किमयागार - 20 गिरीश द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किमयागार - 20

किमयागार - वाळवंट
मी मेंढ्या कडून शिकलो, क्रिस्टल कडून शिकलो आणि आता मला या वाळवंटाकडून पण काही शिकायला मिळणार आहे.
मुलगा विचार करित होता.
वारा काही थांबत नव्हता, मुलाला तरिफामधील पहिला दिवस आठवला.
तो किल्ल्यावर बसला होता आणि वारा झोंबला होता.
अचानक त्याला मेंढ्यांची आठवण झाली. आताही त्या अंदालुसियाच्या मैदानात अन्नपाण्याच्या शोधात फिरत असतील.
त्याच्या मनात आले , आता त्या काही माझ्या मेंढ्या नाहीत, त्या त्यांच्या नविन मेंढपाळाबरोबर रुळल्या असतील आणि कदाचित मला विसरल्या असतील.
तसे असले तरी फारचं छान ! . मेंढ्यासारख्या प्राण्यांना प्रवासाची सवय असते आणि त्यांना पुढे जात राहणे समजते.
त्याच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार आला. त्याला वाटले की तीचे लग्नही झाले असेल. एखादा बेकरीवाला किंवा एखादा मेंढपाळ तीला पुस्तके वाचून दाखवत असेल. तो काही एकटाच मेंढपाळ नव्हता.
किमयागार - सहजज्ञान.
पण सारवानाच्या बोलण्याचा गर्भितार्थ कळल्याने मुलाला बरे वाटले. माणसाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ जोडणारी भाषा त्याला कळायला लागली होती. त्याची आई यालाच सहजज्ञान असे म्हणत असे.
हे सहजज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचे सर्वव्यापी जीवनशक्तीशी एकात्म साधणे आहे. आणि या शक्तीच्या माध्यमातून आपण सर्व एकमेकांशी जोडले जातो. आणि असे म्हणतात की सर्व काही ठरलेलें असते.
जसे लिहिलेले असते तसेच घडत असते आणि म्हणूनच आपल्याला अंत:प्रेरणा (आतून होणारी जाणिव), होत असते. मुलाला क्रिस्टल व्यापाऱ्याचे शब्द आठवले 'मक्तूब.'
सर्व काही आधीच लिहिलेलं असते.. वाळवंटातील रस्ता हा काही ठिकाणी खूप वाळू असलेला तर काही ठिकाणी मोठ्या टेकड्या असलेला होता.
टेकडी लागली तर वळसा घालून जावे लागत असे. पण कधी कधी मोठी व लांब टेकडी असेल तर रस्ता बदलावा लागे.
प्राण्यांच्या खुरांना वाळूचा थर जास्त असणे सोयीचे असते. वाळुचा थर कमी असेल तीथे उंटाना चालणे कठीण होत असे व रस्ता बदलावा लागे.
काही ठिकाणी पाणी आटल्यामुळे जमीनीवर मीठ साचलेले असे.
आणि अशा ठिकाणी प्राण्यांना चालणे कठीण होत आहे असे. माणसांना उंटावरून उतरून उंटावरील सामान पण आपल्या हातात घेऊन चालावे लागत असे .
आणि असा रस्ता संपल्यावर परत सामान उंटावर ठेवावे लागत असे. कांही वेळा मार्गदर्शक आजारी पडत, मृत्यू पावत, तेव्हा त्याच्या जागी दुसरा मार्गदर्शक नेमावा लागे. आणि अशा तडजोडी कराव्या लागत असल्या तरी तांडा होकायंत्र दाखवत असलेल्या दिशेने वाटचाल करत असे.
आकाशातील तारे पाहून पाणी कुठे असावे ते कळे. तारा आकाशात प्रकाशताना दिसला की, पाणी, पाम वृक्ष, राहण्याची जागा कुठे आहे, इतर प्रवासी तांडे भेटतील अशा योग्य रस्त्याने आपण चाललो आहोत असे समजत असे.
इंग्रजाला मात्र या सगळ्यात काही स्वारस्य नव्हते, तो पुस्तके वाचण्यात गुंग असे. मुलाकडे पण प्रवासाच्या सुरुवातीपासून तो वाचत असलेले पुस्तक होते.
त्याला तांड्याचा प्रवास व वाऱ्याचा आवाज जास्त मजेदार वाटत असल्याने त्याने पुस्तक बाजूला ठेवले होते.
मुलाची कल्पना होती की, पुस्तक वाचल्यावर काही नवीन ज्ञान मिळते पण आत्ता तरी त्याला त्याची गरज वाटत नव्हती. सारवानाबरोबर त्याची मैत्री झाली होती व ते रात्री शेकोटी जवळ गप्पा मारत बसत. मुलगा मेंढपाळ जीवनाचे तर सारवान त्याचे अनुभव सांगत असे.
उंटचालक
एक रात्री शेकोटी जवळ बसले असता, तो उंटचालक सांगू लागला. मी अल कैरुम जवळ राहत असे. माझी स्वतःची बाग (शेती) होती. बायको, मुले होती आणि असे वाटत असे की आता यात मरेपर्यंत काही बदल होणार नाही. एका वर्षी उत्पादन भरपूर झाले आणि त्यावर्षी आम्ही मक्का यात्रा केली.
या यात्रेने आयुष्यातील एक कर्तव्य मी पूर्ण केले. आता मी आनंदाने मरू शकेन असे वाटत होते. पण एक दिवस भुकंप झाला, नाईल नदीला पूर आला पाणी किनाऱ्याबाहेर आले. मला असे वाटत असे की असे काही माझ्याबाबतीत घडणार नाही.