भाग्य दिले तू मला - भाग ९० Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९०


देखा नही तेरे जैसा ईश्क कही; मै दुवा करती हु
तुझे पाने के लिये मुझे हर बार दर्द मिले..

ती सकाळची वेळ. बाजूला बहारदार निसर्ग आणि त्यात हरवलेले ते दोघे. मसुरी, उत्तराखंड मधील फिरण्याची एक सुंदर जागा. मसुरीला पहाडाची राणी म्हणून संबोधले जाते. ज्यांना निसर्गात विसावण्याची आवड आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक जागा खासच आहे. त्यात तुम्ही तुमच्या सर्वात जास्त आवडीचा व्यक्ती सोबत असलात की मग तो प्रवास आणखीच खास होत जातो. जिकडे बघावं तिकडे पहाडच पहाड आणि त्यात ती हिरवीगार झाड अगदी मनाला भांबावून सोडतात. स्वरा- अन्वय गन हिल पॉईंटचा सुंदर नजारा बघण्यात व्यस्त होते. अगदी पहाडावार वसलेली ती घरे बघून स्वरा हळूच हसत म्हणाली," क्या बात है!! कितीही वेळ बघितल तरी मन काही भरत नाही इतकं सुंदर हे दृश्य. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात आपण नक्की घेऊया इथे घर. इतक्या शांत वातावरणात तुमच्यासोबत आयुष्याचा उर्वरित प्रवास करण्याची मज्जाच वेगळी. त्याला काही शब्दच नसतील. सोबत राहू पण मी सोबत राहिले तर हा.."

अन्वयच्या चेहऱ्यावर आधी हसू पसरल होत पण तिच्या शेवटच्या वाक्याने त्याला जरा तिचा रागच आला. तो जरा रुसून तिच्याकडे बघत होता पण तीच अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि ती हसतच म्हणाली," अन्वय सर आपल्या भारतात इतके सुंदर प्लेसेस आहेत हे माहितीच नव्हतं मला. मला तर निसर्गात भटकंती करायला फार आवडत. थँक गॉड तुम्ही मला इथे घेऊन आलात. नाही तर मिस केलं असत मी हे सर्व. अन्वय सर आपण ना अधून-मधून असे बाहेर जात जाऊ. ह्यावेळी एकटे आलो पण पुढच्या वेळी सर्वांसोबत येऊ. चालेल ना?"

आता पहिल्यांदाच तिची नजर त्या सुंदर वातावरणाहुन अन्वयवर पडली आणि त्याचा पडलेला चेहरा बघताच हसतच तिने विचारले," साहेब काय झालं? इतक्या सुंदर वातावरणात तोंड का पाडून बसला आहात? काही कारण आहे की उगाच?"

ती हसून बोलत होती तर अन्वय हळूच रागावत म्हणाला," स्वरा तुला अस नाही वाटत आहे की तुला फ्रीडम दिलं म्हणून काहीही बोलत असतेस तोंडाला येईल ते. चूक केली का मी तुला फ्रीडम देऊन?"

तो चिडलेला बघून तिने हसन बंद केलं आणि जरा शांत होत तिने विचारले," अस का बोलत आहात? मी काय केलं बर?"

अन्वय हळूच तिच्यापासून दूर जात म्हणाला," काय केलंस हे पण मीच सांगू? बर मीच सांगतो. तुला मी इथे फिरायला आणलं की जुन्या गोष्टी आठवायला. नुसत्या दूर जाण्याच्या गोष्टी करत असतेस. आता पण बघ ना एक स्वप्न दाखवता- दाखवता अचानक बोलून गेलीस की मी असले तर हा म्हणून. मान्य की मी तुला समजून घेतो पण नकळत तू मला दुखावतेस अस नाही वाटत का तुला?"

अन्वय बराच चिडला होता आणि स्वरा त्याच्याकडे बघत म्हणाली," सॉरी बाबा तुम्हाला माहिती आहे ना मी जरा मूर्ख आहे. काहीही बोलून देते. तुम्ही कशाला मनावर घेता. आई पण म्हणाल्या होत्या ना मूर्ख मला. मूर्ख लोकांचं मनावर घेऊन ना आपला मूड खराब करू नये. सॉरी नवरोबा पुन्हा नाही होणार अशी चूक. प्लिज माफ करा आणि रुसवा सोडा."

अन्वयने तिच्या विरुद्ध बाजूने तोंड करत म्हटले," मला नको तुझी सॉरी. हे बर आहे आधी दुखवायच मग सॉरी म्हणायचं. सॉरी म्हटल्याने काय सर्व नीट होत.आय हेट यु स्वरा!!"

अन्वय स्वराकडे बघत नव्हता आणि स्वरा त्याचा राग कसा घालवायचा म्हणून विचार करू लागली. काही क्षण गेले. तिने इकडे तिकडे बघितले. रस्त्यावरून कुठलीच गाडी येताना दिसत नव्हती आणि तिने त्याच्याजवळ जात त्याच्या गालावर किस करत म्हटले," आता गेला राग?"

तीच वागणं बघून अन्वयला क्षणभर हसू आलं होतं पण तिला दिसू नये म्हणून पुन्हा त्याने नजर बाजूला केली. त्या रस्त्यावर ते दोघेच होते आणि कुणीच कुणाशी बोलत नव्हते. स्वरा काही क्षण पुन्हा थांबली आणि त्याच्या दुसऱ्या गालावर किस करत पुन्हा म्हणाली," आता पण नाही गेला राग?"

अन्वयला तर तेच हवं होतं पण ह्यावेळी तो बाजूला झाला नाही आणि नौटंकी करत म्हणाला," ईथे नको ओठांवर हवं तेव्हाच राग जाईल."

अन्वय तिच्याकडे बघत होता आणि स्वरा क्षणभर गालातल्या गालात हसत होती. तिला त्याचा तो नटखट स्वभाव माहीत होता त्यामुळे क्षणभर तीच हसन काही बंद झालं नाही. अन्वय पुन्हा म्हणाला," चल दे पटकन मला वाट बघायची नाही. तुला माफी हवी आहे मग त्यात उशीर नको व्हायला. नाही तर मी रुसवा सोडणार नाही कधीच. विचार कर."

स्वरा आता हसत- हसतच उत्तरली," रुसवा ठीक आहे पण नवरोबा इथे हे सर्व बर वाटत का? तुम्हाला टेंटवर गेल्यावर देईन. हवे तेवढे घ्या तिथे. एका शब्दाने नाही म्हणणार नाही. तुमचीच तर आहे मी, पाहिजे तेवढे घ्या. चालेल?"

अन्वयने पुन्हा नजर बाजूला केली आणि रुसत म्हणाला," नाही चालणार. आता म्हणजे आता. चूक आता केली आहे ना मग माफी पण आताच मागावी लागेल. ह्यात सूट नाही."

त्याने बाजूला नजर केली आणि तो हसतच राहिला. तिला क्षणभर फसवून त्याला मज्जा येत होती. तो आपल्याच हसण्यात हरवला होता तेवढ्यात स्वरा म्हणाली," ते इथे नाही जमणार ना नवरोबा प्लिज हवं तर आता पुन्हा एकदा गालावर देते आणि मग रात्री हवी तेवढी घ्या. प्लिज ना, असा हट्ट नका करू. प्लिज प्लिज!!"

तिने पटकन त्याच्यावर गालावर किस केले आणि अन्वयच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पसरल. त्याच हसू बघून तीही क्षणभर आनंदी झाली आणि अन्वय हसत उत्तरला," असा रुसलो तर रोज देशील किस्सी?"

स्वराला आता लक्षात आलं की तो नाटक करत होता म्हणून स्वरा त्याला धपाटे घालत म्हणाली," म्हणजे जाणून करत होतात ना? खडूस कुठले. तुम्हाला ना संधी हवी असते फक्त माझी छेड काढायची. कसे आहात ना तुम्ही?"

ती त्याला मारत होती आणि तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यात व्यस्त झाला होता. ती त्याला मारत होती आणि त्याने तिचे दोन्ही हात पकडत नजरेला नजर देत विचारले," पक्का ना रात्री? मला हवी तितक्या वेळ? रात्रभर म्हटलं तरीही नकार देणार नाहीस ना? प्रॉमिस??"

त्याचे शब्द येताच स्वराने त्याच्या हातातून आपले दोन्हीेही हात सोडवले आणि आपल्या डोळ्यांवर ठेवत उत्तरली," हो तुम्हाला हवे तेवढे घ्या खुश. मी नाही अडवणार. मलाही हवेच आहेत ते."

त्याने क्षणातच तिच्या डोळ्यांवरचे हात काढले आणि तिच्या त्या लाजऱ्या चेहऱ्याकडे बघू लागला. एक क्षण तर ते एकमेकांच्या नजरेत हरवले होते. त्यातून दोघांनाही बाहेर निघायची इच्छा नव्हती आणि स्वरा हळूच हसत म्हणाली," साहेब निघायचं, उशीर होईल फिरायला. अस बघायला पूर्ण रात्र पडली आहे. मग हवं तेवढं बघा."

तो अजूनही तिच्याकडे बघतच होता आणि स्वरा लाजतच राहिली. स्वराला आता त्याची ती नजर अंगावर शहारे आणू लागली. ती त्याच्या इतक्या जवळ होती की त्याचे श्वास तिला भुरळ घालू लागले. हृदय भरपूर गतीने चालत होत. तिथे फार वारा सुरू नव्हता पण तीच शरीर त्याच्या नजरेनेच भारावून गेल होत. वारा नसतानाही थंडीचे भास तिला होऊ लागले होते. काही वेळ ती त्याच्यासोबत थांबली असती तर तिचाच स्वतावरचा ताबा सुटला असता म्हणून ती त्याच्या हातातून आपले हात सोडवून सरळ दुसरीकडे पळाली. ती पळत होती तर अन्वय हसून तिच्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे लाली पसरली होती. धावतानाही स्वरा अधून-मधून मागे वळून बघत होती आणि ती सध्या काय फिल करत आहे ह्याच उत्तर त्याला क्षणात मिळालं. तो हसत होता तर ती पळत होती.

स्वरा धावत- धावत स्कुटीजवळ पोहोचली जी त्यांनी आजच्यासाठी हायर केली होती. अन्वयही हळूहळू पावले टाकत तिच्या जवळ पोहोचला. तो जवळ येताच ती हसतच उत्तरली," चावटपणा झाला असेल तर निघुया का? मला अजून खूप फिरायचं आहे. नाही तर तुमच्या नादात सर्वच राहून जायचं. तुम्ही मला फिरायला घेऊन आलात ना तेव्हा आधी ते करा मग आयुष्यभर चावटपणा करा तुम्हाला कुणी अडवलं नाही."

अन्वय तीच बोलणं ऐकून हसलाच होता की स्वरा उत्तरली," सर मी चालवू. खूप दिवस झाले चालवायला मिळाली नाही. अफकोर्स तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर नाही तर म्हणाल तुझ्यासोबत येण्याची रिस्क कोण घेणार? पापाकी परी गाडी लेकर उडी अस म्हणू नका हा?"

तिचे शब्द ऐकून अन्वय स्वतःला हसण्यापासून सावरू शकला नाही आणि मोठ्याने हसतच म्हणाला," इट्स ओके मॅडम. असला तरी शेवटचा क्षण तुझ्यासोबतच असेल ह्यातच मला आनंद आहे. तस पण मला तुला जवळून बघायचा बहानाच हवा होता, आता तूच तो मला दिलास. तू चालव मी करेन चावपटना."

स्वरा त्याला बघत हसतच उत्तरली," तुम्ही नाही सुधारणार ना?"

अन्वय क्षणभर तिच्याकडे एक पाऊल टाकत म्हणाला," कधीच नाही. म्हातारे होऊ तरीही असाच राहीन. चावट तर चावट!! तुला काही प्रॉब्लेम?"

काय होता अन्वय, स्वराची अगदीच बोलती बंद करायचा. ती त्याच बोलणं ऐकून हसली पण आता तिच्याकडे त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं म्हणून ती हसतच गाडीवर बसली आणि त्याच्या बसण्याची वाट पाहू लागली. तीच लाजन अजूनही कमी झालं नव्हतं आणि अन्वय क्षणात मागे बसला. अन्वय मागे बसताच स्वराने हळुवारपणे गाडी चालवायला सुरवात केली. स्वरा गाडी चालवत होती तर अन्वयही बाहेरच वातावरण बघण्यात हरवला. हे स्वरा-अन्वयच्या आयुष्याच्या जीवनाचे सर्वात सुंदर क्षण होते. ज्यात तिला तिच्या चेहऱ्यावरून कुणी ऐकवणार नव्हतं आणि तिला कामाचही कुठलंच टेन्शन असणार नव्हतं. तिचा सुंदर चेहरा बघताच जगातल्या सर्वात सुंदर मुलीसोबत असण्याचा आनंद त्याच्याही चेहऱ्यावर सहज दिसायचा. असे ते क्षण..स्वराने गाडी चालवायला घेतली आणि अन्वयने तिच्या बाजूने सरकत तिला मागून मिठी मारली. दोन्ही हात तिच्या कमरेमागून येऊन घट्ट बांधल्या गेले. त्यांच ते तस वागणं तिलाही आवडलं होत तरीही जरा त्याला सतवाव म्हणून ती उत्तरली," पुन्हा सुरू केला ना चावटपणा? तुम्हाला फक्त संधी हवी असते, हो ना??"

अन्वय क्षणभर हसतच उत्तरला," हो तर. बायकोवर प्रेम करायची संधी सोडायची नसतेच मुळात. माझं प्रेम तर सर्वांपेक्षा जास्त आहे मग मी कशी सोडणार ही संधी?"

तो अस काही बोलायला लागला की तिच्या पोटात गुदगुल्या व्हायला लागायच्या आणि स्वरा हसतच उत्तरली," आणि हे अस इथे कुणी बघितलं तर लोक काय म्हणतील? आपल्याला बेशरम म्हणायला सुद्धा कुणी मागे पुढे बघणार नाहीत. आधीच चेहऱ्यावरून बोलतात आता संस्कृती भ्रष्ट केली म्हणून ओरडतील."

अन्वयने हसतच पुन्हा म्हटले," कुछ तो लोग कहेंगे मॅडम. तस पण इथे सर्व कपलच फिरायला येतात सो तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. अश्लील काही करत नाहीये मी, फक्त माझ्या बायको सोबत ह्या सुंदर स्वर्गात काही क्षण जगतोय. तेव्हा कुणाला प्रॉब्लेम असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे आणि मला वाटत आपल्याला अस बघून सर्वच करतील सेम माझ्यासारख. ते काही लाजनार नाहीत. तस पण लाजनारे आपल्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मिस करतात सो हे बहाणे मला तरी देऊच नका हो मॅडम. मी लोकांमुळे हे क्षण वाया घालवणार नाही. जग प्रत्येक गोष्टीत काही ना काही कमी काढतच मग काय सतत त्यांचं ऐकत बसायचं. बोलणारे बोलतात आपण आपल्याला वाटत ते करायचं. बायकोवर प्रेम करायला आता जगाची परवानगी घ्यावी लागेल मला??"

ती क्षणभर हसतच उत्तरली," आता काय बोलणार मी बिचारी गरीब? पुन्हा एकदा गप्प केलत ना मला? करा तुम्हाला आवडेल ते. मला काही प्रॉब्लेम नाही. साठवून घ्या आपले आवडते क्षण. काय माहिती मी उद्या असेल, नसेल?"

तीच हे वाक्य येताच त्याने मागून तिच्या डोक्यावर मारले. ती हळूच हसली पण अन्वय रागावला नव्हता. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

किसीं की सोच उनकी है
भला हर बार क्यू उसे अपणाया जाये
बनालो खुदकी अपनी सोच
जीसकी दुनिया दिवानी हो जाये...

केम्पटी वॉटरफॉल. ती दुपारची वेळ होती. स्वरा- अन्वय वॉटरफॉलची मज्जा अनुभवायला तिथे पोहोचले होते आणि स्वरा पुन्हा एकदा त्या निसर्गात हरवली. एक तर तो सुंदर निसर्ग वरून त्यातून पडणारा तो वॉटरफॉल बघून स्वराचा चेहरा पुन्हा एकदा खुलला होता तर तिथे असणारी गर्दी बघून अन्वय काही वेळ त्या सर्वाना बघतच राहिला. कदाचित त्याला थोडं ऑकवर्ड वाटत होतं, स्वराला इथे काही त्रास होणार तर नाही ना ह्याचा विचार करत तो तिथेच शांत उभा राहिला तर स्वरा समोर दिसणाऱ्या पाण्यात क्षणातच झेपावली. स्वरा पाण्यात उतरली आणि क्षणात मस्ती करण्यात गुंग झाली. तो निरागसपणा बघून तिला कुणिच अस म्हणू शकत नव्हत की ही तीच स्वरा आहे जी वयापेक्षाही जास्त प्रगल्भ आहे म्हणून कदाचित क्षणात अन्वयच्या चेहऱ्यावरची ऑकवर्ड नाहीशी झाली आणि तो सुंदर हसू चेहऱ्यावर घेऊन तिच्याकडे बघू लागला. स्वरा तर पाण्यात उतरली पण अन्वय अजूनही उतरलाच नाही हे बघून स्वरा त्याला मोठ्याने म्हणाली," या ना अन्वय सर किती मज्जा येतेय इथे. तुम्ही इथे फिरायला आलात की फक्त बघायला? धीस इज नॉट फेअर हा!!"

अन्वय पाण्याच्या जरा दूरच होत म्हणाला," तू कर एन्जॉय मी इथेच बरा आहे. मला नको बाबा हे पाणी वगैरे.."

क्षणभर स्वराला त्याचा राग आला होता पण ती काहीच म्हणाली नाही उलट तिथे असणाऱ्या स्त्रियांसोबत ती खेळू लागली तर अन्वय आता तिचे सुंदर सुंदर फोटो घेऊ लागला होता. तिच्या ते लक्षात आलं आणि स्वरा त्याला चिडवायला वेगवेगळ्या पोज देऊ लागली. तिच्या त्या फोटोमधला कार्टूनपणा बघून अन्वयच हसू आवरत नव्हतं तरीही त्याने तिचे फोटो काढणे बंद केले नव्हते. स्वरा मधातच पोज देताना, त्याला फोटो काढता येऊ नये म्हणून कुणाच्या तरी मागे लपायची. अन्वय तिचे फोटो काढायला तिच्या बाजूने वळायचा तर तिला त्याच्याशी मस्ती करायला आवडत होत. कितीतरी वेळ दोघांची अशीच मस्ती सुरू होती. आता अन्वयने फोटो काढणे बंद केले आणि एका जागी शांत बसला. तो फोटो जरी काढत नव्हता तरीही त्यांच पूर्ण लक्ष तिच्या निरागस चेहऱ्यावर होत. असा एक सेकंद नव्हता की तो तिच्याकडे बघत नव्हता. जे म्हणतात की लग्नानंतर आपली बायको सोडून दुसऱ्याची बायको आवडते त्यांच्यासाठी अन्वयच प्रेम एक सुंदर उदाहरण होत. जो तिला जेवढं ओळखत जात होता तेवढाच तिच्या प्रेमात बुडत होता. मनावर प्रेम असलं की कदाचित बायको पासून बोर होत नाही आणि शरीरावर असलं की गरज संपताच बोर होत हे ह्या काही घटनांवरून नक्कीच सांगता येत होतं म्हणूनच कदाचित अन्वयला तीच वेड लागल होत.

तो सतत तिच्याकडे बघत होता आणि केव्हापासूनच त्याला बघत असणारी स्वरा त्याच्याजवळ आली. हळूच त्याच्या बाजूला येत तिने विचारले," काय बघत आहात हो मला इतके? मी इतकीही काही सुंदर नाही. बाजूला बघा तरी किती सुंदर मुली आहेत इथे. तुम्ही त्यांच्याकडे बघितलं ना तरीही मी काही म्हणणार नाही हा उलट मलाही सांगा कुणाला बघत आहात ते. आपण मिळुन बघू. आजच्या दिवस सूट तुम्हाला, अस समजा मी नाहीच आहे."

तीच बोलणं ऐकताच अन्वयच्या चेहऱ्यावर सहज हसू पसरल पण तो काहीच बोलला नाही आणि स्वराच म्हणाली," हसले म्हणजे फसले अन्वय सर.. सांगा सांगा कोण आवडली?"

तिची ती क्यूटनेस आणि अंदाज बघून त्याच्या चेहऱ्यावरच हसू तसच राहील. काही क्षण तसेच गेले आणि स्वराने अचानक त्याचा हात पकडत म्हटले," खूप झालं बघून चला या मध्ये. मी इथे तुमच्यासोबत आले आहे हे विसरू नका. तुमच्याशिवाय ह्या क्षणात मज्जा नाही हो कस कळत नाही तुम्हाला. बायकोच मन इतकं तर जानता मग हे कसं समजत नाही तुम्हाला? मी तुमच्याविना अपूर्ण आहे मग हे क्षण कसे पूर्ण असतील?"

तिच्या चेहऱ्यावरच फक्त काही सेकंद हसू गेलं आणि अन्वय हातातला मोबाइल बॅग मध्ये ठेवत पुन्हा तिच्याकडे आला. स्वराने पुन्हा त्याला हात दिला आणि अन्वय तिचा हात पकडूनच मध्ये आला. त्याने पाण्यात ह्याव आणि तिने सरळ त्याच्यावर पाणी उडवायला सुरुवात केली. ती त्याच्या चेहऱ्यावर पाणी उडवत होती आणि अन्वय त्याही क्षणातून तिलाच बघत होता. पाणी उडवता- उडवता ती त्याच्यापासून दूर पळू लागली आणि अन्वयने क्षणात तिचा मागून हात पकडला. तिला क्षणभर सुद्धा वाटलं नव्हतं की तो इतक्या लोकांसमोर तिचा हात पकडेल म्हणून ती जरा लाजलीच. हार्ट बिट तर किती फास्ट काम करत होते, तीच तिला माहिती. तिने अजूनही त्याच्याशी नजर मिळवली नव्हती आणि क्षणात त्याने तिचा हात पकडून स्वतःकडे ओढले. ती अगदीच त्याच्या छातीवर जाऊन ठेपली. तो तिच्याकडे बघत होता आणि ती त्याच्या डोळ्यात त्याच प्रेम बघत होती. इतकं प्रेम जे कधी तिच्यावर कुणीच केलं नव्हतं. ती एकटक त्याच्याकडे बघतच होती की अन्वयने तिच्या पायांना घट्ट पकडून वर हवेत उचलले आणि हळुवार तिला फिरवू लागला. आतापर्यँत त्याच्या नजरेला नजर देऊन असणारी ती आता गोल गोल आकाशाकडे बघू लागली. तिच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर क्षणांपैकी एक तो क्षण होता. त्या क्षणी ना अन्वयला जगाच भान होत, ना स्वराला. स्वरा तर उघड्या डोळ्याने तो चौफेर प्रदेश बघत होती आणि अन्वय त्याही क्षणी तीच हसू. जवळपास ५ मिनिट तो तिला फिरवत होता आणि त्याने तिला खाली उतरवले. त्यांचं आतापर्यँत कुणाकडे लक्ष नव्हतं पण ती जशी खाली उतरली तसे बाजूचे सर्व त्यांना बघून टाळ्या वाजवू लागले. टाळ्यांचा, ओरडण्याचा आवाज येताच स्वराला लाजायला झालं आणि तिने पुन्हा एकदा आपला चेहरा त्याच्या कुशीत लपविला. ती त्यातून बाहेर निघतच नव्हती की अन्वय हसतच उत्तरला," बघितलंस माझी बायको किती सुंदर आहे? तुला उगाच वाटत की ती सुंदर नाही. इतकी सुंदर बायको सोबत असल्यावर तिच्यावरून नजर हटवणारा पुरुष, तिची सुंदरता समजुच शकला नाही अस म्हणेन. माझी बायको जगातली सुंदर व्यक्ती आहे हे मला माहित आहे आणि ते कधीच बदलणार नाही. तेव्हा तिला सोडून दुसरीला बघायचा प्रश्नच येत नाही. समजल स्वरा मॅडमं?"

स्वराने नजर तर वर केली नाही पण हळूच हसत उत्तरली," तुमच असच बोलणं ऐकून ना मी कायम फ्लॅट होते. मग क्षणभर वाटत की पटकन ओठ टेकवावे तुमच्या ओठांवर. किती हे प्रेम अन्वय सर!! इतकं प्रेम कुणी कुणावर करत का?"

अन्वय हसतच उत्तरला," दे मग. बघ मी डोळे बंद केले आहेत. चल दे पटकन."

तिने हळूच नजर वर करून बघितले तर त्याने खरच डोळे बंद केले होते. स्वराला क्षणभर स्वतःवरच लज्जा आली आणि त्याच्यापासून दूर पळत म्हणाली," ते तर मी गमतीत म्हणत होते. तुम्हाला काय खर वाटलं? वाट बघा हा त्या क्षणाची. मी माही देणार.."

ती दूर पळत होती आणि अन्वय तिच्या निरागसपणावर हसत होता. ती अगदीच काही पावले समोर गेली आणि पुन्हा एकदा अन्वयवर पाणी उडवू लागली. अन्वयने तिला काहीच म्हटले नाही उलट तिच्या प्रेमाच्या पावसात तो मनमुराद भिजत होता. प्रेम असतच अस, सतत मनाशी जुळून असणार. त्याला कधीच मर्यादा नसतात आणि ते बोर पण होत नाही असे ते क्षण सांगत होते पण त्यासाठी अट एकच प्रेम मात्र खरं असावं. खर्या प्रेमात माणसाच मनावर प्रेम असत आणि शरीर फक्त बहाणा असतो जवळ यायचा. एकमेकांना फुलविण्याचा...

सारी जिंदगी मेरी
तुझपे कुर्बान कर दु
नशा है मेरी आंखो मे
आ तुझे मै जन्नत की सैर करादु...

पुन्हा एक रात्र. स्वराला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत म्हणून स्पेशली हॉटेल बुक करण्याऐवजी त्याने टेंट बुक केलं होतं. रात्रीच्या वेळी ती जागा बघण्याची मज्जाच वेगळी असायची शिवाय त्याला गर्दीमध्ये स्वराला ठेवायचं नव्हतं हे त्यामागे कारण होत. आजही बाहेर मनमोहक वातावरण निर्माण झालं होतं. हलकी-हलकी थंडी अंगाला स्पर्श करून जात होती. दोघांच जेवण आटोपलं होत पण अन्वय कॉल करायला जरा बाहेर गेला होता. स्वरा मध्ये एकटीच बसून होती पण दिवसभराचा त्याचा मूड बघून तिला दिवसात एकदाही कंटाळा आला नव्हता. अन्वयची ती रोमँटिक नजर तिला मनातून सुखावून जात होती, त्याचे शब्द रात्रभर सोडणार नाही तिला आठवू लागले आणि त्या क्षणी आणखी काय काय रोमँटिक होईल ह्या विचारानेच स्वराच्या अंगावर शहरा आला होता. एक तर ती हलकी हलकी थंडी आणि त्यासोबतच त्याच्या प्रेमाची जादू आज स्वराच्या मनावर बरीच चढली होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सतत लाजेचे भाव होते. मनात काय चालू असेल ह्याबद्दल विचार न केलेलाच बरा. ती टेंट मध्ये बसून दिवसभराच्या क्षणाचा विचार करत होती की अन्वय मध्ये आला. तो मध्ये येताच स्वराच शरीर पुन्हा एकदा खुलुन निघालं. तो मध्ये आला तरीही तिने त्याच्याकडे बघायला नजर वर केली नव्हती. अन्वयच्या ते लक्षात आलं नाही म्हणून मध्ये येत तो म्हणाला," अग आईचा कॉल होता विचारत होत्या तुझ्याबद्दल."

स्वराने त्याच बोलणं ऐकलं तर होत पण तिने अजूनही नजर वर केली नव्हती. काही क्षण बोलून झाल्यावर तो शांत झाला. क्षणात त्याची तिच्या चेहऱ्यावर नजर गेली आणि एक एक पाऊल तो समोर टाकू लागला. त्या वातावरणात इतकी शांतता होता की त्याच्या पायांचे आवाज आणि तिच्या हृदयाचे आवाज एकत्रच येत होते. पायही हळूच एकमेकांवर घासू लागले. तो एक-एक पाऊल टाकत जवळ पोहोचला. तो आता इतक्या जवळ पोहोचला होता की त्याच्या श्वासांचे आवाजही तिला येत होते म्हणून तिने पटकन डोळे घट्ट मिटून घेतले. अन्वय खर तर मागे त्याचा चष्मा पडला होता तो घेत होता पण त्याला जाणवलं की तिने डोळे बंद केले आहेत म्हणून तो क्षणभर चेहऱ्यावर हसू ठेवून शांतपणे तिच्याकडे बघू लागला. तो बघत होता. त्याने आजपर्यंत इतकी सुंदर मुलगी कधीच बघितली नव्हती म्हणून त्याला तिला बघण्याचा मोह आवरत नव्हता तर अजून अन्वयने काहीच का केलं नाही म्हणून तिने हळूच डोळे उघडले. तो अगदीच जवळ होता. तिने डोळे उघडताच त्याने नजरेनेच विचारले," किस करणार आहे अस वाटलं ना?"

त्याची ती नजर आणि स्वराचे हार्ट बिट आणखीच फास्ट झाले. ती चेहऱ्यावर लाजेचे भाव घेत त्याच्यापासून दूर जात म्हणाली," शी बाबा तुम्ही ना खुप छळता मला. किती छळाव ना एखाद्याने?"

ती त्याच्याकडे बघतच नव्हती आणि अन्वय तिला मागून मिठी मारत म्हणाला," अधिकार बनतो माझा. इतक्या सुंदर क्षणी मी नाही तर कोण गंमत करणार तुझी. काही चुकीच बोलतोय का मी?"

ती त्याच्या बाजूने वळत म्हणाली," पण.."

तिने त्याच्याकडे बघितले. तिच्या हार्ट बिट हळू व्हायच्या काहीच नाव घेत नव्हत्या. पुन्हा एकदा त्याची ती नजर आणि स्वराच लाजन. अन्वय तिला दोन्ही हाताने स्वतःकडे ओढत म्हणाला," घेऊ किस्सी?"

स्वराकडे त्याच उत्तरच नव्हतं. मुळात त्याला परवानगीची गरजच नव्हती. तिची नजर खाली आणि अन्वयने हळुवार आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेले. क्षणात तिनेही आपली नजर वर केली आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकताच डोळे बंद झाले. ओठ आपले काम करत होते तर स्वरा-अन्वय कुठेतरी हरवले होते. अगदी किती सेकंद ते एकमेकांच्या ओठातला रस पिते होते माहिती नाही पण बाहेरून आवाज आला आणि स्वराने डोळे उघडले. तिने डोळे उघडताच ती लाजतच बाजूला झाली तर अन्वय तिच्याकडे बघून हसत होता. स्वराला आता खूपच लाजायला झालं होतं. त्याच्याशी तिला नजर मिळविता येत नव्हती म्हणून ती क्षणात बाहेर पळाली तर अन्वय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून हसत होता.

अगदी काहीच क्षण झाले. स्वरा धावतच येत म्हणाली," अन्वय सर मस्त मेहफिल बसली आहे. मध्ये आग आणि काही लोक गाणे म्हणत आहेत गिटारवर चला ना आपण जाऊ."

अन्वय हसतच उत्तरला," तू हो समोर, मी एक मेल करून येतो."

स्वरा धावतच तिकडे पळाली आणि अन्वय केंटमध्येच राहिला.

१० मिनिटांच्या आसपास झाले. अन्वय मेल करून बाहेर निघू लागला. त्याला दुरूनच दिसलं की स्वराला थंडी वाजत आहे म्हणून तो पुन्हा मध्ये गेला आणि शाल घेऊन पुन्हा बाहेर जाऊ लागला. अन्वय हळूहळू समोर जाऊ लागला आणि गाण्याचे आवाज आणखीच वाढू लागले. स्वरा अगदी गाणे ऐकण्यात तल्लीन झाली होती त्यामुळे थंडी वाजतेय ह्याच भानही तिला नव्हत. अन्वयने हळूच जाऊन तिच्या अंगावर शाल दिली. अंगावर शाल येताच तीच त्याच्याकडे लक्ष गेलं. क्षणभर तिने त्याच्या नजरेत बघितले आणि आपोआप चेहऱ्यावर हसू आलं. अन्वय अगदी तिच्या बाजूला बसला आणि तोही गाणे ऐकण्यात तल्लीन झाला.

ज्यांनी टेंटची व्यवस्था केली होती, तिथलेच ४-५ मूल-मुली गाणं म्हणत होते. बहुदा नेहमी ते गाणे म्हणत असावे असे त्यांच्या गोड आवाजावरून जाणवत होते म्हणून जवळपास सर्वच कपल, सिंगल लोक तिथे बसून गाणे ऐकत होते. जवळपास अर्धा तास त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यातलाच एक म्हणाला," हे गाईज हम तो गाते रेहते है. ये हमारा रोजका काम है पर क्या आपमेसे कोई गाना चाहेगा. मौसम भी सुहाना है तो क्यू ना कोई आकर कुछ अच्छासा सुना दे. जीससे मेहफिल मे और रंग चढ जाये. है यहा कोई ऐसा जो अपणे किसीं खास के लिये कुच रोमँटिकसा सुना दे?"

सर्व लोक एकमेकांकडे बघत होते. कुणीच समोर जात नव्हत म्हणून मग अन्वयच उठला. स्वरा क्षणभर त्याच्याकडे बघतच होती आणि अन्वयमध्ये जात म्हणाला," हॅलो गाईज. मै गाना गाणे से पेहले कुछ केहना चाहता हु आपकी इजाजत हो तो."

तो आतांचाच मुलगा म्हणाला," हा जरूर. क्यू गाईज सुने ना?"

बाजूच्यानी होकार भरला आणि अन्वय हसत म्हणाला," बिवी कितनी अजीब इंसान है ना? वो कैसे.. उनकी तरफ ना देखु तो भी चीढ जाती है और देखु तो पूछती है की इतना क्या देखते हो इतनीभी सुंदर नही मै. क्या उसे समझना इतनाभी आसान है?"

अन्वयचे शब्द ऐकताच सर्व हसू लागले. त्यात स्वराही होती. अन्वय स्वराकडे हात दाखवत पुन्हा म्हणाला," ये है मेरी बिवी. क्या आपको वो सुंदर नही लगती? आपको पता नही पर मुझे बहोत लगती है. पता नही क्यू?? क्या खास है उसमे? एक बात हो तो बताऊं. हजारो क्वालिटी देकर भगवानने ऊसे बनाया है और आज उसमेसे एक क्वालिटी मुझे देखणे मिली और वो आपसे शेअर करणा चाहता हु. तो मॅडम आज केहणे लगी मुझसे की मै सुंदर नही तो किसीं और सुंदर लडकी को देख सकते हो. ये एक बात सूनकरही लगता होगा ना ऐसी बिवी सबको मिलनि चाहीये?"

त्याचे शब्द आणि पुन्हा एकदा वातावरणात हसू. स्वरा तर हसतच त्याच्याकडे एकटक बघत होती आणि अन्वय पुन्हा म्हणाला," आप हसलो मन चाहे उतना पर मै उसकव सोच की दाद देता हु. सच बोलू दोसतो तो हम मूर्ख है की हमारी बिवी छोड कर हमे दुसरे ज्यादा पसंद आते है. माँ के बाद सबसे ज्यादा वही हमारी देखभाल करती है. वो हमे प्यार करती है, हमे सिर्फ अपणाती नही तो अपणा नसीब बना लेती है. तो क्या उसकी फिकरकी उसके प्यार की तुलना किसीं औरं से कर सकते है? शायद यहा सब ये समझ नही सकते पर जिसे समझ आया उसे उसकी अहमियत समझ आयेगी. अब मेरी बिवी को जवाब देना चाहता हु. बिवी तुम्हारा चेहरा तुम्हारी सुंदरता नही तो तुम्हारी सादगी, तुम्हारी फिकर असली सुंदरता है और ये सुंदरता देखणे के लिये मै हर पल आपके साथ रेहने वाला हु. क्यूकी आपकी सादगी, फिकरमे कोई मिलावट नही है. हजारो लडकीया मिलेगी, कोई पैसेसे प्यार करेंगी तो कोई मेरी लुकसे. तुम सिर्फ अकेली हो जो मेरे दिलंसे प्यार करती हो इसलीये तुम पर सारी दुनिया कुर्बान. लोगो का पता नही पर मै अपणे बिवी को हर पल देखणा चाहूगा फिर उसका चेहरा खराब हो जाये या वो बुढि हो जाये. क्या ये चीजे प्यार करणे से मुझे रोक सकती है तो मै केह सकता हु बिलकुल नही. बिवी तुम्हारी सादगी को दाद देता हु पर मेरी दुनिया मे तुम्हारे अलावा कोई और नही. तो बिवी ये गीत सर्फ आपके लिये."

सर्व अगदी शांतपणे ऐकत होते. स्वरा तर त्याच उत्तर ऐकून भारावून गेली होती आणि अन्वय गाऊ लागला..

तुमको छुके भी छुने को
करता है दिलं
तुमको पाके भी पाने को
करता है दिलं
तुमको छुके भी छुने को
करता है दिलं
तुमको पाके भी पाने को
करता है दिलं
आवारगी आने लगी
सांसो मे खुशबू छाने लगी
दिलं पे दिवानगी
छा गयी इस कदर
बंद आंखो से भी
मुझको आये नजर
कैसे कहु हमे कितनी मोहब्बत है
हा मोहब्बत है
कैसे कहु तुमसे कितनी मोहब्बत है
हा मोहब्बत है…

तेरी सांसोसेही मेरी सांसे चले
तुही दिखे जबभी आंखे खुले
देखा फलक देखी जमीन
कोई नही तुमसा कही
आ तुझे खुदमे मै इस तरहँ लु छुपा
के खुदा भी हमे कर ना पाये जुदा

कैसे कहु तुम्हे कितनी मोहब्बत है
हा मोहब्बत है..
हा मोहब्बत है…

तो थांबला तेव्हा सर्व टाळ्या वाजवत होते. तो मगाचाच मुलगा त्याला हग करत म्हणाला," क्या बात है भैया. गाणे से भी जो बाते कही नो वो सच मे लाजवाब है. थॅंक्यु सो मच. सच कहू तो आपणे मेहफिल मे चार चांद लगाये है."

अन्वय हसतच तिच्या बाजूला जाऊन बसला. तो बाजूला बसताच तिने पटकन त्याचा हात पकडला आणि हळुवार आवाजात म्हणाली," थॅंक्यु माझ्यावर इतकं प्रेम करायला. लव्ह यु सो मच!!"

अन्वय क्षणभर हसतच म्हणाला," थॅंक्यु स्वरा मला माझ्या हक्काच प्रेम द्यायला. तुझ्या व्यतिरिक्त ते मला कुणीच देऊ शकत नाही. तुझ्या प्रेमासमोर चेहरा महत्त्वाचा नाही की जगाचे बोल महत्त्वाचे नाहीत. मला स्वप्न बघायचे आहेत तुझ्यासोबत अगदी शेवटच्या सेकंदपर्यंत फक्त चेहऱ्यावरच हसन कधी कमी होऊ देऊ नको."

ती त्याला बघून हसली आणि अन्वयच्या चेहऱ्यावरही पुन्हा एकदा हसू आलं.

आयुष्यात प्रत्येक व्यक्तींने थोडं फार स्वार्थी असावंच, आयुष्यात स्वार्थ नसेल ना तर आपल्याला आपल्या आवडीनुसार जगता येत नाही. प्रत्येक गोष्टीत समाजाचे काही तरी मत असणारच पण त्यातली कोणती घ्यायची हे आपण ठरवायच. त्याग मनाला समाधान देऊ शकतो पण स्वार्थ मनाला आनंद देतो तेव्हा थोडं फार स्वार्थ आयुष्यात नक्किच असावा. तो बोलून गेला आणि नकळत आईने बोललेले शब्द त्याने चुकीचे ठरवले. त्यालाही त्रास होत असेल फक्त तुला सांगत नाही ह्याच किती सुंदर उत्तर नकळत त्याने दिलं होतं ना..

" प्रेम अस असावं की समोरच्याचा त्रासही आपल्याला आपला वाटावा आणि त्याचा संघर्षही आपला..प्रवास आपला वाटला लोकांच्या बोलण्यामुळे चिडचिड होत नाही की काय हेच रोज रोज म्हणून रागही येत नाही। असच तर असत प्रेम. ह्यापेक्षा प्रेमाची काही वेगळी व्याख्या आहे का??"

अन्वय स्वराचा हात एकमेकांच्या हातात होता आणि लक्ष समोर पण मन जुळली होती कायमची जी आता कधीच तुटणार नव्हती. ते दोन शरीर वेगळे होते पण प्रेम त्यांच्यासारख कुणाचंच नव्हतं..त्यांना आता लोकांच्या बोलण्याची पर्वा नव्हती. ते जगत होते प्रत्येक दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून..

आसमासे धरती की मोहब्बत
कभी देखी है किसींने
पर दूर रेहकर भी सुकून दे जाये
ऐसी मोहब्बत भला की है किसिने?