हनिमून इन नैनीताल Kalyani Deshpande द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हनिमून इन नैनीताल

केदार ट्रॅव्हल्स ची नैनीताल हनिमून स्पेशल टूर बुक करून रजत घरी परतला. अगदी उत्साहाने त्याने रियाला बुकिंग तिकिट्स दाखवले. रियाने अतिशय आनंदाने रजतला मिठी मारली.


रजत महाजन एक तीस वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर मुंबईतील एका आय टी कंपनीत काम करणारा. आठ दिवसांपूर्वीच त्याचं लग्न त्याच्याच कंपनीत ग्राफिक्स डिझायनर असलेल्या अठावीस वर्षाच्या रिया देसाई शी झालं होतं. दोघांचे अरेंज मॅरेज होते. कोणालाही ऐकून कमाल वाटायची की एकाच कंपनीत काम करून दोघंही आधी एकमेकांना ओळखत नव्हते. रीतसर 'अनुकूल ' विवाह संस्थेत नाव नोंदवून तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती त्यानंतर त्यांना कळले की ते गेल्या चार वर्षांपासून एकाच कंपनीत कामाला होते म्हणून.


दोघांच्या पत्रिका उत्तम जुळल्या आणि अर्थात स्वभावही.

मूळचे विदर्भातील असलेले रजत-रिया ह्यांचे लग्न धुमधडाक्यात वर्ध्याला संपन्न झालं.


आता दोघेही आठ दिवसात नैनीताल ला हनिमून टूर ला जाणार होते.


नागपूरला राहणारा, टेक्सटाइल कंपनीत काम करणारा रंजन पटेल आणि त्याची बायको किया पटेल ह्यांनी त्यांच्या सेकंड हनिमून ला नैनीताल ला जायचे ठरवले. केदार ट्रॅव्हल्स मधून ऑनलाइन बुकिंग सुध्धा झाली.

पस्तीस वर्षांचा रंजन ने त्याच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच चोवीस वर्षांचा कियाला तिच्या वाढदिवसाला नैनीताल ची ट्रीप गिफ्ट करायचं ठरवलं होतं.

वयाच्या बत्तीसा व्या वर्षी काही आजाराचे निमित्त करून रंजन ची पहिली बायको निजधामास गेली होती. त्यानंतर त्याच्या रुक्ष आयुष्यात कियाने आगमन करून त्याचा संसार फुलवला होता. रंजन कियाचे सुध्धा अरेंज मॅरेज च होते.


पुण्याला राहणारा एक चाळीस वर्षांचा कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन नायर आणि त्याची पस्तीस वर्षांची डेंटिस्ट पत्नी नमिता नायर ह्यांना त्या दोघांच्या आईबाबांनी त्यांच्या पाचव्या लग्नाच्या वाढदिवसाला केदार ट्रॅव्हल्स चे तिकीट्स देऊन नैनीताल ट्रीप गिफ्ट केली.


मुंबईत राहणारी बावीस वर्षांची मोनिषा चटर्जी आणि तिचा तीस वर्षांचा सायकॉलॉजी चा प्राध्यापक नवरा शशी चटर्जी त्यांच्या हनिमून ला जाण्यासाठी सज्ज झाले होते. स्थळ अर्थातच होते नैनीताल आणि केदार ट्रॅव्हल्स मधून च ते जाणार होते.


तेवीस जानेवारी 2024 ला तो दिवस उजाडला. केदार ट्रॅव्हल्स चे नैनीताल टूर ला जाणारे सगळे प्रवासी मुंबई विमानळावर जमा झाले. सगळ्या प्रवाशांना घेऊन विमान ने टेक ऑफ केलं. सगळे अगदी उत्साहात होते आणि एकदाचे नैनीताल ला सगळे पोचले.


केदार ट्रॅव्हल्स ने प्रवाशां च्या राहण्याची सुविधा ब्ल्यू क्रिस्टल ह्या महागड्या हॉटेल मध्ये केली होती. सगळे प्रवासी आपापल्या नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये निघून गेले.


संध्याकाळचे आठ वाजले होते डिनर ची वेळ झाली होती. सगळे हनिमून कपल्स एकमेकांमध्ये रमून गेले होते. सगळ्यांना डिनर साठी आमंत्रित केल्या गेलं. सुभाष आणि त्याचा असिस्टंट सूरज हे टूर गाईड होते.


रजत रिया,रंजन - किया, रोहन नमिता आणि शशी मोनिषा डिनर घेण्यासाठी डायनिंग एरिया मध्ये गोळा झाले. रजत एकटक रियाकडेच बघत होता. रिया लवेंडर कलर च्या लाँग, स्लिव्ह लेस गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत होती. तर रजत ने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती. रिया सगळीकडे बघत बघत चालत होती. मोनिशा च्या गोऱ्या रंगावर निळा टॉप आणि काळी शॉर्ट्स खुलून दिसत होती तर शशिने मोरपंखी टीशर्ट आणि डेनिम ब्ल्यू जीन्स घातली होती. इकडे रोहन पिवळ्या शर्ट मध्ये हँडसम दिसत होता तर नमिता सोनेरी पारदर्शक साडीत नटली होती. कियाने लाल रंगाची साडी नेसली होती तर रंजन ने काळा सुट घातला होता. सुबक ठेंगण्या कियाकडे स्त्री पुरुष सगळ्यांच्या नजरा वळत होत्या. किया अत्यंत मोहक दिसत होती. ती तिच्या पाणीदार डोळ्यांच्या दाट पापण्या फडकावत सर्वत्र बघत होती.


सगळे हनिमून couples उत्साहात आणि आनंदात वावरत होते. सगळेजण एकमेकांशी ओळख करून घेत,गप्पा मारत ब्ल्यू क्रिस्टल मधील रुचकर जेवणाचा आस्वाद घेत होते.


बोलता बोलता कियाची नमिताशी ओळख झाली.


"हॅलो यू आर लूकिंग सो एलिगंट बाय द वे आय एम नमिता"


"थँक्यू नमिता फॉर द कॉम्पलिमेंट. आय एम किया "


"तुमचं नुकतंच लग्न झालं वाटते",नमिता


"नाही दोन वर्षं झाले, आज इथे आम्ही आमच्या सेकंड हनिमून ला आलोय",किया


"आम्हाला आमच्या आईबाबांनी ही ट्रिप गिफ्ट दिलीय",नमिता हसत म्हणाली.


तिकडे रंजन रजत शी बोलण्यात मग्न होता पण रजत रिया कुठे गेली हे बघण्यात मग्न होता.


रोहन ड्रिंक घेताना एका कोपऱ्यात उभे राहून नमिता आणि किया कडे बघत होता.


मोनीशा शशी ला अखंड बडबड करून बिझी ठेवत होती.


हॉटेल मध्ये डिनर झाल्यावर सगळ्यांसाठी ऑर्केस्ट्रा ची व्यवस्था करण्यात आली होती.


स्टेज वर सगळे कलाकार जमले होते तर स्टेज खाली मध्यभागी शेकोटी पेटवली होती.


सगळेजण गोलाकार शेकोटी भोवती बसले होते. नमिता ने अंगाभोवती शाल लपेटली.

कियाला थंडी वाजू लागली त्यामुळे रंजन ने तिला त्याचा सूट दिला. रजत रिया ने स्वेटर घातले तरीही ते एकमेकांच्या आणखी जवळ सरकून बसले. हवेतील गारठा कमालीचा वाढू लागला.

मोनिषाचे दातावर दात वाजू लागले, तिने शॉर्ट्स घातल्यामुळे ती कुड कुडू लागली. तिने शशिकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली. मोनिषाने त्याच्याकडे बघितलं आणि तिला थोड्या वेळापूर्वी चे संभाषण आठवले.


"तू एवढ्या थंडीचा हा ड्रेस घालणार आहे", शशी आश्चर्याने म्हणाला.


" मग काय झालं? मला मुळीच थंडी वाजत नाही.", मोनिशा बेफिकिरी ने म्हणाली.


आणि आता थंडीने तिची वाट लागली होती. नाराजीनेच शशी उठला आणि आपल्या रूम कडे जाऊ लागला. त्याने रूम 205 चे लॉक उघडले त्याने बॅग मधून मोनिष चे स्वेटर घेतले आणि तो पुन्हा लॉक लावून जायला वळला तेवढ्यात त्याला हसण्याचा आवाज आला त्याने इकडे तिकडे पाहिले पण त्याला कोणी दिसले नाही. कुण्या स्त्रीचा आवाज होता तो.

सगळे तिकडे शेकोटी भोवती जमले असताना इथे एखादी स्त्री काय करत असेल असा विचार करून तो पुढे जाऊ लागला, जसा तो पुढे गेला तसा हसण्याचा आवाज मोठा झाला आणि त्याबरोबर उग्र अत्तराचा दर्प दरवळला. त्याला अतिशय विचित्र वाटलं तो घाईघाईत शेकोटी जवळ आला आणि त्याने मोणिषा ला स्वेटर दिले. तिने नजरेनेच त्याचे आभार मानले.


स्टेजवर गायक आणि गायिका मंडळी रंगात आले होते. एकेक रोमँटिक गाणे सुरू होते. रॉकी नावाचा प्रसिद्ध सिंगर on demand गाणे म्हणत होता.


रोहन ने फर्माईश केली किशोर कुमारचे गीत, ऐसे ना मुझे तुम देखो आणि रॉकी ने ताल धरला.

रॉकी मन लावून गाणे म्हणू लागला. सगळे हनिमून couples गाण्यावर डोलू लागले,कोणी एकमेकां कडे बघून गुण गुणू लागले. काही हौशी जोड्या नाचू लागल्या. त्यात रंजन आणि किया नाचू लागले. नमिता रोहन ला शोधू लागली पण रोहन गेला होता कुठे?


रोहन होता डायनिंग हॉल मध्ये ड्रिंक्स घेत आणि नृत्य करणाऱ्या कीयाकडे विचित्र नजरेने बघत. सगळ्या जोड्या एकमेकांच्या सोबत मग्न असताना नमिता शेकोटी कडे बघत एकटीच बसली होती. तिला रोहन चे कारनामे माहीत असल्याने आताही तो असाच कशात तरी बिझी असेल हे तिने ओळखले आणि म्हणूनच ती नाराज झाली. रोहन च्यां आणि माझ्या आईबाबांना काहीतरी गरज होती का आम्हाला ह्या ट्रिप ला पाठवायची? काय उपयोग झाला? पैसा देऊन मनस्ताप मात्र झाला.


तेवढ्यात नाचता नाचता रंजन च्या छातीत अचानक दुखू लागलं.


" काय झालं रंजन तुला", कियाने काळजीने विचारले


पण छातीत जास्त दुखत असल्याने तो बोलू शकला नाही. इतर जोडप्यांना ते लक्षात आलं. कोणीतरी हात दाखवून गाणे थांबविले. अचानक गुलाबी थंडीत वातावरण गंभीर झालं. आता काय होते असं वाटून अनेकांना घाम फुटला.


" अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा",कोणीतरी ओरडले.


काहीजण हॉटेल मॅनेजर ला बोलवायला धावले. नमिता रोहन ला शोधू लागली तेवढ्यात तिला तो डायनिंग हॉल मधून घाईघाईने येताना दिसला.


रोहन चल लौकर त्या कियाच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला वाटते, नमिता म्हणाली.

रोहन घाईघाईत रंजन जवळ गेला त्याला त्याने तपासले आणि म्हणाला, "आपल्याला याला ह्याच्या खोलीत न्यावे लागेल. दोन जणांनीं मिळून रंजन ला त्याच्या खोलीत नेले. तिथे रोहन ने त्याच्या छातीला हलकामसाज दिला आणि एक गोळी दिली आणि तो म्हणाला,"रंजन तुला काहीही झाले नाही फक्त गॅसेस चा त्रास झाला बाकी काही नाही. आता तुला गोळी दिली आहे थोडा डाव्या कुशीवर पड, थोड्यावेळाने तुला बरे वाटेल." हे ऐकून सगळ्यांना हायसे वाटले. कियाचा जीव भांड्यात पडला. किया रंजन जवळ रूम मध्येच थांबली. रोहन ने तिच्या खादयावर थोपटून, " टेक केअर kiya" असे म्हंटले. ते म्हणत असताना रोहन कियाकडे बघून विकृत हसला. कियाला थोडं ते ऑड वाटलं. नमिताने रोहन कडे रागाने पहिले.


सगळेजण पुन्हा शेकोटीजवळ जमले आणि गाण्याचा प्रोग्राम पुन्हां सूरू झाला.


रजत रियाचे डुएट सुरु झाले, भिगी भिगी रातो मे आणि सगळ्यांनी शेकोटी भोवती फेर धरला. रात्रीचे अकरा वाजायला आले होते. गारठावून टाकणारी थंडी आणि शेकोटीची उब सगळ्यांना सुखावून टाकत होती. तेवढ्यात वेटर सर्वांसाठी चहा घेऊन आला. सगळ्यांनी त्याला जिओ मेरे भाई असा आशीर्वाद देऊन टाकला.


चहा पिल्यावर झोप उडण्या ऐवजी नमिताला झोप येऊ लागली.


"रोहन मला खूप झोप येतेय मी खोलीत जाते तू येतोस कि थांबतोस?"


"तू हो पुढे मी येतोच दोन चार गाणे ऐकून", रोहन उत्साहाने म्हणाला.


नमिता तिच्या रूम नंबर 206 मध्ये गेली आणि जाऊन झोपली. थोड्याच वेळात रोहन उठून रूम नंबर 204 कडे जायला लागला. त्याने दारावर टाकटक केले. थोड्याच वेळात दार उघडले आणि रोहन बघताच राहिला. समोर निळ्या सॅटिन च्या नाईट ड्रेस मध्ये किया उभी होती आणि ती अत्यंत आकर्षक दिसत असून हसत होती. रोहन ला ते पाहून आश्चर्य वाटले आणि कमालीचा आनंद झाला. रोहन रूम मध्ये शिरला आणि कियाने दार लावून घेतले.


कियाने रोहन ला बोन फायर जवळच्या आराम खुर्चीत बसवले. रोहन तिच्याकडे भारावून पाहू लागला. कियाने त्याच्या कडे अश्या दृष्टीने पाहिले कि तो विरघळू लागला.


" थांब मी फ्रेश होऊन येते ", किया पुटपुटली आणि वॉशरूम कडे जायला वळली.


रोहन मनोमन खुश झाला आणि आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं कि किया त्याला बघितल्यावर आश्चर्यचाकीत होईल आणि मग तिला रंजन च्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपण आलो असे सांगावे लागेल आणि सोबत आणलेला चहा तिला द्यावा लागेल ज्याने काम सोपे होईल. पण.. पण... हे काय झाले किया आधीच सगळं माहित असल्यासारखी तयार होती. व्वा! कियाला सुद्धा ह्या रोहन ची भुरळ पडलेली दिसतेय असा विचार करत रोहन समोरच्या आरशात स्व्वतःचे प्रतिबिंब मोठ्या दिमाखात पाहू लागला. तेवढ्यात वॉशरूम चे दार उघडले आणि त्याला आरश्यात दिसलें ते पाहून त्याच्या अंगावर शहारा आला. त्याने गरकन मान वळवून मागे पहिलं आणि तो डोळे फाडून पाहतच राहिला.


कियाच्या अंगावर निळा सॅटिन चा गाऊन नव्हता.

कियाला त्या अवस्थेत पाहून रोहन ताडकन उठून उभा राहिला.

त्याच्या अंगभर सरसरून काटा आला.

.

.

.

.

.

कारण.... कारण.....

किया तिथे नव्हतीच तिथे होतं एक सहा फूट उंचीचे काळं ओंगळवाणे अस्वल ज्याचे सुळे बाहेर आले असून पुढे आलेले पांढरे डोळे होते.

आणि हळूहळू तो रोहनच्याच दिशेने सरकत होता. रोहन हळूहळू मागे मागे सरकू लागला.


हे कोण आहे.... किया कुठे गेली..... अस्वल भेसूरपणे हसू लागले आणि वेगात रोहन जवळ आले आणि अस्वलाने रोहन ला आपल्या बाहूपाशात घेतले. रोहन ने मोठ्ठी किंकाळी फोडली आणि तो धाडकन खाली पडला.

त्या पाठोपाठ खोलीतील दिवे लागले आणि हास्य कारंजे उडाले.

रजत रिया मोनिषा शशी रंजन किया नमिता सगळेच हसू लागले.


अस्वलाच्या पोशाखातील वेटर नमिता कडून पैसे घेऊन निघून गेला. रोहन ला लगेच शशी आणि रजत ने त्याच्या रूम मध्ये नेऊन बेडवर झोपवले. थोडं पाणी तोंडावर शिंपडल्यावर रोहन ला शुद्ध आली. सगळ्यांना आपल्या रूममध्ये पाहून तो थोडा हबकला.


"अरे रोहन काय झालं होतं तूला?", रजत रिया


"आम्ही किती काळजीत होतो", किया रंजन


"आता बरे वाटतेय न?", शशी मोनिषा


"पण तू कियाच्या म्हणजे रंजन कियाच्या रूम मध्ये काय करत होतास", नमिताने ओरडून विचारले.


नमिताचा रोख बघून आणि सगळ्यांना असं आपल्या रूममध्ये आलेलं बघून रोहन कमालीचा खजिल झाला.


" अगं मी रंजन ची चौकशी करायला गेलो होतो ", रोहन कसाबसा सगळ्यांची नजर चुकवून म्हणाला.


" पण मग तिथे बेशुद्ध कसा झाला? ", नमिता


"काय माहित? काहीतरी विचित्र दिसलं मला त्या खोलीत. ती खोली बाधित आहे.", रोहन ला भर थंडीत दर्दरून घाम फुटला.


"काय दिसलं तुला तिथे?", नमिता हसू दाबत विचारत होती.


"काही सांगता येणार नाही पण ती रूम हौन्टेड आहे एवढं नक्की.", रोहन


"ठीक आहे बरं झालं तू आम्हाला सांगितलं, आता मॅनेजर ला सांगून आम्ही ती बदलून घेतो.", रंजन म्हणाला.


त्यानंतर सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन गुडूप झाले. सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळेस, लंच आणि डिनर च्या वेळेस आणि साईट सीन च्या वेळेस सुद्धा नमिताने पाहिलं रोहन घाबरत घाबरत सगळीकडे पाहत होता फक्त कियाला सोडून. तिच्याकडे तर तो डोळा वर करून बघत नव्हता. सगळ्यांचे सगळे दिवस मस्त गेले, सगळ्यांनी छान एन्जॉय केल. त्या रात्री पुन्हा गाण्याचा कार्यक्रम शेकोटी सगळं होतं. सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद लुटत होते. कोणी जोडपे शेकोटी जवळून हलत नव्हते तर कोणी जोडपे एवढ्या थंडीत आईसक्रीम खात होते. रजत रियाने कह दू तुम्हे या चूप रहू असं पुन्हा एकदा एक छान गाणे म्हंटले.

त्यानंतर शशी मोनिशाचा छान डान्स झाला आणि शेवटी ऑन डिमांड गाण्यांची मैफल सुरु झाली. नमिताने गाण्याची फर्माईश केली आणि गायक हेल काढत काढत गाऊ लागला,


मुझे मेरे बीवी से बचाओ.........


गाणे सुरु असताना तिला त्या रात्रीचे प्रसंग आठवले. तिने रंजन ला चेस्ट पेन सुरु झाल्यावर रोहन ने त्याला कोणती गोळी दिली ते पाहिलं होतं त्यानंतर तीच गोळी तिच्या चहात मिक्स केलेली तिने पाहिलं होतं. तिला रोहन काय करणार ह्याचा अंदाज आला असल्याने तिने एक प्लॅन आखला त्यात तिने सगळ्यांना म्हणजे रजत रिया, रंजन किया, शशी मोनिषा आणि हॉटेल मधील सहा फुटी वेटर ह्यांना सामील करून घेतले. सगळ्यांनी प्लॅन यशस्वी केला.

टूर संपल्यावर तिने सगळ्यांना धन्यवाद दिले.

पण ह्या सगळ्या भानगडीत एक गोष्ट राहिलीच ती म्हणजे शशीला त्या रात्री जो स्त्रीचा हसण्याचा आवाज आला होता आणि उग्र दर्प आला होता तो कशाचा होता???


शशी तर तो आवाज विसरला,पण म्हणून काय झाले? आजही त्या झाडाखालून गेलं कि तोच हसण्याचा आवाज येतो आणि पाठोपाठ येतो उग्र दर्प....त्या दिवशी शशीला त्या झाडाच्या पारंब्या वाटल्या कारण तो घाईत होता पण जर त्याने वर पाहिलं असतं तर त्याला कळलं असतं कि त्या पारंब्या नसून एका उलट्या लटकलेल्या हडळीचे केस होते.

शशीचे नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला नाहीतर....... त्या उग्र वासाने जसा एका वर्षांपूर्वी एका हनिमून कपल चा गुदमरून मृत्यू झाला होता तसा त्याचाही झाला असता.

💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀