किमयागार - 18 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 18

त्याने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचा बराच भाग ' परीस ' शोधण्यात घालवला होता.
त्याने जगातील मोठ्या वाचनालयात अलकेमीची पुस्तके वाचली होती, विकत घेतली होती. त्यातून त्याला कळले होते की, एक अरब अल्केमिस्ट , जो दोनशे वर्षांचा होता त्याला परीस मिळाला होता. अरबस्तानात जाऊन आलेल्या एका मित्राने सांगितले की , अल फायोम वाळवंटात एक अरब आहे, तो कोणत्याही धातूपासून सोने बनवतो तो दोनशे वर्षांचा आहे असे म्हणतात.
हे ऐकून इंग्रजाचा उत्साह अनावर झाला. त्याने आपली सर्व कामे थांबवली व काही पुस्तके घेऊन निघाला आणि तो आता या गोदामात पोहोचला होता.
बाहेर एक मोठा तांडा आला होता आणि तो वाळवंट पार करून जाणार होता व अल फायोमवरून जाणार होता.
इंग्रज मनात म्हणाला, मी त्या अल्केमीस्टला शोधणारचं.
एक तरूण अरब सामान घेऊन आत आला व इंग्रजाला सलाम करून म्हणाला, 'आपण कोठे जाणार आहात?.'
इंग्रजाने वाचता वाचताच उत्तर दिले मला वाळवंटात जायचे आहे. या क्षणाला त्याला (इंग्रज) आता स्वतः च्या ज्ञानाची उजळणी करायची होती, कारण अल्केमिस्टने काही प्रश्न विचारले तर त्याच्या ज्ञानाचा कस लागणार होता.
तरूण अरबाने पण पिशवीतून पुस्तक काढले व वाचन करू लागला. पुस्तक स्पॅनिश भाषेत होते. इंग्रजाला जरा बरे वाटले कारण त्यालाही अरबीपेक्षा स्पॅनिश भाषा चांगली येत होती. आणि हा तरुण जर अल फायोमला जाणार असेल तर त्याला बोलण्यासाठी एक सोबती मिळणार होता. मुलगा पुस्तक वाचता वाचता उदगारला हे खरेच विचित्र आहे. तो परत पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होता. मी दोन वर्षे हे पुस्तक वाचतो आहे पण पहिल्या काही पानांच्या पुढे गेलेलो नाही, जरी आता त्याला थांबवायला तेथे राजा नव्हता.
तो वाचनात मन रमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने घेतलेल्या निर्णयाबाबत तो साशंक होता. पण आता त्याला हे कळले होते की, निर्णय घेणे ही हातात घेतलेल्या कामाची एक सुरुवात असते. माणूस जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचा प्रभाव त्याला अशा ठिकाणी पोहचवत असतो, ज्याचा त्याने निर्णय घेताना विचारही केलेला नसतो.
किमयागार -उरीम थुम्मीम

मी जेव्हा ठरवले की, खजिना शोधायचा तेव्हा मला वाटलेही नव्हते की, मी एका क्रिस्टल दुकानात काम करेन.
आता माझा हा तांड्यात सामील होण्याचा निर्णय माझ्यासाठी काय नवीन दाखवतो पाहू. शेजारी बसलेला इंग्रज पुस्तक वाचत होता, पण तो बोलायच्या मनस्थितीत दिसत नव्हता व मुलगा आत आला तेंव्हा थोडा त्रासलेला दिसत होता.
ते मित्र होऊ शकले असते पण इंग्रजाने बोलणे थांबवले होते. मुलाने पुस्तक बंद केले व खिशातील उरीम, थुम्मीम काढले व खेळू लागला.
तो इंग्रज एकदम ओरडला उरीम, थुम्मीम ! मुलाने दचकून दगड खिशात टाकले. मुलगा म्हणाला, मला ते विकायचे नाहीत. इंग्रज म्हणाला, त्याची फारशी किंमत नाही, ते रॉक क्रिस्टलचे बनलेले असतात व असे लाखो दगड पृथ्वी वर मिळतात, पण काही लोकच हे सांगू शकतात की ते उरीम, थुम्मीम आहेत.
मला हे माहिती नव्हतं की ते इथे मिळतात. मुलगा म्हणाला मला ते एका राजाने दिले. इंग्रज काही बोलला नाही पण त्याने खिशातून दोन दगड काढले, ते मुलाकडे होते तसेच दगड होते. आणि इंग्रज म्हणाला, हे दगड तुला राजाने दिले का?.
किमयागार -शकुन
मला वाटते की, तुम्हाला असे वाटत आहे की, एक राजा माझ्यासारख्या मेंढपाळाशी का बोलेल.
इंग्रज म्हणाला, '
नाही, तसे अजिबात नाही. मेंढपाळांनीच तर प्रथम राजाला ओळखले जेव्हा जग त्याला ओळखण्यास तयार नव्हते, त्यामुळे राजा मेंढपाळाशी बोलेल यात आश्चर्यकारक काही नाही.
मुलाला काही समजतेय की नाही असं वाटून तो पुढे म्हणाला बायबलमध्ये असे लिहिले आहे.
त्यातूनच मला उरिम, थुम्मीम बद्दल माहिती झाली. हे दगड दैवी आहेत. प्रिस्ट याना सोन्याच्या जाकीटात ठेवत असतं.
मुलाला या गोदामात आल्याचा आनंद वाटू लागला. इंग्रज म्हणाला हा एक शुभ शकुन असेल. मुलाला संभाषणात रस वाटू लागला. तो म्हणाला तुम्हाला शकुनांबद्दल कोणी सांगितले. इंग्रज त्याच्या हातातील पुस्तक बंद करत म्हणाला,

" जीवन शकुनांवर तर आधारित आहे".
एक अशी भाषा आहे जी सर्वांना समजते पण ती लोक विसरलेत. मी इतर काही गोष्टी बरोबरच अशा भाषेच्या शोधात आहे. मला अशा माणसाला शोधायचे आहे.
"मी किमयागाराच्या शोधात आहे."

इतक्यात तिथे गोदामाचा मालक आल्यामुळे संभाषण थांबले.
तो म्हणाला, 'तुम्ही दोघे नशीबवान आहात. अल फायोमला आज एक तांडा जाणार आहे.'

"मला इजिप्तला जायचे आहे." मुलगा म्हणाला. 'अल फायोम इजिप्तमध्येच आहे.' गोदाम मालक म्हणाला. 'तू अरब आहेस ना?'.