजूला पडलेल्या उशीला पकडून झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागली पण आज ते शक्य नव्हतं. तिच्या मनावर मेंदूने कब्जा केला होता आणि तो तिला त्यातून बाहेर पडू देत नव्हता. रात्री किती वेळ झाला होता माहिती नाही पण आज स्वराला झोप काही येत नव्हती. ती इकडून तिकडे बेडवर कुस बदलत होती पण झोप काही येईना. तिला बरच अस्वस्थ वाटू लागलं आणि तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला..त्यावर अन्वयचा मॅसेज होता.

" स्वरा निवांत पोहोचलो. रात्री बऱ्याच उशिरा पोहोचलो तेव्हा मॅसेज करू शकलो नाही. आता काहीच वेळ झाला उठलो. खूप मिस करतोय स्वरा तुला. तुझी सवय झाली आहे ना म्हणून असेल. काय होईल ग इथे माझं ५ दिवस तुझ्याविना?"

त्याचा मॅसेज बघतच तिने मोबाईल बाजूला ठेवला. ह्यावेळी तिने त्याच्या मॅसेजला रिप्लाय दिला असता तर झोपलीस का नाही म्हणून तो ओरडला असता म्हणून तिने काही रिप्लाय दिला नाही पण हळूच ओठातल्या ओठात म्हणाली," मिस यु सर!! आज जाणवत आहे मला तुम्ही माझ्या आयुष्यात काय आहात. स्वरा संघर्ष नक्की करू शकते पण तुम्ही तिची ऊर्जा आहात. ती ऊर्जा नसेल तर स्वराही काहीच नाही. अन्वय सर आज फक्त एक दिवस तुमच्याविना काढणं कठीण जातंय तर आई म्हणाल्या तस जर आपण वेगळे झालो तर मग मी कशी जगेन तुमच्याविना? तुमच्याविना आयुष्य तर सोडा पण इथे एक दिवस जात नाहीये मग कसा करेन मी एकटीने प्रवास? अन्वय सर मी गमतीत म्हणते की तुम्हाला सोडून जाईल पण माझ्यात हिम्मत नाहीये हो तेवढी. तुम्ही असलात तरच ही स्वरा सर्वांसोबत लढू शकते नाही तर अशीच अवस्था असेल माझी. अन्वय सर तुम्ही श्वास आहात माझा. तुमच्याविना माझं जीवन अशक्य आहे पण तुम्हाला आणि आईला तोडूनही मी खुश राहू शकत नाही. त्यांचा प्रत्येक शब्द प्रत्येक त्रास मीही अनुभवते आहे. बोलत नाही म्हणजे कळत नाही अस नाही ना? पण काय करू अन्वय सर मला खरच कळत नाहींये. त्यांना खुसज करायला गेले तर मी तुम्हाला गमावून बसेल. नाही होणार हे माझयाने. अन्वय सर शेवटच सांगा मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्या आयुष्यात येऊन चूक तर केली नाही ना? तस असेल तर सांगा. मला तर होईल तरीही चालेल पण तुम्ही आईला म्हटलं ते पूर्ण करून दाखवेन. बोला ना सर!! का शांत आहात इतके?"

स्वरा त्याला प्रश्न विचारत होती पण ह्याच उत्तर द्यायला ना समोर अन्वय होता ना स्वराला काही सुचत होत. स्वराने आज पहिल्यांदा कुणाला तरी त्रास दिला आणि आईचे शब्द जणू तिला शाप वाटू लागले. आज स्वरा एकीकडे अन्वय पासून दूर जाण्याने घाबरली होती तर दुसरीकडे आईच्या शब्दात तिला वेदना जाणवत होत्या म्हणून ती फक्त रडत होती. ज्या व्यक्तीने सर्व काही गमावल असेल तिला खरच दुसऱ्याच दुःख दिसणार नाही का? मग जर स्वरा ते बघू शकत होती तर अन्वय म्हणाला तस ती आपले शब्द पूर्ण करणार होती का?

सोपं नव्हतं उत्तर पण ती घेणार होतीच एक निर्णय..कोणता घेऊ ह्याच विचारात तिच्या आणखी काही रात्र जाणार होत्या.

बेबसीसे ज्यादा खुद पे गुस्सा कर रही हु
मै रो नही रही, किसीं और को रुला रही हु...