हा एक शुभ शकुन आहे. अरब बाहेर पडल्यावर इंग्रज म्हणाला. मी योगायोग व नशीब या दोन शब्दांवर ग्रंथ लिहू शकतो. या शब्दांवर सर्वाना समजणारी अशी वैश्विक भाषा लिहिली जाते. तो मुलाला म्हणाला की, आपली भेट तुझ्या हातात उरीम थुम्मीम असतांना झाली हा फक्त योगायोग नाही. त्याने विचारले तू पण अलकेमिस्टला शोधायला चाललास का?
मुलगा म्हणाला मी खजिना शोधण्यासाठी चाललो आहे. त्याला वाटले की हे आपण उगाच बोललो.
पण इंग्रजाला त्यात काही विशेष वाटले नाही, तो म्हणाला मी पण एका अर्थी त्याच शोधात आहे. मुलगा म्हणाला, मला अल्केमी म्हणजे काय तेही माहिती नाही.
तो असे बोलत असतानाच एक मुलगा त्यांना बाहेर चला म्हणून सांगण्यासाठी आला.
ते बाहेर गेले. एक दाढीवाला माणूस बाहेर उभा होता तो म्हणाला
" मी तांड्याचा नेता आहे".
तांडा नेता.
मी ज्याना बरोबर घेऊन जातो, त्यांचे जीवन मरण माझ्या हातात असते. वाळवंट म्हणजे एक लहरी स्त्री आहे, आणि ती माणसाना विचित्र अनुभव देते. तीथे जवळ जवळ दोनशे माणसे होती. उंट, घोडे, खेचर, पक्षी असे जवळपास चारशे प्राणि होते. तसेच दुसऱ्या गृपमध्ये महिला, मुले व काही कमरेवर तलवारी व खांद्यावर रायफली असलेले पुरुष होते. तिथे जरा गोंधळच चालू होता व तांडा मालकाला तो काय म्हणतोय ते कळावे म्हणून दोन तीनदा सांगावे लागत होते.
इथे वेगवेगळे लोक आहेत आणि प्रत्येकाचे देव वेगळे आहेत. पण माझा देव अल्ला असून मी अल्लाहची शपथ घेऊन सांगतो की मी वाळवंटात तुमच्या सुरक्षेसाठी सर्वस्व पणाला लावीन. पण माझी अपेक्षा आहे की, तुम्ही सर्वांनी तुमच्या देवाची शपथ घ्यावी की तुम्ही माझ्या आज्ञा कोणत्याही परिस्थितीत पाळाल. वाळवंटात तसे न करणे म्हणजे मृत्यू ला आमंत्रण देण्यासारखे आहे.
आणि गर्दीतून पुटपुटण्याचे आवाज येऊ लागले.
प्रत्येक जण शपथ घेत होता.
मुलाने जिझसची शपथ घेतली. इंग्रज शांत होता. ही कुजबुज थोडी जास्त वेळ चालली कारण देवाची शपथ घेतल्यानंतर ते आम्हाला सुरक्षित ठेव अशी प्रार्थना करत होते.
नंतर बिगुल वाजला व सर्वजण ऊभे राहिले. मुलगा आणि इंग्रज थोडे घाबरत उंटावर बसले. मुलाच्या मनात आले इंग्रज माणसाने आणलेल्या पुस्तकांच्या बॅगेमुळे उंटावर खुप ओझे होईल, त्याला उंटाची दया आली.
' फक्त योगायोग अशी गोष्ट नसते.' इंग्रज त्यांच्यातले गोदामातले संभाषण पुढे चालू करत म्हणाला.
मी इथे आलो कारण माझ्या एका मित्राने एका अरबाबद्दल ऐकले की जो ..... इतक्यात तांडा चालू लागला आणि इंग्रज काय बोलतोय ते ऐकू येणे अशक्य झाले.
किमयागार - धागा
पण मुलाच्या आता लक्षात आले होते की, तो काय सांगत होता. एक गुढ धागा दोन गोष्टींना एकत्र जोडत असतो. त्याच धाग्यामुळे तो मेंढपाळ झाला होता. त्यामुळेच त्याला एकच स्वप्न परत परत पडले, त्यामुळे तो आफ्रिकेजवळील शहरात आला आणि क्रिस्टल व्यापाऱ्याची भेट होण्याअगोदर त्याच्या जवळचे पैसे चोरीला गेले होते. माणूस आपल्या नियतीला ओळखण्याच्या जवळ जातो, तसे भाग्य मिळवणे त्याच्या जगण्याचे कारण बनते.
तांडा पूर्वेकडे वळला. प्रवास सकाळपर्यंत चालला आणि सूर्य वर आला तेंव्हा थांबला. परत सूर्य खाली आला तसा चालू लागला. मुलाचे आणि इंग्रजाचे फारसे बोलणें झाले नाही कारण इंग्रज त्याचा वेळ पुस्तक वाचण्यात घालवत असे.
मुलगा शांत पणे प्राणी व माणसांचा हा वाळवंटातील प्रवास पाहात होता. ते निघाले तेव्हा पेक्षा आता परिस्थिती बदलली होती. आता शांतता होती. तेव्हा आरडाओरडा, मुलांचे रडणे, मार्गदर्शकांच्या सुचना, बोलणे इत्यादी आवाज होते. वाळवंटात वाऱ्याचा आवाज होता, प्राण्यांच्या पायाचे आवाज येत होते. मार्गदर्शक पण कमीच बोलत होते.
किमयागार - वाळवंट
एक सारवान ( उंट चालक ) म्हणाला, मी अनेक वेळा वाळवंट पार केले आहे. पण वाळवंट इतके मोठे असतें आणि क्षितिज इतके दूर असते की त्यामुळे माणसाला आपल्या खुजेपणाची जाणिव होते आणि त्याला शांत राहवेसे वाटते. मुलाला या बोलण्याचा अर्थ कळला होता, तो जरी यापूर्वी वाळवंटात आला नव्हता तरी तो जेव्हा समूद्र , अग्नी कडे पाहत असे तेव्हा तो त्यांच्या भौतिक ताकदीपुढे मौन होत असे.