मल्ल प्रेमयुद्ध - भाग 55 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 55

मल्ल प्रेमयुध्द


6 महिन्यानंतर...


क्रांतीचे नॅशनलसाठी सिलेक्शन झालं होतं.

"क्रांती तुझी एवढया वर्षांची मेहनत कमी आली. मला विश्वास होता, तू नक्की सिलेक्ट होणार.."
"सर एवढ्या वर्षांची मेहनत हाय पण तुम्ही जे माझ्याकडून करून घेतलंय गेल्या सहा महिन्यात ते मी एकटी नसती करू शकली. तेवढ्यात रत्ना आणि समीर धावत आले. रत्नाने क्रांतीला मिठी मारली.
"क्रांती एवढा आनंद झालाय... शब्द न्हाईत..."
"पहिल्यांदा आई दादांना फोन करते. मग आत्याबाईंना सांगते."
"क्रांती तुम्ही फोन करा आणि केबिनमध्ये या आपल्याला आता जायची तयारी करायला पाहिजे." साठेसर निघून गेले. आज क्रांतीला वीर कुठेच दिसत नव्हता.) तिने रत्नाकडून फोन घेतला आणि दादांना फोन करून सिलेक्शनविषयी सांगितल. दादांचा आनंद गगनात मावत न्हवता.

"आशा ये आशा, चिनू या लवकर.."
"काय झालं?" आशा साडीच्या पदराला हात पुसत आली.
"अग तुझ्या लेकीचं सिलेक्शन झालाय नॅशनल साठी.... पहिली देवासमोर साखर ठेव..."
"काय सांगताय दादा.. वा! पण ताई टुर्लमेंटला कुठं जाणार हाय...?" चिनू म्हणाली.
"कर्नाटकला.. पुढच्या आठवड्यात.."
"पण हे सासरी म्हायती हाय का? न्हाय आबासाहेब फोन करत न्हाईत का नेहमीप्रमाण बोलत्यात... काय कळत न्हय बघा मोठ्या माणसाचं ते एक बर जावई तिच्याबर हायती... पोर न्हय तर बोलावलं न्हाय आपल्याला कधी ना आपण बोलवून ते आले आपल्याकडं. "आशा विचार करत बोलत होती.
"अग एवढ्या आनंदाच्या येळला कशाला तर्क लावतीयास बघू नंतर ... थांब मी वास्तदना ही बातमी देतो लई खुश व्हत्याल बघ एकून..." दादा घराच्या भायर पडलं. चिनू मात्र तिच्या विचारात गुंग झाली.
"चिनू ए चिनू... "चिनूचे लक्ष नाही हे बघून आशेने परत तिला हलवले.
"काय आई?"
"कसल्या एवश्य ईचारात गुंग झालीस? बघ मला सांग काय वावग घडत न्हय न? मला कसली हुरहूर लागली कळना... ताई रोज बोलती न तुझ्याशी नीट..."
"व्हय आई नीट बोलती अन काळजी नको करू समद नीट हाय... तू ठेवती देवापुढ साखर का मी ठिवू.."
"न्हय मीच ठिवते, संतु ला फोन कर अन पेढ आणायला सांग.."
"व्हय आई..."चिनूने संतुला फोन करून सगळं सांगितले. तिला आईशी बोलताना किती जड जात होते पण ती तायडीचा शब्द पळत होती. तिच्या या कोंपिटीशनमध्ये चिनूला काहीही अडचण नको होती.
तिने विचार केला आणि ऋषीला फोन लावला.
"हा चिनू आत्ता वाहिणीसोबत बोलत होतो. काय न्युज दिली. ग्रेट आहे वहिनी..."
"पण तुमच्या दादाचं???"
"दादाचा काय? तो नाही पोहचला फायनलला...हे बघ शेवटी कष्ट आणि नशिबाचा भाग असतो. तिथं आपण काहीच करू शकत नाही."
"फोन केला त्यांना?"
"हो केला पण आर्याने उचलला. बहुदा तो त्यांच्याकडे राहतो अस मला वाटतय करण तो भूषण दादाशीसुद्धा बोलत नाही. बऱ्याच वेळा भूषणदादा स्वतः फोन करून त्याला समजावतो. भूषणदादाला अजून वाटत की तो ऐकेल त्याचं... अस नको व्हायला की तो मित्राच्या नात्यात कुठं कमी पडलाय..."
"पण ताई डीओर्स पेपर तयार करती.. ही टुर्लमेंट झाली की ती गावाला येऊन आई दादांना सगळं सांगणार हाय आणि रीतसर डीओर्सचे पेपर दाजींना पाठवणार हाय... तिला वाटतय की दाजी आणि आर्या मध्ये काहीतरी सुरू हाय..."
"मी फोन केला तेंव्हा आर्याने उचलला होता मी जास्त काही बोललो नाही पण दादाने परत फोन केला नाही. अजून वेळ गेली नाही चिनू दादाने स्वतःहून वाहिनीकड जायला हवं..."
"न्हाय जाणार दाजी... त्यांना वाटत असत तर कधीच गेले असते." चिनू अस्वस्थ होती.
"चिनू आपण जाऊयात कर्नाटकला वाहिनींची टुर्लमेंट बघायला..."
"खरंच...?
"हो सगळे जाऊ..."
"चालल.." चिनू खूप खुश होती. ऋषीला पण आनंद झाला.


सुलोचनाबाईंना तेजश्रीने क्रांतीच्या सिलेक्शनची बातमी दिल्यावर सुलोचनाबाईंनी देवाला नमस्कार केला. मनोमन ती जिंकावी अशी प्रार्थना केली. संग्राम आणि तेजश्री दोघे खुश होते.
"आई ही गोष्ट आनंद देणारी हाय पण..."
"पण काय? मला म्हायती हाय... त्यानं केला का तिचा इचार मग त्या पोरीं का सहन करायचं, घेतला काडीमोड तरी चाललं मला न्हय वाटत तीन मन मारून आयुष्य त्याच्या गुलामीत राव्ह? का त्याच्याशिवाय समद आयुष्य काढावं..."
"आई तू समजवं त्याला एकल तुझं..."
"बाप सोबत हाय त्याच्या माझं का एकलर तो?"
"आई एकदा बोल.."
"येळ अली की त्याच त्याला समजलं माझी गरज न्हाय समजवायची..."
"पण आत्या एकदा सांगून बघा..." तेवढ्यात संग्रामचा फोन वाजला. ऋषीचा फोन होता.
"व्हय की जाऊ...व्हय मी तेजुला पण घेतो... हा मग तुम्ही इकड या मी ट्रायव्हल बुकिंगच बघतो." संग्रामने आनंदाने फोन ठेवला.
"काय झालं?"
"क्रांतीची टुर्लमेंट बघायला जाऊ म्हणतोय.."
"वा..." तेजश्रीने आनंदाने उडी मारली. तेवढ्यात आबा आले.
"कोणी कुठ जायचं न्हाय..."
"का? वीरच्या निवड झाली न्हय म्हणून? का क्रांती पुढं जाती म्हणून?"
"संग्राम??? आबांशी बोलतोयस"
"मग ? खरं बोललं तर तरास झाला व्हय?"
"संग्राम जा तुम्ही तयारीला लागा... म्या जर खायला प्यायला करती.घेवून जाल मंजि बरोबर.."सुलोचनाने आबांकड बघितलं सुद्धा नाही आणि निघून गेली.
आबांना अतिशय राग येत होता. पण कोणाला बोलत येत नव्हतं.


इकडे वीरला सगळ्या गोष्टी असह्य होत होत्या .
"वीर चिडून काहीच उपयोग नाही. गोष्टी हाताबाहेर गेल्यात. पपांना मी आधीच सांगत होते. की काहीतरी सेटिंग्ज लावा पण एवढ्या ओळखीचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. तिला सिलेक्ट होऊपर्यंत थांबायला नको होतं. आता सेमिफायनलला काही होतंय का बघायला पाहिजे."

"ती जिंकायला नाय पाहिजेत......" वीर हळू आवाजात बोलला.
"नाही जिंकणार.. dont worry..."
"आता तिला जिंकताना मी नाय बघू शकणार.."
"तुला वाटतय ती जिंकेल?"
"हो मला त्रास द्यायला तिला आवडलं म्हणू तरी जिंकलं..."
"वीर त्याआधी आपण लग्न करूयात?"
"काय??"
"होय..."
"न्हाय हे शक्य न्हाय..."
"का? का? शक्य नाही. वीर मी तुझ्या घरी आले होते तेंव्हा तू मला म्हणाला होतास की , आत्ता हे सहज होऊ देत सगळं माझा बदला मला घेऊ देत मग बघू काय करायचं आता मला साथ दे... मी दिली..."
"मग???"
"मग काय वीर ... त्या वेळी मी हवं ते करू शकले असते. अन थाच वेळी तुझ्याशी लग्न केलं असतं." वीर हसला.
"वीर तू हसतोयस... म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस.."
"मला म्हायती न्हाय मी काय करणार हाय..."
"म्हणजे... तुझं क्रांतीवर प्रेम आहे का?"
वीरने आर्याकडे बघितले सुद्धा नाही तो उठला आणि बाहेर पडला.

गार्डन मध्ये जाऊन शांत बसला. त्याला पहिल्या भेटीपासून क्रांती आठवत होती.
डोळे झाकून तो सगळे प्रसंग आठवत होता. तिचा माझ्यासोबत लग्नासाठी नकार, ते पहिली रात्र...
"पण मी का आठवतोय सगळं... ती माझ्यापासन लांब जाती ते एका अर्थाने बर हाय... मग मला आर्याशी का नाय लग्न करायचं? रोज मी क्रांतीला का आठवतो. मी खरंच प्रेमात पडलोय का परत..."
आर्या मागून येऊन उभी राहिली होती.
"वीर तू मला नकार देतोयस का? म्हणजे तू क्रांतीच्या प्रेमात पडला आहेस. पण तू प्रेमात तिच्या नाही माझ्या पडायचं तुला पाडाव लागेल. नाहीतर त्याचे परिणाम तुला माहीत आहेत."
"आर्या मला धमकी नको दिउस तुला मी कधीच कोणतं वचन दिल नव्हतं... की मी तुझ्यावर प्रेम करतोय अस म्हणलो नव्हतो. मी फक्त क्रांतीचा बदला घेण्यासाठी तिच्याशी लग्न करतोय एवढं सांगितलं व्हत. तू माझं काय बिघडवणार ? आणि बिघडव बिघडवायच असलं तर मी त्यासाठी पण तयार हाय.."

वीर तिथून परत उठला नी त्याच्या रूमवर गेला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत