Mall Premyuddh - 54 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 54

मल्ल प्रेमयुध्द

भूषणला वीरच वागणं विचित्र वाटत होतं. त्याने स्वप्नाला फोन केला.
"हॅलो स्वप्ना..."
"पोहचला?"
"पोहोचलो कधीच आता निघतोय."
"भेटला का क्रांतीला बरी आहे का ती?"
"ती बरी हाय हो पण वीर त्याच डोकं फिरलंय... त्याला कळत नाय तो काय करतोय."
"म्हणजे?"
"त्याने क्रांतीच्या मित्राला कुस्तीच्या निमित्तान बेदम मारला हो...मला कळत न्हाय जर वहिनीला सोडायचं हाय मनातल्या रागापाई तर मग नसते उद्योग कशाला?"
"भूषण तो क्रांतीच्या प्रेमात आहे पण त्याच्या मनात राग इतका साठून आहे की हे त्याला कळत नाही हे त्याला जाणवत आहे पण तो व्यक्त वेगळ्या मार्गाने करतोय."
"आता प्रेम करून काय फायदा? वहिनी किती दुखावली माहीत हाय का स्वप्ना.. तिच्या डोळ्यातल्या भावना जर तुमी बघितल्या असत्या ना तर काळीज पिळवटून निघालं हो.."

"त्याला जाणीव होईल..."
"स्वप्ना वेळ निघून जाईल हो... आपल्याला काहीतरी केलं पाहिजे..."
"पण काय?"
"आपण भेटून बोलू... मी आत्ता निघतो तुम्ही गावाला आला की भेटून यावर काहीतरी मार्ग काढू..."




आबा वीरच्या फोनची वाट बघत होते. शेवटी कंटाळून आबांनी फोन केला.
"वीर बरा हाय नव्ह?"
"व्हय आबा.."
"आवाजवर वाटत नाय?"
"आबा न्हाईत नाय का सगळी लांब जात्यात माझ्यापासन अस वाटतय..."
"लेकरा अस का वाटतय..."
"आबा आज भूषण्या क्रांतीला भेटायला आला व्हता मला भेटला पण लै रागात बोलला तो कधी अस माझ्यावर आवाज चढवून बोलला नव्हता आबा..."
"वेळ आलीच त्याचा खरा चेहरा तोच व्हता शेवटी गरिब त्यांची धाव कुंपणापर्यंत... तुमाला म्या आधीपासूनच सांगत व्हतो त्याच्याशी मैत्री नका करू पण..."
"पण आबा मी चुकतोय तवाच तो माझ्यावर चिडतो न्हायतर समजावून सांगितलं असत त्यांनी... तो झाला आई, वैनी, दादा कोणाचा फोन न्हाय आला मला...फकस्त एकदा क्रांतीच्या दादांचा फोन आला मला मी ठीक बोललो त्यांच्याशी..."
"बघ एकदा का तुझ्या मनासारख झालं की जवळ येत्यात आपोआप सगळेजण नदी काळजी करू... आर्या काय म्हणती..."
"आबा डोक्याला ताप हाय ती न तिचा बाप हात धून मग लागल्यात डीओर्स घायचा अन लग्न करायचं म्हणून..."
"मग घायचा की डीओर्स आता अस किती महिने राहिल्यात अन करायचं आर्याबर लग्न आपलं ठरलं व्हत ना तसं..."
"आबा इतक्यात नको... ती लोक लै श्रीमंत त्यांना पैशाचा माज हाय मला काय लग्न झाल्यावर सुखान जगू देत्याल अस वाटत न्हाय. आबा एवढं एका माझं आपण थांबू थोडं दिस"
"बर तुला वाटत तसं करू..."
"आबा आई कशी हाय?"
"ती बरी हाय... रोज क्रांतीला फोन असतो.."
"ज्या आईला मी एक मिनिटं डोळ्यासमोरन बाजूला झालेलो चालायचं न्हाय तीन इतकं दिवस हुन एक फोन केला न्हाय."

"आईला तुझ्या काय बी कळत नाय नको मनाला लावून घेवू थोडा येळ गेला की व्हईल सगळं नीट."
वीरने फोन ठेवला त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
"मी का आज असा वागलो ?समीरला का बेदम मारलं? त्याची काय चूक व्हती? तो गेम व्हता त्यात तो नवीन लै लागलं असलं का त्याला? मला जाऊन माफी मागायला पाहिजे . मी असा नव्हतो. का माझ्याकडून अस झालं?



क्रांती उशाला फक्त टेकून बसली होती.
"क्रांते झोप आता विचार करून काय व्हणारे का? सकाळी लवकर उठायचं?"
"रत्ना झोपच येत न्हाय. सकाळचा प्रसंग डोळ्यापुढणं जायना, अस वाटतय जावं अन जाब इचरावा.."
"नको त्याचा काय फायदा... भूषणला ईचारणा मग तुझ एकूण तरी घेत्याल का? काय बी बोलायला जाऊ नकोस आता समीरची काळजी वाटती."
"व्हय ग... किती लागलंय त्याला..."
"साठेसरांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे व्हती."
"आग कस श्यक्य हाय साठेसारणा आर्यांच्या वडलांच्या दाबाखाली काय बोलत येणार हाय...ऐकलं न्हाय ज तूकी वीर आणि..."रत्ना एवढंच बोलली आणि क्रांतीच्या डोळ्यातून पाणी आले.
"ये वेडाबाई आग कोणासाठी डोळ्यात पाणी आणतीस?"
"रत्ना अग विश्वास असतो ना ग... आपण सगळी आयुष्यतली माणस ज्याच्यासाठी सोडून येतो. तो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अस वागतो ज्ञानी मनी नसताना."
"क्रांती पहिल्या रात्री..."
क्रांतीने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली." रत्नाला समजायला वेळ लागला नाही. क्रांतीच त्याच्यावर लई प्रेम हाय.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत


इतर रसदार पर्याय