किमयागार - 14 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 14

व्यापारी म्हणाला, मला कधी असे वाटलेच नाही की कोणी वाळवंट पार करून पिऱ्यामिड बघायला जाईल. ते दगडाचे ढिगारे आहेत. तुम्ही तसे आपल्या घराच्या मागे बांधू शकता.
तुम्ही कधी प्रवासाचे स्वप्न पाहिलेच नाही का? मुलगा म्हणाला, पण इतक्यात एक गिह्राईक आल्याने बोलणे थांबले. दोन दिवसांनी व्यापाऱ्यानी परत शोकेसचा विषय काढला. मला बदल फारसे आवडत नाहीत. आपण काही त्या हसन सारखे श्रीमंत नाही, त्याने एखादी चुक केली तर त्याला फरक पडत नाही पण आपल्याला चुक महागात पडेल. मुलाला वाटले हे दु:खदायक असले तरी खरेच आहे.
पण तू शोकेस का करू इच्छितोस?. मला लवकर परत जायचे आहे व मेंढ्या घ्यायच्या आहेत. आपण नशीब साथ देत असेल तेव्हा त्याचा फायदा घ्यावा, आणि ते जसे साथ देते तसे आपले प्रयत्न पण चालू राहिले पाहिजेत. यालाच अनुकुलतेचा सिद्धांत म्हणतात.
व्यापारी काहीवेळ शांत बसला. मग तो म्हणाला आपल्याला कुराण दिले आहे. आणि जीवनात पाच कार्य करणेस सांगितले आहे.
तू मला प्रवासाबद्दल विचारलेस, पाचवे कार्य आहे मक्का येथे जाणे.
मक्का पिऱ्यामीडपासून पण खूप दुर आहे. मी तरूण असताना दुकान चालु करण्यासाठी पैसे जमवले व तेव्हा विचार केला की मी श्रीमंत झाल्यावर मक्का यात्रा करेन. पैसे मिळायला लागल्यावर दुकान सांभाळण्यासाठी माझ्याकडे माणूस नव्हता आणि क्रिस्टल फार नाजूक असतात.
आणि मी नेहमी मक्का यात्रा करणारे लोक बघत असतो.
त्यातील काही श्रीमंत असतात, ते नोकर, उंट घेऊन जातात, पण काही माझ्यापेक्षा पण गरीब असतात.
जे तेथे जातात त्यांना आनंद व समाधान मिळते. ते आपल्या घराच्या दारात यात्रेला जाउन असल्याचे दाखविण्याऱ्या वस्तू ठेवतात.
त्यातील एक चांभारकाम करणारा होता, तो म्हणाला यात्रेसाठी वर्षभर चालताना एवढा पण थकवा आला नाही जेवढा टॅंझीअर मधील रस्त्यावर चामडे खरेदी करताना येत असे.
मग आता तुम्ही मक्का यात्रा का करत नाही? मुलाने विचारले.
कारण मक्केला जाण्याचा विचार माझ्या जगण्याचे कारण आहे. हे रोज तेच तेच असणारे दिवस, शेल्फ वरची क्रिस्टल, कॅफेतील तेच ते सकाळचे व रात्रीचे जेवण असे जीवन घालवण्यासाठी ती इच्छा मला प्रेरणा देते. माझे स्वप्न सत्यात उतरले तर माझ्या जीवनाला कारणचं राहणार नाही. तू मेंढ्या व पिऱ्यामीडचे स्वप्न बघतोस, पण तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस. तू तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करतोस. मी मात्र मक्केला जाण्याचे फक्त स्वप्न पाहतोय. त्या दिवशी व्यापाऱ्याने त्याला शोकेस करण्यासाठी परवानगी दिली. प्रत्येकाची स्वप्नं पूर्ण करण्याची पद्धत वेगळी असते. दोन महिने गेले. शोकेसमुळे गिह्राईक वाढले होते. मुलाने हिशोब केला की अजून सहा महिने काम केल्यानंतर तो परत जाण्याईतके व साठ मेंढ्या घेण्याइतके पैसे जमवू शकेल. एका वर्षात तो कळप दुप्पट करेल आणि अरबांबरोबर व्यवसाय करू शकेल कारण आता त्याला अरबी भाषा येऊ लागली होती. मार्केट मधील त्या दिवसानंतर त्याने 'उरीम' आणि थुम्मीम चा वापर केला नव्हता कारण आता इजिप्त हे एक स्वप्नचं होते, जसे व्यापाऱ्याचे दृष्टीने मक्केला जाणे. आता मुलगा आनंदी होता आणि तरिफाला परत जाण्याच्या दिवसाची वाट पहात होता.
" आपल्याला काय हवे आहे हे कळणे महत्वाचे आहे". राजा म्हणाला होता. मुलाला आता ते कळले होते आणि तो आता त्याप्रमाणे काम करू लागला होता.
त्याला आता स्वतः बद्दल विश्वास निर्माण झाला होता. तो बऱ्याच नवीन गोष्टी शिकला जसे की क्रिस्टलचा व्यापार, शब्दरहित भाषा आणि शकुन. एकदा दुपारी एक माणूस टेकडीवर आल्यावर म्हणाला , येथे एकही चांगले पेय चहा वगैरे मिळणारे दुकान नाहीये.
मुलगा व्यापाऱ्याला म्हणाला, आपण टेकडीवर येणाऱ्या लोकांसाठी चहाचे दुकान काढूया.
व्यापारी म्हणाला येथे खुप ठिकाणी चहा मिळतो. मुलगा म्हणाला आपण क्रिस्टल ग्लास मधून चहा देऊया, लोक चहाचा आस्वाद घेतील आणि ग्लास विकत घेण्यास तयार होतील. लोक नवीन व छान काही दिसले की खुश होतात.