व्यापारी म्हणाला येथे खुप ठिकाणी चहा मिळतो. मुलगा म्हणाला आपण क्रिस्टल ग्लास मधून चहा देऊया, लोक चहाचा आस्वाद घेतील आणि ग्लास विकत घेण्यास तयार होतील. लोक नवीन व छान काही दिसले की खुश होतात.
व्यापारी यावर काही बोलला नाही. त्या दिवशी दुकान बंद झाल्यावर व प्रार्थना म्हणून झाल्यानंतर हुक्का पित असताना व्यापाऱ्याने मुलाला बोलावले व विचारले तुझ्या मनात तरी काय आहे ?. मुलगा म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मला मेंढ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी पैसे मिळवावे लागतील. व्यापाऱ्याने एक मोठा झुरका घेतला व म्हणाला मी हे दुकान तीस वर्षे चालवतोय. मला क्रिस्टल बाबत पूर्ण माहिती आहे . लोकांना हे नक्कीच आवडेल. पण क्रिस्टल ग्लास मधून चहा दिला तर आपले दुकान मोठें होईल आणि मला माझी जीवनशैली बदलावी लागेल. मुलाला म्हणाला मग ते चांगले नाही कां ?.
किमयागार -बदल -
मला गोष्टी आहेत तशाच बऱ्या वाटतात. व्यापारी म्हणाला. तू येण्यापूर्वी मला असे वाटत असे की मी याच भागात राहून माझा वेळ फुकट घालवला, माझे काही मित्र येथून गेले, काही श्रीमंत झाले तर काही आतबट्टयात गेले. पण आता मला वाटते की हे अगदीच वाईट नव्हते, आता दुकान जेवढे मोठे व्हावे असे मला वाटत होतं तेवढे आहे. मला बदल फारसे आवडत नाहीत, कारण बदलांना सामोरे कसे जावे ते मला कळत नाही. जसे आहे तसेच राहवे असे मला वाटते. मुलाला काय बोलावे हे समजत नव्हते. व्यापारी पुढे म्हणाला, तुझे येणे हे मला भाग्यकारक ठरले आहे. मला आता लक्षात येते आहे की आशिर्वादाकडे दुर्लक्ष केले तर तो शाप ठरू शकतो. मला जीवनात फारशा काही अपेक्षा नाहीत. पण मला कधी कल्पना नसलेली अशी क्षितिजे व धनाची अपेक्षा दाखवणाऱ्या गोष्टी करण्यास तू मला प्रवृत्त करत आहेस.
आणि आता त्या पाहिल्यानंतर किती शक्यता असतात तेही कळले. पण मला माझ्या मर्यादा माहित आहेत व काय करू शकतो ते माहित आहे.
मुलाच्या मनात आले आपण तरिफामधील बेकरीवाल्याला काही सांगितले नाही हेचं बरे झाले.
किमयागार -प्रगती
ते दोघे हुक्का पित थोडा वेळ शांत बसले. ते अरबी भाषेत बोलत होते आणि मुलाला याचा आनंद होत होता की तो अरबी भाषेत बोलू शकत होता.
एक काळ असा होता की त्याला वाटत असे त्याच्या मेंढ्याच जगातील माहिती असाव्या अशा गोष्टी शिकवू शकतात.
पण मेंढ्या अरबी भाषा शिकवू शकल्या नसत्या. मेंढ्या इतरही काही गोष्टी शिकवू शकल्या नसत्या , त्यांना फक्त चारा पाणी समजते.
खरेतर मला मेंढ्या शिकवत नव्हत्या तर मी त्यांच्याकडून शिकत होतो.
विचार चालू असताना व्यापारी म्हणाला
" मक्तुब ".
म्हणजे काय ? मुलाने विचारले. ते कळायला तुला अरबस्तानात जन्म घ्यावा लागेल. पण तुझ्या भाषेत आपण म्हणू शकतो " हे ठरलेलेेच ( नशिबात लिहिलेलंच) असते. " आणि हुक्का पिता पिता त्याने मुलाला चहा विक्रीसाठी परवानगी दिली. नदीचा प्रवाह थांबवणे काही वेळा शक्य नसते.
काही लोक वर आले , ते थकले होते , त्यांना क्रिस्टल मधून चहा देणारे दुकान दिसले. ते चहा प्यायला आले.
एक म्हणाला माझ्या बायकोने असा कधी विचारही केला नसेल व म्हणाला मी क्रिस्टल ग्लास घेतो, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत ते हे सुंदर ग्लास बघून खुश होतील.
दुसरा म्हणाला या ग्लास मुळे चहाची चव ही छान वाटत आहे.
ही बातमी लगेचच सगळीकडे पसरली आणि हे जुनं दुकान काय नवीन करत आहे हे बघायला लोक येऊ लागले.
आणि काहीच दिवसात व्यापाऱ्याला आणि दोन नोकर घ्यावे लागले. चहा मोठ्या प्रमाणात मागवावा लागू लागला. आणि बरेच स्त्री पुरुष त्याचे ग्राहक झाले. असे करता करता एक महिना उलटला.